Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 03, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... » Archive through October 03, 2007 « Previous Next »

Aktta
Wednesday, September 26, 2007 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म्म आरामात लीही.....:-)
एकटा...


Ana_meera
Thursday, September 27, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केव्हा येणार वादळ?
वादळाच्या प्रतिक्षेत्- तमाम मायबोलीकर्स(नंदि चे पंखे)


Anaghavn
Thursday, September 27, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ख़ूप उत्कन्ठा लागून राहीली आहे.जेव्हढ जमेल तेव्हढ लवकर टाका.

Nandini2911
Thursday, September 27, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारा त्या दिवशी ऑफ़िसला जाण्यासाठी तयार होत होती. दुपारचा एक वाजून गेला होता. तसंही सध्या वर्ल्ड कप चालू असल्यामुळे तिला जास्त काम नव्हतं. नट्याना कुठला क्रिकेटर आवडतो आणि क्रिकेटराना कुठली नटी हे लिहिणं एवढंच काम होतं, त्यामुळे रात्री लवकर परत येता आलं असतं.
येताना वीरच्या सेटवर जाऊन त्याला सरप्राईज द्यायचा तिचा विचार होता. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला.
नंबर अनोळखी होता. पण मुंबईचाच होता. तिने फोन घेतला.
"सारा..." पलीकडून आवाज आला. खूप जवळचा, तरीही अनोळखी.
"कौन?" तिने विचारले,
"बेटा, फ़ैजल बात कर रहा हू.. पहचाना?" खरंतर तिनं अजिबात ओळखलं नव्हतं. पण तसं दाखवून दिलं तर मग ती पत्रकार कशी म्हणावी?
"हा.. बोलीये.. कैसे है आप?" तिने विचारलं.
"नही पहचाना तुमने मुझे.." पलीकडचा माणूस किंचित हसत म्हणाला.
काय वैताग आहे....
"जी नही पहचाना... " तिने कबूली देऊन टाकली.
"मै रत्नागिरीसे हू.. " तो म्हणाला. तिला रत्नागिरी सोडून दोन वर्षे होऊन गेली होती. तरी तिला काहीच अर्थबोध होईना..
"शायस्द तू मला विसरली असशील पण माझं तुझ्याकडे काम होतं. तू माझी थोडी मदत करशील?" तो माणूस अगदी हळू म्हणाला.

जवळ जवळ अर्ध्या तासाने सारा दिलेल्या पत्त्यावर माझगावला पोचली. फ़ैजलचाचानी तिला इथलाच पत्ता दिला होता. का यायचं ते ही सांगितलं होतं. पण त्याना तिची नक्की कशी मदत हवी होती ते मात्र त्यानी सांगायचं टाळलं होतं. त्या अंधार्‍या बिल्डिंगमधे तिसर्‍या मजल्यावर त्यांचं घर होतं. आज किती तरी वर्षानी ती त्याच्या घरी जात होती. रत्नागिरीत असताना त्याच्याच घरी सारखी असायची.

"आओ," चाचानी दरवाजा उघडताच हसून तिचं स्वागत केलं. रत्नागिरीसारखं हे घर मोठं नव्हतं. पण एकदम छान सजवलं होतं. चाची मात्र घरात कुठेच दिसत नव्हत्या.
वातावरणामधे एक अवघडलेली शांतता होती.
"चाचा, कहा है वो.." तिने न राहवून विचारलं.
"हॉस्पिटलमधे. घरचे सगळे तिथेच गेले आहेत."
"केव्हा? आय मीन.. " आपलेच शब्द असा दगा देतील असं तिला कधीही वाटलं नव्हतं.
रेहानची परत भेट होईल असं तिला वाटलं नव्हतं. आणि जरी वाटलं असतं तरी तो असा भेटेल हे ही तिला वाटलं नव्हतं....


Aktta
Thursday, September 27, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good Good Good Good

Nandini2911
Friday, September 28, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती तरी वेळ फ़ैजलचाचा तिच्याशी बोलत होते. पण तिचं लक्षच नव्हतं. ती मनाने केव्हाच रत्नागिरीला पोचली होती.

त्याच्याबरोबर ते हसणं बागडणं, उन्हातान्हातून भटकणं, त्याच्याबरोबर रात्र रात्र जागून तारे बघणं.. सगळं तिच्या डोळ्यासमोरून तरळत होतं. तो तिचा मित्र होता. सर्वात जवळचा मित्र. त्या अल्लड वयामधे स्वत्:ची सगळी स्वप्ने त्यानं तिला सांगितली होती. आणि तिनं त्याला. तिची स्वप्नं मूर्तरूपात होती. त्याची मात्र केव्हाच छिन्नविछिन्ह झाली होती. आणि कुठे ना कुठे सारा यासाठी जबाबदार होती.
"मला रेहानला भेटायचंय...." ती न राहवून बोलली.
चाचानी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.
"हो, मला त्याला भेटायचय. प्लीज चाचा. आपण अजूनही त्याला वाचवू शकतो. हो ना? " बोलता बोलता तिच्या डोळ्यातून पाणी आलं.

"बेटा, सहा महिने आधी तू भेटली असतीस तर काहीतरी फ़ायदा झाला असता... आता काहीच उपयोग नाही. बस्स.. त्याची आखरी इच्छा आहे तुला भेटायची. ती तू पूर्ण कर... बाकी काही नको." चाचा म्हणाले.
"चाचा, मी भेटते त्याला. मग बघू पुढचं..."

त्या दिवशी तिने ऑफ़िसमधे येत नाही असा मेसेज पाठवला. अर्थात कामाचा ताण नसल्यामुळे धवन पण काही बोलला नाही.

ती रेहानला भेटायला गेली.

रेहान तिथे बसला होता. कधी काळी एखाद्या तळ्यासारखे खोल असलीले त्याचे निळे डोळे आता मात्र सुकल्यासारखे दिसत होते. सोनेरी केस अस्ताव्यस्त वाढले होते, आणि पिंजारलेले. एके काळी या केसाचा स्पर्श रेशमासारखा होता.. तिला अचानक आठवलं... तो खूप बारीक झाला होता. त्याच्या हातात एक वर्तमानपत्र होतं. पण नजर मात्र कुठेतरी शून्यात.
"तुम्ही मला सांगू नका. तिचं नाव याच पेपरमधे असेल. मी वाचतो आणि मग तुम्हाल सांगतो. काहीही बोलतात हे लोक..." तो एकटाच बोलत होता.

साराच्य डोळ्यासमोर पाणी केव्हा आलं आणि केव्हा अंधारी आली आणि केव्हा ती पडली हे त्याअला समजलंच नाही. मुळात सारा तिथे आहे हेच रेहानला समजलं नाही.


Nilima_v
Friday, September 28, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असे वाटते सारा आणि रेहान एकच आहेत "Beautiful Mind" movie सार्खे.
लवकर साराला बरी कर.

Aktta
Friday, September 28, 2007 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा लागोपाठ दोन पोस्ट...:-)

Anaghavn
Tuesday, October 02, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्सूक्ता वाढत आहे.येऊ द्या लवकर.

Nilesha
Tuesday, October 02, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला या इथे लिहिल्या जानार्या लिखानाचे कोपिराइत मिलु शकतिल का?

Moderator_2
Tuesday, October 02, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे लिहील्या जाणार्‍या लिखाणाचे कॉपिराईट त्या त्या लेखकाकडे असतात. त्यांच्या परवानगीने तुम्ही ते साहित्य वापरु शकता. कॉपिराईट कशा साठी हवे आहेत.


Nandini2911
Wednesday, October 03, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवळ जवळ तासाभराने तिने वीरला फोन लावला. वीरने शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेतलं.
रात्री जेव्हा तो तिच्या फ़्लॅटवर गेला तेव्हा सारा अजून रडतच होती.
"कोण रेहान?" त्याने पहिलाच प्रश्न तिला विचारला.

"माझा लहानपणचा मित्र, माझ्या जवळ रहायचा." तिने हुंदका आवरत उत्तर दिलं.
"काय झालय त्याला?" त्याने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.
"त्याला वेड लागलय..."
"काय?"
"लहानपणापासूनच तो जरा सा.. म्हणजे.. पण आता मात्र.. वीर... आता काहीही... मला त्याची अवस्था बघवत नाही.. " ती परत रडायला लागली.
कितीतरी वेळ वीर तिला कुशीत घेऊन सम्जावत होता. तुकड्यातून तुकड्यातून त्याला रेहानबद्दल समजत होतं.

रेहान साराच्या जवळ रहायला होता. ती आठेक वर्षाची होती जेव्हा ती रत्नागिरीला आली होती. रेहान दहा वर्षाचा होता. त्याची आई नुकतीच कॅन्सरने गेली होती. रेहानला मुद्दाम दूर हॉस्टेलवर ठेवलं होतं. पण त्याची आई गेल्यावर मात्र त्याला त्याच्या मामाकडे रत्नागिरीला ठेवलं होतं.

हळू हळू त्याची आणि साराची ओळख झाली होती. तसा अभ्यासात हुशार होता तो. पण मधेच थोडा विक्षिप्तपणा करायचा. कधी कधी दिवसभर घरात बसायचा, तर कधी कधी कुठे आहे त्याचा पत्ता लागायचा नाही.
हट्टाने त्याने अब्बांकडून टेलीस्कोप मागवून घेतला होता. रात्र रात्र तारे बघत बसायचा. त्याची स्केचेस वहीत काढायचा.

तसा रेहान जास्त कुणाशीच बोलायचा नाही. शिवाय सारा. सारा त्याची बेस्ट फ़्रेंड होती. त्याच्याबरोबर फ़िरायची. गप्पा मारायची. सुदैवाने साराच्या घरून कधी तिला या विषयावर टोकले नाही. खरंतर तिच्या घरी कुणाला तितका वेळ पण नव्हता.

"तेव्हाच मॉमला डॅडच्या सततच्या भानगडीविषयी समजलं होतं. कित्येकदा ती मला घेऊन तिच्या घरी पण जाणार होती. पण डॅड कायम तिला कसेतरी समजावयचे. " सारा वीरला सांगत होती. "पण मग सतत त्याची वाद चालू रात असले नसले तरी फ़रक पडायचा नाही. माझे शाळेतले ते दिवस फ़क्त आणि फ़क्त रेहानमय होते. खूप मस्ती करयाचो आम्ही. खूप भटकायचो. तो दहावी पास झाला आणी त्याच्या अब्बानी त्याला बाईक घेऊन दिली. मग तर काय? अख्खी रत्नागिरी पालथी घातली असेल आम्ही. " नकळत साराच्या चेहर्‍यावर एक हसू आलं.


Anaghavn
Wednesday, October 03, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रहस्या वाढत चालला आहे.सारा आणि सरस्वति?काय गेम आहे?

Anaghavn
Wednesday, October 03, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही कथा लिहायची आहे.प्लिज मला कुठे कथा टाकायची ते सान्गाल का?

Chaffa
Wednesday, October 03, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतपर्यंत पोहोचलात आहात तर कथा कादंबरी या शिर्षकाखाली नविन thred चालु करण्याची सोय आहे तिथे क्लिक करा आणि तुम्ही लिहू शकाल आपल्याला शुभकामना.

Nandini2911
Wednesday, October 03, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काय झालं?" तिच्या गालावर आलेली केसाची एक बट मागे सारत वीरने विचारलं.
"सहज आठवण आली. तो एकदा मला एका उंच कड्यावर घेऊन गेला होता. तिथून रत्नागिरी आणि समुद्र दोन्ही इतकं छान दिसत होतं. सुर्यास्ताची वेळ होती. इतकं मस्त रोमॅंटिक वातावरण होतं. ना..."
वीरची नजर त्याच्या नकळत धारदार झाली.
"अरे, असा चिडतोस काय? रेहान माझा फ़क्त मित्र होता. त्याच्यापलिकडे कधीच काही नाही. पण आता मात्र...."
"आता मात्र..." त्याने विचारलं.
"वीर, रेहान फ़क्त थोड्याच दिवसाचा सोबती आहे. तुला मी सांगितलं ना.. रेहान स्किझोफ़्रेनिक आहे. इतकी वर्षे तो एक दुहेरी जीवन जगत आलाय. एक खरं जग आणि एक त्याचं कल्पनेतलं जग. या खर्‍या जगात त्याची मैत्रीण सारा होती. आणि कल्पनेत.. " बोलता बोलता सारा उठली आणि एक जुनी पुराणी डायरी तिने वीरच्या हातात दिली.

डायरीवर नाव लिहिलं होतं. "सरस्वती केळकर"
"ही कोण?" त्याने विचारलं.

"ही रेहानची मैत्रीण. त्याच्या कल्पनेतली. आज दुपारभर बसून मीही डायरी वाचून काढली आहे. हे रेहानचंच अक्षर आहे. त्यानेच लिहिली."
"यु मीन.. सरस्वती एक इमॅजिनेशन आहे?"
"तुझ्यामाझ्यासाठी येस... सरस्वती एक कल्पना आहे. पण सारा आणि सरस्वती खूप जवळच्या आहेत. सरस्वतीच्या आईने लहानपणी तिला सोडलं. साराच्या आईवडीलानी तिच्याकडे कधी लक्षच दिलं नाही. सरस्वती एकटीच जगामधे नशीब आजमावयला येते. सारा सुद्धा खूप एकटी होती. सरस्वतीला पत्रकार व्हायचं आहे. साराचं पण तेच स्वप्न. सारा जिथे नोकरी करते तिथेच सरस्वतीला पण नोकरी मिळते. आणि जेव्हा सारा मुंबईला येते. तेव्हा सरस्वतीपण..."
"सॉरी. बट आय ऍम कन्फ़्युज्ड."
"वीर... मीच सरस्वती आहे. रेहानच्या कल्पनेमधली. जोपर्यंत सत्य आणि कल्पना याच्या सीमा वेगवेगळ्या होत्या तोपर्यंत कुणाच्याच हे लक्षात आलं नाही. पण आता या सीमा एकमेकात गुंफ़ल्या आहेत. रेहान कलप्ना आणि सत्य यात फ़रक नाही करू शकत आता. त्याच्या दृष्टीने दोन्ही जगं खरी आहेत. आणि आता त्याच्या कल्पनेनेच त्याच्या मनाचा ताबा घेतलाय. तो आता साराला ओळखत नाही. ओळखतो तो फ़क्त सरस्वतीला...."

"माय गॉड. मग आता?"

"त्याचे दिवस फ़ार थोडे आहेत वीर. आणि त्याला सरस्वतीला भेटायचं आहे. त्यालाही माहीत नाही पण ही त्याची शेवटची इच्छा आहे."

वीर एकटक तिच्याकडे बघत होता. तिच्या आणि त्याच्या एकसंध नात्याच्यामधे कुठेतरी एक भिंत उभी राहत होती..... रेहान नावाची...



Chinnu
Wednesday, October 03, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॅन!.. नंदु, हे वाचून लयी जोराचा झटका बसला गं! रात्रारंभाची आठवण झाली. पुढे येवु देत.

Taraka
Wednesday, October 03, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोंर का झटका धीरेसे लगे....

Tiu
Wednesday, October 03, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My guess!!!

सारा स्किझोफ़्रेनिक आहे! She is leading 2 lives. एक सारा आणी दुसरी सरस्वती.

As far as Rehaan is considered, he is again a fictional character in Saraswati's mind, Saraswati who is actually Sara. सरस्वतीनी लिहिलेली diary सरस्वतीनी लिहिलेली नसुन रेहाननी लिहिली आहे अस साराला वाटतंय पण actually ती सारानीच लिहिलीये. loop मधे schizophrenia!!!

काय लिहितोय मी?


Disha013
Wednesday, October 03, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आइ गं,मलाही काही कळेनासं झालयं. मी मागचं सगळं विसरत चाललिये आता!
झकासरावांचा सल्ला प्रमाण मानुन समाप्त बोर्ड बघुनच परत वाचावी म्हणतेय कादंबरी.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators