|
Psg
| |
| Thursday, June 15, 2006 - 3:58 am: |
| 
|
लग्नाचा वाढदिवस.. सकाळपासून स्नेहल गडबडीत होती. आज नाष्त्याला डोसे करायचे होते. सकाळची कामे, मुलांची तयारी, चैतन्य ची धावपळ.. शेवटी सगळे जमले टेबलवर. मुलं खायला लागली.. डोसे आणि गुलाबजामही.. खुशीत होती. आई-बाबाही बसले. चैतन्य आला.. आज काय आहे गं नाष्त्याला, लवकर दे..कॉल आहे मला. बापरे, डोसे आणि गुलाबजाम. सकाळ सकाळ नको गं इतक heavy देत जाऊस... एकच जाम घेतो.. स्नेहलचा चेहरा खर्रकन उतरला.. चेतन, मुलं पटपट घराबाहेर पडली. तीही तिचं आवरून ऑफिसला पोचली. ती एक Chartered Accountant होती. एका मोठ्या कंपनीत consultant म्हणून जात होती. केबीन मधे पोचल्यावर उदास अशी बसून राहिली. आज २३ सप्टेंबर.. त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस!!! चेतनच्या लक्षातही नव्हत.. भूतकाळात शिरायला वेळ लागला नाही तिला.. १० वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली.. तिच्या आत्तेभावाचा मित्र होता तो. ओळख झाली, प्रेम जमले, घरी सांगीतले.. सगळच सुरळीत झाल. एक्मेकांना पूरकच होते ते. मनं जुळली होती. लग्न करायचा निर्णय घेतला होता. चेतन तेव्हा एका software company मधे नोकरीला होता. पण त्याची स्वप्न मोठी होती. त्याला स्वत्:चा व्यवसाय करायचा होता. स्नेहल नुकतीच CA झाली होती आणि एका Audit Firm मधे काम पहात होती. तेव्हाच चेतनला USA ला जायची संधी आली २ वर्षांसाठी. ती त्याने घ्यायचे ठरवले. स्नेहलची साथ होतीच. मग लग्न करूनच जायचे ठरले. काढीव मुहूर्तावार धामधूमीत लग्न झाले. US चे दिवस मंतरलेलेच होते. project नवीन, देश नवीन आणि लग्नही.. सगळ्याचीच मजा.. project च्या खाचाखोचा, गोरे PM आणि colleagues , नव्या देशाच्या रीती, हवा आणि लग्नाचे नवलाई.. वर्ष कस सरलं कळलं नाही. दूसर्या वर्षी ते settle झाले होते, चेतनही त्याचे contacts develop करायला लागला होता. त्याला business मधे त्याची मदत झाली असती. तिही थोडा अभ्यास करून ज्ञान update करत होती. US चा stay संपवून ते परत आले. मग मात्र दिवसांना चाकं लागली. चेतननी नोकरी सोडली, ऑफिस सुरु केल. US चे चांगले clients होते. नवीन setup , भरपूर कष्ट यात चेतन बुडून गेला. स्नेहा ची साथ होतीच. तिच्या commercial knowledge चा त्यांना उपयोग झाला. सुरुवातिच administration स्नेहानी बघीतल. मग आदित्यची चाहूल लागल्यानंतर तिनी काम कमी केल. ऑफिस settle झालं होतच. staff ही चेतनला चांगला लाभला होता. ती घरात बिझी झाली. आदित्य नंतर दोन वर्षातच पालवी झाली आणि स्नेहा पुरती अडकली. चेतनची बाहेर धावपळ आणि स्नेहाची घरात! पैसा भरपूर मिळत होता. घरची परिस्थिती चांगली होतीच. मुलं सुट्टी झाली तशी स्नेहाही part time नोकरी करू लागली. तिला त्यामुळे profession च्या touch मधेही रहयला मिळत होतं आणि घरचा सगळच बघता येत होत. चेतन यात कुठेच नव्हता.. बिलं भरण्यापासून, मुलांच्या दुखण्यापर्यंत सगळं स्नेहा बघत होती. चेतन आणि स्नेहा खूप romantic होते. पण काळ जसा पुढे गेला तश्या priorities बदलल्या. चेतन यायचा उशीरा घरी. मुलांशी खेळण्यात थोडा वेळ जायचा. पण त्यांना त्यांचा असा वेळ मिळत नव्हता. रोज थोडा तरी quality time एकत्र मिळावा अस स्नेहलला वाटायचं. बाकी तिची तशी काही तक्रार नव्हतीच. आज तिच्यापाशी भौतिक गोष्टी सगळ्याच होत्या. नव्ह्ता तो जोडीदाराबरोबरचा सहवास. सगळं इतक ठरून गेल होत की यापेक्षा आपल्याकडून काही अपेक्षा असतील अस चेतनला वाटयचच नाही. सिनेमा, हॉटेल, खरेदी सगळं चालू असायचच. सण, लग्न, बहिण येण, तिच माहेरपण सगळच स्नेहा बघत होती. यापेक्षा अजून काय वेगळ आता? लग्नाचे वाढदिवस कसले celebrate करायचे??? स्नेहलनी मोठ्ठा श्वास घेतला.. आजचा दिवसही routine च जाणार होता.. क्रमश्:
|
Psg
| |
| Thursday, June 15, 2006 - 4:10 am: |
| 
|
२४ सप्टेंबर.. चेतन तयारीत होत. सकाळचे ९.३० वाजले होते. रीमानी connect करून दिलं की keith शी महत्वाच बोलायचं होतं. आज नवीन assignment ची बोलणी होणार होती. एवढ्यात फोन वाजला, रीमाच होती. पण keith connect होऊ शकला नव्हता. कॉल उद्यावर गेला होता.. श्याऽऽऽ!! चेतनचा सगळा मूडच गेला. उद्या..त्याने कॅलेंडर कडे पाहिलं. अरे, हे २३ला लाल का केले आहे बरं? च्यायला कालची कोणती appointment miss केली? तो रीमाला विचारणार होता. इत्क्यात तो स्वत्:शी म्हणला, चला वेळ आहे तर आपणच आठवू.. काय होत बर काल? २३ २३.. अरे! काल आपल्या लग्नाचा वाढदिवस! साफ़ विसरलो आपण. कमाले आणि स्नेहानी नाही का आठवण करून द्यायची? या विचारानी तो थोडा थबकला.. त्याला आश्चर्य वाटले. काल का नाही बोलली स्नेहा काही? काहीच नाही? gift ची मागणी नाही, रात्री विसरलो म्हणून कटकट नाही? तीही विसरली की काय? त्याला कालचे गुलाबजाम आठवले! म्हणजे तिच्या लक्षात होते. मग का बोलली नाही ती काहीच? चेतनला अचानक आठवला मागचा वाढदिवस. तोही तो विसरलाच होता. तेव्हा घरी जाऊन जाम भांडण झालं होत. स्नेहानी जाम चिडचिड केली होती. मग तोही म्हणला होता.. अगं काय झालं विसरलं तर? तुला दिसतय ना मी बिझी आहे. जे तुला पाहिजे ते घेऊन ये ना. साडी, ड्रेस, दागिने.. आता झालं की लग्न जुनं. काय त्यात अप्रूप इतक? स्नेहल ते ऐकुन गप्पच बसली होती एकदम.. बरोबरे..ती दुखावली आहे. तिने काल वाट पाहिली असेल आपण wish करू म्हणून. आपल्या लक्षातच नाही म्हणल्यावर तिही गप्प बसली असेल. काय झालं हे? ते जुने दिवस आपण विसरलो? जुने कशाला, स्नेहा आजही आपल्या पाठी भक्कमपणे उभी आहे. म्हणूनच झोकून देऊन आपण हा डोलारा उभा केलाय. पण तिचा एकटीचा सहवास असा मिळतच नाही आता, हे जाणवलच नव्हतं. हा दिवस आपल्या दोघांच्याही दृश्टीने किती महत्वाचा आहे. छ्या, कसले गाढव आहोत आपण! ही बिचारी काही बोललीही नाही.. नेहू, सॉरी गं! त्याला स्नेहलबद्दल एकदम प्रेम दाटून आलं.. तो ४ वाजताच घरी आला. आई-बाबा देवळात निघाले होते. मुलं खेळत होती. त्याला लवकर घरी बघून सगळ्यांना आश्चर्यच वाटलं! त्याने वेळ मारून नेली. आई-बाबा एकदाचे गेले देवळात. मुलंही थोडी excite झाली होती. पण काही विशेष नाही म्हणल्यावर तीही गेली. ते दोघच उरले. स्नेहाला त्याने चहा करायला सांगीतले आणि तो तिच्या पाठी जाऊन उभा राहिला. तिला स्वत्:कडे वळवून तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला.. नेहू, सॉरी.. स्नेहाला कळलेच काय झालेय ते.. ती रडायलाच लागली एकदम. चेतननी तिला मिठीत घेतलं. सॉरी गं खरच मनापासून सॉरी. मी विसरलो, जाम विसरलो. हे घे ना.. त्याने तिला एकच लाल गुलाबाचं फूल दिलं! स्नेहल हसली.. कोणत्याही दागिन्यापेक्षा, साडीपेक्षा ही भेट तिला मनापासून आवडली आणि कळलं की चेतनलाही कळलय तिला काय वाटलय ते.. नेहा, मला एकच शिक्शा.. पुढच्या वर्षीच कॅलेंडर mark करून ठेवायचं नाही! माझ्या लक्षात हा गेलेला दिवस कायमच राहील. स्नेहा, तू गप्प बसून मला जे शिकवलस ते कटकट करून सांगीतलं असतस तर मी कानामागे टाकलं असत. पण आता कधीच नाही.. आणि मीच विसरले पुढच्या वर्षी तर? असं होईल का राणी? नाहीतर मी आहेच ना.. आठवण करून द्यायला.. समाप्त!
|
Maudee
| |
| Thursday, June 15, 2006 - 4:27 am: |
| 
|
ख़ूपच छान. ओघवती आहे वाचतान अजिबात कुठे तुटल्यासारख़ी वाटत नाहिये. आणि हो लगेच पूर्ण केल्याबद्दल अभार
|
Ruma
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:12 am: |
| 
|
पूनम अतिशय सूरेख.. छान वाटल वाचून..
|
Moodi
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:44 am: |
| 
|
psg अप्रतीम लिहीलयस. ग्रेट!!!!! 
|
Deemdu
| |
| Thursday, June 15, 2006 - 6:24 am: |
| 
|
पूनम मिल्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस विसरला वाटत ते शक्य नाहीये म्हणा, म्हणजे अजुन त्याला नीट चालता वगैरे येतय म्हणून हो असो, छान लिहीलस.
अगदी स्वत बद्दल घडल्यासारख 
|
तेच लिहिणार होते आत्ता एक तर विसरला आणि पुन्हा फ़क्त गुलाबावर वेळ मारून नेली म्हणजे सॉलिड हुषार असणार 'तो' असो, चांगलं लिहिलयस पूनम!
|
छान लिहिल आहेस ग पुनम...
|
Ninavi
| |
| Thursday, June 15, 2006 - 9:26 am: |
| 
|
पूनम छान आहे गोष्ट. होतं खरंच असं. BTW मिल्या कसा आहे आता? हिंडाफिरायला लागला का? 
|
Mrinmayee
| |
| Thursday, June 15, 2006 - 10:32 am: |
| 
|
पूनम, फारच सुंदर अन ओघवतं लिहिलय. इथले बरेच जण आणि जणी स्वत:ला ओळखू शकतील ह्या प्रसंगात
|
Chinnu
| |
| Thursday, June 15, 2006 - 12:06 pm: |
| 
|
पुनो! एक्का दमात चहा संपवुन, office ला जातांना ती चव जीभेवर रेंगाळत असते, तशी मस्त आहे कथा. तुझे sty चे episodes पण सही आहेत. अजुन येउ द्यात!
|
Dineshvs
| |
| Thursday, June 15, 2006 - 1:50 pm: |
| 
|
PSG छान आणि ओघवती कथा.
|
<PSG> सही लिहिली आहेस गोष्ट. पण ती स्नेहल फ़ार म्हणजे फ़ारच समजुतदार आहे हं
|
Shyamli
| |
| Thursday, June 15, 2006 - 2:40 pm: |
| 
|
पूनम अतिशय सूरेख.. छान वाटल वाचून.. पण एका फुलावर भागवायच म्हणजे काय फारच झालं बाई....
|
Tulip
| |
| Thursday, June 15, 2006 - 2:41 pm: |
| 
|
पुनम, आवडली. साधी आणि छान! फापटपसारा नाही.
|
Storvi
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:21 pm: |
| 
|
मैत्रेयी तुझी reaction बघुन लक्षात येते तुमचं लग्न किती तु लग्नात किती मुरलेली आहेस ते.. पुनम छान आहे ह कथा. मिल्या ला म्हणावं असेल हिम्मत तर कर विडंबन 
|
Psg
| |
| Friday, June 16, 2006 - 12:31 am: |
| 
|
सर्वांना कथा आवडल्याबद्दल धन्यवाद! मिल्या सुखरूप आणि हिंडता फ़िरता आहे
|
Gandhar
| |
| Friday, June 16, 2006 - 1:05 am: |
| 
|
पूनम सुंदर लिहिली आहेस गं
|
Bee
| |
| Friday, June 16, 2006 - 2:13 am: |
| 
|
मला प्रतिक्रियांमधल हे मिल्या प्रकरण अजिबात कळल नाही इथे.. पूनम बाकी कथा एकदम छान लिहिली आहेस.. कुठे थांबूच दिल नाहीस तू
|
Jyotip
| |
| Friday, June 16, 2006 - 5:42 am: |
| 
|
पुनम..खुप छान लिहिल आहेस 
|
|
|