Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कोबी

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » कोबी, फ्लॉवर, नवलकोल » कोबी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 29, 200720 07-29-07  1:24 pm

Nalini
Sunday, July 29, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Athak
Sunday, July 29, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओये ओये नलिनी काय काय बनवलेस मजा आ गया खानेकु
गरमागरम ताव मारला कबाब पॅटिस अन काय काय हे नांव सांग मग सांगतो किती छान झाले ते :-)


Nalini
Monday, July 30, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, ही कृती जर अस्थानी वाटत असेल तर योग्य जागी हलवायला मी तयार आहे. तु उडवलेला मेसेज मला अर्धाच वाचायला मिळाल्यामुळे मला तुझ्या सुचना नाही कळाल्या. परत एकदा सांगणार का? त्यात मला राग येण्यासारखे काहीच नाही.
खरतर मी नेमस्तकांची तसेच Admin ची हे सगळे फोटो टाकण्यापुर्वी परवानगी घ्यायला हवी होती. नेमस्तक, जर एखादी कृती अशी फोटो स्वरुपात टाकणे अयोग्य असेल तर कृपया हे फोटो उडवुन टाकावेत हि विनंती.


Bee
Monday, July 30, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, मला ह्या वड्यांची कृती हवी आहे आणि दुसरे म्हणजे इतकी बारीक कोबी चिरली की किसली तेही सांग. छायाचित्र छान आले आहे. वर आधी लिहिलेले दोन मजकुर मी उडवुन टाकलेत, उगाच जागा वाया जाऊ नये म्हणून.

मदत करण्यापुर्वी आगाऊ धन्यवाद..


Nalini
Monday, July 30, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अरे त्यात धन्यवाद कसले.
साधरण मध्यम आकाराचा भरीव कोबी घ्यायचा. तो खिसणे शक्य नसेल तर मग बारीक चिरायचा. जर कोबी चिरून घेतला तर तो पाण्यात घालुन काढायचा. मी फुडप्रोसेसरवर खिसून घेतला. मग त्यात मिक्सरमध्ये वाटलेले वाटण( हिरवी मिरची, जिरे, लसुण, अद्रक, मिठ, हळद) घातले. थोडासा लिंबूरस घातला. त्यात मावेल तेवढे बेसन घालून चित्रात दिसतेय तसे पिठ भिजवले. ह्यात वरुन पाणी घालायची गरज नसते. मग ह्या पिठाचे कोथिंबीरीच्या वडीला करतो तसे मुटकुळे करून ते कुकरमध्ये उकडून घेतले. उकडल्यानंतर त्याच्या वड्या कापुन तव्यावर तेल घालून खरपुस परतल्या.
प्रमाण: मी सगळेच अंदाजे घेतले होते. आवडीनुसार कमी जास्त तिखट करता येतील.



Runi
Monday, July 30, 2007 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी,
कोबीच्या वड्या एकदम आवडल्या, तोंडाला पाणी सुटले. करुन बघेन मी. एक बेसिक प्रश्न.
कुकर मध्ये त्या मुटकुळ्यांना किति शिट्ट्या मारायच्या. कि शिट्टी लावायचीच नसते कुकरला.


Bee
Tuesday, July 31, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, धन्यवाद, परत एकदा.. कसले तर कृती दिल्याबद्दलचे :-)

Runi
Friday, August 10, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, मी करुन बघितल्या कोबीच्या वड्या तु सांगीतल्या त्याप्रमाणे आणि एकदम छान झाल्या होत्या. धन्स ग.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators