Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 21, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through June 21, 2006 « Previous Next »

Moodi
Tuesday, June 20, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माउडी तुझे लाख आभार. एकदम सही पोस्ट.

दिमडू अशा लोकांशी वाद घालता येत नाही कारण पुर्वग्रह दुषीत मने आहेत यांची. केवळ मराठा अन ब्राम्हण हेच दिसतात यांना टिकेसाठी. जसे बाकीचे इतर धर्मीय फार सोवळे.

ह्याच आरक्षणामुळे समाजात जी दरी उभी राहील ती कधीच कमी नाही व्हायची. जात व्यवस्था दूर करण्या ऐवजी अन सगळ्यांना समान न्याय देण्या ऐवजी मते मिळुन आपल्या साती पिढ्या कशा आरामात जगतील हा राजकारण्यांचा डाव.

आर्थिक बाबींचा निकष लावुन करा ना आरक्षण, द्या मदत. मग तो कोणत्याही जाती धर्माचा का असेना. जे मागासवर्गीय आधीच गर्भश्रीमंत आहेत त्यांच्या पोरांना कशाला हवेय आरक्षण? म्हणजे हे काही श्रम न करता केवळ जातीच्या बळावर नोकर्‍या अन शिक्षण मिळवणार. अन जो इतर गटात आहे तो केवळ गरीबीत सडणार.


Limbutimbu
Tuesday, June 20, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> जे मागासवर्गीय आधीच गर्भश्रीमंत आहेत त्यांच्या पोरांना कशाला हवेय आरक्षण?
अग तिथेच तर फरक हे ना! पाणी तिथेच मुरत हे!
एक बामण जरा सुधारला तर तो बामणाच्याच काय इतरजातीच्या शिकाऊ पोरान्नाही कशाना कशा स्वरुपात मदत होइल असे बघत असतो! शेकड्यान्नी उदाहरणे आहेत
अशी उदाहरणे हे देवु शकतात का? आपली तुम्बडी भरुन घेणार्‍यान्नी सन्धीच्या गप्पा मारु नयेत अन येवढ असेल तर ह्यान्च्यातल्या क्रिमी लेअर ने ह्यान्च्यातल्यान्नाच जरुर मदत करावी की! पण नाही ना! मदत केली तर खिशातला पैका जाईल त्यापेक्षा बामणान्विरुद्ध रान उठवुन परस्परम समर्पयामी अस सरकारकडुन कमी मार्कान्च्या मोबदल्यात सगळ फुक्काट मिळवाव ना! हाय काय अन नाय काय त्यात!
अन यातुन काय लफड झालच तर मुठभर बामणच तर चिरडली जातील, येवढ्या शम्भर कोटी लोकसन्ख्ये साडेतीन टक्के बोम्बलले, त्यान्ची माती झाली तर बिघडले कुठे?
प्रेमात, क्रान्तीत अन युद्धात सर्व क्षम्यच नस्ते का?
तर अस हे हे!
चालु द्या!


Samit
Tuesday, June 20, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांजलेले????
कोण????
बघा नक्की कोण किती गांजलेले आहे ते, मग बोला वर्णविग्रहाच्या गोष्टी.


Limbutimbu
Tuesday, June 20, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबानोऽऽ मला एक सान्गा की तो शब्द "गान्जलेले" असा हे की "गन्जलेले" असा हे? (घोर विचारग्रस्त चेहरा)
अन त्या शब्दातल्या "लेले" मधला एक "ले" कटाप करुन उरलेल्या शब्दापुढे "ल्या मनाचे" असा शब्द मी लावु का? (भाबडा चेहरा)
DDD

Moodi
Tuesday, June 20, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या सही पोस्ट. गांजलेल्या मनाचेच म्हणावे लागेल.

Mrdmahesh
Tuesday, June 20, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


गेल्या २५ वर्षांपासून शिक्षणात आरक्षण आहे (हे तर तुम्हाला मान्यच करावे लागेल...) जर शिक्षण (जे नोकरी मिळवण्यासाठी आजकाल आवश्यक झाले आहे..) गरीबांसाठी खुले झाले असेल तर परत नोकरीत (ते ही खाजगी क्षेत्रात) आरक्षण का? अनेक सरकारी खात्यांच्या recruitment drive exclusively for SC/ST/NT/OBC च्या अनेक जाहिराती मी बघितल्या आहेत.. २५ वर्षे शिक्षणात आरक्षण मिळून सुद्धा या लोकांना खाजगी क्षेत्रात गुणवत्ता दाखवून नोकर्‍या मिळवता येऊ नयेत? याचाच अर्थ असा की आरक्षण मिळाले, शिक्षण मिळाले पण "गुणवत्ता" नाही... कारण ती प्रवृत्तीच नाही...
घरोघरी पेपर टाकून शिकणारा सवर्ण मुलगा आज Class II officer आहे (आणि अशी हजारोनी उदाहरणे आहेत)... अशी प्रवृत्ती जर असती तर आज हा प्रश्नच आला नसता..
शिक्षणात, सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण मिळाले म्हणजे समाज सुधारेल अशी स्वप्ने तुम्ही लोकांनी पाहिलीत... किती सुधारला हो हा समाज? खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळावे या मागणी वरूनच लक्षात येते की समाजात अजूनही सुधारणा झालेली नाही.. अजून कुठे कुठे आरक्षण मागणार आहात तुम्ही?
आम्ही शाळेत असताना एखादा विद्यार्थी EBC चा फॉर्म भरायचा, तेव्हाच आम्हाला कळायचे की हा मागासवर्गीय आहे.. तोपर्यंत आमच्या मनातही हे यायचे नाही... म्हणजेच जातीयवादाची बीजे तुम्हीच आरक्षण आणून पेरत आहात...
उगीचच आरक्षणाची भीक मागण्यापेक्षा कष्ट करून शिक्षण मिळवावे, गुणवत्ता दाखवावी अन् स्वत:च्या रहाणीमानात सुधारणा करून समाजात मानाने रहावे (जे अनेक सवर्णांनी केले आहे) हेच उत्तम...
तुम्हाला सवर्णांचा पैसा दिसतो पण त्यामागचे कष्ट दिसत नाहीत..
आरक्षण मागण्यापेक्षा "भाई भाई" करत समाज सुधारण्याचे तुम्ही कार्य(?) करावे.. बाय द वे "तुमच्या" प. बंगालात private sector मध्ये आरक्षण आहे का हो?


Santu
Tuesday, June 20, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या सगळ्यांच्या एक गोश्ट लक्षात येत नाहि का?
आत्ताचे आरक्षण हे काय आम्बेडकर अनुयायांना नाहि.

म्हणजे sc st तर ओबीसी. यांना आहे.म्हनजे माळि कोश्टी यांना.

हे लोक काय त्या अर्थाने दलित म्हनता येणार नाहि.
उलट हे reservation dilute करन्याचा प्रकार आहे.
यानि झाल तर sc st चे नुकसान च होणार आहे.


Divya
Tuesday, June 20, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश छान पोस्ट मला त्या चोराची गोष्ट आठवली त्यात तो शेवटी पकडला गेल्यावर आइ ला काहीतरी सांगायचे आहे म्हणुन आइचा कान चावतो का तर जेव्हा तो पहीली चोरी करतो तेव्हाच जर तिने शिक्षा केली असती तर कदाचित तो आज चोर झालाच नसता.
आज सरकारने या आरक्षण देण्याने त्या वर्गाला अजुनच पंगु करायचे ठरवले आहे, कदाचित ते आज जाणवणार नाही पण जेव्हा लक्षात येइल कि आपले आरक्षणा शिवाय पान हलत नाही आणि कामाच्या बाबतीतही समाधान नाही कारण त्या लेवल ला पोचण्यासाठी खुप झिजावे लागते तिथे हे सहज पोचले तरी ती जागा पेलवेल का हा ही प्रश्न आहेच की. म्हणजे उद्या आरक्षण मिळवुन झालेला डॉक्टर हा डॉक्टर नक्कीच होइल पण चांगला डॉक्टर व्हायला श्रम आणि गुणवत्ता दोन्हीची गरज आहेच. शेवटी प्रॅक्टीस कुणाची चालणार हे ही उघडच आहे ना. मग काय पेशंटवर पण आरक्षण घालणार का? सगळच आरक्षणाच्या बेसिसवर असल्यावर तसेच वाटेल म्हणा.


Limbutimbu
Tuesday, June 20, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> बाय द वे "तुमच्या" प. बंगालात private sector मध्ये आरक्षण आहे का हो?
अरे बाऽऽऽबाऽऽऽ हे काय विचारतोस?
त्याला अस विचार की तुमच्या पश्चिम बन्गाल मधे आणि कोलकत्यात मूळात नव्याने काही Private Sector निर्माण झाला हे का? असलेला टिकलेला हे का? याचे उत्तर हो असेल तर बोम्बलायला शेकड्यान्च्या सन्ख्येने कोलकटीयन्स (नॉत ओन्ली बन्गाली) पुण्या मुम्बै कडे का धाव घेतात?
बोम्बलायला युनिअन काढुन कारखाने बन्द पाडायचे, उरलेल्या बेरोजगारान्ना महाराष्ट्रात पाठवायचे अन मतान्च्या राजकारणाकरता पाकीबन्गाल्यान्च्या घुसखोरीकडे दुर्लक्श करायचे अन जन सामान्यान्ची लक्तरे वेशीवर मान्डीत आम्ही किती गरीब असे म्हणत केन्द्राकडे भीक मागायची, अन मागुन मिळविलेली भीक या ना त्या केवळ्घोषणापटुत्वातुन वाटलेल्या खिरापतीमार्फत स्वतःच लाटायची हा या कम्युनिस्ट बन्गाल सरकारचा आजवरचा धन्दा! अरे मान्जराला वाटते की आपण डोळे मिटुन दुध पितो म्हणजे जगाचेही बन्द असतील!
खर तर या असल्या पोस्ट्स म्हणजे आचरट पणाचा नमुना हेत! एखाद्या तिठ्ठ्यावर दलित वस्तीत अशा पोस्ट्स मधल्या वाक्क्यान्ना खच्चुन टाळ्या पडत असतील! इथे मायबोलीवर टाळ्या अपेक्षित हेत? लालभाई आणि तमाम ब्रिगेड, परी तुम्ही जागा चकलासी हो!
इथे टाळ्याही मिळणार नाहीत अन कुणाचा बुद्धिभेदही होणार नाही भले बुद्धदेव भट्टाचार्य जरी आला समजावयाला!
आयला, मला तर सन्शय येतो हल्ली, की शेजारच्या बिहारी लालुच राजकारण बघुन बघुन हे लाल पावटे बावटे पण तसच राजकारण हल्ली खेळु लागलेत की काय! कारण पाच पन्चवीस वर्षान्पुर्वी पर्यन्त किमान तत्व निष्ठता ध्येय निष्ठता सन्घटन कौशल्य तरी होती त्यान्च्यात! विरोधक देखिल कौतुक करायचे! पण जसा का रशियातला लाल बावटा कोसळला अन अस लक्षात आल की वीस वीस वर्षे राज्य करुन (अन वीस वीस वर्षे एकच मुख्यमन्त्री असल्यामुळे पक्षातील असन्तुष्टान्ची वाढती सन्ख्या बघुन) बन्गाल नि केरळा बाहेर काही हात पसरवता येत नाहीत, तर धीर सुटलेल्या कम्युनिस्टान्च्या गेल्या पन्धरा वर्षातील राजकीय हालचालीन्चा मागोवा घेता असे लक्षात येते की दुसर्‍यान्ना जातियवादी ठरवित सर्वात जास्त धोकादायक धर्मभेदाचे अन हिन्दुधर्मान्तर्गत जातीभेदाचे राजकारणात मुरलेल्या कॉन्ग्रेसवाल्याप्रमाणे कम्युनिस्टही वावरु लागले आहेत!


Limbutimbu
Tuesday, June 20, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> मग काय पेशंटवर पण आरक्षण घालणार का?
बहुतेक नाही पण एक शन्का गम्भिर येती हे मनात!
मग सवर्ण डॉक्टरला कसला तरी अधिभार लावतील बीलाच्या रकमेवर ज्यातुन आरक्षित समाजी डोक्टरना मुक्त ठेवतील! आय बेट, हे असच चालत राहील तर तेही करतील हे राजकारणी!
हव तर अजुन इनकम टॅक्स मधिल सुट विचाराधीन हे की विचारात घेतली हे माहीत नाही!


Moodi
Tuesday, June 20, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या तुझी ही पोस्ट म्हणजे अब्जावधींचा आवाज रे.
महेश एकदम मस्त. तुम्हा दोघांना हजारो लाखो मोदक( अनुमोदन)


Mahaguru
Tuesday, June 20, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल ठाकरे साहेबांनी लै भारी सांगीतले.

आज reservation च्या नावाने उदो उदो करणारे आणि त्याच्या नावाबर रस्त्यावर येवुन सार्वजनिक मालमत्तेची तोडमोड करणारे नवबौद्ध, अफगाणीस्थानात गौतम बुद्धाचा पुतळा तोडला त्यावेळी का शेपुट घालुन बसले होते?


Limbutimbu
Tuesday, June 20, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन ते भविष्यात प्रायव्हेट मधी काय होत ते थोड थेवु बाजुला! आत्ता काय होत माहिते का?
आमच्या एम्प्लॉईज सोसायटीची विलेक्शन हे! तर तिला उभ रहायच तर त्यात रिझर्वेशन हे! तर काय हे ना की जवळपास समान पगार पोस्ट वगैरे असलेल्यातला एक सवर्ण विलेक्शनला उभा रहाणार असेल तर फॉर्मची किम्मत पन्नास रुपये अन त्याचाच त्याच कम्पनीत तसाच पगार घेत असलेल्या रिझर्वेशन वाल्ल्याला तोच फॉर्म पाच रुपयात मिलणार!
प्रश्ण पाच वर्सेस पन्नास असा नाही! या रिझर्वेशनची खरोखरच गरज हे का? यातुन समाजात अधिकच दुही जाणिवपुर्वक पसरत नाही का?


Santu
Tuesday, June 20, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे लिम्बु
तारी सुध्दा मरायला कोण
जाइल त्याच्या कडे.


Abhi9
Tuesday, June 20, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जातिभेद नष्ट करण्यात आम्हाला अजिबात स्वारस्य नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यापेक्षा जास्त गुंतागुंत करुन ठेवण्यात आम्ही धन्यता मानतो.

Dineshvs
Tuesday, June 20, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु, अगदी चपखल ऊदाहरण.
मुळात बुद्धाचाच बराच मानसिक गोंधळ ऊडाला होता शेवटी. मुर्तिपुजा नको असे म्हणत त्यानेच मरताना त्याच्या शिष्याना स्तुप बांधायची सुचना केली. ( संदर्भ दुर्गा भागवत )
शिवाय मुर्तिपुजा नको म्हणत असताना मुंबईत बुद्धाच्या, आंबेडकरांच्या पुतळ्यांची जोरदार विक्रि होतच असते.


Maanus
Wednesday, June 21, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे.. OBC वाल्यांबद्दल येवढा राग असतो... हे माहीत नव्हते...

तुम्हाला बर वाटव म्हणुन, मी आजुन माझ्या OBC दाखल्याचा वापर कुठे नोकरी मिळवताना केला नाहीय, ना घरात पुढे येणार्‍या कुणाला करायला सांगेन... but i am not responsible for whole OBC community.


Limbutimbu
Wednesday, June 21, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस, हा राग bc किन्वा obc अशान्करता नसुन सब घोडे बारा टक्के या पद्धतीच्या व्यवस्थेवर हे! :-)

Raina
Wednesday, June 21, 2006 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरक्षणाच्या बाबतीत ठाक-यांचा दाखला देणे म्हणजे आग विझवण्यासाठी द्रव पदार्थ म्हणुन पेट्रोल वापरण्यासारखे आहे. ठाकरे कधीही कुठल्याही बाबतीत "अति जहाल" मत च देतात. त्यांच्या आणि आमच्या हयातीत, त्यांनी कधी साराचार विचार, आणि नीरक्षीरविवेकानी काही अभ्यासपूर्ण वक्तव्य केली आहेत असे पहायची फार ईच्छा आहे. असो.

अभि-
I agree with you.

आणि ह्या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर मनमोहन सिंगा सारख्या खंडीभर डिग्र्या मिळवणा-या विद्वान मनुष्यानीही शेवटी राजकीय लाभासाठी मुग गिळुन गप्प राहणे- हे ही खरोखर उद्वेगजनक आहे.

Deemdu
Wednesday, June 21, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना अग मुग गिळुन गप्प बसायला तर त्यांना पद दिल गेल आहे :-(
जर खरच ह्या माणसाला काही अधिकार दिले गेले असते तर कदाचीत परिस्थीती वेगळी असली असती, पण जेंव्हा दुसर्‍याच डोक लावुन काम करायची वेळ येते तेंव्हा हे असच होणार


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators