Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 30, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 30, 2007 « Previous Next »

Mayurlankeshwar
Friday, July 27, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!झाडा...मस्तच!
चिन्नू इतक्या दिवसांनी... दैवदुर्लभ!!! वा!! सुंदर कविता!!







Shyamli
Friday, July 27, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार लोक्स ,ब-याच दिवसानी कवितेवर आल्ये :-)

आहा चिन्नु,
नाजुक कविताये एकदम :-)
पूनम लिखते रहने का रे,त्याशिवाय कुठे चुकतोय हे कसं कळणार? :-)

कधी कधी खरंच कळत नाही
आपल्याला काय हवंय ते! >>> खरय.....



Chinnu
Friday, July 27, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मयुरा, श्यामली ताई :-)

देह होईल पंढरी, मन होईल विठोबा, सुंदर वचन आहे प्रिंसेस. मेघधारा कवितेतले विचार सुंदर, बोलीभाषेमुळे वेगळीच खुमारी आली आहे. बैरागी, मला तुमची कविता (की स्वगत) आवडली पण अपुर्ण वाटली. देवा अजुन वाचत आहे, पण शेवटचे कडवे आवडले.


Mayurlankeshwar
Friday, July 27, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याआधी...


तुला पुन्हा पुन्हा वाटतेय की
तळव्यातून उमटावेत मातीचे हुंकार
आणि डोळ्यांत विरघळावं चांदणं...
निघावं कोणत्याही दिशेला कोणत्याही क्षणाला...
अठ्ठावीस युगांचा पट उलगडून
हाजीर व्हावा विठ्ठल आणि
जगण्याच्या मूर्तिमंत वाळवंटात
स्त्रवावा इंद्रायणीचा अभंग...!!

त्याआधी...
माती,चांदणं,नदी,दिशा...
हे सगळं कोठून इम्पोर्ट करशील ह्या शहरात?
विठ्ठलाचं काय एवढं...??
त्याला उभा करता येईलच की
कोणत्याही शिल्लक वीटेवर!
पण त्याआधी...
माती?चांदणं?नदी?दिशा??
तुला समजतो ना
मूर्तिमंत वाळवंटाचा मूर्तिमंत अर्थ???


Pulasti
Friday, July 27, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, बैरागी, प्रिन्सेस, मेघा, झाडा, चिन्नु, मयुर - कविता आवडल्या. काही काही भाग पूर्णपणे कळले नाहीत.. पण एकूण सूर, रोख, विचार लक्षात आले आणि भावले!!
-- pulasti.

Chinnu
Friday, July 27, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद पुलस्ति. मयुरा अगदी कॉंक्रीट कविता! :-) छान.

Pulasti
Friday, July 27, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंगळ

वातानुकूलित प्रशस्त महादालन
प्रत्येक कोपरा...प्रत्येक चेहरा - भरजरी
रेशमी वस्त्रं, धूप, हार, तोरणं...
मंचावर जगद्गुरुंनी मांडलेला सुबकसा महायज्ञ
विश्वशांती, विश्वकल्याण ई.ई. साठी.
शेकडो टापटीप भाविक तल्लीन भिंतींवरच्या प्लाझ्मा प्रक्षेपणात.
बाहेरच्या बाजूला -
कार्यकर्त्यांची सुनियोजित धावपळ,
यज्ञाच्या समाप्तीची वाट पहात असलेल्या सुग्रास भोजनाचा दरवळ आणि
grant, ben franklin अशा महाभागांनी भरलेली
या अध्यात्मिक खाजगी महाविद्यालयाची देणगीपेटी.
मी -
माझ्या अघळपघळ घरगुती अवताराकडे दयार्द्र निराशपणे बघणार्‍या २-४ नजरा शिताफीने टाळल्या,
आणि, उच्चभ्रू भगवद्कृपेपासून वंचित असलेल्या माझ्या दैनंदिन झटापटीकडे निमूटपणे वळलो.
आश्चर्य वाटलं आणि थोडं समाधानही...
ही अध्यात्मिक चंगळ माझ्या खिशाला आणि मनाला परवडत नाही... अजूनही, अजूनतरी.

-- पुलस्ति.

Sarang23
Friday, July 27, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, कविता आवडली!
चिन्नू... मस्तच!!! मजा आली कविता वाचून... छत्रीची द्विपदी खूप म्हणजे खुपच आवडली!

मयूर, विचार चांगला वाटला, पण मला कल्पनेच्या शेवटापर्यंत जाता आलं नाही...

पुलस्ती... मला ही कविता वाचून "असा मी असामी" मधल्या सॅंटाकृजच्या गुरुदेवांच्या उतार्‍याची आठवण झाली... :-)
असा काहीसा...
"बेमट्या, ब्रम्हदेवान एवढी सृष्टी घडवली आपली चारही टाळकी वापरून, पण त्याचा आवडता प्राणी गाढव. म्हणून मनुष्यप्राण्यातदेखील त्याने गाढवाचा अंश सढळ हाताने घातलाय... जगात कुंभार थोडे, गाढवं फार तस्मात कुंभार हो गाढवांस तोटा नाही... काय समजलास बेमट्या?!"


Bairagee
Friday, July 27, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझी मते
झाड, पहिला तुकडा आणि आपण विसरून गेलेलो असतो हरवून जायची वाट.....वाव्वा.. कविता एकंदर आवडली.
मयूर, जगण्याच्या मूर्तिमंत वाळवंटात स्त्रवावा इंद्रायणीचा अभंग...!! वाव्वावा. तिथपर्यंत ग्रिप मस्त आहे. नंतर जोम कमी होतो.
चिन्नू, जवळपास प्रत्येक कविता थोडसे स्वगत असतेच. असो. ती कविता तुम्ही पूर्ण केल्यास आनंद होईल. तुमची कविता वाचली. ती वृत्तात हवी होती किंवा शुद्ध मुक्तछंदात. मध्येच कुठेतरी घुटमळते आहे. काही कल्पना फार चांगल्या आहेत. जसे छत्रीची. पण केवळ कल्पना म्हणजे कविता नाही. घोटीवपणा, आखीवपणा, रेखीवपणा यायला हवा.
पुलस्ति कविता आवडली. 'मी..' नंतरचा भाग जरा रिफाइन करता आला तर बघा.नोद घ्यावी: माझी मते माझी मते आहेत आणि ती उत्क्रांत होत असतात, होऊ शकतात.:-)


Chinnu
Friday, July 27, 2007 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति अगदी बरोबर आहे, 'चंगळ' परवडेबल नाहीये ही!
सारंग खुप खुप धन्यवाद! :-)
बैरागी कविता वाचल्याबद्दल धन्यवाद. गझल कार्यशाळेच्या after effect मुळे कविता घुटमळली आहे हे खरेच. :-) तुम्ही सुचविल्याप्रमाणे प्रयत्न करून पाहते.
तुमची कविता मला पुर्णपणे स्वगत वाटली आणि तशीच आवडलीही. पण मी ती कविता पूर्ण करणे अगदी अशक्य आहे. जरी मी तो प्रयत्न केलाच तरी एका भरझरी वस्त्राला चिंधी जोडल्यासारखे होईल! घोटीवपणा, आखीवपणा यायला कदाचित वेळ लागेल, अजून आत्ता कुठे शिकत आहे. :-) धन्यवाद.


Shyamli
Saturday, July 28, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्तर
काहि अनुत्तरीत प्रश्णांना
काळावर सोपवून दिलेलं असतं ब-याचदा
मग तेही एखाद्या सन्यस्तासारखी समाधी घेउन बसून राहतात
मनाच्या तळघरात,
वरकरणी आपणही सोडुन दिलेला असतो नाद,
अन अचानक,
डायरीतल्या आवडत्या पानात दडपुन ठेवलेलं
जाळी पडलेलं नाजुक पिंपळपान सापडावं तसं....
त्या प्रश्णाच उत्तर अलगद सापडलेलं असत आपल्याला
......आपल्याही नकळत.


श्यामली!

Shyamli
Saturday, July 28, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर, विठ्ठलाचं काय एवढं...??
त्याला उभा करता येईलच की
कोणत्याही शिल्लक वीटेवर! >>>>आवडलं

पुलस्ति,विचारात पाडल या कवितेनी.........

Jo_s
Sunday, July 29, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा, मयूर छानच

पुलस्ति, अप्रतीम, खासच झाल्ये,
मलाही सारंग प्रमाणे असामी आठवलं, भन्नाटच आहे तो भाग.

श्यामली, सुंदरच आहे कविता, स्ट्रेस मॅनेजमेंट मधला महत्वाचा मुद्दा आहे हा.

सुधीर

Vaibhav_joshi
Sunday, July 29, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा ! खरंच चंगळ आहे इथे
:-)
प्रिंसेस .. एखादी चाल मनात होती का लिहीताना ? तसं वाटतंय खरं . जरा घाई झाली असं मलाही वाटलं .

मेघा .. अष्टाक्षरी मधल्या काही ओळी छंदात नाहीयेत असं वाटतंय . जरा बघणार का ? शेवटचं कडवं जबरी आहे .

झाडा .. मस्तय

मयूर .. बैरागीशी सहमत .

चिन्नु .. ओळ लिहायची राहून गेली आणि तरारून आलेली जाणीव आवडलं मला . गज़ल चा प्रभाव जाणवतोय हे खरं असलं तरी त्यात काही गैर नाहीये . वेगवेगळी यमके असलेल्या द्विपदींची कविताही कानाला छान लागू शकते . Dont worry about the syntax , content is more important

पुलस्ति .. आजकालची अध्यात्मिक चंगळ परवडणारी नाही हे मात्र खरं .

श्यामली ..
उत्तर छान आहे . मला फक्त सन्यस्तासारख्या समाधीचा उल्लेख का आला आहे हे कळलं नाही .

आज बर्‍याच दिवसांनी गुलमोहोर ( ललित , कथा , आणि सर्व कविता बीबी ) असा निवांत वाचून काढताना मजा आली . आणि एक कविताही सुचली . अर्थात ही फक्त " माझी " " मला " जाणवलेली खंत आहे . कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये .


Vaibhav_joshi
Sunday, July 29, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याई

तुला झालाही असेल भास
नाम्याचा किंवा तुक्याचा
पण क्षणभरच ...
नंतर पुन्हा तू निर्विकार झाला असशील
हे लक्षात येताच
की असं काही घडायला फार मोठी पुण्याई लागते .
अर्थात आम्हालाही हे मान्य आहेच
की तुझ्यावर कविता किंवा अभंग सुचायला
आषाढी एकादशी यावी लागते .


Shyamli
Sunday, July 29, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फक्त सन्यस्तासारख्या समाधीचा उल्लेख का आला आहे हे कळलं नाही . >>>>सन्यस्त का? तर सगळ्या मोहांचा,अपेक्षांचा त्याग करुन(इथे उत्तराच्या अपेक्षेचा )आणि मिळतच नाहि उत्तर म्हटल्यावर त्या प्रश्णाला सन्यस्त होण्याशिवाय पर्याय नसतो. थोडक्यात विरक्ती स्विकारुन "प्रश्ण" गप्प होतात, ब-याचदा परत न येण्यासाठी (पडण्यासाठी) पण म्हणुन त्यांच अस्तित्व नाकारता येत नाहि, ते असतातच म्हणुन समाधिस्त असं लिहावं वाटलं मला.

चुकतय का रे काहि?

सुधीर धन्यवाद :-)




Bairagee
Sunday, July 29, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, वैभव कविता छान आहेत.
घोटीवपणा, आखीवपणा यायला कदाचित वेळ लागेल, अजून आत्ता कुठे शिकत आहे.
चिन्नू, चांगली गोष्ट आहे. कवीने लर्निंग मोडमधून बाहेर यायला नको. पुढच्या वेळेस जरूर लक्षात ठेवा. तसेच कंटेट, कल्पना महत्त्वाच्या असतात. पण मी वैभवशी असहमत आहे. माझ्या मते,मांडणीत एक किमान दर्जा यायला, आखीवपणा यायला हवा. ह्या गोष्टींचे थोडे भान यायला हवे. कल्पना ही केवळ सुरुवात असते. तसेच एकदम नवीन भन्नाट कल्पना ह्या जगात कमीच येतात. त्यामुळे,
it's not what you say but how you say it.
नोद घ्यावी: माझी मते माझी मते आहेत आणि ती उत्क्रांत होत असतात, होऊ शकतात.


Meghdhara
Sunday, July 29, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच वाचकांची चंगळ आहे.

झाड अप्रतिम कविता. अगदी मनातुन.

चिन्नू मस्त! आवडली पण फ्लोमधे वाचताना गडबड वाटते.

मयूर काही भाग अतिशय आवडला नी पोचला तर काही भाग कळला नाही. रुखरुख आणि उत्सुकता आहे. सविस्तर विचारतेच.

पुलस्ति खरच. असच वाटतं.

सारंग अगदी काय आठवण दिलीस. असामीचा हा भाग ऐकताना तर आणखीन मजा येते.

श्यामली उत्तर मस्त.
जॉस जे म्हणालास ते खरच आहे.

वैभव :-)

मेघा




Mankya
Monday, July 30, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू .. किती हळूवार .. सुरेख !
झुंजुमुंजु पाऊलवाटा .. नादावली पहाट .. आवडलं !

मयुरा .. जबरीच रे !
मुर्तिमंत .. व्वाह !

पुलस्ति .. खरंय ! आवडली ' चंगळ ' !

श्यामली .. वरकरणी आपणही सोडून दिलेला असतो नाद .. व्वाह !
कुठल्यातरी प्रश्नात खरंच अडकलियेस कि काय ?

वैभवा .. छानच रे ' पुण्याई ' !

माणिक !


Jo_s
Monday, July 30, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव
की तुझ्यावर कविता किंवा अभंग सुचायला
आषाढी एकादशी यावी लागते .
छानच झाल्ये...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators