Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ज़े का रंजले ग़ांजले ...

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Kavita aani Gaani » ज़े का रंजले ग़ांजले « Previous Next »

Apurv
Monday, August 07, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मला कोणी ३ आणि ४ चा अर्थ सांगाल का? सगळ्या ओळींचा अर्थ सांगितला तर उत्तमच!

Moodi
Monday, August 07, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जमेल तसा सांगते.

मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त

याचा अर्थ नवनीत म्हणजे लोण्याचे आतुन अन बाहेरुन ( फणस जसा बाहेरुन काटेरी पण आतुन मऊ अन रसाळ असतो तसे नाही) जसे एकच मऊ अन स्निग्ध स्वरुप असते तसेच सज्जन माणसाचे असते. तो बाह्य जगात एक अन आतुन एक असे दोन मुखवटे धारण करीत नाही. तो लोण्यासारखाच मऊ अन एकस्वरुप रहातो अन वागतो.

४ थ्या ओळीबद्दल मला संभ्रम आहे. जाणकार रसग्रहण करतीलच.Chandya
Monday, August 07, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीव सुखाने रंगलेले असोत अगर ते दु:खाने गांजलेले असोत, त्यांना हे सर्व आपले आहेत असे जो मानतो (१)
तोच साधु आहे असे समजावे आणि त्याच ठिकाणी देव आहे असे जाणावे (२).
ज्याप्रमाणे लोणी अंतर्बाह्य मऊ आहे त्याचप्रमाणे सज्जनाचे चित्त असते (३).
ज्यांस कोणाचाही आश्रय नाही अशा निरश्रितांस जो आपल्या ह्रदयात धरतो(४).
ज्याप्रमाणे पुत्रावर दया करितो त्याचप्रमाणे जो आपणाजवळ असणार्‍या दासदासींवर दया करतो(५).
तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्याबद्दल आता काय सांगू, तो साक्षात भगवंताची मूर्तीच आहे(६).

सार्थ श्रीतुकारामाची गाथा
अनुवाद: विष्णुबुवा जोग


Apurv
Wednesday, August 09, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi and chandya, thanks to both of you!
आपंगिता चा अर्थ आश्रय होत का?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators