Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 18, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » एका वर्षाची गोष्ट » Archive through December 18, 2006 « Previous Next »

Shonoo
Sunday, November 19, 2006 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हुश्श! दमलो बुवा!' नवरा आणी जेफ दोघेही एकदमच म्हणाले. 'आता श्रमपरिहार्थ खास' असं म्हणत जेफ ने सगळ्यांना ब्रॅंडी दिली आणि समोरच्या कॉफ़ी टेबलवर पाय पसरून सोफ़्यावर मागे रेलून बसला. जुलिआ नाक फ़ुगवून म्हणाली 'हॅ! तुम्हाला दमायला काय झालं? स्वैपाक मी केला. हवं नको पाहिलं हिने. फक्त सगळ्यांचे वाइन ग्लास भरून इतके कसे दमलात तुम्ही?' 'सर्व पाहुणे गेल्यावर आवरा आवर कोणी केली? तुमच्या स्वैपाकाची भांडी घासली कोणी?' नवरा काही हार मानायला तयार नव्हता. आता परत उगीच शब्दाने शब्द वाढायला नको म्हणून मीच विषय बदलला. जुलिआला म्हटलं ' या वर्षीचं तुझं भाषण काही रंगलं नाही! काहीतरी 'मिसिन्ग' आहे असं वाटलं.' एक मिनिटभर काही बोलू का नको अशा विचारात दिसली. मग डोळे मिटून मागे रेलून बसली आणि ' होतं असं कधी कधी म्हणाली.
सगळेच थकलो होतो. आता परत दुसरा विषय काढून परत त्यावर काही इन्टरेस्टिन्ग गप्पा होतील याची शक्यता कमीच. आपापले ड्रिन्क सम्पल्यावर पटापट गूड नाईट म्हणून सगळे पान्गले. मी दिवे बंद करून दारं खिडक्या चेक करून वरती जाईपर्यंत त्यांच्या खोलीतला दिवा मालवलेला होता. उशीवर डोकं टेकेपर्यंत मी झोपून गेले होते. तरी अगदी डोळे मिटता मिटता नवरा कुजबुजला 'आज जेफ शी नव्याने ओळख झाली माझी. Thanks for hosting this dinner. '


Malavika
Monday, November 20, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू येऊ देत अजून.

Abhijat
Thursday, November 23, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Will this writing on thanks giving have next posting on the day of thanks giving?

Ramani
Wednesday, November 29, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, खुपच सुन्दर कथा. पण लवकर लवकर टाका ना! असे तुकड्या तुकड्यान्त वाचले की एकसन्ध परिणाम होत नाही.

Radhadeshpande
Wednesday, November 29, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू,लिहिण्याची शैली खूप आवडली.पण फ़ार वेळ करू नकोस लिहायला नाहीतर मग काहिच लवकर लक्षात येत नाही.

Milindaa
Thursday, November 30, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीतर मग काहिच लवकर लक्षात येत नाही.<<<

इथल्या बहुसंख्य कथा लिहीणार्‍यांची ही नविन युक्ती आहे अस कळले.. त्या निमित्ताने लोक खूप काळ त्यांची गोष्ट वाचत राहतात म्हणून...

असे ऐकले हो.. :-)


Shonoo
Thursday, November 30, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा

कळतात बरं ही बोलणी!
:-)


Mirchi
Tuesday, December 05, 2006 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वर्षाची गोष्ट
एक वर्ष चालणार आहे वाटत.......:-)


Kimayashah
Tuesday, December 05, 2006 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर! मलाही तसच वाटतय.
लवकर लिही ना!


Sahi
Wednesday, December 06, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटायला लागले आहे कि ह्या लेखक मन्ड्ळीसाटी एखादी सोय हवी की जेथे ह्यान्ना त्यान्च्या कथान्चे भाग सवडीनी लिहिता आणी स्टोअर करता येतील.कथा पुर्ण ज़ाली की पब्लीश बटन दाबायचे की आम हितगुजकरान्ना अखन्ड वाचता येतील. माज़्या ओनलाईन क्लासमधे टर्म पेपर साठी ही सोय आहे

Shonoo
Thursday, December 07, 2006 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Black Friday म्हणजे वर्षातला एकमेव दिवस जेव्हा नवरा हौसेने खरेदीला जाणार. युनिव्हर्सिटीमधे शिकत असतानापासूनचा रिवाजच आहे त्याचा. तेंव्हा दोन चार दिवस आधीच सगळ्या आवडत्या दुकानांचे Flyers वाचून, त्यातल्या हव्या त्या गोष्टींवर खुणा करून ठेवत असे. आता सगळं ऑनलाइन असल्याने कागदांची रद्दी कमी झालीय. कुठे काय वस्तू वर काय डील आहे सगळं शोधून एक लिस्ट तयार करतो. त्याप्रमाणे मग कुठल्या कुठल्या दुकानात जायचं त्याचा क्रम ठरतो. यंदा जेफ ला पण घेऊन जाणार होता. सकाळी लवकर उठून जुलिआ त्यांना दोघांना मॉल मधे सोडून आली. आता कमीत कमी चार सहा तासांची निश्चिंती!
आम्ही सकाळचा चहा नाश्ता वगैरे आवरून ख्रिसमस च्या सजावटीला लागलो. या वीकेंड ला जर सर्व डेकोरेशन करून टाकलं नाही तर Santa Clause कोळशाचे तुकडेच देणार यावर जुलिआचा ठाम विश्वास असावा. त्यामुळे ती स्वत: तर सर्व डेकोरेशन सम्पवतेच पण तिच्या परिवारातल्या सगळ्यांना पण दम देत असते. शुक्रवारी इतर सर्व डेकोरेशन करायचे, घराबाहेर दिवे लावायचे, शनिवारी जाऊन ट्री घेऊन यायचा आणि शनिवारी रात्री बसून ट्री चं डेकोरेशन करायचं. असा तिचा अने वर्षांचा शिरस्ता. तीच सवय आता आम्हाला पण लागलीये.

यंदा ख्रिसमसच्या सुटीत देशात जायचा विचार होता म्हणून ट्री फक्त आणायचा नाही, बाकी सर्व डेकोरेशन करायचं अशी जुलिआशी आनी मुलंशी तडजोड झाली होती. सुटीत देशात जायचं म्हणजे केवढी तयारी असते. त्यात निदान ट्री लावणे, सजवणे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सगळं काढून ठेवून त्या ट्री ची विल्हेवाट लावणे ही कामं तरी कमी होतील! आम्ही दोघी गप्पा मारत सर्व खोकी उघडून काय काय वस्तू कुठे ठेवता येतील याची चर्चा पण करत होतो. एका खोक्यात भारतातून आणलेल्या बर्‍याच्शा गोष्टी होत्या. ते पाहिल्यावर गप्पांची गाडी आमच्या ट्रिप कडे वळली. आणि अचानक जुलिआने विचारले How about Jeff and I go to India with you guys ?


Shonoo
Thursday, December 07, 2006 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची ओळख झाल्या पासून दर वेळी भारतात जाताना हिला विचारलंय मी! भावाच्या, दिराच्या लग्नाला यायला कबूल ही झाली होती. पण ऐन वेळी काही ना काही कारणाने नकार दिला होता. अलिकडे मी विचारणंच सोडून दिलं होतं. नाही म्हणायला जेफ क्वचित आमचे फोटो पाहून म्हणायचा Some Day I want to go there with you guys . पण ते आपलं तेव्हढ्यापुरतं. मग आता अचानक हे कुठून? बरं, मी हौसेने सगळी तयारी करावी, त्यांनी कुठे फिरावं, कुठे रहावं सोबत कोण मिळेल सगळं ठरवायचं आणि परत आयत्या वेळी परत माघार घेतील. मला उगीच मनस्ताप! त्यामुळे मी जरा बिचकतच ' हो चालेल की' म्हटलं. माझी चल बिचल तिला कळली. ' घाबरु नकोस. यावेळी मी तुला दगा देणार नाही. जेफ ने नाही म्हटलं तर मी एकटी पण येईन तुमच्याबरोबर'.

मग तिने आमच्या जायच्या यायच्या तारखा, ट्रॅव्हेल एजंटचे फोन नंबर सगळं नोन्दवून घेतलं. परत एकदा आग्रा, जयपूर, पुरी, कोणार्क आणि कन्याकुमारीची माहिती विचारून घेतली. मुम्बैतच काय महाराष्ट्रात कुठेही गॉल्फ़ कोर्स नाही असं मी कितीही ठणकावून सांगितलं तरी त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता.


Maku
Friday, December 08, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोनी मदत करू शकेल का...
मला पन कथा लिहय्ची आहे... पन ति कुथे जाउन लिहायची ते मला कोनी तरी सानगता का ....
plzzzz
mi star new thread madhe jaun type kele tari pan yeth nahi aahe ....

Madhura
Friday, December 08, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मकु , झाली ना तुझी कथा
इथे सुरु आणि हे वाच बरे. शिवाय webpage च्या तळाशी help ची लिन्क आहे ती पण बघ.

Shonoo
Wednesday, December 13, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचे दहा पंधरा दिवस चिकार धावपळीत गेले. विद्यार्थ्यांची परिक्षा घेणे, पेपर तपासणे, भारतात जायची खरेदी, २-३ आठवडे घर बंद करायचं त्याची तयारी. कितीही याद्या केल्या तरी न संपणारी कामं. त्यात जुलिआ आणि जेफच्या प्रवासाची तयारी होतीच. तरी दोघांनी व्हिसा प्रकरण स्वत:च निस्तरलं, तिकिटांची शोधाशोध सुद्धा मला करायला लागली नाही. पण इमेल फोन आणि IM वरून प्रश्नांचा भडिमार काही कमी झाला नाही. शेवटी एकदाचा प्रवासाचा दिवस उजाडला आणि वाटेत काहीही गोंधळ न होता आम्ही मुम्बै मधे येऊन पोचलो.

काही दिवस आमच्याबरोबर राहून मग उरलेला वेळ ते दोघे स्वतंत्र फिरणार होते. मुम्बै मधे आमच्या शाळा, कॉलेज, मुम्बै ची बीचेस, क्रॉफ़र्ड मार्केट वगैरे बघायचं आधीच ठरलं होतं. शिवाय वाळकेश्वर, महालक्ष्मी, हाजी अली, एलिफंटा इत्यादी सगळी नेहेमिची ठिकाणं बघून झाली. एक दोन नातेवाईकांकडे जेवणं आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचे कार्यक्रम पण पार पडले. आठवडा भराने जयपूर, आग्रा, दिल्ली, कोणार्क, पुरी, आणि कन्याकुमारी पाहून मुम्बै ला परत अशा दौर्‍यावर दोघे रवाना झाले.


Shonoo
Wednesday, December 13, 2006 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक दिवशी संध्याकाळी फोन करून खुशाली कळवत जा असं बजावून सांगितलं होतं. पण त्या दोघांनी तर रोजच्या घडामोडींचा, काय काय पाहिलं,काय अनुभव आले, काय अडचणी आल्या सगळ्यांचा रिपोर्टच दिला. वरून सगळं नीट लिहून ठेवणारे आणि परत गेल्यावर प्रवासवर्णनच लिहिणार आहे म्हणाला जेफ. एकंदरीत त्यांचा प्रवास मजेत चालला होता.

कन्याकुमारीहून निघायच्या दिवशी मात्र अगदी थोडक्यात आवरतं घेतल्या सारखं बोलले दोघं. पण आम्हा दोघांनाही सुटी सम्पत आल्याचे वेध लागले होते त्यामुळे जुलिया च्या तुटक फोन कॉलकडे फारसं लक्ष दिलं नाही.


Saee
Thursday, December 14, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

interesting .... आगे क्या होगा? उत्कंठा वाढली आता:-)

Shonoo
Friday, December 15, 2006 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेफ आणि जुलिआ कन्याकुमारीहून सकाळी सकाळीच येऊन पोचले. आता परत निघायला दोन दिवस उरले म्हणून आम्ही नवरा बायको नेहेमी प्रमाणे वैतागत होतो. मनात ठरवलेली पण प्रत्यक्षात राहून गेलेली कामे, न जमलेल्या भेटी गाठी, राहिलेली खरेदी सर्व गोष्टींचा मनाला होणारा त्रास. परत गेल्यावर तुम्बलेली घरची आणि ऑफ़िसची कामे यांची टोचणी पण चालू झालेली असतेच. या सर्व गडबडीतसुद्धा त्या दोघांचं काहीतरी बिनसलंय येवढं जाणवलं.

संध्याकाळी सगळ्यांनी मिळून बाहेर जेवायला जायचं ठरलं होतं. जाताना नवरा आणि जेफ स्कूटर वरून निघाले. जुलिआ आणि मी गाडीतून मुलांबरोबर जाणार होतो. पण ती म्हणाली ' आजी आणि मुलं जाउ दे गाडीतून, तू अन मी रिक्षाने जाउ. मला तुझ्याशी काही बोलायचंय'.

कुठल्या तरी दूरच्या रेस्टॉरंटमधे जायचं ठरलं होतं. इतक्या दूर रिक्षाने जायचं, वाटेत ट्रॅफिक लागेल. धूळ, धूर, आवाज याचा जुलिआला त्रास होईल. माझ्या मनात नव्हतं खरं तर. पण सासूबाई म्हणाल्या 'जा तिच्याबरोबर. सकाळपासून काही लक्षण ठीक दिसत नाहीये दोघांचं.'



Shonoo
Saturday, December 16, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिक्षात बसल्या बसल्या जुलिआची कहाणी सुरू झाली. कन्याकुमारीला समुद्र किनार्‍यावर नवरा बायकोचं जोरदार भांडण झालं होतं. सुरुवात खरं तर काही क्षुल्लक कारणाने झाली होती. पण शब्दाने शब्द वाढत गेला. 'परक्या देशात, अनोळखी गावात होते दोघं म्हणून एकत्र मुम्बै ला परत तरी आलो. इतर कुठे असतो तर दोघेही एकएकटेच परत निघून गेलो असतो आपल्या घरी' इतकं कडाक्याचं भांडण झालं. कन्याकुमारीहून निघून मुम्बै ला येईपर्यंत दोघे एकमेकांशी mono syllabic बोलत होते फक्त.

मी बरीच सारवा सारव करायचा प्रयत्न केला- 'बरेच दिवस प्रवासात आहात. भाषा कळत नाही, जेवण खाण वेगळं, दर दोन दिवसांनी वेगळ्या गावात मुक्काम या सगळ्यांचा परिणाम होतोच. त्यामुळे दोघंही extra sensitive झाला आहात. आता अजून दोन दिवसात आपण निघू इथनं. एकदा आपापल्या घरी जाऊन पोचलात की जरा डोकं शांत होईल सगळ्यांचं' पण जुलिआ काही मानायला तयार नव्हती.

तिकडे जेफ ने नवर्‍याला काय सांगितले असेल कोणास ठाऊक. नवरे कधी अशा तक्रारी सहजा सहजी कोणापुढे करत नाहीत. त्यात्य जेफची आणि माझ्या नवर्‍याची काही तशी खास दोस्ती पण नाही. पण कुणी सांगावं कधी कधी एखाद्या तिर्‍हाहिताजवळ मन मोकळं करता येतं तितक्या सहजपणे आपल्या माणसांशी नाही बोलता येत.

त्या दोघांचां भांडण मिटवण्यासाठी काय करावं यापेक्षा माझ्या मनात त्यांनी कन्याकुमारीची ट्रिप भांडणात वाया घालवली याचेच विचार जास्त होते.

माझ्या मनात कन्या कुमारीची मूर्ती ही एखाद्या भरतनाट्यम नर्तकी सारखी आहे. शेलाटा बांधा, भरजरी रेशमी साडी चापून चोपून नेसलेली, अंगावर सुवर्णालंकार, गुडघ्याच्या जवळ पोचणारी वेणी, त्यावर माळलेली फुलं, हातात अक्षता आणि हळद कुंकवाचं ताट, एखादा कलश्- नारळ ही असेल त्यात, मोठाले काजळ रेखलेले डोळे, अंत:करणात धडधड. अशी ती वाट पहात असेल समुद्र किनार्‍यावर. कधी न सम्पणार्‍या या प्रतिक्षेत तिच्या मनातले भाव कसे कसे बदलत गेले असतील? सख्या-सोबतिणींनी, घरच्यांनी तिची कशी समजूत काढली असेल? आशा निराशेच्या हिंदोळ्यावर तिने किती हेलकावे खाल्ले असतील, निराशेच्या गर्तेत कसं स्वत:ला झोकून दिलं असेल


Prajaktad
Monday, December 18, 2006 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कन्याकुमारिच वर्णन मस्त केलेयस...कथा पुढे सरकली...उत्कंठाही वाढलीय..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators