Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 02, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... » Archive through July 02, 2007 « Previous Next »

Nandini2911
Tuesday, June 26, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरस्वतीला आश्रम आवडून गेला. इथल्या वातावरणाशी तिने पटकन जुळवून घेतले. सकाळी सहा वाजता उठायला लागायचं. मग सकाळची आन्हिके आटोपून आठ वाजता बाहेरच्या पडवीत प्रार्थना. त्यानंतर चहा चपाती किंवा बटर असा नाष्टा. मग सगळ्य जणी कामाला लागायच्या. सरस्वतीला शिवणकाम वगैरे काहीच जमत नव्हतं. त्यामुळे आश्रम साफ़ करण्याचं काम तिच्याकडे होतं.

कचरा, लादी पुसणं ही सगळी कामं ती करायची. लेलेआजीना तिचं नीटनेटकं काम फ़ार आवडायचं.

लेलेआजीचं पत्र घेऊन ती जवळच्याच एका माध्यमिक शाळेत गेली. मोठे सर म्हणून मुख्याध्यापक होते. त्यानी तिला खूप प्रश्न विचारले. थोडे अभ्यासाबद्दल पण बरेचसे तिच्याबद्दल... त्यानी तिला शाळेत प्रवेश दिला.
"हे बघ, मला तू चांगली मुलगी वाटतेस. तुझे आतापर्यंतचे मार्क्स चांगले आहेत. तुझ्या परिस्थितीसाठी मी तुला जितकी होईल तितकी मदत मी तुला करेनच. पण तुला अभ्यास मार्त्र करावा लागेल. कुठेही लक्ष विचलित न करता... "

सरस्वतीने मान डोलावली. हा सल्ला तिला आयुष्य भर उपयोगी पडणार होता.

जून महिना उजाडला. आणि शाळा चालू झाली. पहिल्याच दिवशी वर्गातल्या प्रत्येकाचे लक्ष तिच्याकडे होतं. मोठे सरानी कुणाचेतरी जुने गणवेष तिला दिले. आश्रमातच कुणाच्यातरी जुन्या साडीची एक पिशवीपण तयार झाली. ती वर्गात कुणाशीच बोलायची नाही. वर्गात एकदम शेअटच्या बाकावर बसायची. एकटीच. कित्येक मुलिनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती जेवढ्यास तेवढंच बोलायची. शिक्षकानी विचारलेल्या प्रश्नीची उत्तरं पण ती द्यायची नाही. "आखडू" "खडूस" "मतिमंद" "भिकारी" अशी बरीच नावं तिला या दरम्यान चिकटली होती. पण सरस्वती काय चीज आहे हे समजायला पहिली घटक चाचणी यावी लागली. सगळ्यात पैकीच्या पैकी मार्क. इतकंच काय शिर्केबाईनी तिचा इतिहासचा पेपर नोटीसबोर्डवर लावला. "उत्कृष्ट" असं लिहून.

आश्रमात पण लेलेआजी तिला विशेष काम सांगत नसत. तरीपण ती तिचा अभ्यास संभाळून जमेल तितकी कामं शिकतच होती. नववीची परिक्षा संपायच्या आधीच तिने दहावीचा अभ्यास सुरू केला...

सगळं कसं सुरळीत चाललं होतं. पण मधेच सरस्वती झोपेत किंचाळायची.. "काका.. नको.. जाऊ द्या मला" असं काहीतरी बडबडायची. सुरुवातीला मालती घाबरून जागी व्हायची. पण सरस्वतीला झोपेत बडबडायची सवय आहे हे समजल्यावर ती निवांत झोपायची.

त्या दिवशी रात्री मालती पाणी प्यायला उठली. सरस्वती शांत झोप्ली होती. उशाशी कसलंतरी पुस्तक होतं. मालती दिवा बंद करून बिछान्यावर पडली. सरस्वती परत बडबडत होती. आधी ती काय म्हणते ते मालतीला नीट ऐकू आलं नाही.. परत तिने लक्ष देऊन ऐकलं...

"रेहान.. प्लीज.. रेहान... रेहान.. " सरस्वती बडबडत होती..


Yashwardhan
Wednesday, June 27, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी जरा लवकर लिही ना.... नेहमी प्रमाणे प्रत्येक एपिसोड नंतर एक उत्सुकता लागुन रहातेय....

Manogat
Wednesday, June 27, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही नंदु,
उत्सुक्ता टीकवुन ठेवतेस वचकाची. मस्त ओघ घेतला आहे कथेने....


Jaijuee
Wednesday, June 27, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैताग आणलास नंदिनी तू! तुकड्या-तुकड्यांत वाचून रसभंग होतो. एकदाच बसून लिहून टाक ना!

Manutai
Wednesday, June 27, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाईजुईशी सहमत. क्रुपया नंदिनीजी, एक विनंती आहे सलग लिहून एकदम पोस्त karaa naa. kimaan ekaa veLee 2 {episode}?}

Antara
Wednesday, June 27, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे वाचून असा फ़िल येतोय की एकता कपूर च्या सिरियल सारखे सुरु आहे, प्रत्येक भाग चटकदार करण्याचा प्रयत्न पण एका एपिसोद चा दुसर्‍याशी संबन्ध नाही किंवा पुर्वनियोजित कथानक ही नाही. एकेक एपिसोद लिहायचा, काहितरी खमंन्ग मसाला टाकाय्च. आणि कथा जाईल तशी जाऊ द्याय्ची. sorry, but this is wat I feel..

Nandini2911
Wednesday, June 27, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काहीतरी बोलू नकोस."
"अगे बाय, खरंच. कोन आहे हा रेहान?" मालती आणि सरस्वती मागच्या अंगनात भांडी घासत बसल्या होत्या.
"मी कुठल्याही रेहानला ओळखत नाही." सरस्वती हे वाक्य सकाळपासून दहादा बोलत होती. पण मालतीचा विश्वास बसत नव्हता. "तू रात्रभर रेहान बोलत होती." हे तिचं पालुपद चालूच होतं. सरस्वतीने मेंदुच्या सगळ्या कोपर्‍यात धुंडाळलं या नावाची एकही व्यक्ती तिच्या परिचयाची नव्हती. काल रात्री आपल्याला कसली स्वप्ने पडली हे पण तिने आठवायचा प्रयत्न केला. शेवटी तो विषय तिने तसाच सोडून दिला.
मालतीला मात्र सतत सरस्वती काहीतरी लपवत आहे असं वाटत होतं.
"तुझ्या वर्गात आहे का कुणी रेहान? तुला आवडतो का तो?" मालतीने परत तोच विषय आणला.

"हे बघ, माझ्या वर्गात कुणी रेहान नाही. असला तरी मला तो आवडणार नाही. मला या लोकाचा फ़ार राग येतो." बोलता बोलता सरस्वतीच्या डोळ्यासमोरून सलवार कमीज घातलेली तिची आई तरळून गेली. मालती त्यानंतर शांत बसली.

दुपारी वर्गात गणिताच्या तासाला अचानक सरस्वतीला काहीतरी आठवलं... आश्रमात आल्यावर तिने मालतीला आवाज द्यायला सुरुवात केली.

"काय झालं?" मालती स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती.

"सकाळपासून मला पिडलंस ना.. की कोण रेहान म्हणून... हे बघ.." सरस्वतीच्या हातात एक जुनं वर्तमानपत्र होतं.


"हा तर रोहित कपूर आहे."
"नीट बघ.. हा "दिल तुम्हारा हो गया" मधला फोटो आहे. त्याच्यात याचं नाव रेहान अस्तं.. मी हा पिक्चर तीन चारदा पाहिलाय. माझा आवडता हीरो आहे."

"मग हा तुझ्या स्वप्नात आलेला?"
"असेलही.."
"काय उपेग? लग्न झालय याचं.." मालती तिला चिडवत म्हणाली.

"बाई,, मला माहीत आहे. बायकोचं नाव माना कपूर, दोन मुली.. अं.. राही आणि पाखी. रोहित कपूरविषयी जे काही छापून येतं ना ते मी सगळं लक्षात ठेवते. त्याचा जुहूला बंगला आहे. आणि लवकरच त्याचा आणि माधुरीचा पिक्चर येतोय,"

मालती नुसती ऐकत होती.
"इतके पिक्चर बघतंस, आणि पेपरात मार्क कसे मिळतात?"

सरस्वती खळखळून हसली.
"कारण मी पेपरात रोहित कपूर लिहत नाही." आणि सरस्वती पुढच्या अभ्यासाला लागली. .

नववीचे वर्ष तिचे सुखात गेलं. गाव सोडताना एक भिती होती. बाहेरचं जग फ़ार कठीण आहे असं तिनं सगळीकडे वाचलं होतं पण तिला उलट घरापेक्षा हा आश्रमच जास्त जवळचा वाटत होता. लेलेआजीनी तिला सर्व प्रकारे मदत केली होती. आश्रमात बहुतेक जणी सरस्वतीला घाबरुन असायच्या. न जाणो तिने लेलेआजीकडे तक्रार केली तर..

रंजना मात्र सरस्वतीकडे मारक्या म्हशीसारखी बघायची. तिच्या विषयी मालतीने सरस्वतीला बरंच काही सांगितलं होतं. पण सरस्वती आता कुणालाही घाबरत नव्हती. "भिती" नावाची गोष्ट ती कुठेतरी विसरून आली होती.



Ardeshmukh
Wednesday, June 27, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nice one

new entry Rohit Kapoor !!

Manjud
Thursday, June 28, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीर, रेहान आणि आता पाखी........

मी "समाप्त" हा बोर्ड लागल्याशिवाय आत कथा वाचणार नाही. break सहा जाये ना........मला कुणीतरी सांगा रे कथा संपली की!!!


Sush
Thursday, June 28, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोहित कपूर नविन नाही, आधीही आला आहे कथेमधे.
नन्दिनि आपण चालु ठेवा. interest वाढत चालला आहे. तर्क वितर्क करुन डोक भणभणायला लागल आहे.


Rajankul
Thursday, June 28, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय को भणाणता है, ये story पढनेवाले डोका बाजुमे रखके पढते है.

Manutai
Thursday, June 28, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरबी गोष्टींइतकीच सुरस वाटत आहे. नम्र विनंती की जरा लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करणे.

Rayhaan
Friday, June 29, 2007 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Veer Kapoor a successful film actor cancels his marriage announcement just one day before.
Sara VK, a gossip columnist is troubled with her friend Rehan being hospitalised and fighting with death and somehow remote that she was engaged with Veer.
Priya Natarajan, Sara's rival has been keeping watch on Sara to "expose" her and get her scoop.

Veer goes to Sara's flat only to find that she is asleep. He startsreading her diary which has life of Saraswati Kelkar has been written.

Saraswti is only daughter of a Kelkar. Her mother has left her husband and married a muslim guy. At the age of thirteen she lost her father. At fourteen she leaves her home after raping by her uncle.

Saraswati comes to Ratnagiri and starts her struggle. She is currently living in an Ashram. She is alone, hurt and not going to believe in love in her life. For her, life is about finding two times meal and a shelter.

Bur her vision is going to change.. Lets see who gives direction to her life.




Nandini2911
Friday, June 29, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरस्वती आश्रमापाठच्या बागेत बसली होती. कुण्या पाटणकर नावाच्या माणसाची ही आंब्याची बाग होती. ऑक्टोबर महिना चालू होता. नुकताच पावसाळा संपल्याच्या हिरव्याशार खुणा अजून सगळीकडे पसरल्या होत्या. रविवारचा दिवस होता. सरस्वतीची आणि बीजगणिताशी थोडी खटपट चालू होती. साईन कॉस वगैरे जरा जास्तच त्वेशात लढत होते. वर्गात अजून शिकवलं नव्हतं. पण सर शिकवेपर्यन्त थांबणं तिला शक्य नव्हतं. डीसेंबरच्या आधी ती अभ्यास पूर्ण करणार होती.

लेलेआजीची तब्ब्येत हल्ली बर्‍याचदा ठीक नसायची. त्यात रविवारचा दिवस म्हणजे सगळ्याचा गोंधळ घालायचा दिवस होता.

इथे तिला हवी तसी शांतता होती. अंगात निळा सलवार कमीज घालून ती एका झाडाखाली बसली होती. हनुवटीवर हात ठेवून ती हातातले गणित वाचत होती. मधेच पाटीवर काहीतरी लिहत होती. आजपासून बरोबर एका महिन्याने तिचा वाढदिवस होता. ती सोडून कुणाच्याच लक्षात नव्हतं.. नाही नाही.. ती सोडून कुणालाच माहीत नव्हतं. इतक्या मोठ्या जगात तीच एकटी. अभ्यासात तिचं लक्ष लागेना. विचार इकडे तिकडे फ़िरायला लागल्यावर तिने पिशवीतून पुस्तक काढलं. शाळेच्या वाचनालयातली तिने जवळ जवळ सगळी पुस्तके तिची वाचून संपली होती. खास शिक्षकासाठा असलेल्या भागात तिला प्रवेश मिळवून शेक्सपीअरच्या नाटकाची भाषान्तरे घेऊन आली होती.
Comedy of Errors तिला विषेश आवदलं होतं. परत तिने तेच वाचायला घेतलं,

बागेत त्यावेळेला तिच्याशिवाय दुसरं कुणी आहे हे तिला माहीत नव्हतं. पुस्तकात ती एवढी रमली की तिच्याशिवाय जगात दुसरं कुणी आहे हे तिच्या लक्षात नव्हतं.

"हाय.." थोड्या वेळाने आवाज आला.
समोर एक तरूण उभा होता. सतरा अठरा वर्षाcआ. पिंगट केस. गोरापान, उंच, निळे डोळे.

सरस्वती क्षणभर त्याच्याकडे बघत होती. कधीतरी याला कुठेतरी पाहिलं होतं. कधी आणि कुठे ते आठवेना. तिच्या चेहर्यावरचे भाव त्याने ओळखले असावेत. तो दोन पावलं पुढे आला.
"मैने कहा.. हाय.." तो किंचित हसत म्हणाला. एखाद्या शांत पहाटे वार्याने फ़ुंकर घालावी तसं त्याचं स्मित होतं. निळ्या डोळ्यात एक असीम खोली होती. काही न बोलता पापणी ही न मिटता सरस्वती त्याच्याकडे बघत होती.

"पहले कभी नही देखा आपको यहा पे.." तो परत म्हणाला. त्याने अऽगात पांढरा शुभ्र शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. इतके दिवस सरस्वती आश्रमात होती, आजूबाजूअcया घरातल्या सर्वाना ती ओळखत होती. पण याला कधीच पाहिलं नव्हतं.

"लगता है आपको सुनाई नही देता.." त्याने उजव्या हाताचा अंगठा हलवून नाही अशी खुण केली. एखाद्या चित्रकराची असावी तशी त्याची बोटे निमुळती होती.

सरस्वती अचानक भानावर आली.
"हाय..." तिने बोलण्याचा प्रयत्न केला. आवाज घशातच कुठे तरी हरवला. "हाय,," ती परत एकदा म्हणाली. यावेळेला जरा जोरात, त्याला ऐकू जाईल अशा बेताने.

"ओह.. तो आप सुन सकती है और बोल भी सकती है..." त्याच्या हाताम्धे एक चांदीचं कडं होतं आणि पायात काळे शूज.

सरस्वतीला काय बोलायचं तेच सुचेना. तिने शांतपणे हातातली पुस्तकं पिशवीत ठेवायला सुरुवात केली. दूरवर एक कावळा केकाटत होता. तेवढाच काय तो आवाज येत होता. तो शांतपणे तिच्याकडे बघत होता.
" intersting " तो म्हणाला.

सरस्वतीने मान वर करून त्याच्याक्डे पाहिलं.

"आय मीन... दहावीचं गणिताचं पुस्तक आणि शेक्सपीअर एक साथ." तो म्हणाला.
सरस्वती फ़क्त गालातच हसली.
"तुला हसता पण येतं... इथे कधी पाहिलं नाही तुला.." त्याने त्याच्या केसातून हात फ़िरवला आणि आधीच विस्कटलेले केस अजून विस्कटले.
"त्या आश्रमात राहते." सरस्वतीने हातानेच आश्रमची इमारत दाखवली. त्याच आश्रमाक्डे पाहताना सरस्वती पूर्ण भानावर आली. नेहमीइचा वागण्या बोलण्यातला थंडपणा परत आला. तिला कुणाशी ओळख नको होती. इथे, या मुलाशी तर बिल्कुल नको.
"ओह.. म्हणजे तू आय मीन,," त्याला काय बोलाअय्चं ते सुचेना.
"मी अनाथ आहे. दहावीला शिकते आणि अभ्यासाला इथ आले होते, अजून काही?" तिने आता व्यवस्थि आवाजात विचरलं.
"अनाथ? orphan ? कोई अनाथ नही होता. सबको देखनेवाला खुदा उपर बैठा है. वही सबका मालिक है, परत अनाथ म्हणू नको." तो शांतपणे म्हणाला. त्याच्या गळ्यात एक काळा ताईत होता.

सरस्वतीला ताबडतोब तिथून निघायचं होतं. संतापाची एक लाट अंगातुसळत होती. तो परत पुढे अजून काही बोलला असता तर नक्कीच हा ज्वालामुखी भडकला असता. त्याच्या आत तिला तिथून निघायचं होतं.
"मी कधी या जागेचा स्टडीसाठी विचारच केला नाही. I just like to sit here. and Enjoy " तो परत हसत म्हणाला.
सरस्वतीला त्याच्याशी बोलण्यात काडीचादी इंटरेस्ट नव्हता. तिला तिथून निघायचं होतं. एकच प्रॉब्लेम होता. हा मुलगा नेमका रस्त्यात उभा होता.
"मला निघायचं आहे." ती शांत्पणे म्हणाली.
"ओह.. झाला स्टडी? परत भेटूच. मी अजून महिनाभर आहे इथे. नाव काय तुझं?"

खरंतर तिला नाव सांगायचं नव्हतं. तरीपण त्याच्या डोळ्यकडे बघण्याचा मोह तिला सोडवत नव्हता. त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.
"सरस्वती..."
" Nice name "

ती हसली आणि पुढे निघाली.
"बाय द वे, मी रेहान..."

सरस्वतीने वळून त्याच्याकडे पाहिलं. जोरात कुठूनतरी वारा आला. तिच्या आजूबाजुला एक पांढरा प्रकाश पसरला. तिला काहीच दिसेना. तिने डोळे मिटून घेतले. "रेहान" एकच शब्द तिच्या मनात कोरला गेला. त्यानंतर सगळीकडे फ़क्त तो प्रकाश आणि तो वारा. पुढचं काही तिला आठवत नाही.



Manjud
Friday, June 29, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Rayhaan, This is our first interaction. Nice to meet you.
I know the ingredients of the story and the end product too. Only thing is I am very much curious about the recipe. I've read carefully each and every episode right from begining. I am ready to wait till the story ends.

My mail id is given in my profile. and am waiting for your mail..... I can read urdu....


Ardeshmukh
Friday, June 29, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Very nice superb
once again

& as usual
i dont have words to describe how much i liked the story

keep it up (Hurry up ! :-) )



Nandini2911
Saturday, June 30, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संध्याकाळचे सात वाजत आले असावेत. काळा काळा अंधार सगळीकडे पसरला होता. मालतीने सरस्वतीला परत एकदा हलवलं. सरस्वती दचकली.
"काय? कुठे हरवली?"
"अं... रेहान.." सरस्वती अजून तंद्रीतच होती.
"बाय.. गेले तीन तास तुझाकडून मी हाच एक शब्द ऐकतेय. रेहानला सोडा आनि रातीच्या जेवणाच्या तयारीला लागा. " मालती तिथून निघून गेली.

सरस्वती आश्रमाच्या व्हरांड्यात बसली होती. पण ती इथे केव्हा आली हेच तिला आठवत नव्हतं. कशी आली हे ही आठवत नव्हतं. एखाद्या जादूमधे असावं अशी तिचा अवस्था होती. मेंदूची सुई फ़क्त त्या एकाच नावावर अडकली होती. रेहान..

थोड्या वेळाने तिला आजूबाजुच्या परिस्थितीचं जरा तरी भान आले. मोरीमधे जाऊन तिने चेहर्‍यावर पाणी मारलं. खरंतर तिला स्वत्:चा राग पण येत होता. काय गरज आहे त्याचा एवढा विचार करायची. कोण होता तो? रस्त्यात भेटलेला एक मुलगा. तो तर तिचं नावही विसरला असेल. कदाचित नसेलही...


विचार करता करता तो दिवस कसा गेला ते तिलाही समजलं नाही. तिला त्याला पुन्हा भेटायचं होतं. आणि तरीही पुन्हा कधीही त्या बागेत पाय ठेवणार नाही अशी शपथ तिने स्वत्:ची स्वत्:ला घालून दिली.


दुसर्‍या दिवशी ती सकाळीच पल्लवीच्या घरी गेली. पल्लवी कदम ही तिची शाळेतली एकमेव मैत्रीण होती. पल्लवी अभ्यासात ढ होती. पण श्रीमंत बापाची मुलगी असल्यामुळे तुच्याकडे सगळी पुस्तके गाईड असायचे. सरस्वती तिला अभ्यासात मदत करायची. नुकतीच सरस्वती पल्लवीचा पीसी वापरायला शिकत होती. इंटरनेटमधून तिला एक असं जग भेटत होतं. जे तिला कधी माहीतच नव्हतं. ती या जगात खुश होती. नवीन माहिती मिअळवायची वाचायची तिला जणू व्यसन लागलं होतं. कधी कधी ती आणि पल्लवी गप्पा मारायचा तेव्हा तिच्या लक्षात यायचं... तीच एकटी बोलतेय. पल्लवीला काही एक माहीती नाही आहे.

आश्रमात पण वेगळी परिस्थिती नव्हती. तीच एकटी शाळेत जायची. वर्तमानपत्रे वाचयाची. कुणाशीतरी संवाद साधावा असं वाटायचं पण तसं कुणीच नव्हतं.


आश्रमात तिच्यासाठी एक अजून काळजीचं कारण होतं. रंजना. दिवसेदिवस ती सरस्वतीला त्रास द्यायला कारणं शोधत होती. तिचा उद्देश साफ़ होता. आश्रमातल्या बाकीच्या मुलीनी तिला याबाबत सांगितलं होतं. मुळात तिला रंजनाची किळस वाटत होती आणि हल्ली तर तिच्याकडे बघणं सुद्धा नको व्हायचं.

एके दिवशी सकाळी लेलेआजीची तब्ब्येत खूपच खालावली आणि त्याना सीव्हील हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. पुढे काय आहे याची सर्वाना कल्पना होती. फ़क्त तो क्षण पुढे जावा हीच प्रार्थना होती. लेलेआजी लवकर बर्‍या व्हाव्ह्यात म्हणून सरस्वती रोज रामरक्षा म्हणायची.

लेलेआजीच्या गैर्हजेरीत आश्रम नुसता बेशिस्त झाला होता. गुरुकाका, आश्रमाचे व्यवस्थापक रोजच्या तक्रारी ऐकून कंटाळले होते. कशचा कशाला हिशोब लागत नव्हता. रंजना आणि तिच्या गॅंगला तर रान मोकळं मिळालं होतं.

रात्री सरस्वती माजघरात बसून अभ्यास करत होती. रंजना तिच्याकडे आली.
"ए हरामखोर..." ती गुरगुरली. सरस्वतीने मान वर करून तिच्याकडे पाहिलं नाही.
"तुझ्याशी बोलतेय मी."
"माझं नाव सरस्वती आहे." तिने मान वर न करता उत्तर दिलं.

"असेल. माझं काम आहे तुझ्याकडे, माझ्या खोलीत चल." सरस्वतीला नक्की कसलं काम आहे ते समजलं. हे ही समजलं की ती एकती नाही.

पण सरस्वती मात्र एकटी होती.
"चल.." रंजना म्हणाली.

सरस्वती उठून उभी राहिली.
रंजना हसली. कुणाला काही समजायच्या आत सरस्वती पुढच्या दरवाज्याकडे पळाली. आणि दरवाजा उघडून अंधारात धावायला लागली.

बाहेर काळामिट्ट अंधार होता. आणि सरस्वती जीवाच्या आकान्ताने धावत होती. पाठी वळून तिने पाहिलं सुधा नाही. धावता धावता तिच्या डोळ्यासमोर तिचा काका तरळून गेला, त्याला ती बळी पडली होती. आता मात्र कुणाच्याही बळीचा बकरा होणं तिला नामंजूर होतं... ती धावतच होती. धावता चावता धाप लागली मह्णून ती थांबली.

"ऑलंपिक मधे इंडीयाला एकतरी मेडल मिळेल." कुणाचातरी आवाज आला.
तिने पाहिलं. अंधारात पण तो उभा असलेला दिसला. त्याच्या हातात टॉर्च होता. रेहान.. मंदपणे हसत. जणू त्याला माहीत होते की सरस्वती आता येणार आहे.


Bsk
Monday, July 02, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आहे..ती पण काल्पनिक..!! इंटरनेट असायला काहीच हरकत नाहीय...

Ardeshmukh
Monday, July 02, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are
jar baap shrimant asala tar
"Ratnagirit" suddha internet
milu shakat ki !!

aani 1999 pasun mi internet vapartoy
te hi eka chotyaashaa Gavat
(since last 8 years)
so why not possible


Ladaki
Monday, July 02, 2007 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी कथा एकदम सुरेख चालली आहे. प्रत्येक क्षणी आता पुढे काय हा एकच प्रश्न समोर येतो

>>>दुसर्‍या दिवशी ती सकाळीच पल्लवीच्या घरी गेली. पल्लवी कदम ही तिची शाळेतली एकमेव मैत्रीण होती. पल्लवी अभ्यासात ढ होती. पण श्रीमंत बापाची मुलगी असल्यामुळे तुच्याकडे सगळी पुस्तके गाईड असायचे.>>>

अभिजात आणि बीएसके कथा जरी काल्पनिक असलि तरि माझ्यामते कथा कुठेही संदर्भ सोडुन नाही लिहिली जात आहे.
८-१० वर्षांपुर्वी रत्नागिरीत इन्टरनेट सामान्य माणसांसाठी सर्रास उपलब्ध नव्हते पण तरिही वर म्हटल्याप्रमाणे उच्चभ्रू लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हायला सुरुवात झाली होती
for their business purpose




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators