Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 19, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 19, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Tuesday, July 17, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय मित्र मिल्यास ...
वाढदिवसानिमित्त सप्रेम भेट


ओलीसुकी


कधी भुरभुर पाऊस झेललाय देहावर ?
इतक्या चोरपावलांनी येतो की
आलेला कळतच नाही ...
अगदी अंगाशी येईपर्यंत ...
पण तोपर्यंत मिटलेल्या डोळ्यांनी ...
ओलेत्या ओठांनी
पावती देऊन टाकलेली असते
सुखावल्याची ....
आणि तरीही
तो रिमझिमत राहतो ... साळसूदासारखाच
जोवर अनावर होत नाही
आपल्या भिजायच्या निर्णयामागची ओलीसुकी
................
................
चिंब ओल्या निर्णयाला उन्हं देताना कळतं
कधी कोसळ ..... कधी भुरभुर !
आपण आता सराईत झालो आहोत
ओलीसुकी करण्यात ....



Milya
Tuesday, July 17, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा काय सुंदर भेट आहे!!!

वैभवा खूप खूप आभार रे!!!!

Zaad
Tuesday, July 17, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंब ओल्या निर्णयाला उन्हं देताना कळतं
प्रचंड काव्य आहे या ओळीत....खासच!!
कविता खूपच सुंदर!!!


Sarang23
Tuesday, July 17, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र मिल्या, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!

वैभवा... खूप सुंदर भेट... एक कविताच भेट द्यायची म्हणजे...


Daad
Tuesday, July 17, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओय होय! वैभवा ओलीसुकी झन्नाट आहे! भुरभुर पाऊस्- नुसते शब्दच कसे!
मिल्या, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
(कस्सा लक्की आहेस, बाबा! एक अख्खी कविता भेट! मज्जा आहे एकाची, बुवा)


Psg
Tuesday, July 17, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता समजल्यावर नि:शब्द झाले!
सुरेख वैभव!

Jayavi
Tuesday, July 17, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव..............अप्रतिम!! प्रचंड आवडली !
मिल्या.....किस्मतवाले हो :-)

Swaatee_ambole
Tuesday, July 17, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुंदर! :-)
       

Paragkan
Tuesday, July 17, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya baat hai !!

Chinnu
Tuesday, July 17, 2007 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) वैभवा, सुंदर! मलाही ओलीसुकी आवडले.

Bairagee
Wednesday, July 18, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, 'ओलीसुकी' सुंदर आहे.

Jo_s
Wednesday, July 18, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, छानच आहे भुरभुर.....

Chinnu
Wednesday, July 18, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडा, पखाल वरील विश्लेषण पाहिले. छान वाटले वाचून. अर्थ स्पष्ट केल्याबद्दल खुप धन्यवाद.
या वयात आध्यात्मिक लिहितोस? तेही इतके सुंदर! छान.
मिल्या सॉरी हं, गुरुजींची कविता एवढी सुंदर आहे आणि त्या नादात विसरूनच गेले. वाढदिसाच्या उशिराने भरभरून शुभेच्छा! :-)


Sarang23
Wednesday, July 18, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

    चरा

झाडांवर फुले आणि
पानांवर पाणी
हिर्व्या हिर्व्या रानामध्ये
पाखरांची गाणी

पाण्यासाठी ओढ्याकाठी
थकलेल्या गाई
सोन्याहून पिवळते
गर्द वनराई

ओल्या ओल्या उताराला
लाल लाल कडा
वाटेवर पावलांच्या
प्राजक्ताचा सडा

अशा वेळी पहाटेचा
खळाळता झरा
चालताना भांबावून
तोल जातो जरा

भेटीसाठी वेडावून
सैरा वैरा धावे
एवढे ना कुणासाठी
कुणी वेडे व्हावे

सखयेच्या अंगोपांगी
उडवितो फेस
रुबाबात असे जसे
कुरळेसे केस

परी अशा उधाणाला
गालबोट लागे
पाडतात ओरखडे
वियोगाचे धागे

मिलनाला आतुरल्या
वेड्या चालीमुळे
दगडात पडलेला
चरा हळहळे


सारंग


Lopamudraa
Wednesday, July 18, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सांरंग काय सुरेख वर्णन केलय.. , खुप आवडली कविता...!!!!
एकसे बढकर एक कडवं आहे.(चरा शब्दा ऐवजी दुसरा शब्द हवा होता का?.)
मिल्या वाढदिवसाच्या शुभच्छा..!!!
पाउस सुरेख आहे वैभव.. मस्त.


Swaatee_ambole
Wednesday, July 18, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, मस्त! लय छान आहे.
सगळ्याच उत्कट भेटींना असणार्‍या वियोगाच्या चिरशापाची जाणीव छान उतरली आहे.

ते ' फेस - केस' खटकलं मात्र.
तसंच पहाटे गायी थकलेल्या कश्या? वर्णनात घोटाळा वाटतो.


Meghdhara
Wednesday, July 18, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वैभव!
दाद झन्नाट..! काय शब्द वापरलायस.
व्वा सारंग चरा हळहळे! काय कल्पना आहे!
त्या झर्‍याचा नाद आलाय कवितेला.
फक्त सखयेच्या आंगोपांगी नीट पोचले नाही.
मेघा



Mankya
Thursday, July 19, 2007 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा .. मस्तच रे मित्रा ! मस्त लय आहे !

माणिक !


Daad
Thursday, July 19, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा, स्वातीला मोदक.
लय मात्रं आवडेश


Milya
Thursday, July 19, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग : आवडेश रे.. घाटातली वाट ची आठवण झाली
पण माझे पण स्वातीला अनुने बनवलेले मोदक :-)

आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद...

खरे तर तुम्ही मला धन्यवाद द्यायला पाहिजेत.. माझ्या वाढ्दिवसामुळे तुम्हाला अशी सुंदर कविता वाचायला मिळाली




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators