Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 10, 2007

Hitguj » Looking for » General » कार घ्यायची आहे » Archive through September 10, 2007 « Previous Next »

Badbadi
Tuesday, July 17, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीकरांनो,
आपल्यापैकी अनेक जण कार चालवत असावेत. देशात किंवा परदेशात कुठेहि. काहि लोकांनी वेगवेगळ्या make च्या कार चालवल्या असतील. या सगळ्या अनुभवातून तुमचे काहि मत झाले असेल. इथे ते लिहिलत तर आपल्या इतर मायबोलीकरांना कार घेताना मदत होईल.
कार बद्दल technical details/problems, servicing frequency, resale market तसेच कार चे इतर pros & cons सांगा. कार ची किंमत आणि लोन हा वैयक्तिक आणि सतत बदलणारा विषय आहे. त्याला शक्यतो फाटा मिळावा.


Savyasachi
Wednesday, July 18, 2007 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे, नंद्याने पुर्वी खुप चांगली माहिती लिहीली आहे यावर एका BB वर. (लोकहो या ' बीबी ' प्रकरणाला काही मराठी नाव आहे का हो? ) नक्की असेल ती अजून. अर्थात, ती बरीचशी यूएस च्या गाड्यांवर होती.

/hitguj/messages/103388/4445.html


Badbadi
Wednesday, July 18, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, अरे ते उसगावाबद्दल आहे. मी in general आणि खास करून देशात गाडी घेण्याबद्दल विचारते आहे.

Savyasachi
Wednesday, July 18, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी देशात एक मारुती झेन घेतली होती जूनी. त्यावर आधारीत.

सर्वप्रथम, पेट्रोल की डिझेल हे ठरवावे. म्हणजेच, महीन्याचा खर्च किती असावा याचा आढावा घ्यावा.

-पेट्रोल गाडीत जास्त पिकप. कमी धूर. आवाज कमी. चालवायला स्मूथ. कमी दुरुस्त्या. कमी किंमत डिझेल मॉडेलपेक्षा.
फ़क्त कमी मायलेज म्हणून रोजचा खर्च जास्त हा त्रास.

मग कोणती कंपनी, मॉडेल ते ठरवावे. यात वरील गोष्टी लक्षात घेता येतील. शिवाय, किती सीसी इंजीन आहे, किती मायलेज, एसी किती ताकदीचा, जास्त काळ बसण्यासाठी चांगली आहे का, किती माणसे नेहमी बसणार, कुठे जाणार नेहमी अशा बर्‍याच गोष्टी.

मग नवी की जुनी ते ठरवावे. यासाठी बाजारात किमती किती आहेत ते बघावे लागेल.
नवी घ्यायची तर सरळ डीलर्सकडे जाऊन चौकशा करणे, लिहून ठेवणे, ऑफ़र्स कंपेअर करणे.

जुन्या विकायच्या गाड्यांचे दलाल असतात. त्यांना सांगून ठेवणे. ते एकूण किमतीच्या २ टक्के घेत होते कमीशन.
स्थानीक गरेजेस मधे जाऊन विचारणे.
एक मेकनीक ओळखीचा असावा.
गाडी कळली की त्या मेकनीकला घेऊन जाणे. तो चालवून वघतो आणि काय काय करावे लागेल, खर्च, हा खर्च धरून किती ऑफ़र द्यावी ते सांगतो. बर्याचदा हे मेकनीक पैसे घेत नाहीत कारण बहूतेक ते दुरुस्तीचे काम आपल्यालाच मिळेल असा विचार असावा.
मग पटले तर ऑफ़र द्यावी. सौदा झाला तर RTO ची कामे करणारे लोक त्या दलालाला माहीत असतात. ते करून देतात सगळ.


Zakasrao
Thursday, July 19, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन गाडी घेताना एकाच गाडीचे अनेक डिलर असतात. सगळ्यांकडे जावुन माहिती घेवुन याव आणि जो कमी किम्मंत किंवा जास्त एक्सेसरीज फ़्री देतोय ते बघाव. बर्‍याच कंपनीतल्या कर्मचार्‍यांसाठी डिलर चांगले ऑफ़र देत असतो. आणि जर एकाच कंपनीतल्या लोकानी जर ग्रुप करुन त्याच्याकडे गेल तर तो अजुन चांगली ऑफ़र देण्याची शक्यता असते.

Badbadi
Thursday, July 19, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, झेनबद्दल अनुभव काय आहे?
झकास, धन्स!!


Kedarjoshi
Thursday, July 19, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे आमच्या कडे पण एक झेन होती. VXI . कधीही त्रास दिला नाही. रेग्युलर पेटतेल आनी ऑईल एवढाच खर्च आता २ महीन्यापुर्वी विकली.
झेन मला फार लहान वाटते. बलेनो त्यातल्यातात मोठी वाटते. तुझ्या बजेट वर बरेच अवलंबुन असेल. पण झेन मस्त आहे.


Savyasachi
Thursday, July 19, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेन उत्तम गाडी. केदार म्हणतो तेवढाच खर्च. जुनी असून. माझ्या बहिणीची नवीन आहे ३ वर्षांपुर्वी घेतली. तीचा पण काही त्रास नाही. पण छोटी आहे. डिकीत जागा कमी. ५ माणसांचे २ दिवसांचे सामान बसते पण जरा काटकसर करून.
माझ्या त्यावेळच्या शोधानंतर santro उत्तम वाटली होती. आणि डिझेल मधे indica rocks!
अजून पुढचे मॉडेल पाहीजे असेल तर लोक इंडीगो वर पण खुष आहेत असे दिसले. मित्राची पेट्रोल accent आहे आणि मस्त चालते.


Dhumketu
Friday, July 20, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेन चे नवीन मॉडेल आल्यामुळे जुन्या मॉडेलच्या किमती उतरल्या आहेत..


Badbadi
Friday, July 20, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंद, झेन ची जुनी मॉडेल्स मिळतच नाहीत ना!!!
सव्या, केदार धन्स :-) average किती मिळत होतं? fuel efficiency महत्त्वाची आहे.


Savyasachi
Friday, July 20, 2007 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेन १७ एसी न चालवता आणि एसीसकट १३ द्यायची. पण १९ २० देते अस म्हणणारे बरेच आहेत.
सॅंट्रोबद्दल विचार करावा. जागा जास्त आहे, अवरेज तेवढेच असेल १३ ते १७. तशी इंडीका पेट्रोल पण चांगली आहे.


Badbadi
Sunday, July 22, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, santro आहे रे.... आता दुसरी बघावी असा विचार आहे :-) Indica बघितली कि BPO ची आठवण होते :-)

Mahaguru
Tuesday, September 04, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prius or any hybrid car बद्दल कोणाला काही बरे वाईट अनुभव आहेत का?

Ajay
Wednesday, September 05, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे Prius 2007 आहे. करपरतावा मिळ्त होता तेंव्हापासून आहे. आता मिळेलच असे नाही किंवा मिळाला तर फार कमी मिळतो. थंडीत कमी आणि उन्हाळ्यात जास्त mileage मिळते पण जास्तीत जास्त mileage 47 miles च्या वर कधी गेले नाही.
गाडी नक्किच महाग आहे. पण एकूण अनुभव खूप सुखद आहे आणि एकदाही पश्चाताप झाला नाही. खूप छान तांत्रिक सोयी आहेत. मी जवळ जवळ १३ वर्षानी नवीन गाडी घेतली त्यामुळे असेल पण मला हे नवीन होते. आता इतकी चटक लागली आहे कि दुसया गाडीमधे बसवत नाही. :-)


Ajay
Wednesday, September 05, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मी अगदी घासाघीस करून घेतली आणि Invoice पेक्षा फक्त २०० जास्त देवून घेतली. डिलर म्हणेल त्या किंमतीला घ्यावी लागण्याचे दिवस केंव्हाच संपले

Maanus
Wednesday, September 05, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हायब्रिड कार चा प्रत्यक्ष अनुभव नाही, मला वाटायचे की हायब्रिड कार snow season मधे निट वेग देत नसतील atleast fwd तरी नाही. ह्यावर अजयच उजेड टाकु शकतील :-) म्हणुन मी awd पेट्रोल ची गाडी घेतली, आता अजुन माझ्या फिरण्याचा (२ महीन्यात ४००० मैल) CT मधल्या पेट्रोल च्या किमतीशी ताळमेळ बसत नाहीय (३.२५)

पन तुम्ही cali मधे दिसताय, म्हणजे snow चा काही संबध नसावा.

नविन गाडी घेताना edmunds.com ची मदत घ्या. सरळ तिथुन True Market Value TMV ची print out घेवुन जायची आणि सरळ dealer समोर ठेवायची. i think मी बहुतेक फक्त १५० का २०० रु जास्त दिले invoice price पेक्षा. आणि edmund ची print out ठेवल्यावर पाच मिनटात price fix झाली. त्या साईट वर प्रत्येक कार चे फ़ोरम पन आहेत, ते पन एकदा नजरे खालुन घाला.


Farend
Wednesday, September 05, 2007 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरू, होंडा ला मधे कोणी तरी sue केले होते क्लेम केलेले माइलेज मिळत नाही म्हणून.

मी मधे विचार करत होतो, पण गाडी त्यामानाने लहान आहे (कदाचित कॅमरी पेक्षा) आणि आत्ताच्या पेट्रोल च्या भावाने सुद्धा साधी कारच स्वस्त पडेल असे वाटते.

Hybrid Camry बघितलीस का? ती जर चांगली असेल तर दुसरीकडे बघायलाच नको.


Mahaguru
Wednesday, September 05, 2007 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अजय, माणुस, फारेंड!
मला दररोज किमान ५० miles one way पळवायला गाडी हवी आहे. त्यादृष्टीने मी prius चा विचार करत होतो. बाकी hybrid गाड्यांच्या देखभालीच्या काय कटकटी असतात त्या माहित नाही.


Kedarjoshi
Thursday, September 06, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होन्डा ची हायब्रिड टोयोटो पेक्षा वेगळ्या टेक्नॉलॉजी वर चालते. प्रायस लहान आहे पण आता सेडान मध्ये पण मिळते आधी हचबक मध्ये होती.

मी होन्डा नी प्रायस दोन्ही चालविल्या आहेत मला काही फार फरक वाटला नाही. (रेग्युलर कार पेक्षा म्हणजे पिक अप मध्ये वैगरे).

गुरु hartz n Avis कडे green collection आहे. गाडी विकत घ्यायच्या आधी एकदा रेन्ट करुन पाहा.


Maitreyee
Monday, September 10, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी गाड्या या विषयात तज्ज्ञ मुळीच नाही. मला एक बेसिक शंका आहे. क्रुपया हसू ने :-)
तर या हायब्रिड( प्रायस वगैरे) गाड्या घेण्यात फ़ायदा काय? कारण त्यांची किम्मत आत्ता तरी साध्या सिव्हिक वगैरे च्या पेक्षा अंदाजे ७ हजाराने जास्त आहे. fuel efficiency नीट पाहिली तर जितके $$ गाडीच्या Total life span मधे गॅस वर वाचतात त्याहून हा किमतीतला फ़रक जास्त च आहे. फ़ार फ़ार तर तेवढाच आहे म्हणू. बाकी Battery reliability, spare parts cost वगैरे चे मी काही लक्षात घेतलेले नाही. मग अत्ता या गाड्या जास्त किम्मत देऊन घेण्यात पॉइन्ट आहे का? की माझे काही चुकतय?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators