Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठी शायरी

Hitguj » Language and Literature » भाषा » मराठी शायरी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 08, 200620 06-08-06  8:47 am
Archive through December 04, 200620 12-04-06  12:15 pm

Yuvrajshekhar
Friday, December 22, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाहिले नव्हते तिला पण मी तिला माहित होतो,
मी कधी काळी तिच्याही यौवनाचे गीत होतो.

खूप काही हारलो पण काय हरलो नेमके मी?
हे तरी कळले कुठे की काय मी मिळवीत होतो.

तशी मलाही हवी होती ऊब मायेच्या घराची,
पण घराच्या कल्पनेने जन्मभर मी भीत होतो.
-चंद्रशेखर सानेकर.


Yuvrajshekhar
Friday, December 22, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू,
अन खुलाशांचाच सारा अर्थ मग बदलून गेला.

एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे,
अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला.

जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे,
सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेला?
-चंद्रशेखर सानेकर.


Yuvrajshekhar
Friday, December 22, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपक अंगेवार आणि विजय आव्हाड यांच्या 'काळजाची वात' आणि 'जगण्याच्या खोल तळाशी' या गझल संग्रहांचे प्रकाशन दिनांक २८ डिसेंबर २००६ रोजी सायंकाळी रविंद्र नाट्यमंदिर येथे होत आहे आणि सर्व गझल प्रेमींसाठी हा कार्यक्रम मोफ़त आहे.

Yuvrajshekhar
Saturday, January 13, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.
-चंद्रशेखर सानेकर


Yuvrajshekhar
Tuesday, January 16, 2007 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी शायरी आवर्जून वाचणाय्रा माझ्या सर्व मित्रांस एक विनंती आहे की पद्य विभागात जाऊन एकदा चंद्रशेखर सानेकर हा BB एकदा पाहून घ्यावा आणि प्रतिक्रियाही अवश्य नोंदवावी.

Yuvrajshekhar
Sunday, January 21, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला हा गर्व की ठोका कधी चुकणार नाही,
मला ही जिद्द की स्पर्शिन तुझिया काळजाला.
-चंद्रशेखर सानेकर


Yuvrajshekhar
Tuesday, February 27, 2007 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला आश्चर्य हे की मला का सावली नाही
अन मला अप्रूप हे की मी उन्हाशी बोलतो आहे.
-चंद्रशेखर सानेकर


Yuvrajshekhar
Tuesday, February 27, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगले की मज हसावे लागले

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधीही
मी कशी होते मलाही आठवावे लागले

लोक भेटायास येती काढत्याअ पायासवे
अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले
-सुरेश भट्ट


Yuvrajshekhar
Tuesday, February 27, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे
चालु दे वक्षांत माझ्या वादळांचे येरझारे

रंगत्या पूर्वेस माझी वेदनेस देईल लाली
अन तुझ्या दारात माझी धूळ हे नेतील वारे
-सुरेश भट्ट


Yuvrajshekhar
Tuesday, February 27, 2007 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने
तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे
-चंद्रशेखर सानेकरYuvrajshekhar
Tuesday, February 27, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे
हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो.
-चंद्रशेखर सानेकर


Kaushik
Thursday, March 15, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रशेखर सानेकर.....ख़्हुप्च छान, छान लीहीता षयरि आवदलि

Sneha21
Wednesday, June 06, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम अप्रतिम....वाचतच रहावे असे वाट्ते.........


Aparna_pradeep
Saturday, September 15, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gचन्द्रशेखर सनेकर अप्रतिम गज़ल एक्दम सुन्दर सुरेख

Wedant_ganesh
Sunday, November 09, 2008 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दादा,
माझे नावं गणेश,
वय 19/मुंबई.
मी web designing शिकत आहे.
मी एक नविन मराठी web site बनवित आहे.
मला तुझे गजल खुप आवडले म्हणुन मी ते तुझ्या नावासहित माझ्या web site वर add करायचा विचार केला आहे.
please reply me on
wedant_ganesh@yahoo.co.inTopics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators