Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 29, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » कोबी, फ्लॉवर, नवलकोल » कोबी » Archive through July 29, 2007 « Previous Next »

Prajaktad
Tuesday, January 27, 2004 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1/2 kobi
daliche pith
tikhat,mith,kothimber
kanda

kobi kisun mith lavun thevava,ghatt pilun
pani kadhave
daliche pith, thikhat,kothimber,etc ghalun ghatt pith karave,far malu naye chikkat hote
thodya barik ravayar thapun katlet style karave deep fry karave light brown zalyavar
kadhave
thand zale ki hatane haluvar kuskarwe
eka patilyat tel tapawa,kanda barik chirun
parta,tyat he kuskaralele kobikatlet takawe
changle paratawe
zakan thevun 2-5 min thevave...barik chiraleli kothimber takun halwa..
kobichi tich tich bhaji khavun kantala yeto
hi bhaji chan lagteMoodi
Wednesday, August 24, 2005 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पानकोबीत ( म्हणजे साधा कोबीच ना? ) चणा ( हरबरा ) डाळ पण घालतात. मी मात्र हिरवी मिर्ची घालुन नुसती परतुन घेते. अन south indian पद्धतीने म्हनजे मोहरी,हिन्ग,हळदीच्या फोडणीत 10-15 मिनिटे भिजवलेली चमचाभर उडदाची डाळ अन थोडा कढीपत्ता अन हिरवी मिर्ची घालुन करते. मग भाजी झाल्यावर वरुन ओला खोबरे किस अन कोथिंबीर टाकायची. मस्त होते.

Nalini
Wednesday, August 24, 2005 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण जशा कोथिंबिरीcया वड्या करतो त्याप्रमाणे कोबीcया वड्या केल्यास अवीला छान लगतात, आणि कोबीला येणारा विशिष्ट उग्र वास पण येत नाही.

Priya
Wednesday, August 24, 2005 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोबीच्या भाजीत या डाळींच्या ऐवजी बटाट्याच्या काचर्‍या घालून किन्वा मटार घालूनही रसभाजी करता येते. छान लागते. कोबीची भाजी करताना पाणी जरा बेतानेच घाल कारण कोबीला बरेच पाणी सुटते. खरं तर कोबीला पाणी घालायची गरजही पडत नाही. नुसत्या वाफेवर, पाण्याचे झाकण ठेवुन कोबी चांगला शिजतो अंगच्या पाण्यामुळे. फोडणीत आणि वरुन कोथिंबीर घातली की कोबीला उग्र वास असेल तर कमी होतो. फोडणीमध्ये जिरे घातले तरी एक वेगळा छान वास येतो.

Sampada_oke
Wednesday, August 24, 2005 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमीcया पद्धतीने कोबीcई भाजी करुन कंटाळा आला तर मी फोडणीला इरलेला कोबी घालून तो शिजत आला की धने पूड जिरे पूड आणि गरम मसाला घालते शिजली की त्यावर भरपूर कोथिंबीर घालायcई छान लागते

Savani
Wednesday, September 27, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पण एक पद्धत..
यासाठी पाहिजे:
कोबी, ३-४ हिरव्या मिरच्या( नुस्ती मधे चीर द्यायची, तुकडे करू नयेत. ), ओला नारळ, कढीपत्ता, फ़ोडणीचे साहीत्य.

आधी कोबी धुवुन बारीक चिरून घ्यावा, किसून घेतला तरी चालेल. एका कढईमधे तेल तापवून त्यात जिरे, हिंग, हळद,कढीपत्ता,हिरव्या मिरच्या जरा परतून घ्यायच्या. त्यात बारीक चिरलेला कोबी थोडा परतून झाकणावर पाणी घालून शिजवत ठेवायचा. मी कोबी मधे कमीत कमी पाणी घालते. जास्तीत जास्त वाफ़ेवर शिजवायचा. कोबी चांगला शिजत आला की मग भरपूर ओला नारळ घालायचा. भरपूर म्हन्जे अगदी कोबीच्या निम्मा घालायचा. मीठ घालून परत २-३ मिनिटं भाजी शिजू द्यायची. आणि मग गॅस बंद करून खाली उतरवायची.
करून बघा, ज्याना कोबी अजिबात आवडत नाही अश्याना सुद्धा ही भाजी आवडते.


Lajo
Thursday, September 28, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोबीची भाजी मी कधीकधी अशी करते,

बारीक चिरलेला कोबी,
लाल ढोबळी मिरचीचे छोटे तुकडे
Frozen मक्याचे दाणे
थोडी अख्खी काळी मिरी
जीरे
कढीपत्ता
चवीपुरते मीठ आणि साखर
थोडा लिंबाचा रस
कोथिंबीर
खवलेला ओला नारळ ( optional )

तापलेल्या तेलात जीरे आणि मीरे घालुन थोडे खरपुस परतायचे (जळु द्यायचे नाही).
आता त्यात चिरलेला कोबी घालायचा व कढीपत्त्याची पाने घालायची. झाकण ठेवुन वाफ आणायची
कोबी थोडा शिजत आला की लाल ढोबळी मिरचीचे तुकडे घालायचे आणि परत एक वाफ आणायची.
शेवटी मक्याचे दाणे, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालुन परत एक वाफ आणायची.
वरुन कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालायचे.

टीप: या भाजीत 'हळद' अजिबात घालायची नाही. कोबीचा हिरवट रंग, मिरचीचा लाल रंग आणि मक्याचा पिवळा रंग आशी छान तिरंगी भाजी दिसते.

कोबी खूप शिजवायची नाही. थोडी crunchy राहीली पाहीजे.

कोबीच्या भाजीत, हिरवी ढोबळी मिरची पण छान लागते. कोबी शिजतानाच त्यात मिरचीचे तुकडे घालायचे.


Dineshvs
Sunday, July 23, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaobaI

slaa[-sarcaa kaobaI kapNyaasaazI Cana ]pyaaoga haotao.hllaIcyaa caaOkaonaI iksaNaIlaa jaI kapM krNyaacaI saaoya Asato %yaavarpNa kaobaI Cana ica$na haotao.

tolaavar ijaro ihMga va ihrvyaa imarcyaaMcaI faoDNaI kravaI.%yaavar kaobaI Gaalaavaa.maIz va saaKr Gaalauna imainaTBarca prtavao.kaobaIlaa paNaI sauTu do} nayao.tao krkrItca rhayalaa hvaa. maga }t$na %yaavar ilaMbaacaa rsa ipLavaa.

dusara p`kar

AQaI- vaaTI na iBajavalaolaI ]iDdDaL tolaat KmaMga prtavaI.laala imarcyaaÊ ihMga va maaohrI Gaalauna %yaavar kaobaI Gaalauna prtavaa.maIz Gaalauna kaobaI iSajau Vavaa. ih BaajaI jara inavau VavaI mhNajao kaobaIlaa sauTlaolyaa paNyaat DaL iBajato.Savyasachi
Friday, March 16, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोबीची तीच तीच भाजी कशी करायची ते जरा सांगा. :-) US मधे मिळणारे पदार्थ वापरून.

Savani
Friday, March 16, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची, तीच तीच खायचा कंटाळा आला तर कोबीचा भात, किन्वा परोठे करता येतील. मुटके करता येतील. गोड हवे असेल तर रबडी करता येईल.


Savyasachi
Friday, March 16, 2007 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग सावनी, मला साधी भाजीच कशी करायची ते पाहीजे. तिच माहीत नाही तर इतर काय करणार? :-( तेंव्हा साधीच सांग.

Lalu
Friday, March 16, 2007 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तिच माहीत नाही तर इतर काय करणार?
वर इतर दिल्यात त्यातली एक सारखी सारखी कर, म्हणजे मग ती 'तीच तीच' होते, मग बाकी 'इतर' करायच्या! ~d :-)

बेसिक कोबीच्या भाजीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. कोणी नेहमीच डाळ किंवा पीठ पेरुन करतात. ही अगदी साधी- फोडणीला तेल, हळद आणि जिरे. हिरव्या मिरच्या आणि थोडे आले बारीक चिरुन. चिरलेला कोबी, मीठ साखर. शिजवण्याच्या टिप्स वर काहींनी दिल्यात त्याच. यात घालायचे सगळे पदार्थ US मध्ये मिळतात, (चांगला) कोबी सोडून! उग्र वास आणि जाड पाने नसलेला कोबी बघून आणणे. Whole foods किंवा organic सेक्शन मध्ये मिळेल. काही indian stores मध्ये पण चांगला मिळतो.


Psg
Saturday, March 17, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची.. ही घे बेसिक रेसिपी-
कोबी, मिरच्या, कोथिंबीर, फ़ोडणीचे साहित्य, हरबर्‍याची डाळ/ बटाटा**

जर सकाळी भाजी करणार असशील, तर आदल्या दिवशी रात्री हरबर्‍याची डाळ साध्या गार पाण्यात भिजत घाल. (प्रमाण- एका कोबीला अर्धी वाटी डाळ). सकाळी कोबी बारिक चिर. पातेल्यात/ कढईत नेहेमीची फ़ोडणी कर, मिरच्या घाल, आणि ही भिजवलेली डाळ, पाणी काढून घाल. परतून घे, मग कोबी घाल, सगळं mix करून घे, मग चवीनुसार मीठ, साखर. पुन्हा परत. थोडसं पाणी घाल आणि शिजत ठेव. पातेल्यावर झाकण ठेव.. त्यावरही पाणी घाल.. त्या वाफ़ेचाही उपयोग होतो. भाजी शिजली की कोथिंबीर, ओला नारळ घाल (ऐच्छिक).

** डाळ भिजवायला विसरली/ संपली असेल तर कोबी बरोबरच एका बटाट्याच्या काचर्‍या करून फ़ोडणीत घाल.


Savani
Saturday, March 17, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण मग वर दिलेल्या सगळ्याच रेसिपी साधी कोबीची भाजी कशी करावी अश्याच आहेत की.
कोबीमध्ये हरबरा डाळ, उडदाची डाळ, बटाट्याच्या काचर्‍या, नुस्तेच ओले खोबरे, असे कितीतरी वेगवेगळे प्रकार घालून करता येईल. सगळे US मधे सहज मिळणारे आहेत.


Savyasachi
Sunday, March 18, 2007 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, मस्त उपाय, एकदम आवडला :-)
सावनी अग ते विविध प्रकार वाचून गोंधळुन गेलो.
पूनम धन्यवाद. आता तुझी पद्धत परत परत वापरून तिच तिच करुन टाकतो. :-) फ़ार कोबी पडलाय घरात. मला डाळीच काय करायच ते माहीत नव्हत. (कोणती डाळ तेही माहीत नव्हत :-))


Nalini
Sunday, July 29, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोबीवडी.
कोबी न खाणार्‍याला( न आवडणार्‍याला) ह्या वड्या जर करुन खाऊ घातल्या तर अगदी मिटक्या मारत खातात कारण ह्यात कोबी होता हे त्यांना समजलेलेच नसते.Nalini
Sunday, July 29, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageNalini
Sunday, July 29, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageNalini
Sunday, July 29, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageNalini
Sunday, July 29, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageचोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators