Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 08, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » मराठी शायरी » Archive through June 08, 2006 « Previous Next »

Yuvrajshekhar
Sunday, April 23, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठीमध्येही शेरोशायरी असते ,आपण मराठीमध्ये आपणांस माहीत असलेले शेर पोस्ट करावेत.

Yuvrajshekhar
Sunday, April 23, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे
-चंद्रशेखर सानेकर

Yuvrajshekhar
Sunday, April 23, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी न त्याची ऊमेद जगली, ज्याच्या डोळा असती अश्रू
ज्याच्या डोळा असती स्वप्ने, जगते त्याची उपासमारी
-चंद्रशेखर सानेकर

Yuvrajshekhar
Monday, April 24, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजूनही मनाला, तुझी याद आहे
किती काळ गेला तुझी याद आहे
कसा रंग देऊ सखे मी नव्याने
अजूनही घराला तुझी याद आहे
-वैभव देशमुख


Yuvrajshekhar
Monday, April 24, 2006 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुष्य तेच आहे
अन हाच पेच आहे
तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे
-संगीता जोशी


Yuvrajshekhar
Tuesday, April 25, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकेक युद्ध माझे मी हारलो तरीही
मजला अजिंक्य केले माझ्या पराभवांनी
-सुरेश भट


Yuvrajshekhar
Tuesday, April 25, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
-इलाही जमादार


Yuvrajshekhar
Wednesday, April 26, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही कोणती रात आहे, मी सुखाने गात आहे
कोणता हा पूल सखये आपुल्या दोघांत आहे.
-राम घोडके


Yuvrajshekhar
Friday, April 28, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसे होतील आता चार वेदांच्या वयाची,
वेदना खोदूनी व्हावी बांधणी ग्रंथालयाची.

वाळवंटाच्या ऊरातच केवढ्या अणुचाचण्या ह्या,
वाटते उंटास भीती माणसांच्या आश्रयाची.
-विजय आव्हाड


Yuvrajshekhar
Friday, April 28, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदिरातूनी येता येता मशिदीतही जावे म्हणतो,
भजन आरती केल्यावरती नमाज पडूनी घ्यावा म्हणतो.

आस्तिकताही फळली नाही नास्तिकताही जमली नाही,
आता शेवटी तीर्थामध्ये मदिरा मिसळून प्यावे म्हणतो.
-दिपक अंगेवार


Ajay
Friday, April 28, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान संकलन करता आहात. आणि कवीचे नाव लिहिता आहात हे फार चांगले केले तुम्ही.

Yuvrajshekhar
Saturday, April 29, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अजय बरेच दिवस कुणीही साधी प्रतिक्रिया देखील नोंदवत नव्हतं पण आपण आपली comment post केल्याबद्दल खरंच आभारी आहे.

Yuvrajshekhar
Wednesday, May 10, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाशाला भास म्हणालो,चुकले का हो?
धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो?

चौदा वर्षे पतीविना राहिली ऊर्मिला
हाच खरा वनवास म्हणलो चुकले का हो?
-इलाही जमादार


Yuvrajshekhar
Wednesday, May 10, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी कवडसा बनून यावे,तुझ्या घरी एकांती
उघडझाप करशील मुठीची,मला पकडण्यासाठी.
-इलाही जमादार


Maitreyee
Wednesday, May 10, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पाहिलेच नव्हते मी आधी!छान collection आहे युवराज!

Bee
Thursday, May 11, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज, अप्रतीम आहेत रे काही ओळी ह्यातील. आपल्या मराठीमध्ये बरेच चांगले लिहिणारे आहेत फ़क्त त्यांचा शोध घ्यावा लागतो. आणि चांगले लिहिणारे जगापुढे इतक्या सहजासहजी येत नाही. काहींच्या कविता ह्या पुस्तक काढावे इतक्या नसतात.

Yuvrajshekhar
Monday, May 15, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मैत्रेयी आणि बी, लवकरच मी आणखीन
शेर पोस्ट करेन, मात्र असेच मध्ये मध्ये भेट देत जा
आणि जमलं तर तुम्हीही थोडेसे शेर पोस्ट करा.


Amitdesai
Wednesday, June 07, 2006 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार, मी अमित, आपले शेर वाचले. सव्वशेरही वाचले. सर्वास धन्यवाद देन्यास हा पत्रप्रपन्च.

Mrinmayee
Wednesday, June 07, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाउसाहेब पाटणकरांचं मराठी शायरीचं एक "दोस्त हो"! नावाचं पुस्तक असल्याचं आठवतं. बरोबर का? तसंच खालील ओळी कुणाच्या ते माहिती आहे का युवराजशेखर तुम्हाला?

'पावसात मी भिजले नाथा, गाल निथळती जळी
ओठांनी ते टिपून सांगा शराब का वेगळी'


Sneha21
Thursday, June 08, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे प्रत्येक जन आपापल्या धुन्दित
आनि प्रत्येकाच्या मनात स्वार्थ आहे
तरिहि अशाच जगन्याला सद्ध्या अर्थ आहे.
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators