Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... » Archive through September 26, 2007 « Previous Next »

Yogitasankpal
Friday, September 07, 2007 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,
आज प्रथमच कादंबरी वाचली, खुपच छान आहे. मला एक मदत करशिल का? मला ही कादंबरी संग्रही करायची आहे.


Will you help me how to copy and paste the same.. I could not able to do the same. Which font to use and all?

Please help me in this regards.

Regards,
Yogita

Abhijat
Friday, September 07, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कादंबरी पूर्ण झाली तर संग्रहीत करणार ना! कितीक अठवडे झाले ही कादंबरी मुंगीच्या पावलापेक्षा हळू गतीने पुढे सरकत्येय. ही दुसरी "एक वर्षाची गोष्ट" झाली नाही म्हणजे मिळवली!


Aashu29
Friday, September 07, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजात, अनुमोदन !! !! !

Jadoo
Friday, September 07, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे या लोकांना message टाकणेच बंद केले पाहिजे ती तिकडे ' एका वर्षाची गोष्ट ' सुद्धा अर्धि पडलि आहे... जाहिर ban टाका अशा incomplete stories वर or admin can create another section for incomplete stories

Shraddhak
Friday, September 07, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे या लोकांना message टाकणेच बंद केले पाहिजे ती तिकडे ' एका वर्षाची गोष्ट ' सुद्धा अर्धि पडलि आहे... जाहिर ban टाका अशा incomplete stories वर<<<<
जादू, मला नाही वाटत इथे लिहिणारे मुद्दाम लिहायला टाळाटाळ करत असतील असं. कधीकधी कथा डोक्यात पूर्णपणे तयार असते, पण काही भाग टाकल्यावर लिहायला वेळ मिळत नाही. लिहिणार्‍यांनाही अडचणी असू शकतात. सगळ्यांनाच ठराविक गतीने लिखाण पूर्ण करता येईल असं नाही.
तेव्हा चिडून न जाता समजून घ्याल ही अपेक्षा.


Nandini2911
Friday, September 07, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीरने हल्क्याच हाताने साराच्या फ़्लॅटचा दरवाजा उघडला. हॉलमधे कुणीच नव्हतं. तो दोन तीन पावलं आत आला... तेवढ्यात कुणीतरी त्याच्या अंगावर एक उशी फ़ेकली..
"नालायक..." सारा ओरडली.
"सारा.. बात तो सुनो.." त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. परत एक उशी त्याच्या अंगावर आली.

"रात्री इथे आलास सकाळी मला न सांगता का गेलास?" ती परत ओरडली.
"सॉरी,,, तू झोपली होती म्हणून उठवलं नाही." ती खरंच खूप चिडली होती.. तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता.
"झोपले होते.. मेले तर नव्हते ना.. काल तू मला मेल पाठवलंस. दिवसभर फोन उचलला नाहीस. का असा वागतोस?" शेवटच्या प्रश्नासोबत अजून एक छोटी उशी त्याचा दिशेने आली. अजून घरात किती उशा होत्या तो आठवायचा प्रयत्न करायला लागला.

"बोल ना.." ती म्हणाली.
"सारा.. प्रेस कॉन्फ़रन्स कॅन्सल करायची आयडीया तुझी होती. तेच तर मेल मी पाठवलं. काल सकाळी म्युझिक रेकॉर्डिंग होतं. दुपारी स्टोरी सेशन म्हणून मोबाईल बंद होता.. नंतर तुझे मिसकॉल पाहिले. पण तुझा सेल स्विच ऑफ़ होता मग कसा तुला कॉल देणार?"
"मी काल हॉस्पिटलमधे होते. तिथे सेल स्विच ऑफ़च ठेवावा लागतो. " ती हळूच म्हणाली.

"बरं... आईच्या सेलवरू तू कॉल कसा दिलास?" तो तीन चार पावलं पुढे आला.. बहुतेक आता ती मारायचं विसरली असावी.
"तू तिचा सेल विसरला होतास. म्हणून तर मला समजलं की तू इथे होतास... " तिने त्याच्या हातात मोबाईल दिला.
तो हसला..
"खरं सांगू... मी मुद्दाम विसरलो होतो... तू मला फोन करशील म्हणून... "
तिच्या ओठवर हसू फ़ुललं..
"फ़िल्मी लाईन मारु नकोस... तू जाताना ती डायरी पण नेलीस ना?" तिने विचारलं.
"हो,,"
"कशाला?"
"वाचायला....."
"या आधी वाचली नाहीस का?"
"दर वेळेला मला नवीन वाटते.. खुप intersting आहे."

" interesting? You call it interesting? "
"का नाही? रेप, मर्डर, रोमान्स, हेट्रेड, रीलीजन सर्वच मसाला भरलाय याच्यामधे."

"सरस्वतीची स्टोरी फ़क्त मसाला स्टोरी नाही आहे. " ती म्हणाली.
"ऊप्स, I literally forgot . ही तर love traingle पण आहे."

"नो, वीर. या स्टोरीमधे कुठेही प्रेम नाही. Believe me सरस्वतीवर प्रेम करणारं कुणी नाही. ती एकटी आहे. आणि एकटीच राहील."
"मुंबईला आल्यावरसुद्धा...."
त्याने विचारलं.
"हो, आणि तुला भेटल्यावरसुद्धा..." सारा हसून म्हणाली.
"कॉफ़ी घेणार?" तिने विचारलं...
त्याच्या चेहर्‍यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं होतं.






Nandini2911
Saturday, September 08, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारा गालातल्या गालात हसत उभी होती. वीरच्या चेहर्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता.

"कॉफ़ी घे."
"अं... नको, मघाशीच घेतली." त्याने हातली डायरी टेबलावर ठेवली.
"सारा, मला काही तरी समजत नाही आहे. सरस्वतीच्या डायरीमधे ही रेहानची आठवण कशी काय?" त्याने डायरीमधले ते दुमडलेले पान काढून तिला दाखवलं.

सारा क्षण दोन क्षण वाचत होती. मग तिच्या काहीतरी लक्षात आलं.. ती खळखळून हसली.
"वीर... तू म्हणजे मूर्ख आहेस..."

इतका वेळ वातावरण अगदीच झाकोळलेलं होतं. पण जशी सारा हसली तसं सारं मळभ दूर झालं. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश बाल्कनीतून घरात कधी आला ते दोघानाही समजलं नाही.
"म्हणजे काय?" त्याने विचारलं.

साराने डायरीमधला एक फोटो काढला.
"हे काय?"
"मला काय माहीत? ओह.. बूकमार्क होता होय.. उगीच पान फ़ोल्ड केलं मी..."
सारापरत एकदा हसली. "नीट बघ. कुणाचा फोटो आहे ?"

वीरेने तिच्या हातातला फोटो घेतला. सारा एकटक वीअकडे बघत होती. त्याने फोटो घेतला.. पाहिला आणि लगेच फ़ेकून दिला..

"का? काय झालं? आवडते ना तुला ती..." सारा चिडवत म्हणाली.
"बिल्कुल नाही. तुम्हे पता है वो मेरे टाईपकी नही. " तो मिश्किल्पणे हसत म्हणाला.

"अच्छा, पण मी तर परवाच वाचलं ना.. की तू आणि ती एका पार्टीत एकत्र होता... तिथून तुम्ही लवकर निघालात... कुठेतरी गेलात आणि दुसर्‍या दिवशी तू शूटिंगला लेट पोचलास.. वगैरे वगैरे.... "

"मिस सारा व्ही के, द चटपटी गॉसिप गर्ल... तुला वीर कपूर सोडल्यास दुसरे कुणावर लिहता येत नाही का?" तो तिचे केस ओढत म्हणला...
"आई गं.. सोड ना रे. नालायक.. " ती ओरडली.
"अजिबात नाही.. तू त्या इडली सांबारचे आणि माझे नाव जोडणं सोडून दे. तरच नाहीतर बस्स आशीच ओरडत. I Dont care " तो हसत म्हणाला.
"किती रे तू दुष्ट आहेस..."

"माझीच fiancee माझी लफ़डी लिहिते आणि वर मलाच दुष्ट म्हणते.. " तो हसला. आणि त्याने तिचे केस सोडले.

तेवढ्यात साराचा सेल वाजला..
"ओह नो. डॅडीचा कॉल. ते आज इथे येणार होते.. कदाचित आले पण असतील. मी त्याना एअरपोर्टवरून पिक अप करणार होते.. तुझ्यामुळे उशीर झालाय.. " तिने सेल उचलता उचलता त्याला बडबडायला सुरुवात केली.


Ana_meera
Saturday, September 08, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेट नंदिनीजी!! आता हे डैडी कोण? रवीवारी लिहिणार का? खूप gap पडलाय होSS

Aashu29
Saturday, September 08, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry माझ्या अज्ञानाबद्दल, पण सारा ही सरस्वति नाहिये का?
कि अजुन हा suspense आहे?

Zakasrao
Saturday, September 08, 2007 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या लोक्स ना मी एक सुचना देतो वाचुन घ्या.
ज्यावेळी कथा संपल्याचा बोर्ड लागेल त्यावेळी या आणि वाचा.
तुमचा वेळ वाचेल आणि वैताग पण म्हणुन म्हणतो
समाप्तचा बोर्ड वाचाल तर वाचाल :-)
नवीन पोस्ट नन्दिनीने टाकली आहे की नाही हे पाहण्यासाठी एक उपाय आहे.
मायबोलीच्या पेजच्या वरच्या कोपर्‍यात last1/3/7 अस दिसेल.
तो सर्च option आहे. त्यातील १ वर क्लिक कराल तर मागच्या २४ तासातल्या पोस्ट दिसतील.एकदा क्लिक करुन बघा म्हणजे कळेल ते काय आहे नेमके.म्हणजे new tag बघुन इथे आला तर फ़क्त प्रतिक्रिया वाचुन तुमचा हिरमोड नाही होणार. :-)
विषयांतराबद्दल क्षमा असावी पण इथे मला तुमची तळमळ बघुन रहावल नाही.
आणि राहिली गोष्ट नन्दिनीला ढोसण्याची तर तिला मायबोलीवरुन मेल पाठवा कथा पुर्ण करन्यासाठी. :-)
तो लगे रहो दोस्त लोक्स. :-)
तिला ढोसत रहा असेच :-)


Manjud
Saturday, September 08, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झ, एका दिवशी दोन पोस्ट्स म्हणजे वाचकाना मेजवानी आहे.

खाऊन घ्या दोस्त लोक्स, पुढचे जेवण कधी मिळेल सांगता येत नाही.

नंदिनी,


Nandini2911
Saturday, September 08, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचानक साराने फोन ठेवला. वीर अजून ती डायरीच बघत होता. बाकी कशाकडेसी त्याचं लक्ष नव्हतं. तिला दोन वर्षापूर्वीचे तिचे दैनिक सत्यशक्तीमधले दिवस आठवले.

नुकतीच तर ती कामावर लागली होती. हातात तसा फ़ारसा अनुभवपण नव्हता. रत्नागिरीसारख्या ठिकाणी काम करणं वेगळं आणि मुंबईमधे काम करणे वेगळे....

रोज एखाद्या नवीन exclusive स्टोरीच्या ती मागे असायची. पण ती कधीच मिळायची नाही. एक तर बातम्या सगळ्याना टीव्हीवर दिसायच्याच. मग त्यात खास काय लिहिणार? तशीही ती अजून "बिनबीटाची" होती. अजून तिला कुठलाच बीट मिळाला नव्हता.

एके दिवशी चिडून तिने एक imaginary interview लिहून टाकला. बॉबी देओलचा. म्हटलं तर स्टार म्हटलं तर नाही. तो छापून आल्यावर मात्र तिला ताबडतोब पेज थ्री ला शिफ़्ट करण्यात आलं. याचं कारण म्हणजे सारा गॉसिप व्यवस्थि लिहू शकेल याची धवनला, तिच्या एडिटरला खात्री पटली होती.

पहिले दोन आठवडे साराने रूटीन स्टोरीज दिल्या. मात्र हळु हळु धवन तिला जास्त स्पायसी स्टोरीज लिहायला सांगू लागला.
"कुठून लिहिणार? माझ्याकडे तर एकापण स्टारचा नंबर नाही." ती मनाशीच म्हणायची.

अशातच एके दिवशी परत तिने अजून एक exclusive interview ऑफ़िसमधे बसून लिहून काढला. अर्थात यासाठी साराने पूर्णपणे तिची बुद्धी पणाला लावली. मुलाखत होती. रसिका आणि रोहित कपूरच्या मुलाची वीर कपूरची. हा सर्वात मोठा स्कूप ठरला कारण आता पर्यंत रसिका स्वत्: कधी मुलाविषयी बोलायची नाही. "तो लहान आहे, त्याला या मीडीया सर्कसपासून लांब ठेवा.. " ती प्रत्येक पत्रकाराला सांगायची. साराने मात्र बिनधास्तपणे वीरची मुलाखत लिहून टाकली.

वीर कपूर सत्यशक्तीसारखा मराठी पेपर वाचत नसेल याची तिला मनापासून खात्री होती. मुलाखत पब्लिश झाल्याच्या चार पाच दिवसानी तिला एक फोन आला...
" Hi This is Tina. Can you please give me veer's number? He is my school friend. "

साराने फोन ठेवून दिला. वीर कपूर आता कुठे लाईमलाईटमधे येत होता. आताच त्याला "ओळखणार्‍याची" संख्या वाढायला पण लागली होती. सारा मनाशीच हसली. A star is born तिच्या मुलाखतीचं हेडींग होतं.

अर्थात एका आठवड्यानंतर मात्र एक गंमत घडली. सारा ऑफ़िसमधे आल्या आल्या तिला बॉयने सांगितलं की कुणीतरी व्हीजीटर आहे. ती व्हीजीटर्स रूममधे एक तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा बसला होता. चेहर्‍यावरून तरी तो ओळखीचा वाटत होता. पण कुठे पाहिलय ते नक्की आठवत नव्हतं.

निळे डोळे, पिंगट केस आणि गळ्यात ताईत. सगळ्यात वेगळी होती ती त्याची नजर. कित्येक रात्रीची जागलेली. आणि मणामणाचं ओझं वाहणारी. त्याच्या हातात तिने लिहिलेलं आर्टीकल होतं.








Ana_meera
Saturday, September 08, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुणाची ग ती बाय!!
आता घरी चालले. सोमवारी अजुन मिळेल वाचायला?


Itgirl
Sunday, September 09, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघाला अनुमोदन?! गुणाची ग ती बाय!! :-)आज रविवारी कामासाठी हापिसला आले आणि चक्क कहाणी पुढे गेलेली!! नंदू, तूर्तास तुला बदडण्याचा प्रोग्रॅम कॅन्सल ग!!

Aktta
Sunday, September 09, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज बरेच दीवसांनी इकडे आलो आनी एकदम माझ्या डोळ्यांचे पारने फ़िटले( असच काही तरी बोलतात) तीन मोठे मोठे पार्ट....
Any Way मस्त चालू आहे कथा... :-)
एकटा....


Nandini2911
Wednesday, September 19, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"क्या चाहिये?" तिने विचारले.
त्याने वळून तिच्याकडे पाहिलं.
"मुझे वीरसे मिलना था..." तो हळूवार आवाजात म्हणाला.
"क्यु?" मुलीनी फोन करणे ठिक आहे. याचं काय काम असू शकते?
"देखिये, मै आपको सबकुछ नही बता सकता. पर वीर कपूर मेरी मदद कर सकता है. प्लीज आप मुझे उसका नंबर दे दिजिये या फिर घर का address " तो अगदी काकुळतीने म्हणाला.
"देखो, मै तुम्हे किसी का भी नंबर नही दे सकती. This is against my principles ," सारा चिडून म्हणाली.
"आप समझती क्यु नही. मेरा उससे मिलना बहोत जरूरी है, मै उसको नही बताऊगा की मुझे नंबर कहा से मिला है.. प्लीज.." तो म्हणाला
साराला काय करावे ते सुचत नव्हते. हा मुलगा खरं बोलत होता. त्याला खरोखर वीरच्या नंबरची गरज आहे असं त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं. पण तिने नंबर कुठून दिला असता.. तिच्याचकडे नंबर नव्हता...
"आप काम क्या है, वो तो बता दो.." तिने परत विचारले.

"नही बता सकता... बहोत जरूरी है.. एक काम करेंगी आप?" त्याने विचारले. "आप मेरा नंबर लेलो, और उसे फोन करके मुझे फोन करने बोल देगी..."

"वे जानता है आपको?" साराने विचारले. तिला या प्रकरणात सध्या जाम उत्सुकता लागून राहिली होती.
"नही... पर उसे बता देना ये किसी के जिंदगी और मौत का सवाल है..."
सारा विचारात पडली. "ठिक है.. तुम्हारा नंबर मेरे पास दे दो.. मै उससे बात करके आपको बता दूगी.."
त्याने नंबर सांगितला. तिने तो डायरीमधे लिहून घेतला.
"और आपका नाम?" तिने मान वर करत विचारले. त्याने तिचे आर्टिकल तिच्याच पुढ्यात धरले होते.
"तू माझा असा खोटा इंटरव्ह्यु का छापलास?" त्याने अत्यंत थंड आवाजात विचारले.
सारा तिथल्यातिथे थिजून उभी राहिली.


Anaghavn
Friday, September 21, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chhan Kadambari ahe.Pudhachya bhagachi utsuktene wat pahayala lawanaari.
B.T.W Me attach join zale ahe.Mhnje mh adhi 2001-2002 madhye "Mitreyee" ya navane login vhayavhe. pan tevha me U.S. la hote. tyanantar attach lodig zale ahe, pan weglya navane.

Nandini2911
Friday, September 21, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवळ जवळ दोन तासानी सारा आणि वीर बरिस्तामधे बसून हसत होते. खूप दिवसानी सारा मनापासून हसत होती.
"आधी मला वाटलं की तू चिडून आता काहीतरी बोलणार, ओरडणार वगैरे.." ती कॉफ़ीचा मग खाली ठेवत म्हणाली.
"माझा आधी तोच प्लान होता. पण जसजसा मी वाचत गेलो तसं वाटले की हे जरी खोटे असलं तरी जे लिहिलय ते खूप खरं आहे. माझ्याबद्दलचे खूपसे फ़ॅक्ट त्यामधे बरोबर होते. म्हणून मला तुला भेटायचं होतं. तुला माझ्याविषयी इतकी माहिती कशी काय?"
ती गालातल्या गालात हसली. खरं कारण तिने त्याला सांगितलं नसतं. कदाचित तो चिडला असता, त्याला पटलं असतं की नाही कुणास ठाऊक. तिने मौन बाळगणंच पसंद केलं.

तो पण काहीच बोलला नाही. असेच काही क्षण गेले.
"तुझ्याविषयी काहीतरी सांग ना.. " तो तिला म्हणाला.
तिने कपाळावरून पुढे येणारी बट पाठी सारली. "कॅमेरा हवा होता.." वीरच्या मनात विचार चमकून गेला.
"काय सांगू... खरं की खोटं?" साराने विचारलं.
"खोटं तू खूप छान सांगशील, मला खात्री पटलीये. पण खरं कसं सांगशील ते माहीत नाही.."
ती परत एकदा खळखळून हसली.
"ठीक आहे. खरं सांगते. मी सारा व्ही. के. मूळची केरळातली, पण बरीच वर्षे झाली. माझे आईवडील रत्नागिरीला असतात. माझा जन्मपण तिथलाच. त्यामुळे मी अस्सल रत्नागिरीकर म्हटलेस तरी चालेल. मी तीन वर्षे झाली मुंबईला येऊन. आल्या आल्या इथे जॉब लागला. external बी ए केलेलं आहे. एम ए करायची इच्छा आहे. अजून काही..." तिने विचारलं.
त्याने कॉफ़ीचा एक घोट घेतला.
"जे मला हवं ते तर बोललीच नाहीस.. "
"काय?"
" Single or.....? "
" Yes... single but not ready to mingle... " ती हसत म्हणाली.
"का?"
"प्रत्येक गोष्टीला काही कारण लागतं का?" तिने त्याच्याकडे बघत विचारलं.
"नाही.. कधी कधी काही काही गोष्टीना अजिबात कारण लागत नाही. " त्याने तिच्या डोळ्यात बघत उत्तर दिलं.


Radha_t
Friday, September 21, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारा = सरस्वती हो ना? आणि रेहान की वीर हे तिच्या पुढच प्रश्नचिन्ह. छान चाललिये कथा, येऊ द्या पुढच लवकर लवकर.

Nandini2911
Wednesday, September 26, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीर आणि साराची मैत्री दिवसेंदिवस वाढतच होती. तसं त्या दोघामधे काही फ़ारसं साम्य नव्हतं. तिला जुने पिक्चर बिल्कुल आवडायचे नाही. त्याच्याकडे जुन्या पिक्चरच्या डीव्हीडीचं एक कलेक्शन होतं. आपलं काम संपलं की हॉस्टेलवर परत यायचं असा तिचा खाक्या. त्याला रात्रभर भटकायची आवड.

तरीही त्याची मैत्री फ़ुलतच होती. एके दिवशी अशीच ती ऑफ़िसमधे असताना त्याच्याबरोबर मोबाईलवर गप्पा मारत होती.
सुधीरजी तिच्या बाजूला केव्हा आले तिला समजलंच नाही.
"ए मी तुला नंतर फोन करते." लक्षात आल्यावर ती पटकन म्हणाली. आणि तिने फोन ठेवून दिला.
"कोण? रसिकाचा मुलगा?" सुधीरजीनी तिला विचारलं.
ती काहीच बोलली नाही.
"हे बघ बेटा, मी तुला खूप दिवसापासून ओळ्खतो, तुझे टॅलेंट मी ओळखून आहे. त्यामुळे तू अशा फ़ालतू लोकाबरोबर बोलावं हे मला पटत नाही. शेवटी चेहर्‍यावर रंग लावून फ़िरणारी ही माणसं. कधी चेहरा बदलतील सांगता येत नाही. तुझ्या कामावर पूर्ण लक्ष दे, इथुन पुढे जायचे आहे तुला." सुधीरजी अगदी शांतपणे तिला समजावत होते. ती खाली मान घालून ऐकत होती. तिच्या नकळत तिच्या डोळ्यातून पाणी केव्हा वहायला लागलं तिलाच समजलं नाही.



त्याच दिवशी संध्याकाळी वीर तिला घरी घेऊन गेला. रसिकाला सारा खूप आवडली.
"तुझ्या घरच्याचं काय?" रसिकाने तिला विचारलं.

सारा काहीच बोलली नाही. तिने फ़क्त वीरकडे पाहिलं.
"आई, तू फ़ार पुढचा विचार करतेयस. मी आणि सारा आता सध्या कुठल्याही बंधनात अडकणार नाही आहोत. अजून माझं करीअर आहे. साराला पुढे शिकायचं आहे." तो हसून म्हणाला.
एखादी परिस्थिती कशी सांभाळावी हे त्याला चांगलेच जमत होतं.

किती चांगले दिवस चालले होते त्याचे. ती हॉस्टेल सोडून त्याच्यासोबत फ़्लॅटवर रहायला आली होती. त्याच्या पहिल्याच पिक्चरचं काम जोरात सुरू होतं. आता तर वीरला हे पण समजलं होतं की साराला रोहित कपूर फ़ार आवडतो. रोहितच्या आणि वीरच्या विचित्र नात्याला साराने कबूल केलं होतं.

एका पार्टीत रोहित कपूरने तिला मुद्दम बोलावून घेतलं होतं आणि तिला एक छानसे ब्रेसलेट गिफ़्ट दिलं होतं.
रसिका आणि रोहित अजूनही एकमेकाना भेटत असावेत असं त्यानंतर तिला उगाचच वाटत राहिलं. पण वीरला काही सांगायचं धाडस मात्र आलं नाही.

सर्व आयुSःय कसं छान चालू होतं. अजून फ़क्त दोन वर्षे आणि त्यानंतर दोघंही लग्न करणार होते... सगळं सुरळीत पार पडलं होतं.. साराची सगळी स्वप्ने पूर्ण झाली असती. जर मधेच "रेहान" नावाचं वादळ परत आलं नसतं तर...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators