|
Milindaa
| |
| Tuesday, March 07, 2006 - 11:17 pm: |
| 
|
अगं मी खातेच शेवटी <<< मला अशी शंका आहे की स्टो च सांगत असेल आरोही ला की फक्त गोल कूकीज च खा
|
Sashal
| |
| Wednesday, March 08, 2006 - 12:29 am: |
| 
|
वा वा छान BB सुरू केलाय .. माझाही मुलगा ( आता १९ ला २ चा होईल ) खूपच terrible झालाय हल्ली .. काहीही सांगायची सोय नाही .. जेवताना सांडू नकोस, पाण्यात खेलू नकोस, तो तो झाली बास आता अशा बारीक सारीक प्रत्येक कारणावरून ओठ काढून रडून तरी दाखवायचं किंवा मग मझा patience संपून मी रागावले तर उलट किंचाळायचं .. बाहेर जायला ह्याला आवडतं म्हणून तयारी करायची तर कपडे, shoes ही तयारी करायलाच आढेवेढे त्यातून overpower करून केलं काही की परत ओठ काढून रडायला सुरूवात .. खरंच कठीण आहे ही phase ..
|
Kandapohe
| |
| Wednesday, March 08, 2006 - 2:24 am: |
| 
|
विदेशात Terrible Two असते होय. देशात तिसरं विसरं म्हणतात बुवा. दुसरे गेले, तिसरे गेले, चौथे, पाचवे तरी हे संपत नाहीये. आता आठवे हट्टी पण निघेल. सोबत Terrible Two आहेच. परत माझ्यात दडलेले लहान मुल आहेच. 
|
Bee
| |
| Wednesday, March 08, 2006 - 3:11 am: |
| 
|
खरच घरात लहान मुले असली तर एक वेगळाच टाईमपास असतो. आजकाल माझ्या भाचीला फ़ोनवर गप्पा मारायची इतकी सवय लागली आहे की माझी बेल वाजली की ती लगेच ओळखते हा मामाचा फ़ोन आणि मी सहसा काय काय विचारतो हे तिला इतके पाठ झाले आहे की मी न विचारता चार दोन दिवसात काय काय घडले हे सांगून बाईसाहेब पुढल्या नविन विषयांबद्दल बोलायला तयार असतात. आजकाल आई, आज्जीला फ़ोनला हात लावू नका अशी धमकी दिली आहे तिनी. मज्जा येते खूप लहान मुलांच्या वेगवेगळ्या phase मधुन जाताना. काही लहान मुलांना खेळणी हा प्रकार आवडत नाही. पाण्याशी, मातिशी, घरातील पातेल्यांशी, उशा गाद्यांशी खेळणेच त्यांना आवडते.
|
>>>>>> परत माझ्यात दडलेले लहान मुल आहेच. कोण म्हणत की लहान मुले म्हणजे जणु देवाघरची फुले! असतीलही! पण शिन्ची किन्चाळुन रडाओरडायला लागली ना की सणसणीत मुस्काटात हाणुन द्यावीशी वाटते! पण परदेशात म्हणे लहान मुलाना मारु नये असा कायदा हे! कठीणच हे हे सगळ! त्यात लोकाची मुल पावणी म्हणुन घरात येवुन धिन्गाणा घालतात ना अन माझ्या खेळण्याची वाट लावतात ना तेव्हा अस्सा राग येतो म्हणुन सान्गू! हल्ली मी माझी सगळी खेळणी कपाटात कुलुपबन्द करुन ठेवतो! कोण पावण रावळ नसल त्या दिवशी काढुन खेळायची! अन खर काय हे सान्गू का? ल्हान मुलाना आई अधिक प्यारी असती! बाबा पण असतो पण आदरार्थी भिती असती, खर तर असती म्हणण्यापेक्षा आईने ती निर्माण करणे अपेक्षित असत जस की मूल दन्गा करू लागल्यावर आता बाबा रागावतील हां अशा प्रकारच्या सन्वादाने ते निर्माण करायचे अस्ते! पण होते काय ना? की हल्लीच्या स्त्रीपुरुष समानतेच्या काळात बर्याच आयांना अशी भिती घालून पोरान्च्या बापाला मोठेपणा मिळवुन देणे म्हणजे पुरुषी अहंकाराला खतपाणी घातल्यासारखे वाटते! त्याऽऽत काऽऽय? त्याची कशाला भिती घालायची? असले सन्स्कार नाही बाई मी माझ्या मुलान्वर करणार! अन माझ्या मुलानी त्यालाच का म्हणुन घाबरायच? मल्लापण घाबरल पायजेल! मग सगळा घोळ सुरू होतो! हा एक घोळ सान्गितला, अशा प्रकारचे अनेक नमुनेदार घोळ मला ठाव हेत! पर येक सान्गू का? आमच्यात की नाई, लिम्बीच रणचण्डीकेचा अवतार धारण करती! अन मन्ग पोर अन म्या येकमेकान्ना बिलगुन बसतो! त्यान्ना की नाईऽऽ माझी मुॡच भिती वाटत नाही जेवढी लिम्बीची वाटते! येवढ्याश्या पोस्टला सारान्श नको लिहायला, नाही का? 
|
Psg
| |
| Wednesday, March 08, 2006 - 6:37 am: |
| 
|
आपल्या लहान मुलीच/ मुलाच कौतुक प्रत्येकालाच असत. पण त्याचे मूड्/ हट्ट कधी कधी impossible to tolerate होतात. तेव्हा थोड कडक/ strict व्हावच! एकुलत एक आहे म्हणून उगाचच्या उगाच प्रत्येक बाबतीत सारख कौतुक करणही चुकीचच आहे! कोणी काही उपाय केले असतील तर सांगा नाहीतर as usual विषय भरकटतोय!
|
>>>>> कोणी काही उपाय केले असतील तर सांगा नाहीतर as usual विषय भरकटतोय! मला तर सरळ जातानाच दिस्तो हे! तर घे, मी सरळ सरळ किन्वा आडपडद्याने सुचविलेले उपाय! 1. पण शिन्ची किन्चाळुन रडाओरडायला लागली ना की सणसणीत मुस्काटात हाणुन द्यावी शी 2. बाबा पण असतो पण आदरार्थी भिती असती, खर तर असती म्हणण्यापेक्षा आईने ती निर्माण करणे अपेक्षित असत जस की मूल दन्गा करू लागल्यावर आता बाबा रागावतील हां अशा प्रकारच्या सन्वादाने ते निर्माण करायचे अस्ते! 3. मल्लापण घाबरल पायजेल! 4. रणचण्डीकेचा अवतार धारण कर ती!
|
Asami
| |
| Wednesday, March 08, 2006 - 3:46 pm: |
| 
|
LT तू फक्त सारांशच लिहीत जा रे .. तोही फक्त २ ओळींमधे आणी एकदाच ...
|
Storvi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 4:32 pm: |
| 
|
श्या मुलांचं कौतुक हरेक बीबी वर जाउन करायचा माझा मनसुबा ही हाणुन पाडणार बहुतेक psg अगं लालू आणि इतरांनी सांगितले तेच उपाय. distraction वगैरे. आणि तु म्हणतेस तेच बरोबर. सगळे लाड पुरवायचे नाहीतच. त्याबदालही कोणी तरी वर लिहिलच आहे...एखाद्या गोष्टी वर कधी कधी मी सरळ तिच temper tantrum संपू देते पण I don't give in रडता रडता मग ती शांत होते, आणि अपण का रडत होतो हे विसरते. sometimes, you have to just let them vent out(keeping in mind you don't give in) this is the time they are testing the boundries. It is important for us to set some boundries and let them know what those boundries are. paN kaahI goShTI aapalyaa paddhatIt chukIchyaa aahet asaM maajhaM praamaaNik mat aahe. ekaane dusryaachaa dhaak daakhavaNe. kuThalyaahI goShTIt jar descipline करायचे असेल तर मुलाला ते करताना दोन्ही पालकांची धास्ती असावी. they should know that neither mom nor dad will stand for any nonsense शिवाय ती अमुक बघ कशी शहाण्यासारखे वागते हे ही कधी म्हणू नये. त्याने मुलं त्या अमुक चा दुस्वास करतात, And to be quite honest I have never seen this tactic work कोणी असं म्हटलं की ते मुल आणखीनच चवताळत असा माझा अनुभव आहे. तिसर भारतात सगळ्यांना लागलं की ' हात रे ' करायची सवय असते. मी भारतात गेले असतांना मला याचा इतका त्रास झाला जी मुलगी कधी कोणावर हात उगारत नव्हती ती पटकन हात रे असं म्हणुन आई ला पण मारू लागली. बर किती जणांना सांगणार? ते आपल्या इतकं अंगवळणी झालंय कि येता जाता काही लागलं की आपोआप ते म्हटलं जात. and the most important thing is decide now what is acceptable behavior and what is not. and once you make a decision stick with it.
|
Pinkikavi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 5:02 pm: |
| 
|
अगदी बरोबर लिहीलेयेस storvi , माझा मुलगा २ चा असताना मीही त्याच्या हट्टापुढे माघार घ्यायची..... नको ती रडारड म्हणुन लाड पुरवले आणि मग त्याला आयतेच शस्र सापडले.... काही हवे असले की भोंगा सुरु...... घरात बाहेर तेच.......मग आम्ही नवराबायकोने थोडे कडकपणाने वागाय्ला सुरुवात केली.... रडायचे तर रड बाबा म्हणुन ignore केले......स्वारी आता बर्यापैकी ठिकाणावर आली आहे........... आणि एक मजा कुठेही आम्ही बाहेर गेलो की परत घरात घुसने म्हणजे एक दिव्यच असायचे.......घराकडे वळलो की भोंगा सुरु.....साहेब पाय-या चढायलाच तयार नसायचे........मग मी आत जावुन kitkat घेवुन ययचे ते दिसले की मग स्वारी आत यायची...... मुलांचे हे हट्ट खुप लहान लहान असतात हो....... थोडे मोठे झाले की मोठ्या मोठ्या मागण्या असतात....
|
Manuswini
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:26 pm: |
| 
|
best thing is to ignore if kid cries and wants attention for no reason हे माझ्या बहिणीने सांगितले. लिहिले ना आधीच्या post मधे की तिचे संगीत गावून झाले की कोणिच भाव देत नाही पाहून झोपी जाते. बर्याच वेळा उगाच भोंगा असतो तिचा परवा म्हणे उठवलेस का नाही खेळायला. sister मुद्दम्हून म्हणाली तुच झोपलीस, its not my fault . असे उत्तर एकल्यावर but you dont care for me, बहिण म्हणाली see i love you more than care so i did not want to wake my princess sleep झाले तु मुद्दम हून उठवलेस नाही. बहिण म्हणाली बरे बाई आता गात रहा अशीच आणि तो सागर निघून जाईल park मधुन मग पुन्हा तुझाच fault आहे हा. दोन मिनीटे विचार करून गपचुप तयार झाली. background was that around 4:00 , all friends come to park, my niece got up around 6 and asked my sister the time, sister told her the time and she saw outside it was dark thiking that her friend must have gone now
|
Manuswini
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:32 pm: |
| 
|
one more thing, 2 year old is small but try to tell them if you don do this, you will have trouble rather than you strugling and forcing. if you give valid explaination,kids do understand it, I have seen. my niece is now 4 years old, sister intentionally let her take on her own decision, for e.g: i dont want to wear shoes, sister said fine, go like that but if you get any cut to your foot and has to go to doc, it will trouble you not me. so you should not go naked. आणी डॉक्ट्रची तिला थोडी भिती आहेच आपोआप घातले नी गेली बाहेर
|
Chetu08
| |
| Wednesday, March 08, 2006 - 11:32 pm: |
| 
|
Ya this is really true. U have to set the limits. and once set u should not change it. barech vegvegle views aani experiences wachayla milale. Thanx
|
Manuswini
| |
| Wednesday, March 08, 2006 - 11:39 pm: |
| 
|
आमची एक कामवाली बाई तिचे कारटं रडायला लागले की म्हणायची कंबरेत लाथ घालेन गप बस कवा पासून कारटं चिरचिर करतयां तिथं बाप जिव खातयां आनी एथं हे कारटं वहाण्याने मारेन गपचिप बैस पहा असे म्हणून बघा गप्प बसेल तुमचे मूल तिचे तरी कारटं गप्प बसायचे आता हे सर्व आपल्याच पोराला म्हणु शकता म्हणून सांगते
|
मनस्विनी सही गं ! HHPV अगदी ! 
|
>>>> they should know that neither mom nor dad will stand for any nonsense स्टोरवी, काही प्रमाणात व काही मोजक्या बाबी,तत्वान्करताच हे खर हे, आणि येवढ्या लहान मुलान्नाच काय टीनएजर्स करताही हे सुट नाही! याच कारण जर अशी भिती बसली तर, हातुन चुकुनही, मुद्दाम नव्हे, एखादा नॉन्सेन्स झाला तर तो आईबापान्ना कळु न देण्याची खबरदारी घ्यायला मूल शिकु शकत अन त्यातुन निर्माण होणारे घोळ वाढत्या वयात देखिल धोकादायक ठरतात! वय वर्षे पाच सहा पर्यन्त तरी मुलान्ना भावनिक आधाराची विश्वासाची गरज असते, तेव्हा ठरावीक कृतीन्करता बापाचा धाक, तर अन्य ठराविक कृतीन्करता आईचा धाक अशी वाटणी करणे चान्गले म्हणजे मुल चूक झाली तर ज्याचा धाक नाही त्याच्याकडे आधारासाठी तरी जाऊ शकते! यात केस टू केस अनेक बारकावे येतिल पण मूळ तत्व एकच! एकावेळेस कोणत्याही बाबतीत दोघान्चाही धाक असु नये, अन्यथा मुले आधारासाठी परक्या व्यक्तीन्चे सहकार्य घेवु पहातात अन बर्याचदा त्यात फसुही शकतात! हे आपल माझ मत बर का, पटल तरी तपासुन घ्या!
|
Psg
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:56 am: |
| 
|
मला अजून एक मदत हवी आहे- दात brush करण या बाबतीत!! ही मुल इतकी स्वावलंबी कुठुन होतात कळत नाही. हा आधी माझ्याकडुन छान दात घासून घ्यायचा, पण आता स्वत:ला brush धरता येतो ना.. परिणामी ब्रश नुसताच दातावरून फिरतो, दात स्वच्छ होत नाहीत! मला करूनच देत नाही! हेही सांगून पाहिल की दात घाण झालेत, आइकडून करून घेतले की white white होतात, पण ऐकत नाही!
|
Deemdu
| |
| Thursday, March 09, 2006 - 8:54 am: |
| 
|
मला वाटल होत माझाच मुलगा असा त्रास देतो की काय? माझे दात मी घासणार, मी ब्रश वर पेस्ट घेणार, माझे कपडे मीच घालणार, दरवाजा मीच उघडणार, आत्ता TV हवा म्हणजे हवाच आहे, बाहेर जाताना मी shoes घालणार नाही असाच येणार अस एक ना दोन कितीतरी गोष्टींमध्ये हेकेखोरी करायची, सटर फटर काहीतरी खायला मागायच नही दिल तर भोकाड पसरायच आणि दिल तर जेवायच्या नावान बोंब. शाळेत, daycare ला काहीतरी ऐकायच आणि घरी आल्यावर तेच नको ते शब्द वापरायचे एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली की मग रडारड आणि मारामारी, मग हाताने मार, पायाने मार आणि मग माझा मार काय करणार दुसरा पर्यायच उरत नाही
|
Storvi
| |
| Thursday, March 09, 2006 - 3:53 pm: |
| 
|
LT valid concern आहे. पण मला वाटतं धाक आणि भिती यात फ़रक आहे नाही? मी कायम माझ्या आई च्या धाकात राहिले, but she was also my best freind काही वावगं झालंच हातुन तर आई काय म्हणेल असे वाटायचे, आणि आई च्या रागावण्यापेक्षा तिच्या अबोल्याची धास्ती वाटायची. बाबांना मी घाबरायचे, पण I never shared my feelings with him, and same is true to some extent with my brothers. I think, if people in my mom's generation could achieve this, we certainly can make an effort, don't you think? deemdu, psg मलाही हा त्रास होत्य हल्ली, the way I tackle this is तिच्या बरोबर मीही दात घासते( माझे घासुन झालेले असले तरीही) आणि तिला दाखवते बघ आता आई कशी घासते.. त्याने थोडे तरी नीट घासले जातात. आणि मी तो बोटावर बसणारा tongue and teeth cleaner पण आणलाय, मग तीच्या पद्धतीने घासुन झाले की मी ते बोटावर चढवुन त्याने थोडे( जबरदस्तीने का होईना) स्वच्छ करते.
|
Seema_
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:13 pm: |
| 
|
Lt कधी कधी होत हं तस . आमच्या घरात मी जरा जास्तच आरडा ओरडा करते . पुन्हा कारण हेच कि patience कमी . या उलट daddy अगदीच शांतपणान समजावुन सगळ सांगतो . त्यामुळ बरेचदा अस होत कि daddy hero आणि मम्मा खलनायीका असते .
|
Manuswini
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:11 pm: |
| 
|
माझ्या भाचीची एक trick सांगते दात घासताना patience ठेवावा लागेल हे पुर्वसुचना एथे babysitting काळातील आहे हे. मी एकदम गाणी म्हणत भाचीला उठवायचे चलो हमारी सोनु तलवर हाथ लिये आ राही है भागो germs तिला हसायला यायचे सुरवातिला ती १-२ मिनीटे काय तिचे नखरे मी करु द्यायचे. मग जोरात गाणे म्हणत आता मनु aunt का कमाल देखो brush को लेके सोनु के germ यहा वहा भांगेगे. ते असे विचित्र मोठ्या आवाजात काय ते गाणे एकुन ती मला brush द्यायची all your germs are scared of your aunt, see they are running inside your mouth, oh my god there he is, on one more here .. dont hide there .. i am coming असे म्हणत व्यवस्तिथ ती मला brush फिरवायला द्यायची. wow! what a lovely smell .. आणि मी kiss घ्यायची. teacher will say why sonu has brighter teeth. dont tell this secret to anyone that germs are scared of your aunt उल्लु बनवायचे आणि काय. बहुतेक कामे जराशा गोडी गुलाबिने होतात हो. तेच माझी बहिण patience कमि, मग आदळापट होतो.वर बहिण मलाच म्हणेल तुला काय काम आहे.. मी एकदम भाचिच्या good books मधे आहे हो नंनतर ती स्वःताच करायला लागली, मी फक्त मागे उभी असायचे. brush करून झाले की aunt do you see any germs? मी लगेच, see if you brush the way your aunt, they are scared and run away, and she would ask how do I smell now? Lovely!!
|
Manuswini
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:19 pm: |
| 
|
one more thing, get attractive brushes for kids in different shapes, you get toothpastes also in attractive shapes in good brands here in USA, I would use, lets try barbie today etc etc, i learnt a lot from my niece, you have to be creative, funny, with lots n lots patience
|
Anupama
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:47 pm: |
| 
|
माझी मुलगी ३ वर्षाची आहे. same दात घासायला रोज कटकट. शेवटी Dora चा battery operated brush आणला, आता रोज सकाळ, सन्ध्याकाळचे युद्ध बन्द आहे. BTW, I think 3's are more terrible than 2's ;-)
|
Bee
| |
| Friday, March 10, 2006 - 11:43 am: |
| 
|
लहान मुलांना दात घासणे शिकविण्यापूर्वी रोज सकाळी उठल्यानंतर चुळा भरून त्या थुंकणे आधी शिकवावे. म्हणजे दात घासायची पुढली पायरी शिकायला त्रास होणार नाही. ब्रशनी दात खासण्यापुर्वी हाताच्या बोटानी दात कसे घासायचे हे शिकवायला पाहिजे. जर colagate ची चव आवडली नसेल किंवा आवडली म्हणून मुल colagate खात असेल तर आपले काळे दंतमंजन किंवा पांढरे दंतमंजन वापरून बघावे. सर्वात शेवटची पायरी ही ब्रश देण्याची. तोवर मुलांच्या हिरड्याही सशक्त होतात. एकदम ब्रश दिला तर हिरड्यांना त्रास होऊ शकेल. आम्ही ह्याच युक्त्या वापरूण पोरांना दात घासायला शिकविले आहे आणि मुळीच त्रास झाला नाही. ह्या पायर्या तुम्हीही जर मुलांदेखत केल्यात तर ती लवकर शिकतील. माझ्या घरी आई ब्रश वापरत नाही आणि शक्यतोवर तिच्याचकडे मुलांचे उरकणे असते म्हणून मुले आईकडून ह्या गोष्टी लवकर शिकतात.
|
Storvi
| |
| Friday, March 10, 2006 - 5:21 pm: |
| 
|
मनःस्विनी तू किती दिवस ह्या ठिकाणी होतीस, आणि पैकी किती दिवस तु तुझ्या भाचीचे दात घासलेस हे जरा सांगु शकशील का? Don't get me wrong, I just want to get an idea ... I will make my point only after you have provided the details
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|