Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माणगाव १७ किमी. ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » कथा कादंबरी » माणगाव १७ किमी. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 29, 200720 10-30-07  1:26 am
Archive through October 31, 200720 11-01-07  3:52 am
Archive through November 02, 200711-02-07  3:17 pm

Moderator_5
Friday, November 02, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, या कथेवर प्रतिसाद द्यायचा असेल तरच इथे लिहावे. इतर वाद इथे कृपया नको.

Nilima_v
Friday, November 02, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा चांगली आहे पण नीट ज़मली नाही.
बारीक गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवे.
" ..आपल्या आईबाबानी तर सगळे स्वीकारलेच होते ना ? जातीचा, वयाचा ईश्यु तिच्या आईबांकडुन आला. आणि आता तर तिचे पण सगळे व्यवस्थित आहे. काकाकाकुनीही काहि मनात ठेवले नाही. आईबाबानी आजचे आमंत्रण देखील दिलेय त्याना. ताईने समजुत काढली. "
यात कळले नाही की तिच्या आईबाबांकडुनच ईश्यु आला तर त्यांनी मनात काही ठेवयचा प्रश्ण येतोच कुठुन?
त्यातून वर आईबाबानी आजचे आमंत्रण देखील दिले हे जरा अतीच वाटले.

पण तरी गोष्ट आवडली कारण, मनात ठेवण्याचा काहीजणांचा (माझा पण) स्वभाव तुम्ही अचुक पकडलात.
कथेच्या मांडणीत आणखी सुधारणेला वाव आहे.


Manjud
Saturday, November 03, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदांचं कथाबीज मला क्लिक झालं, कथा समजली म्हणून मी अभिप्राय दिला होता. कोणी ऐर्‍यागैर्‍याने थोर ठरवावे म्हणून नाही.

मॉड्स, माझे पोस्ट विषयाशी संबंधीत नसल्यास तुम्ही ऊडवू शकता.


Ashbaby
Saturday, November 03, 2007 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकारात्मक विचार करणारी माणसे आपल्या वागण्यातुन, बोलण्यातुन, समोरच्या व्यक्तिला पण कसे आपल्या विचारांच्या विळख्यात ओढतात, तेच इथे दिसले. सकारात्मक विचार हे प्रयत्नपुर्वक अंगात बाणवावे लागतात बहुदा.

दिनेश, तुमचे वरील वाक्य खुप आवडले. मुद्दाम लिहिण्याचे हेच एकमेव कारण.

आणि गोष्ट ही आवडली. ग़ोष्टीवरील चर्चेने मस्त करमणुक झाली.
साधना.


Manuswini
Saturday, November 03, 2007 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे कीती हा वाद. pls कुठलाही नवीन वाद नको हां माझ्या post ने. पण असे वाटते की,
(अगदीच नाही राहवले म्हणून लीहीते),

कोणीही माणुस आपापली प्रतीक्रीया त्याच्या perception पणे देतो, कींवा अगदी Crude शब्दात म्हटले तर स्वतच्या 'अक्कलेप्रमाणे' देतो आणि त्याची ही प्रतीक्रीया ही त्याला आतापर्यन्त असलेले Exposure , अनुभव (मग तो चुकी का बरोबर काहीही असो) असल्याप्रमाणे देतो कथा वाचून झाल्यावर.
पण ह्या सर्व पोस्ट वाचून असे वाटते की कोणी उगाच कशाला उहापोह करतो. म्हणजे एखाद्याला 'आवडली' म्हणायला पण चोरी नी 'नाही आवडली' म्हणायला पण चोरी असे झालेय इथे.

एक 'आवडली' म्हणाला की दुसरा लगेच नावडली म्हणणार मग मध्येच कोणीतरी अचानक तीसरा 'उपटणार' नी लोकांच्या प्रतीक्रिया कीती चुकीच्या आहेत, biased आहेत, मग त्या कश्या 'उगाच वा वा ' करण्यासाठी आहेत कारण तो लेखकाचा नातेवाईक लागतो वगैरे वगैरे असा कशाला वाद घालतो?? तुम्ही तुमचे मत मांडा ना.. नी गप्प बसा ना...

अरे गोष्टीवर'च' प्रतीक्रीया द्या ना, कोणी काय लीहीले त्यावर कशाला चर्चा करता. उलट असा वाद घालण्यार्‍याला आपण का मह्त्व देतो??(हे आपले मला वाटते).

(आता ह्या माझ्या पोस्टवर 'खुप स्वतला शहाणी समजते अशी पोस्ट नक्कीच येणार पण आपल्याला काही फरक पडत नाही.)

dup ID विषयी तर काही बोलायचे. मागे मला पण अशीच खुप मेल येत होती. बहुधा पाठवण्यार्‍याला काहीच उद्योग न्हवता. अगदी जबरदस्तीने मी कशी id ओळखली तुझी वगैरे वगैरे लीहून. मी म्हटले, बाबा तु तुझ्या आक्कलेप्रमाणे स्वतला शहाणा म्हणतोस नी अगदी छातीवर ठोकून सांगतोस तर सांग बाबा, आपलयाला काहीही फरक पडत नाही. 'कर नाही तर डर कशाला', अगदी बायकी पद्धतीने watch ठेवत होता / होती हा / ही व्याक्ती, म्हणजे हा पण एक चीखलफ़ेकीचाच प्रयत्न होता. शेवटी त्या व्याक्तीने आपणहून माफ़ी मागून गप्प बसली. बरे इथे नुसते तसेच सुंभे नाहीत तर उगाच दुसर्‍याचे कान भरवणारे आहेत अश्या अफ़वा पेटवून but ignore such people, you dont need to prove anybody waht you are. this is my policy .


Manuswini
Saturday, November 03, 2007 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(हे गमतीने लीहीतेय) परवा मी Taxi 9211 पाहीला, त्यात कसा नाना पाटेकर जगावर डाफ़रत असतो सदान कदा. जशी काही सगळी दुनिया वाईटच.. स्वतमध्ये काय आहे ते बघ ना.( you know its about 'attitude' some people just cant accept good things or appreciate good things around them or may be cant take somebody can be better than them. )
सदा कडवट पणे बोलणे, वागणे. इथील काही id बघता मला त्या नाना पाटेकरच्या त्या character ची आठवण आली अगदी. :-))


Dineshvs
Sunday, November 04, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, प्रतिक्रिया द्यायला चोरी, हा मुद्दा पटला, आणि आवडलाही.

मधे कथेतील इंग्लिशचा मुद्दा आला त्याबद्दल. मला ती भाषा वातावरणनिर्मितीसाठी आवश्यक वाटली. कार्यालयातही ( बघा हा शब्दही खटकेल ) एकमेकांशी शुद्ध मराठीत बोलणे क्वचितच ऐकायला येते. क्रियापदं मराठीत ठेवुन, भाषेचे शेपुट मात्र धरुन ठेवले जाते. ( मी तूला मेल टाकलाय, सर्च मार, हे तर सर्रास ऐकतोच ना आपण ) .
मला स्वतःला अशी भाषा आवडत नाही. मी क्वचितच मराठी भाषिकांशी इंग्लिशमधे बोलतो.
मला लहानपणापासुन डॉ. जयंत नारळीकरांचे बोलणे आवडते. पुर्वी ते टिव्हीवर अनेकदा येत. कितीही तांत्रिक विषय असो, ते शक्यतो मराठीतच बोलत असत. त्या मानाने अजित वाडेकर मात्र कुठल्या भाषेत बोलतोय, तेच कळत नसे.

निलिमा, इथे मुलीच्या आईवडिलांकडुन तो प्रस्ताव स्वीकारला गेला नाही. अश्यावेळी दोन कुटुंबात दुरावा राहतोच. पण तो दोन्ही कुटुंबानी ठेवला नाही, फक्त यानेच ठेवला. लहानपणापासून ते एकत्र होते, म्हणजे ते शेजारी वा जवळपास रहात असणार. मग या मुलाच्या आईवडिलानी, त्याना आमंत्रण देणे योग्यच होते. शुभकार्यात सगळ्याना आमंत्रण देतात. त्या मुलीचे लग्न झाले आता याचेही होतेय, मग दोघांचेही आईबाबा असेच वागणार ना ?
मॉडरेटर ५, डुप्लिकेट आयडीवरची चर्चा, त्यासाठी दुसरा बीबी उघडला होता, तिथे करता येईल.
मी त्यांची दखल घेतलेली नाही वा चिखलफेकही केलेली नाही. इतरांच्या त्यासंदर्भातील मुद्द्याना मी उत्तरे दिली आहेत, इतकेच.

तरिही, सत्य परिस्थिती माहित असल्याने, अज्जुकावर होत असलेल्या नियोजित हल्ल्याचा मी निषेध करतोय.


Gobu
Sunday, November 04, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजी, बा द वे, कथेत बारकावे छान मांडलेत!

Dineshvs
Tuesday, November 06, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सत्यजित, हा हा हा.

गोबु, या बारकाव्यातुन मला एक वेगळेच सुचवायचे होते. हा माणुस एका क्षुल्लक घटनेत, जी खरीही नसेल, इतका गुरफटतो कि त्याला उद्याच्या आनंदाच्या प्रसंगाची आठवणही रहात नाही.


Gobu
Tuesday, November 06, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, हो हो, हे अगदी खर आहे


Zakki
Tuesday, November 06, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, माफ करा. तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता.

मला इतके दिवस गंमत वाटायची की मराठी म्हणून लोक कसे इतर भाषा त्यात घुसडतात. कथेत वातावरण निर्मिती इ. कल्पना माझ्या आवाक्याबाहेरच्या आहेत. म्हणून मला कळले नाही.

मला आता अनुभव आहे की भारतात आजकाल कसे बोलतात. त्याला इलाज नाही. सर्वांना आता तसेच बोलावे लागणार. नारळीकर फार मोठे आहेत. ते प्रवाहाविरुद्ध जाऊन मराठीत बोलू शकतात. इतरांच्यात तेव्हढी ताकद नाही. ते (म्हणजे मी सुद्धा) वहातच जाणार प्रवाहाबरोबर.


Dineshvs
Wednesday, November 07, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्कि, यात दुखवण्यासारखे काय आहे ? अगदी शुद्ध मराठीही कधीकधी हास्यास्पद ठरते. आवश्यक तेवढे इंग्लिश शब्द बोलण्यात येणारच. पण गरज नसताना हल्ली खुपदा असे धेडगुजरी बोलतात.
तुम्ही कुठल्याही दोन तामिळ व्यक्तींचे संभाषण ऐका. त्यांच्या तामिळ बोलण्यात इतके इंग्लिश शब्द येतात, कि ती भाषा न कळणार्‍याना सुद्धा सगळे कळते. तसेच आपलेही व्हायला लागलेय आजकाल.
आणि हो तुम्हाला मुद्दाम मी उधृत केलेला उतारा वाचायची विनंति करतोय. अर्थात तुम्ही मूळ अंकही वाचलाच पाहिजे. उतारा इथे आहे बघा.
/hitguj/messages/103385/3251.html?1194414490#POST1021897

Chinya1985
Wednesday, November 07, 2007 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नारळीकरांबरोबरच संदीप पाटील पण छान मराठी बोलतो.सर्व जण सिक्स वगैरे म्हणतात पण तो षटकार म्हणतो आणि इतरही शब्द मराठीतच बोलतो. अहो दिनेश तुम्ही कुठल्या तमीळ लोकांना भेटला आहात मी तर इथे इतके तमीळ लोकांना बोलताना बघितले पण ते आपल्यापेक्षा कितितरी इंग्रजी शब्द कमी वापरतात आणि जरी शब्द वापरलाच तरी अशा तमीळी पध्दतीने बोलतात की वाटत हा शब्द तमीळच आहे.

Dhumketu
Monday, November 12, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आवडली. कधीकधी फ़ोटो किंवा चित्रात काहीतरी राहून गेल्याचा भास होतो आणी ते चित्र वा फ़ोटो आपण परत परत पाहतो. तरीपण अतृप्ततेची भावना मनातच राहते, तशी ही कथा वाटली..

btw, माणगाव च्या १७ कि.मी आधी कुठलाही घाट लागत नाही.


Prafullashimpi
Monday, November 12, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hiदिनेश,
कथेपेक्श ते प्रसन्ग वर्णन फ़ार वाट्ले.
बाकी ठिक आहे.

कळावे. लोभ असावा.

प्रफ़ुल्ल


Bhagya
Monday, November 12, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा!
गोष्ट आवडली, खरंच.

हे घडुन गेलय किंवा नाही याची पण खात्री नसताना, त्याच विचारात गुरफ़टून पुढच्या आयुष्याचा आनंद न घेउ शकणारा कथा नायक चांगलाच रंगवलाय.

आणि आजकाल इंग्रजी शब्द तर इतके येतात संवादात की अरे बाबांनो! एकतर मराठी बोला नाहितर इंग्रजी बोला असे म्हणावेसे वाटते.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators