Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
'शर आला तो, धाउनी आला काळ' कविता हवी ...

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Kavita aani Gaani » 'शर आला तो, धाउनी आला काळ' कविता हवी आहे « Previous Next »

Itsme
Thursday, May 15, 2008 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर आला तो, धाउनी आला काळ
विव्हळला श्रावण बाळ

ही कवीता हवी आहे. कुणाकडे असल्यास कृपया मला कळवा
.

Zakki
Monday, May 19, 2008 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर आला तो, धावुनि आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
हा! आई गे! दीर्घ फोडुनि हाक
तो पडला जाऊन झोक.

ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी.
(चाल बदलून)
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनि
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणूनी नयनी

तो वदला, हा हंत! तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा.
मग कळवळुनि नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधली वेळ
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असतील बसले
कावड त्यांची घेऊन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला
(चाल बदलून)
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगभग भरुनि झारी

जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला

मी एकुलता पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला
त्यां वृद्धपणी मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा, बघतील ते वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
(चाल बदलून)
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी

मजमाघारी करा तुम्ही सांभाळ
होऊनिया श्रावणबाळ.

परि झाकुनी हे सत्य कसे राहील?
विधिलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
घ्या झारी ... मी जातो .. त्याचा बोल
लागला जावया खोल
(चाल बदलून)
सोडिला श्वास शेवटला
तो जीवविहग फडफडला
तनुपंजर सोडुनि गेला

दशरथ राजा, रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी.

कवि - ग. ह. पाटील.


Itsme
Wednesday, May 21, 2008 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद zakki ... किती सुरेख कविता आहे, माझ्या आईला शाळेत होती. तीला पुर्ण आठवेना, म्हणुन हा प्रपंच

Dineshvs
Wednesday, May 21, 2008 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईला कळवलीस कि नाही ? आणि चालीत म्हणायला लाव, माझा आग्रह म्हणुन.

Itsme
Thursday, May 22, 2008 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताबडतोप कळवली :-)

आमची आई आणि तीच्या मैत्रिणी, अशाच जुन्या कविता आठवुन अठवुन म्हणत असतात संध्याकळी फ़िरायला जातात तेंव्हा

आणि एखादी नाही आठवली की अस्वस्थ पणे शोधा शोध सुरु होते :-)

zakki तुम्हाला कुठे मिळाली ही कविता ?


Zakki
Thursday, May 22, 2008 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाव खायचा तर म्हणेन, 'त्यात काय, आम्हालाहि ही कविता होती (हे खरे) नि आम्ही गुणी विद्यार्थी असल्याने इमाने इतबारे पाठ केली होती! आम्ही म्हणजे इतर लोकांसारखे नाही, कविता पाठ करायला सांगितली मास्तरांनी तरी करायचीच नाही!'

खरे असे की माझ्या एका वहिनीला नाद आहे अश्या जुन्या गोष्टी साठवायचा. तिच्याकडे मिळाली.

कवि गिरीश यांची 'पोर खाटेवर मृत्युच्याच दारा' ही रडकी पण ज्यांना कुणाला कविता कळते (मी त्यातला नाही) त्यांना या कवितेत कदाचित करुण रसातील साहित्यिक मूल्ये सापडतील!
हवी असल्यास एक दोन दिवसात लिहीन.


Itsme
Friday, May 23, 2008 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पहिल्या उत्तराचिच अपेक्षा होती. :-)

वहीनीला पण धन्यवाद सांगा.

लिहा नक्की ... अनेकांना वाचायला आवडेल, आणि मी print out काढुन घरी घेउन जाइन नक्कीच


Shonoo
Friday, May 23, 2008 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'आठवणीतल्या कविता' मधे पण आहेत या कविता.

Zakki
Friday, May 23, 2008 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'आठवणीतल्या कविता' मधे पण आहेत या कविता.
होक्का? मग विचारले तेंव्हा कुठे गेला होतात? कुणि उत्तर दिल्यावर मागून म्हणायचे, 'ह्या:! आम्हालाहि हे उत्तर माहित होते, पण आम्ही असे पुढे पुढे करत नाही'.

शाळेतल्या जुन्या सवयी जात नाहित, मोठे झाल्यावरहि!मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators