Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 12, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » कथा कादंबरी » नवर्‍याचं घर.. » Archive through July 12, 2007 « Previous Next »

Manjud
Thursday, July 12, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, रागावायचं कशाला एवढं? अनूने तुला perfectly समजावून दिलं आहे की निगेटिव्ह प्रतिक्रिया तुला का आल्या ते. आणि नंदिनी, अज्जुका, दाद यांच्या प्रतिक्रिया म्हणजे तुला पुढिल लेखन प्रवासाच्या टिप्स आहेत. या सगळ्या नकारात्मक प्रतिक्रिया तुला नाऊमेद करण्यासाठी नक्किच नाही आहेत हे तु राग न धरता समजून घे. आणि प्रत्येक प्रतिक्रिया positively घे.

Shyamli
Thursday, July 12, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली पिन्क टाकल्याशिवाय रहावेलच नाही शेवटी.. तुझी पिंक टाकण्याची सवय बाकी वादातित आहे>>> माझ्या सवयीचा अभ्यास करण्यापेक्षा वर ज्या कथाकारांनी सुचना केल्यात त्या लक्षात घे आणि हीच कथा पुन्हा लिहुन दाखव ना!

इथल्या अभिप्रायांनी लेखक/कवि उत्तरोत्तर सुधारत जातो, तस तुझ्या लिखाणात दिसु दे!

आपण जेंव्हा काहीही वाचतो तेंव्हा वाचलेले शब्द आणि वाक्प्रचार लक्षात राहुन, अथवा ठेउन नंतर जेंव्हा लिखाणात अथवा बोलताना वापरतो ते वापरताना कुठे, कसे ,वापरावे याच भान असायला हवं
नुसत data collection उपाय़ोगाच नसत processing पण यायला हवं.

मी तुझ्या चिकाटीबद्दल खरोखर कौतुकानी लिहिल होतं, तुला ते उपरोधीक वाटलं असेल तर तो तुझा दृश्टीकोन त्याला कारणीभुत आहे.

आणि राहता राहिला मी पिंक टाकण्याची सवय हा मुद्दा तर , तु सोडल तर इथे कोणीही ह्या गोष्टीला दुजोरा देइल असं वाटत नाही.
कारण असल्या घाणेरड्या सवयी मला नाहीतच.


असो तुझ्याशी वाद घालण्याचा मुळीच मानस नाही. तुझ चालु दे.



Bee
Thursday, July 12, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु, रागवन स्वाभाविक आहे. प्रतिक्रियाच्या नावाखाली मुद्दाम डिवचुन घ्यायचा हा खूप जुना प्रकार आहे. मुद्दाम नको तेवढी चिरफ़ाड करायची आणि 100% perfection चा अट्टाहास धरायचा.

edited by Moderator

Nandini2911
Thursday, July 12, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मग लिही ना... तुझ्या कथामधे Depth चीच तर कमी आहे. तू प्रसंग नीट खुलवत नाहीस. आणि मग मला असं म्हणायचं होतं. किंवा इथे उपरोध होता. या अशा explantion ला काहीच अर्थ नाही.

आपण काय लिहिले आहे हे वाचकाना समजलं पाहिजे ना.. शकूला लग्नानंतर आठ दिवसात डोहाळे लागणे शक्य नाही.. हे तुला कुठलीही स्त्री सांगेल.

लग्नानंतर आठ पंधरा दिवसात गर्भधारणा होण्यात काहीच गैर नाही. अनुभवी लोक तुला सांगतील It depends on timing
:-)
100% Perfection चा अट्टाहास नाही, कारण जी तांत्रिक बाब चुकीची आहे ती चुकीचीच आहे. वरुण देवाने किंवा सुर्याने उपद्व्याप केला असेल तरी लक्षात यायला तेवढाच कालावधी लागणार.



Psg
Thursday, July 12, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्ण प्रणय कसा होतो आणि मग गर्भधारणा वगैरे कशी होते ते सर्व in depth मधे लिहून दाखविन
नको! प्लीज :-)

तर कथेबद्दल- छोटी कथा असूनही जवळजवळ प्रत्येक परिच्छेदावर तुला पुन्हा explain करावं लागलं याचाच अर्थ की कथा पोचत नाहीये. जी परित्यक्ता बायकांबद्दल विधानं केली आहेस ती संवादातून आली असती तर जास्त परिणामकारक झाली असती. विचार कर.

आणि १००% perfection शक्य नाही हे ठाऊक आहेच सगळ्यांना, पण ज्या obvious गोष्टी आहेत त्याबद्दल तरी चुका होऊ नयेत अशी अपेक्षा असते, त्यात काही वावगे आहे का? :-)


Sanghamitra
Thursday, July 12, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी पुन्हा एकदा चांगले कथाबीज. पण विस्तार अगदीच कमी.
यावेळची अजून एक सुधारणा म्हणजे यावेळी जरा तगडे प्रसंग पण आहेत गोष्टीत. पण ते ' एका वाक्यात उत्तरे लिहा ' छाप झालेत.
पंधरा दिवसांचा तुझा मुद्दा मान्य. वर्षानुवर्षे हिंदी सिनेमे घेत आलेत ते स्वातंत्र्य तू गोष्टीतला रंग टिकावा म्हणून घेतलेस हे ठीक.
पण कथेला विस्तार लागतो रे.
मुळात कथा एकपानी असेल का हे त्याचे कथाबीजच ठरवते.
एक जबरदस्त पन्च किंवा ट्विस्ट असेल ना शेवटी तर त्याची एकपानी कथा होऊ ' शकते ' . (होईलच असे नाही. पण हे तर किमान हवेच.)
हा तू पिंपळाचे झाड गुलाबाच्या रोपट्याएवढे दिसावे असा प्रयत्न करतोयस.
ते सासरचे लोक लग्नात भेटणे, येताजाता इतर बायकांनी टोमणे मारणे वगैरे (एकता कपूर स्टाईल का होईना) प्रसंग किती व्यवस्थित रंगवता आले असते. (सिरियलीमधे तीनतीनवेळा शकूच्या चेहर्‍याला प्रत्येक ऍंगलने क्यामेरा फेकून मारण्याइतके. )
थोडक्यात म्हणजे, सध्या तू तुझ्याच तीन कथा घेऊन त्यांचा विस्तार करून पहा.


Kanak27
Thursday, July 12, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It's too much yaar , I dont get why u people entertain this guy , leave him.
I know this is none of my business but i am Mayabolikar & i cant see such a misbehavior.
We come here to read nice stories not for reading s.............

Dont mind .


Rajankul
Thursday, July 12, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघा फ़क्त एकाच बलाक्तारात ऐवढा दम असतो तर पंधरा दिवसात काय काय होऊ शकते.. >>. edited by moderator

Ladaki
Thursday, July 12, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विदर्भातील बायका लग्नादोरच पाच सहा महिन्याचा pregnant होऊन सासरी गेलेल्या असतात>>>
पण बी कथेला सुरुवात करताना तु सांगितले नाही ना सगळ्याना की ही मुलगी विदर्भातली आहे पुण्या-मुम्बईच्या मुलींनो तुम्ही नका वाचू

असो तू तुझा वेळ वाचवलास हे न सांगुन. पुढच्या वेळी आम्ही लक्षात ठेवु तुझ्या कथानकातल्या मुली विदर्भातल्या असतात ते....
पण एव्हढे असुनही एक प्रश्न राहतोच ना जर मुलगा बापावर गेलाय हे डोळ्याना दिसत असुनही तिचे सासरचे लोक आपल्या मोठ्या किंवा छोट्या मानाने तिला परत घरी का नाही आणत???

अशी काही पध्दत नाहीये का विदर्भात की आपली चुक कळली की तिला सुधारायची... तशी पध्दत नसेल तर नवर्‍याने बाई ठेवली आहे हे कशाला सांगितले... आणि तेही पत्राने???


कुणातरी अमक्याच्या लग्नात शकूची गाठ तिच्या सासरकडच्या लोकांशी पडली>>>

म्हणजे मला एव्हढेच म्हणायचे आहे की असा कुणीतरी अमका जर दोन्ही कुटुंबामधे आहे तर मग पत्राचा घाट कशाला? कुठुन ना कुठुन तिच्या नवर्‍याचे पराक्रम तिच्या कानांनवर आलेच असते ना?

आणि आता नविन प्रश्न... बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारा नवरा दुसर्‍या बाईच्या नादी कसा लागतो (म्हणजे मी इथेही त्या पुरुषाची बाजू घेतलिये- नादि तोही लावु शकतो बाईला... पण अश्या केसेस मधे दोघानाही सिंपथी दाखावायची आवश्यकता नाहिये... काराण दोघेही धुतल्या तांदळासारखे वगैरे नसतात)


Ladaki
Thursday, July 12, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ कारा हं निबंध लिहायची माझी ही पहिलीच वेळ आहे

Manya2804
Thursday, July 12, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रकार अभिनव आहे ! वाचकांच्या प्रश्नाना उत्तर देत देत कथाबीज फुलवलं जातय ! (वाचकांच्या सहनशीलतेची पण कमाल आहे ! )

बी, असाच लिहीत रहा बाबा. नाही तरी आजच्या भेसळीच्या जमान्यात इतका विशुध्द आचरटपणा आणि तो ही सातत्याने आम्हाला कुठुन अनुभवायला मिळणार ?


Bee
Thursday, July 12, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शकूचा नवरा हा पुणेमुंबईकडचा होता. तिथे म्हणे लग्न झाल्यावर दोन दोन वर्श नवरे बायकोला स्पर्ष देखील करत नाही. शकू बिचारी वर्षभरातच माहेरी परत आली. नवर्‍याला आच फ़ार.. ती कुठे निवावी म्हणून त्यानी ठेवली बाई. जशा duplicate ID मायबोलिवर असतात तसाच प्रकार पत्र पाठवण्यात झाला. पत्र खरे होते पण पाठवणार्‍याचा काही पत्ता नाही.

उरला प्रश्न नैतिकतेचा तर आधी बुधवार पेठ, मग ग्रांट रोड, मग तमाशावाल्या बाय्का अशा एकेक बायका तिच्या नवर्‍यानी उपभोगाच्या नादात त्याला शकूला घरी घेऊन जावेसे काही वाटले नाही. आपला नवरा किती पराक्रमी आहे हे तिला माहिती होते म्हणून तीही म्हणाली की होऊन जाऊ दे ह्याची थंडी एकदाची. पण तरीही तसे काही झाली नाही.. पण घरात बाई वगैरे म्हणजे विदर्भातल्या बायका तरी सहन नाही करत. शेवटी शकू आपच सासरी गेली.. विदर्भा काय नि पुणे मुंबई काय. स्त्रि पुरुष नैतिक अनैतिक सारखेच.

जगात नुसत्या शारीरिक फ़रकामुळे जसे इतर विभात पडतात लोकांच्यात तसाच हा एक्; बाकी काही नाही. काही उंच, काही बुटके, काही काळे, काही गोरे, काहींचे केस सोनेरी तर काहींचे तपकिरी, ह्यापलिकडे बाया बाप्यात काही फ़रक नाही.

हा वरील परिच्छेद मी नाही पुणेकर गौरीबाईंनी लिहिला आहे. तो इथे मी फ़क्त टाईप केला..



Swa_26
Thursday, July 12, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शकूचा नवरा हा पुणेमुंबईकडचा होता. तिथे म्हणे लग्न झाल्यावर दोन दोन वर्श नवरे बायकोला स्पर्ष देखील करत नाही.

हा आणि शोध कुठुन लावलास बाबा तु??? एकिकडे काही फरक नाहि असे बोलायचे आणि दुसरीकडे पुणे-मुंबईचा उल्लेख...कठीण आहे!!...

Bee
Thursday, July 12, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्व, आता लडकी वगैरे सारखे मायबोलिकर विदर्भातील मुली अशा असतात का तशा असतात का अशा संशय व्यक्त करायला लागल्यात तेंव्हा मीही आपले दिली ठोकून मनात येईल ते.. cheap बनायला काही वेळ लागत नाही.. चांगला बनायला वेळ लागतो.. जशास तसे..

Antara
Thursday, July 12, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, जर नेगेटिव प्रतिक्रिया (त्या पन १००% खर्या)झेपत नसतील तर कथा इथे का पोस्ट करता? बर तुम्हाला चॅलेन्ज, तुम्ही दुसर्या एखाद्या नावानी लिहा याच प्रकारात पुढची गोष्ट!! अन बघा 'वेगळ्या' प्रतिक्रिया येतात का!! घेता हे आव्हान?

Limbutimbu
Thursday, July 12, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> cheap बनायला काही वेळ लागत नाही.. चांगला बनायला वेळ लागतो.. जशास तसे..
कुणाचीतरी उसनी गलिच्छ वाक्य इथे टायपुन (चीप बनुन) झाल ना तुझ समाधान?? आता चान्गला बन!
जा, दासबोधावर काहीतरी लिही!


Manjud
Thursday, July 12, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुझं अभिनंदन, कथा लिहून झाल्यावर एका दिवसात २० च्या वर प्रतिक्रिया मिळवल्यास (तुझ्या पोस्ट्स सोडून). तु तर दाद, नंदिनी ह्यानाही मागे टकलंस.

Nandini2911
Thursday, July 12, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुझ्या मागच्या कथेच्या वेळीही मी लिहीलं होतं..
मला तुला कमी लेखायचा चिडवायचा हेतू बिल्कुल नाही.. उलट तु चांगलं लिहावं हा आहे.

मी खूप तर्हेची माणसे पाहिली आहेत. विदर्भ, कोकण, आणि बाकी काहीही... खूप तेर्हेचं वागणं पाहिलय. त्यामुळे इथलीच माणसं अशी का वागतात? आणि त्यातले लोक तशेच असतात वगैरे वर माझा विश्वास नाही.

मुळात तू अशा विषयाला हात घातलास. ज्याचा तुला गंध नाही.
"मातृत्व" हा वाटतो तितका सोपा विषय बिल्कुल नाही. "अस्तित्व" नावाची फ़िल्म बघ, त्यातला माझा आवडता संवाद "बच्चेका बाप कौन है.. ये सिर्फ़ मा बता सकती है.."

अशा नाजुक विषयावर लिहिण्यासाठी तितका विचार करावा लागतो. उआच मला वाटलं म्हणून लिहीलं असं होत नाही.

उगाच अश्लील वाक्यं (तीपण दुसर्‍याची) लिहून तुला काय सिद्ध करायचं आहे? तुझी कथा बेकार होती हे तू का लक्षात घेत नाहीस.
एक वाचक म्हणून विचार कर ना....

मुळात तू माझं बरोबर आहे हा हट्ट का धरतोस? इथे उलट तुझ्या लिखाणातल्या चुका तुला कोणीतरी सांगत आहे तर तू विदर्भात असे आणि पुण्या मुंबईत तसे वगैरे बालिश विधाने का लिहीतोस?


मुळात सर्व काही डोक्यातून काढ आणि एक प्रश्न तू स्वत्:ला विचार. तू ही कथा का लिहीलीस? तुला काय सांगायचं होतं. ते तू सान्गितलय असं तुला वाटतं का? आणि एक वाचक बनून कथा परत वाच.



Himscool
Thursday, July 12, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक कळत नाही.. गेल्या वेळेस असाच गोंधळ ह्या व्यक्तीनी घातला होता.. तेव्हाही तिच्या डोक्यात काही फरक पडला नव्हता..
'पालथ्या घड्यावर पाणी' असा अनुभव पूर्वीही आलेला असुनही सगळे जण का आपली शक्ती वाया घालवत आहात?


Ladaki
Thursday, July 12, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी आज घरी जाताना तुझी कथा आणि त्यावरच्या सगळ्या प्रतिक्रिया यांची प्रिन्टाउट घेऊन जा आणि शांतपणे सगळे वाच म्हणजे कुणी कुणी काय काय रिप्लाय दिलेत ते तुझ्या लक्षात येइल आणि आपल्याला या विषयावर कथा लिहायची दुर्बुध्दी का झाली हा एकच प्रश्न पडेल तुला




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators