Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Devrukh

Hitguj » My city » Greater Mumbai and Konkan » Konkan » Devrukh « Previous Next »

Zulelal
Saturday, August 18, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार बाजूंच्या डोंगरांच्या रांगांमह्ल्या विस्तीर्ण माळरानावर वसलेल्या टुमदार गावांचं वर्णन एव्ह्ढ्याशा चौकटीत कसं कराव? लांबवरच्या सह्याद्रीच्या निळ्याशार कड्याच्या एक कपारीतून धबधबा कोसळणारा मार्लेश्वराचा प्रपात, बाजूच्या डोगराच्या कपारीतून डोकावणरा, इतिहासाच्या अद्न्यात खुणा मिरवणारा, बुरुजांच्या अवशेषातून इतिहास जागवणारा किल्ला, आणि गर्द हिरवाईनं वेढलेलं, तांबड्यालाल मातीचं, कौलारू टुमदार घरांचं, आणि एकमेकांशी कुटुंबाच्या नात्यानं जोडलेलं गाव... ह्याची भुरळ देवांनाही कधीकाळी पडली, म्हणून तेही इथेच विसावले- म्हणून हे ‘देव-रूख’... देवांनी त्या मुक्कामात लावलेल्या, देव-वृक्शांच्या छायेतलं, हिरवंगार, टवटवीत गाव...

Manjud
Wednesday, August 22, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल, तुम्ही सध्या कुठे असता?

Mukund
Thursday, January 03, 2008 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुलेलाल..तुम्ही म्हणता ते खरे आहे..

मी अनुभवलय देवरुखचे निसर्गसौंदर्य आणी तिथल्या मित्र मैत्रिणींचा प्रेमळ पाहुणचार. मार्लेश्वरचे निसर्गसौंदर्य केवळ अप्रतिम! तो मार्लेश्वरचा एकच धबधबा नाही तर ऐन पावसाळ्यात मार्लेश्वराच्या देवळाच्या चहुबाजुला असंख्य धबधबे चहुबाजुने उंचावरुन खोल कोसळत असतात. वर गुहेतल्या देवळात जाणारा पायर्‍यांचा रस्ता वर जाताना आजुबाजुचे विहंगम द्रुश्य दाखवतो व तिथली गर्द झाडी व धो धो कोसळणारा पाउस व पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणार्‍या छोट्या छोट्या नद्या हे सगळे त्या परिसराला स्वर्गीय रुप देतात. सगळ्यांनी एकदा तरी जावे असेच मार्लेश्वरचे ठिकाण आहे. संगमेश्वरपासुन पुढे डावीकडे देवरुखचा फाटा फुटतो. आमच्या गोव्याच्या ट्रिपमधे आम्ही कोकणातले छोटे छोटे रस्ते घेउन गोव्याला जायला ५ दिवस लावले. मुंबई गोवा महामार्ग शक्य तेवढा टाळला. सासवडवरुन कोकणात जाताना आधी कापुरवाळ घाट व मग वरंधा घाटातुन कोकणात उतरलो व परत येताना आंबोलीच्या घाटातुन वर आलो. दोन्ही घाटांचे व मार्लेश्वरचे पावसाळ्यातले रुप ज्यांनी पाहीले नाही ते खरच दुर्दैवी!:-)

मंजिरी व बाकी सगळे तुम्ही जाच एकदा देवरुख व मार्लेश्वरला... तेही ऐन पावसाळ्यात..



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators