Zakasrao
| |
| Thursday, July 19, 2007 - 3:29 am: |
| 
|
आता अनामिक ह्या BB वर फ़ार कोणी येत जात नाहि. त्यामुळे मी माझे सांगतो. मी मजेत आहे. तु कसा आहेस? येत जा इथे.
|
ए अनामिक ऐक ना विद्यापीठ हायस्कूल.. मी ९६ ची आहे.. तू गौतम पंगू नव्हेस ना
|
Zakasrao
| |
| Thursday, July 19, 2007 - 9:24 am: |
| 
|
गौतम पंगु म्हणजे तो बोर्डात आलेला पोरगा???? ये अनामिक आता येवुन काय ते सांग रे. हाय रुतु कशी आहेस?
|
Anamik
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:47 pm: |
| 
|
हाय ऋतु, झकास, मी गौतम पंगूच आहे. मी पण विद्यापीठला होतो. तुम्ही लोक सध्या कुठे असता?
|
ए हाय गौतम कसायेस तू? मी मधुलिनाची मैत्रिण.. सुप्रिया माझी ८वी ते ११वी पंगू वाड्यातच गेली.. चिटणीस बाई आणि पंगूसरांमुळे मी सध्या पुण्यात असते. झकास.. मी झकास आहे रे मेल वगैरे कर की जरा हो हाच तो बोर्ड वगैरे फ़ाडून आलेला पोरगा.. गौतम मग अजून एकटा आहेस की झालास दुकटा
|
Zakasrao
| |
| Friday, July 20, 2007 - 7:56 am: |
| 
|
हाय रुतु आणि गौतम मी मजेत रे. मी सध्या पुण्यातच आहे. तु १९९६ पास आउट काय? मला नेमक आठवत नाही रे तु कोणत्या वर्षी बोर्डात होतास.
|
Ram3
| |
| Friday, July 20, 2007 - 12:13 pm: |
| 
|
Namskar mandali Kase aaahat sagale .... Zakasrao ,Rutu ,Anamic
|
Anamik
| |
| Friday, July 20, 2007 - 3:33 pm: |
| 
|
ओह सुप्रिया , I remember you, मी सध्या फ़िलाडेल्फ़िया मध्ये आहे. भगवंताच्या दयेने अजुन एकटाच आहे झकास, मी दहावी १९९४ ला आणि बारावी १९९६ ला झालो. तू?
|
Zakasrao
| |
| Saturday, July 21, 2007 - 4:00 am: |
| 
|
म्हणजे मी दहावीत असताना ज्याच नाव राज्यभर गाजल तो तु तर. मी १९९६ ला १० वी बोर्ड न फ़ोडता फ़ाडता बरोबर पास झालो भगवंताच्या दयेन एकटाच आहेस का बर बर होइल होइल त्याच्याच कृपेने दुकटा पण होशील रे. बोर्डात येणार्या पोरापोरींच पुढे काय होत काही कळत नाही. उगीचच ते काहीतरी वेगळ वाटायच त्यांच्याविषयी. राम मी मजेत तुम्ही कसे?
|
Anamik
| |
| Monday, July 23, 2007 - 5:02 am: |
| 
|
झकास, काही वेगळं नसतं त्यांच्यामध्ये, बाकी सगळे तसेच ते पण. उगाच चार दिवस जरा लोक नाव घेतात तेवढंच. तू कोणत्या फ़ील्ड मध्ये आहेस?
|
अनामिक असं कसं असेल मग आम्ही पण आलो असतो की बोर्डात बाकी तुम्ही लकी होतात कारण आता बोर्ड च बंद झालाय.. झकास मेल केली नाहीस.. पाठव ना काहीतरी वाचण्याजोगे.. अनामिक अरे बाकी तुझ्या बॅचचे कोणीच नाही का रे येत मायबोलीवर.. आणि तुला भारतात येऊन किती दिवस झाले? कसे वाटते एकूणच तिथे? इथली आठवण येते की सवय झाली आता?? मधुलिनाचे लग्न झाले असे ऐकले..
|
राम नमस्कार कसायेस?मजेत? कुठे असतोस तू?कोल्हापुरातच का?
|
Ram3
| |
| Monday, July 23, 2007 - 12:51 pm: |
| 
|
झकास मि मजेत आहे.. रुतु मि पुन्यामधे आहे पन कोल्हापुर ला जातो नेहमि . तु पुन्यात आहे कि कोल्हापुर आनामिक पन्गु सरान्चा मि पन विद्यार्थि आहे . देवचन्द कोलेज मधे होतो.
|
Anamik
| |
| Tuesday, July 24, 2007 - 4:49 pm: |
| 
|
राम, नमस्कार. मग सध्या तू संपर्कात आहेस का सरांच्या? ऋतु, मधुलिनाचे लग्न झाले आणि तिला एक मुलगी पण झाली. माझ्या बॅचचे बाकी कोणी हितगुजवर तरी नाही दिसले. बाकी तू कशी आहेस?
|
नमस्ते गौतम अरे मी एकदम मस्त मजेत मधुलिनाची बातमी सहीच मग असते कुठे ती? कोल्हापुरातच का?? अरे इथे तुझ्या बॅचचे नसतील कदाचित.. मग इथे पूर्वी यायचे ते सई लालू मद्या वगैरे आपल्याला सीनिअर असावेत. तुला बाकी बरेच दिवस झाले असतील ना कोल्हापूरला जाऊन? मी जात असते ३ आठवड्यांनी नियमीत... अधे मध्ये चिटणीस बाईंना भेटत असते.तेवढाच गोडवा अनुभवायला मिळतो.
|
Zakasrao
| |
| Wednesday, July 25, 2007 - 7:52 am: |
| 
|
हाय लोक्स! रुतु सई मद्या हे लोक आपल्याला बरेच सिनियर आहेत. अरे गौतम मी मेक. इन्जि. मधे. आहे. इथे पुण्यात येवुन ६ वर्श झाले.
|
Anamik
| |
| Thursday, July 26, 2007 - 5:28 am: |
| 
|
मद्या मला ३ वर्षे सिनियर आहे. ऋतु, मला भारतात जाऊन अडीच वर्षं झाली आहेत बहुतेक या वर्षी एखादी ट्रीप होईल. मागच्या ट्रीप मध्ये भेटलो होतो चिटणीस बाईंना, तुझे खूप कौतुक करत होत्या
|
बरं बरं गौतम सकाळपासून नाही का कुणी मिळालं खेचायला.. बाई माझे कौतुक बरे करतील ते?? असो बाप रे म्हणजे मला तर खूपच सीनिअर की तो मद्या मला वाटतं मन्दार जोगळेकरची बॅच असणार बाकी कसायेस तू? तिथे कुणी आहे का कोल्हापूरचे? तिकडचे मित्र मिळाले असतील ना नवे आतापर्यन्त.. झकास पुन्हा नाही सांगणार मेल कर म्हणून..
|
Anamik
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:27 pm: |
| 
|
ऋतु, कोल्हापुरचे काही लोक आहेत इकडे. बाकी नवीन मित्र पण बरेच मिळालेत. तू कविता वगैरे करतेस का? तुझ्या आयडी वरून वाटलं. झकासराव कुठे गायब झाले?
|
अनामिक अरे हो..करायचे पूर्वी मी कविता गुलमोहोर वर पण टाकायचे तेव्हा.. सध्या लिहिते काहीबाही अजून काय नवीन चालू आहे.. मराठी वाचन वगैरे होत नसेल ना आत्ता तुझे? केव्हा असशील साधारण इकडे? मला ना अरे आपल्या शाळेत सुद्धा जायचेय.. किती दिवसात नाहीये पाहिले
|
Anamik
| |
| Monday, August 06, 2007 - 12:09 am: |
| 
|
बहुतेक डिसेंबर मध्ये असेन भारतामध्ये...बघू या. मागच्या वेळी शाळेत गेलो होतो. मराठी वाचन होते अधूनमधून. भारतातून आणलेली पुस्तकं आहेत, आमच्या युनिव्हर्सिटिच्या लायब्ररीमध्ये बरीच मराठी पुस्तकं आहेत. नाहीतर मायबोली आहेच :-)
|
Lalu
| |
| Wednesday, April 02, 2008 - 1:16 pm: |
| 
|
हॅलो, हॅलो... इथे बीबी सुरु केला की नवीन जागा मिळेल....
|
हे सदर आता खालील जागी हलवले आहे /node/1660
|