Submitted by webmaster on 27 October, 2026 - 17:26
गेले काही दिवस सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मायबोली ऑफलाईन ठेवली होती.
फक्त मायबोलीच नाही तर जगातल्या लाखो वेबसाईटस , त्यात मोठ्या कंपन्या, काही सरकारी वेबसाईटस ही होत्या.
आता सर्व सुरळीत असले तरी डागडुजी करत रहावी लागणार आहे . त्यामुळे पुढचे काही दिवस मायबोली मधून मधून बंद ठेवावी लागेल.
तसेच ब्राऊझर मधून येणारी प्रत्येक मागणी तपासली जात असल्यामुळे मायबोली हळू चालते असे वाटेल. ही गोष्ट माहिती आहे आणि आता लगेच त्यावर उपाय नाही.
सुरक्षिततेच्या कारणासाठी नवीन सभासद नोंदणी सध्यासाठी थांबवली आहे.
तुम्हाला काही अडचण असली तर कृपया याच धाग्यावर कळवा.
इथे ही बातमी वाचता येईल.
https://www.theguardian.com/technology/2026/oct/22/websites-across-world...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच मस्त वाटलं पुन्हा
खरंच मस्त वाटलं पुन्हा मायबोली ला अप बघून. हि एकच site मी नित्यनेमाने बघते ऑफिसमध्ये पण server error बघून चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं . काहीही झालं तरी आता एवढ्या दिवसांसाठी मायबोली बंद ठेवू नका .
फारच चुकल्याचुकल्यासारखं वाटत
फारच चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं इतके दिवस. आता छान वाटतंय! >> +1
बेष्ट
बेष्ट 👌
अरे वाह
अरे वाह
इथे येऊन बरं वाटलं
.....
सगळे बग मरो
आणि मायबोली ला कुण्णाची दृष्ट ना लागो
...
भस्मबीज चा भाग यायला पाहिजे आता
मायबोली सुरू झाली ! धन्यवाद
मायबोली सुरू झाली ! धन्यवाद
किमान १० वेळा तरी चेक करत
किमान १० वेळा तरी चेक करत होते की चालु झाली का..
५०३ एरर बघुन परत फिरायचे
फेसबुक पेज वर पण चक्कर मारली..>> मी पण.
मायबोली सुरू झाली ! धन्यवाद>>
मायबोली सुरू झाली ! धन्यवाद>>> +१११
मला वाटले माझ्या ऑफिस ने बॅन
मला वाटले माझ्या ऑफिस ने बॅन केलीये
हायसे झाले!
मलाही वाटलं मला बॅन केलं का
मलाही वाटलं मला बॅन केलं का काय
शेवटी सरांना विचारलं तर ते म्हणाले टेक्निकल इशू असं कळतंय
मग म्हणलं ठिके आणि आज लगेच सुरू झाली
हा पायगुण म्हणाचया ला?
सुरू झाली मायबोली
सुरू झाली मायबोली
मस्त मस्त
वाड्यावर गप्पा मारणे मिस करत होतो,
त्या कल्लू ला अघोरी साधना करायला जास्त वेळ मिळतोय ह्या विचाराने चिंता वाढली होती.
असो आता सुरळीत सुरू झाली आहे.
एक- दोन दिवसात मायबोली सुरू
एक- दोन दिवसात मायबोली सुरू होईल असं वाटलं होतं पण जसे दिवस वाढू लागले तसं वाटलं एवढ्या वर्षाच्या सहवासात अचानक इतक्या दिवसांचा दुरावा कसा काय अचानक आला..? हूरहूर वाटली खरी..!
दुसरीकडे जराशी चक्कर टाकली मात्र मायबोलीशी एकनिष्ठ असल्याने दुसरीकडे जवळीक वाढवावी असं वाटलं नाही.
बरं वाटलं सुरु झाली मायबोली..!
मला आधी टेन्शन आले होते की
मला आधी टेन्शन आले होते की काहीतरी गडबड होऊन इथले सगळे लिखाण उडायला नको. एवढ्या वर्षांची कमाई नाहीशी व्हायची. आता बॅक अप घेईन. तो कसा याचे सल्ले मागायला उद्या स्वतंत्र धागा काढेन.
पण ते टेन्शन वगळता चांगले सुद्धा वाटले की चला एक सक्तीचा ब्रेक झाला. काही नवी दालने उघडली. मायबोलीच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे आणि तिथल्या लोकांना पिडायला सुद्धा मजा येते हे समजले.
हुश्श sss
हुश्श sss
आता कसे सर्व सुरळीत आहे
आता कसे सर्व सुरळीत आहे
श्वानाचे शेपूट तु नळीत आहे
चेहरापुस्तिकेस स्पर्शुनि यावे
तत्काळगावी निघावे स्वभावे
असे सर्व पर्याय शोधोन घ्यावे
दखनी सिनेमे पाहोन झाले
तेव्हां कुठे जरा ऐसे वाटावे
आता जरा माणसात बसावे
गड्या मदना माबोपंथेचि जावे
अडला हरी म्हणोन पाद धरावे
Pages