Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 27, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Tuesday, July 24, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी
अप्रतिम .. खूप आवडली

देवा ..
मस्त आहे .


Bairagee
Tuesday, July 24, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सारंग आणि स्वाती. धन्यवाद. स्वाती, ध्वनी आणि अर्थ ह्या दोन्ही अंगांनी 'येउन पडतो'चा विचार करतो आहे.
देवदत्त, 'सल' मलाही फारशी कळली नाही. मांडणी विस्कळित, अव्यवस्थित वाटते. थेट मुक्तछंदात लिहायला हवी होती असे माझे मत. अभंगओवीसदृश्य चाल लावून वाचण्याचा प्रयत्न केला. पण काही जमले नाही.


Suvarnamayee
Tuesday, July 24, 2007 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी, मस्त!!
( फक्त मी ' समोर येतो' च्या जागी ' येऊन पडतो' वाचलं.)
-मी पण तसेच वाचले! कविता थोडी ऍबस्ट्रॅक्ट वाटली



Devdattag
Wednesday, July 25, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी.. कविता छानच..:-)

मयुर, स्वाती, वैभव धन्यवाद..:-)

सारंग, बैरागी.. सल च्या अर्थांपैकी एक अर्थ असा.

'सल' मध्ये कविला सल आहे तो त्याच्यातल्या अपूर्णतेचा.. काही क्षण त्याला ते समाधान लाभलं होतं, पण ते क्षण परत कसे मिळवायचे हे त्याला कळत नाहिये.
जरी आज लोकांची वाहवा मिळतेय, तो पूर्ण भरात आहे, तरी यातले काही आवडत नाहिये.
इतके दिवस तो जे लिहित होता, बोलत होता ते फक्त दुसर्‍यांसाठी. आज जे शब्द तो लोहितोय जे बोलतोय त्यात त्याच्या भावना आहेत.. (म्हणून इतके दिवस शब्द भावबद्ध नव्हते ते आता झालेत). पण तरीही ते मांडायचं कसं हेच त्याला कळत नाहिये.
शेवटच्या कडव्याचा अर्थ सरळ आहे.


बैरागी.. ही कविता जशी सुचत गेली तशी लिहित गेलो आणि मला स्वत:ला आवडली लिहिल्यावर.. म्हणून जास्त विचार न करता पोस्टली.. आता तुम्ही म्हणताय तशी मांडणी अव्यवस्थित वाटत असेल तर परत विचार करतो यावर..
स्वाती.. शेवटचं कडवं नंतर प्रश्नचिन्ह का ते कळलं नाही..



Swaatee_ambole
Wednesday, July 25, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, ह्या कवितेची रचना तितकी घडीव ( वृत्त, छंद, यमक, किंवा गीताप्रमाणे ध्रूपद - अंतरा, अश्यापैकी) नसल्यामुळे त्याला ' कडवं' म्हणावं की नाही हे कळेना. पण तो भाग आलाय मात्र खासच. :-)

Zansi
Wednesday, July 25, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडेसे अधिक आणि थोडेसे वजा
ह्यातच आहे काय ती मजा
आयुष्य आहे न उलगडणारे एक गुपित
प्रत्येक जण असतो दोर त्याचे कापित

लहानपणी व्हायचे असते मोठे
आणि मोठेपणी व्हायचे असते छोटे
नियती घेत असते आपल्या परिक्षा
अन् आपण आपले बाळगुन असतो
आयुष्या कडुन अपेक्षा

मग येते अशी एक वेळ
माणूस म्हणतो दमलो आता कधिचा खेळतोय खेळ
थांबावे अन् घ्यावा विसावा,
पण काय माहिती पुढचा क्षणच नसावा.

Bairagee
Wednesday, July 25, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पष्ट, स्पष्ट बोलावे. उगाच काहीतरी लपवू नये. ह्याने काहीही साध्य होणारे नाही. धोरणीपणा कवितेत फार काळ टिकत नाही. असो.

Princess
Thursday, July 26, 2007 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आला आला आला
विठु भेठीसाठी आला

कसा रे दु:खाचा माझ्या
गेला तिथे सांगावा
दु:ख निवाराया माझे
विठु लगोलग आला

नको दाखवु प्रेमाचा
खोटा रे देखावा
भाव भक्तीचा असे
विठु माझा भुकेला

घे विठ्ठलाचे नाव
तुझी बदलेल दुनिया
देह होईल पंढरी
मन होईल विठोबा

आला आला आला
विठु भेटीसाठी आला...



Mankya
Thursday, July 26, 2007 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Princess.. सुंदर गं !
भाव भक्तिचा .. व्वा !

माणिक !


Meghdhara
Thursday, July 26, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वाह बैरागी! मस्तच. शब्द नाहीत.
पुढे अजून काहीतरी खुणावत रहाते.
मेघा


Meghdhara
Thursday, July 26, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस वाचताना छंद मीटर अडखळायला होतय का?
एक जुनी कविता आठवली मिळाली तर पोस्ट करेन.

मेघा


Devdattag
Thursday, July 26, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>स्पष्ट, स्पष्ट बोलावे. उगाच काहीतरी लपवू नये.
तो प्रयत्न आहेच.. पण स्वभावातला भिडस्तपणा कवितेतही उतरतो बहुदा..:-)

Meghdhara
Thursday, July 26, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस तुझ्यामुळे एक खूप जुनी कविता खरं तर खूप जुनी वही पुन्हा वर आली.

तर ती आठवलेली कविता..

दिस चालले सरून
महिने महिन्या मागून
वर्ष सरल गं बाई
धनी घरी आला नाही

म्हनला व्हता आता जातो
मायबापाले भेटतो
माझं गार्‍हानं ऐकिवतो
हाए तो मोठा दयालू

असं करू नगं देवा
तुला हाए माझी आन
तुझ्या दारी आला घरधनी
त्याला घरला तू धाड

घरं सांगू का इठोबा
राग धरू नगं मना
धनी ह्योच माझा द्येव
अन पंढरी माझी घरा

लेकरं झाली उदास
देते बाबाचा हा घास
अरे येरे घरा धन्या
किती घोर लावशील

द्येव द्येव द्येव द्येव
नगं दाही दिषा शोधू
द्येव लेकरी आपला
द्येव संसारात साधू


जुनं वाचून खूप मजा आली..

मेघा



Princess
Thursday, July 26, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह मेघा, खुप मजा आली. चल, आता जुन्या वहीतल्या कविता येउ दे इथे.
माझी कविता खुप ठिकाणी अडखळते आहे. मीटर बिघडलय. लिहिल्या लिहिल्या लगेच पोस्टली ना, चुकलच खरे तर.


Zansi
Thursday, July 26, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Bairagee,
स्पष्ट, स्पष्ट बोलावे. उगाच काहीतरी लपवू नये. ह्याने काहीही साध्य होणारे नाही. धोरणीपणा कवितेत फार काळ टिकत नाही. असो.

Thanks for the honest opinion

Zaad
Friday, July 27, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी कधी

कधी कधी खरंच कळत नाही
आपल्याला काय हवंय ते!

एरवी मागे लागूनही हाताला
न येणारं फूलपाखरूदेखील
आपल्या टेबलावर जुन्या
पत्रांच्या ढीगावर कसं ऐटीत
येऊन बसतं. आपल्याला
कळतच नाही ते आपल्याचसाठी
आलंय म्हणून.ते उडून गेलं तरी
कळत नाही कधी.....

कधी पाऊस फक्त आपल्याचसाठी
बरसतो आणि आपण छत्री उघडतो
कधी उन्हं गुदगुदल्या करतात तळव्याला
आणि आपण पांघरूण ओढून घेतो
कधी धुकं पसरतं इतकं छान दाट
आणि आपण विसरून गेलेलो असतो
हरवून जायची वाट.....

कधी कधी नाहीच कळत
आपल्याला काय हवंय ते!

आणि कधी कळून आल्यावर सगळं -
फूलपाखरू उडून गेलेलं असतं
पाऊस थांबलेला असतो
उन्हं निघून गेलेली असतात
धुकं वितळलेलं असतं.......
पश्चात्तापाच्या भरात एक जिवंत
मरण जगू लागतो आपण पण
हे बघतच नाही कधी की,
फूलपाखरू खिडकीबाहेरच फिरत असतं अजून
पाऊस थांबला तरी पानांतून पखांतून मनातून
निथळत असतो.उन्हं अजूनही
मातीशीच रेंगाळत असतात
आणि आपलं जगणं मात्र बनून गेलेलं असतं
संदिग्ध.......धुक्यासारखं.....

कधी कधी कधीच कळत नाही
आपल्याला काय हवंय ते!


Jo_s
Friday, July 27, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, सुंदरच आहे "कधी कधी"

Chinnu
Friday, July 27, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह झाडा, धुक्यासारखी अलगद आहे कधी कधी..

Princess
Friday, July 27, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहाहा, झाडा मस्तच उतरलीये. शेवट खुप आवडला फुलपाखरु खिडकीबाहेरच फिरत असतं अजून....वाह

Chinnu
Friday, July 27, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधीतरी तुला एक ओळ लिहायचीच राहुन गेली..
तुझी स्वप्नं पापणीत येता येता हरवून गेली..

हाक देतच होत्या झुंजुमुंजु पाउलवाटा
पानावरचे दवं कुणा भिजवून गेली..

दारा आड लपल्या पावसाची थोडी गंमत करायची होती
तुझी छत्री नेमकी कुठेतरी राहून गेली!

तरारून आली होती जाणीव गेल्या श्रावणात
मनातून काढायची तेव्हढी राहूनच गेली

रात्रभर गुंतली होती भावनेच्या खेळात
नादावली पहाट, (उगवायचेच) विसरून गेली!

- चिन्नु





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators