Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 24, 2007

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » नावे ठेवा ( सुचवा ??) » नावांचे अर्थ » Archive through February 24, 2007 « Previous Next »

Vinaydesai
Wednesday, November 08, 2006 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee, Jyothi हे ज्योथी नसून ज्योती च आहे.. फक्त small t चा उच्चार 'ट' आणि small th चा उच्चार 'त' होतो असं मला माझ्या Southy मित्राने सांगितलं...

मुळात इंग्रजीत 'T' एकच आहे, मग आपलं Spelling बरोबर का त्यांचं हे काही सांगता येणार नाही.. तेव्हा नावात 'थ' दिसला (सविथा, गीथा) तरी आपण Soft उच्चार धरावा (गीता, सविता) वगैरे...


Zakki
Wednesday, November 08, 2006 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरे एक कारण असे की निदान तमिळ भाषेत तरी क, ख, ग, घ या चारींना एकच अक्षर, च, छ, ज, झ यांना एकच अक्षर, तसेच त, थ, द, ध, यांना पण एकच अक्षर असते. म्हणजे तामीळमधे लिहिले तरी सविथा की सविता हे नक्की नाही, मग इंग्रजीत काही का असेना!

Gajanandesai
Thursday, November 09, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की हो हो. माझ्या एका मित्राची आई मला कजानन म्हणायची. :-) आणि त्यांच्यात उच्चाराला आपल्या 'ळ' सारखे आणखी एक अक्षर असते. (इंग्रजीत त्याचे स्पेलींग zha करतात- माझ्या आठवणीप्रमाणे.) त्याचा उच्चार करणे मला आजतागायत जमलेले नाही.

Zakki
Thursday, November 09, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बंगलोरमधे असताना 'माय फेअर लेडी' हा सिनेमा खूप गाजला. (पुढे त्यावरून 'ती फुलराणी' हे मराठी नाटक आले.) त्यात जसे ' rain in spain.... ' आहे तसे 'वाळ्ळपळ्ळाम् कुडुपांगळ्ळाम्' असे अनेकदा म्हणायला माझ्या तमिळ मित्राने सांगीतले होते. हजार वेळा म्हंटले तर दोन चारदा जमले!

Pinky00
Thursday, November 09, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

samidha cha arth kay??

Anilbhai
Thursday, November 09, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यज्ञात आहुती म्हणुन जे काही टाकतात, त्याला समिधा म्हणतात. :-)

Manishalimaye
Friday, November 10, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की माय फेअर लेडी वरुन ती फुलराणी आलेलं नाहीये तर शॉच्या "पिग्मेलियन" चे पुलंनी केलेलं 'ती फुलराणी' हे स्वैर रुपांतरण आहे. आणि "माय फेअर लेडी"ही याच पिग्मेलियवरुन आलेला चित्रपट आहे.[ फार सुदर दिसली होती ऑंडृ हेपबर्न यात....आणि फुलराणीही अस्साल आपल्या मातीतली पुलंनी रंगवलेली आणि भक्ती बर्वे यांनी साकारलेली.]

Zakki
Friday, November 10, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेल मी काही पिग्मॅलियन बघितले नव्हते. तुम्ही असेल बघितलं म्हणून तुम्हाला आठवत असेल.

अहो, पण हा काही मुद्दा नव्हताच! उगीचच?


Dineshvs
Friday, November 10, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, वळ्ळापळ्ळाम चा अर्थ तामिळमधे माझ्या माहितीप्रमाणे, केळं असा होता.
आता ईतक्या साध्या शब्दाचे ते असे का वाटोळ्ळं करतात, ते तो सुब्र्हमण्यमच जाणे.


Manishalimaye
Saturday, November 11, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>हा काही मुद्दा नव्हताच! उगीचच<<
मी काही आधीचे पोस्ट वाचले नव्हते फक्त जो उल्लेख चुकीचा वाटला तो सुधारुन दिला इतकच आपल्याला राग आला असेल तर I am sorry

Zakki
Saturday, November 11, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो जाऊ द्या हो मनिषालिमये! मला कधी राग येत नाही, नि sorry व्हायचे कारण नाही मायबोलीवर काही लिहीले तरी. वाचणारे sorry होतील असे आपण लिहायचे!

हो, त्या शब्दाचा अर्थ केळे नि दुसर्‍या शब्दाचा अर्थ आणणे (कुडु) या क्रियापदाचे कुठलेतरी रूप (भविष्यकाळ, 'आपण आणावे,' अश्या अर्थी, किंवा काहीतरी)



Robeenhood
Monday, November 13, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा मी माय फ़ेअर लेडी माझ्याकडे असूनही पाहिला नाही पण ऑड्रे हेपबर्न roman holiday मध्ये फारच सुन्दर दिसली होती.. विचारा झक्कीना..

Manishalimaye
Monday, November 13, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती कायमच सुंदर दिसत असे, हो की नाही हो झाक्की? पण हे खरंच खरं आहे आणि मला ती फारच आवडते
आणि हो ती CD असेल तर जरुर बघा


Zakki
Monday, November 13, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो तीच काय, बर्‍याच बायका सिनेमात सुंदर दिसतात, पण त्यांना पहायला का जातात लोक? की सिनेमाचे दिग्दर्शन, संगीत, कथा, अभिनय हे बघायला जाता? आँ!


Anandmoharir
Wednesday, February 07, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला 'मुग्धा' य नावचा अर्थ पहीजे होता.... तर मला कोनी मदद करू शकता काय ?

Bee
Wednesday, February 07, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते मुग्ध ह्या शब्दावरुन मुग्धा हे नाव आले असेल. म्हणजे जी इतरांना मुग्ध करू शकेल अशी ती..

मुग्ध करणे म्हणजे, आपल्याकडे आकर्षित करणे.. आपल्या गुणांच इतरांवर प्रभाव पाडणे..


Anandmoharir
Thursday, February 08, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ajun thoda convincing artha pahije hota....

Dheremangesh
Friday, February 23, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संस्कृत नियमाप्रमाणे "मुग्धा" हे "मुग्ध" चे स्त्रीलिंगी रूप आहे आणि "मुग्ध" म्हणजे गोंधळलेले,गडबडलेले,भांबावलेले ...... "स्वरमुग्धा" म्हणजे स्वरांपासून विचलित झालेली ..... त्यामुळे जर कुणी आपल्या कन्येसाठी हे नाव सुचवत असेल तर ते टाळा ..... :-)

Pooh
Friday, February 23, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते मुग्धा चा अर्थ innocent .

Pooh
Saturday, February 24, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://webapps.uni-koeln.de/tamil/

Cologne Digital Sanskrit Lexicon: Search Results
1 mugdha &c. see p. 825 , col. 1.
2 mugdha mfn. gone astray , lost RV. VS. ; perplexed , bewildered AV. Das3. ; foolish , ignorant , silly. S3Br. &c. &c. ; inexperienced , simple , innocent , artless , attractive or charming (from youthfulness) , lovely , beautiful , tender , young (esp. %{A} f. a young and beautiful female , often in voc. ; also in rhet. a variety of the Na1yika1) Ka1v. Katha1s. Ra1jat. ; (ifc.) strikingly like Vcar. Ba1lar.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators