Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 07, 2006

Hitguj » Looking for » General » मराठी संस्कृती शी संबन्धीत भेटवस्तू » Archive through March 07, 2006 « Previous Next »

Hawa_hawai
Monday, March 06, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमराठी/ परदेशी लोकांना भेट द्यायला खास मराठी / महाराष्ट्रीय अशा काही भेटवस्तू तुम्हाला सुचत असल्यास इथे माहिती द्या.

भेटवस्तू उपयोगात येईल अशीच हवी असे काही नाही symbolic gift द्यायला काही कल्पना सुचत असेल तरी सांगा.


Renushahane
Monday, March 06, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वारली पेंटींग असलेल्या वस्तू किंवा एखादं तसं पेंटींगच छान भेटवस्तु असु शकते.

Lalu
Monday, March 06, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरी चपला. :-) किंवा मोजड्या इ. पण माप माहित पाहिजे.
कोल्हापुरी साज, महाराष्ट्राची माहिती आणि सुरेख फोटो असलेली कॉफी टेबल पुस्तकं. मराठी खाद्य पदाथांची इन्ग्लिश रेसिपी बुक्स. एखादी छोटी गणेशमूर्ती पण चालेल.


Tulip
Monday, March 06, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन वर्षांपूर्वी मला मुंबईला खादी एम्पोरिअम मधे अजंता एलोरा ची प्रिन्ट्स असलेले सुरेख रेशमी स्कार्फ़्स आणि स्टोल्स मिळाले होते. माझ्या परदेशी मित्रमैत्रिणींना ते प्रचंड आवडले होते. मला वाटत बॉम्बे स्वदेशी मधे पण खुप छान महाराष्ट्रीयन handicrafts च्या वस्तू आहेत. तसेच ताज च्या बुक शॉप मधे महाराष्ट्रातील शिल्पकला आणि किल्ले ह्यांची फ़ार छान प्रिन्ट्स आणि फ़ोटो असलेले ( नाव आठवत नाही नक्की ) एक english coffee table पुस्तक मला मिळाले होते. किंमत तेव्हा सातशे की आठशे अशी होती. अशा तर्हेची काही पुस्तके पण महाराष्ट्रियन संस्कृतीचा परिचय करुन देणारी चांगली भेटवस्तू होऊ शकते. नाहीतर खास कोल्हापुरी स्टाईल दागिने किंवा चांदीच्या कलाकुसर केलेल्या वस्तू.

LOL लालू. आपल्या दोघींची फ़ारच ग्रेट माईन्ड्स की ग. थिन्क अलाईक केलय ते


Chandya
Monday, March 06, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चपलाहार, पादु का, खण नाही तर खणाची साडी, धोतर, सोलापुरी चादर, पैठणी, बंडी, घोंगडं उर्फ़ कांबळं उर्फ़ ब्लन्केट, अष्टविनायक प्रतिकृती, सावंतवाडीची लाकडी खेळणी, लेझिम, टाळ, निरांजन, चितळे बाकरवडी, आंबा फ़णस साट्या, आणि पुणेकर असाल तर तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण ( दु. १२ ते ४ ची वेळ सोडुन )


Maanus
Monday, March 06, 2006 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी गाण्यांच्या CD's ... पुष्पक सारखा चित्रपट. एखादे शिवकालीन coin ( पुण्याच्या जुन्या बाजारात भेटतात ते )

पुण्याच्या bombay store मधल्या गोष्टी मला तरी येवढ्या आवडल्या नाही, एकतर पुर्ण दुकानात अंधार असल्याने काही कळत नाही कुठे काय आहे ते.... बहुतेक सर्व ठिकाणी गणपती असतो... आणि किमती काहीच्या काही.

त्यापेक्षा जहांगीर समोर fabindia नावाचे एक दुकान आहे, तिथे मस्त कुडते मिळतात, त्यात त्या तुमच्या खणाच्या style चे देखील कुडते आहेत. jeans वर खाणाच्या style चा कुडता घातला की मुलगी काय दिसते म्हणुन तुम्हाला सांगु...

काहीच नाही सापडले तर थोड पुढे जायचे... कोरेगांवात. मस्त लाल झबले उचलायचे... त्यांना पन osho ला भेटल्याचा आनंद.

गणेशमुर्ती निट सांभाळली जाणार ह्याची खात्री असेल तरच द्यावी, नाहीतर अर्थ नाही. मी काही कृष्णवर्णीय लोकांना ओळखतो जे लोक अश्या भेटवस्तु नीट सांभाळतात, पन शुभ्रवर्णीयांकडुन तरी हा अनुभव अजुन आलेला नाहीय. एका अमराठी पन भारतीय माणसाने पुजेच्या वेळेस मला विचारले is that ganapati statue?

बाकरवडी, दिवाळीत आनदाने मी चांगली अर्धा कीलो बाकरवडी ऑफीस मधे आणुन ठेवली, पन तिखट तिखट म्हणुन ती काय कोणी खाल्लीच नाही.


Maanus
Monday, March 06, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह! अजुन एक, माझ्या समोरच्या मुलीला त्या टिकल्यांचे फार वेड आहे, सारखी विचारत असते त्या कुठे मिळतात.

तिचा असा ( गोड ) गैरसमज आहे की टिकली खुप महाग असते आणि त्यात खुप precious stone वापरलेली असतात.

टिकली महाराष्ट्रियन आहे की नाही (?)


Ninavi
Monday, March 06, 2006 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> jeans वर खणाच्या style चा कुडता घातला की मुलगी काय दिसते म्हणुन तुम्हाला सांगु...

सागर, कुडता बघणार्‍याने घालायचा की मुलीनी ते कळलं नाही नीट!

Maanus
Monday, March 06, 2006 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलींनीच रे. फारच सुंदर दिसतात मुली त्या dress मधे... मुख्य म्हणजे, त्या मुलीचा रंग कोणताही असला तरी.

Ninavi
Monday, March 06, 2006 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' रे'? मी? अरे'रे'!!
सागर, डोळे तपासून घे बरं एकदा.


Maanus
Monday, March 06, 2006 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलींनीच हो... असे म्हणायचे होते, पन गडबडीत गोंधळ झाल. पुढचे बोललो असतो, पन जाऊदेत, मला NJ मधे रहायचेय :-)

Ninavi
Monday, March 06, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी कुणीसा ' ध' चा ' मा' केल्याचं ऐकलं होतं. पण ' गं' चा ' रे'?
ए बाबा, अहोजाहो नको करूस आणि आता!

Zakki
Monday, March 06, 2006 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह., मला स्वतला मात्र कुठलिही भेट वस्तू दिलीस तरी चालेल. त्यात काय? प्रेमाने दिले की मी प्रसन्न होतो.

पण ते तेव्हढे स्कॉच जे जमले तर जास्त बरे. म्हणजे मनुष्य अवतार घेतला की सर्व गुणदोष अंगी येतात ना! म्हणून हो. केले सवरलेले सर्व ईश्वरार्पण म्हंटले की दोष अंगाला लागत नाहीत!

:-)

Maitreyee
Monday, March 06, 2006 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खणाचे कुर्ते? हे नविन च दिसतंय काहीतरी! माणसा लिन्क दे रे कुठे फ़ोटो वगैरे असेल तर:-)

Rachana_barve
Tuesday, March 07, 2006 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यावेळी मी असे खादी सिल्कचे , काही कुर्ते आणले आहेत. तो माणूस म्हणतो तसे साड्यांसारखे designs असतात. आणि त्यावर स्टोल्स सही दिसतात. माझ्या चिंकु आणी गोर्‍या मैत्रीणींना दिल्यावर त्या जबरीच खुष झाल्या. मण्यांच्या पर्सेस लाखेच्या बांगड्या वगैरे पण ह्या मुलींना खूप आवडल्या. पुढच्यावेळी काय हवय त्यांना ह्याची list पण तयार आहे :-)

Dhondopant
Tuesday, March 07, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धोतरजोडी आणि एक कोट टोपी आणली असेल तर आम्हाला पाठवुन द्या कुणी. धन्यवाद. नै... सांगुन ठेवले हो रचना. स्मरणात एक नाही रहात आजकाल. .. लांब छत्री ना दांड्याची?.. ईथे मिळते ती घेतली आहे ईथेच मी.. ती नको. कोट जरा जाडसरच पहा बर... हो.

... हे बघ हे अस होत.. काठी राहीली.. जेट विमानात बसुन आलो मी ईथ पर्वा तर काठी काढुन घेतलीन शिंच्यानी. काठ्या महागलेत म्हणे भारतात.. आपल ईंडीयात!!.. ते बजेट अस्त ना तिकडे?... हो s त्यामुळ.

ईप्रीत s च ऐकाव ते ते...


Kandapohe
Tuesday, March 07, 2006 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जपानी लोकांना खालील गोष्टी हमखास देतो. ज्याचे त्यांना कौतुक पण आहे.

ताजमहालची प्रतिकृती
चहा Tea Bags
चंदनाच्या गोष्टी ( हत्ती, गौतम बुद्ध, गणपती )
मार्बलच्या गोष्टी
लेदरच्या गोष्टी ( पाकीट, बेल्ट )
टाय
हस्तकलेच्या गोष्टी


Maanus
Tuesday, March 07, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे पहा पन इथे मी म्हणत होतो तसे काठांवाले short kurte नाहीत, बहुतेक ते दुकानातच मिळतात.

Hawa_hawai
Tuesday, March 07, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

renu, lalu, tulip, chandya, manus, RB, Kp thanx. changli ahet suggetions. (RB ani Kp tumhi sangitlelya vastu maharashtriyan nahiyet pan pudhchya sathi kadhi upyog hoil. :-) )


Tanya
Tuesday, March 07, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी संस्कृतीशी मिळत जुळत हव असेल तर पुरुषांसाठी झब्बा-लेंगा किंवा हल्लीच्या भाषेत सांगायचे तर सलवार-कुर्ता.(जे सिल्कमध्ये पण मिळतात.), जे परदेशी लोकांना खुप आवडतात, त्यांच्याकडे पण एक भारतीय ethnic wear आहे म्हणुन तेही खुश.
बायकांसाठी, मराठी संस्कृतीत बसणारा नाही पण लखनौवी dress , कुर्ता त्यांना खुप आवडतात.
हल्ली typical गुजराथी गोष्टी, घरांच्या सजावटीसाठी मिळतात, अश्या दुकांनांमध्ये वेगवेगळ्या designs ची तोरण, लामणदिवे, नक्षीकाम केलेले trays, murals (which can be available in clay, metal, wood ,stone etc. ),छोट्या नक्षीकाम केलेल्या पणत्या(ज्यात मेण असते) गोष्टीही त्यांना as a gift म्हणुन आवडतात.


Hawa_hawai
Tuesday, March 07, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु bombay स्वदेशी मधे भरपूर काय असते पण महाराष्ट्रीयन विशेष नाही. दुसरे किमती फार जास्त असतात. तीच वस्तू एखाद्या exhib मधे किंवा direct artist कडून बनवून घेतली तर अर्ध्या किमतीत सुद्धा मिळु शकते.


मला ही भेटवस्तू मराठी नविन वर्षासाठी द्यायची आहे तसच जी काय वस्तू असेल ती 50 पीस हवे आहेत त्यामुळे एखाद्या artist कडून बनवून पण घेता येऊ शकते. त्या अनुषंगाने कुणाला आणखी काही सुचत असेल तर सांगा.

सध्या सुचलेली एक कल्पना art collage मधील एखाद्या विद्यार्थ्याला पकडून त्याच्याकडून जुन्या पुणेरी वाड्याचे pencil sketch काढून घ्यायचे आणि मग त्याच्या copies बनवून फ़्रेम करून घ्यायची.


Kandapohe
Tuesday, March 07, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maharashtriyan>>
गंमत नाही इथले जपानी लोक पुणे, मुंबईला जातात तेव्हा भगदी पिशवी घेतात. ज्यावर लंगर छाप, शिवाजी, संभाजी बिडीची जाहीरात असते. मराठीत काहीतरी लिहीलेले, हत्तीचे, गणपतीचे चित्र असलेले रुमाल, शबनम बॅग, झालेच तर देशी बिड्या सुद्धा आवडु शकतात.

हवे आत्ता आठवले. मेणबत्ती स्टॅंड, चंदनाचे छोटे पेन, चांदीच्या छोट्या मुर्ती, कोयरी, अत्तरदाणी हे पण महाराष्ट्रीअन मधे मोडेल.
:-)

Manuswini
Tuesday, March 07, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बिलकुल गणेश मुर्ती किंवा statue देत नाही आपल्या देवि देवतांचे

ह्या लोकांना विषेश काही अक्कल नसते आणी ठेवतेल्ल कुठेही.

मी स्वःता असे पाहिले जेव्हा मी एका american friend च्या घरी party ला गेले तेव्हा त्याच्या toilet मधे गणपतिचे ते paintings लावले होते.

मी मुद्दाम त्याला विचारले, who gifted you this? and do you know what is that picture for?
तो मुर्ख म्हणाला माझ्या एका indian friend ने gift दिले.
toilet and paintings color combination match आहे म्हणून एथे लावले.

I told him, this is our God, we dont put in toilet, indiot answered I know, but whats wrong?

I prefer to give जाळ्याची विणलेली purses , scarfs from खादी भंडार वगैरे


Psg
Tuesday, March 07, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक प्रकारच्या पणत्या मिळतात, तसेच छोटी, miniature तुळशीवृंदावने ज्यावर दिवा लावू शकतो, रंगिबेरंगी तोरणं, मेंदी हे पण options आहेत

Gajanandesai
Tuesday, March 07, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HH एक छोटासा आकाश कंदील भेट द्यायचा.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators