Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 03, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through August 03, 2007 « Previous Next »

Sarang23
Monday, July 30, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

      अंगण

कशास असला शाप दिला रे
अंगण ठेवुन गेला
रोज पहाटे प्राजक्ताचा
सडा इथे पडलेला

साफसफाई करावयाची
शपथ घातली आणि
मोबदल्याला देऊन गेला
प्राजक्ताची नाणी

रोज पहाटे मन हे आता
काट्यांमध्ये शिरते
दो हातांचा झाडू होतो
अंगण भवती फिरते

सारंग


Meenu
Monday, July 30, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा झाड, बैरागी, मयुर, सारंग, वैभव, पुनम, श्यामले सगळेच सही लिहीताय. आज एकरकमी प्रतिक्रीया देते .. मजा आली वाचुन ..

Swaatee_ambole
Monday, July 30, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आणि आपण विसरून गेलेलो असतो
हरवून जायची वाट.....

वा!

वैभव, ' पुण्याई' मस्तच! :-)

श्यामली, आवडली.


Chinnu
Monday, July 30, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलीताई सुरेख! आतापर्यंत वाचलेल्या तुझ्या कवितेतली ही कविता मला अतिशय आवडली.
बैरागी, मार्गदर्शनाबद्दल खुप धन्यवाद. पुढचा वेळी खात्रीने प्रयत्न करेन.
वैभवा खंत नकोस बाळगु, कारण आषाढी एकादशी हे फ़क्त निमित्त आहे, मनातले व्यक्त करायला. काही वेळा देवळातच जावे लागत नाही, डोळे बंद केल्यावरही काही भाग्यवंतांना दर्शन घडतेच ना. कविता आवडली, त्याबद्दल प्रश्नच नाही!
सारंग सुरुवात छान झाली. आठवणींची नाजुक प्राजक्ता बाजुला सारून मनाचे अंगण नेटके करायची कल्पना आवडली.
गुरुजी, Encouraging प्रतिक्रियेबद्दल फार्फार धन्यवाद. तुमच्या उत्तेजनाने निदान दोन बोबडे बोल तरी लिहिता येत आहे! मुठभर मांस नक्कीच चढलय आज :-)
माणिक अनेक धन्यवाद.
मेघधारा फ़्लोमध्ये नक्की कुठे गडबड वाटली सांगणार का? सुधारण्याचा प्रयत्न करते.


Pulasti
Monday, July 30, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, उत्तर मस्तच! वैभव, पुण्याई आवडली!
सारंग, अंगणाची कल्पना छानच आहे. सडा आणि नाणी दोन्ही प्राजक्ताचीच.. अस थोडं confusion झालंय, पण पुन्हा वाचून पाहीन..
-- पुलस्ति.

Devdattag
Monday, July 30, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आ गया..:-).. .. ..

Daad
Monday, July 30, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है! एक से एक कवितांचा मोहोर आहे... खूप दिवसांनी इथे आलेय आणि खिळून राहिले. काय लिहिताय सगळे, लगे रहो, बाबा, लगे रहो!
घाऊक कौतुक करायला मुळीच आवडत नाही. हे म्हणजे आपल्या माणसासाठी दुसर्‍या कुणालातरी प्रेझेंट आणायला सांगण्यासारखं वाटतं.... पण तेही करायला लागतं..... बरेचदा :-(

लिहीते रहा रे, सगळेच छान लिहिताय... मस्तं मैफिल जमून राहिलीये!


Meghdhara
Tuesday, July 31, 2007 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग रोज पहाटे.. व्वा! सुंदर.

चिन्नू सांगते..
पुर्ण कविता एका ठेक्यात वाटत नाही.
१,३,५,७ आणि नववी ओळ नवीन ठेक्यात सुरू होते पण तीच्या पुढच्या ओळीत ती कन्टीन्युइटी रहात नाही.
म्हणून वाचताना विस्कळीत वाटते.
एका तालात, ठेक्यात, समान मात्रेत नाहिये म्हणावं तर मुक्त छंदाचा फ्लो ही येत नाही.

मेघा


Jo_s
Tuesday, July 31, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, सारंग कल्पना छान आहे पण पहील्या
कशास असला शाप दिला रे
अंगण ठेवुन गेला ........या दोन ओळीत काहीतरी गडबड वाटत्ये. अर्थ नीट कळला नाही.

पुढची सगळी कविता मस्तच.


Meghdhara
Tuesday, July 31, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओढ

सळसळत आरपार
तुझं अस्तित्व जाणवताना
माझं मीपण विलीन होताना
शिल्लक रहिलेली ओढ
उत्तरदायीत्व नाकारते.
तीच्या असण्याचं प्रयोजन
मी सोयीस्करपणे डोळेझाक करते
कदाचीत माझी आत्मप्रौढी
कदाचीत प्रेमाची धुंदी
पण खरं सांगू?
मोकळेपणी चांदण्यात
किंवा अगदी रखरखीत उन्हात
जेव्हा तुझ्या साथीने तटतटून
माझी पंचेंद्रिये आरक्त होतात
जगायची सारी आस्क्ती एकवटून,
तुझे हुंकार श्वासागणीक आत येतात
तेव्हा मी 'मी' रहातेच कुठे?
आणि तू..?
तू आणि मी..
आपण काय एकमेकांना ओढणार?
आपला संवाद हे फक्त नैमित्त
बाकी आत होतेय ती गळाभेट
ओजस्वी स्त्रोतांची
आणि बाहेरुन उधळलेल्या झंझावातात
आपण ओढले जातोय
आपोआप...

मेघा



Mankya
Tuesday, July 31, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा .. क्या बात ! आपल्याला आवडली रे .. अगदि आहे तश्शी !
मेघा .. उत्कट म्हणजे किती उत्कट .. touching every extremity.. every end !... भावनांचं झंझावत अगदी !

माणिक !


Chinnu
Tuesday, July 31, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा धन्यवाद. बदल करुन पाहते.

Suvarnamayee
Thursday, August 02, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, मेघा, वैभव,

कविता आवडल्या


Mankya
Thursday, August 02, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


उत्कट धुंद उसासे माळून .. भाळून गेली रात्र
अन ऊबदार पहाटस्पर्शाने पुलकित गात्र गात्र

धुंदल्या गंधाळलेल्या होत्या त्या अनामिक वाटा
लयीत बेफाम उसळत होत्या ह्रदयी अमृतलाटा

ईतूका वेळ बेफिकीर स्पर्शांशी स्पर्श बोलले होते
ते शब्द अता नयनांनी .. निःश्वासांनी तोलले होते

तृप्त रोमारोमात उमललेली ती समर्पणाची आस
विश्वासाने उरी विसावलेले अलवार उष्ण श्वास

अवघ्या कायेतून समाधान ओसंडून वहात होते
जे डोळ्यातून मूक वाहिले, तेच जूने घाव होते !

माणिक !




Bee
Thursday, August 02, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंधन

ह्या अवघ्या समष्टीतील
निर्जीव अणुरेणुपासून
सजीव जिवापर्यंत
सारेच प्रयास करतात
स्वतंत्र प्राप्तीसाठी, तरीही
बंधनात अडकण्याचा
केवढा मोठा अट्टाहास!


Sarang23
Thursday, August 02, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, आधी वाचल्यासारखी वाटतेय... छान आहे!
माणिक, कविता छान... अधीक व्यवस्थित वृत्त पाळता आले असते...
बी, स्वतंत्र की स्वातंत्र्य?


Meghdhara
Friday, August 03, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक सारंग म्हणतोय ते खरय.. थोडी घाई केलीस ना?
सारंग हो मागे मायबोलीवर कदाचीत टाकली होती. बी बंध कदाचीत माणसाचा बेसीक इन्स्टींक्ट म्हणून अट्टाहास. :-)

मेघा



Mankya
Friday, August 03, 2007 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप आभार .. सारंग, मेघा !
वृत्तात वगैरे लिहायचा प्रयत्नच नव्हता हा मुळात .. अगदी प्रामाणिकपणे ! पण पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करेन सारंगा !
अन घाई म्हणशील मेघा तर ही कागदावर उतरलीच नाही, सरळ ईथेच टाईप केली .. झालं !

माणिक !


Jo_s
Friday, August 03, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा छान,
माणिक तुझ्या कल्पना छान आहेत आणि असतात, फक्त जरा लयीत गडबड होते. सारंग आणि मेघाला अनुमोदन


Bairagee
Friday, August 03, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सारंग, 'प्राजक्ताची नाणी'आवडली.मेघधारा, कविता, कवितेतली उत्कटता आवडली. माणिक,उत्कट धुंद उसासे, ऊबदार पहाटस्पर्श, धुंदल्या गंधाळलेल्या ... अनामिक वाटा आदी क्लिशे जमल्यास टाळायला हवेत. बी, स्वतंत्र प्राप्तीसाठी ऐवजी मुक्तीसाठी बरे वाटते.'स्वतंत्र प्राप्तीसाठी' म्हणजे 'इंडपेंडंट इनकमसाठी' असा अर्थ घेतला तर वेगळाच अर्थ निघतो.







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators