Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 05, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... » Archive through June 05, 2007 « Previous Next »

Nandini2911
Tuesday, May 29, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही खुलासे...
सुरुवातीलाच..
ही कादंबरी आहे. त्यामुळे ती मी तुकड्यातून लिहीन. कृपया सहन करावे.
या कथेतील रेहान काल्पनिक आहे. माझ्या कुठल्याही मित्राशी त्याचा संबंध नाही. माझ्या आयुष्यातल्या कुठल्याही घटनेशी या कादंबरीत समावेश नाही.
थोडक्यात ही पूर्णपणे काल्पनिक कादंबरी आहे.
धन्यवाद.



Nandini2911
Tuesday, May 29, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याने पुन्हा एकदा स्क्रीनवरून नजर फ़िरवली. बहुतेक त्याने नीट लिहिलं होतं. तरीही त्याला जे म्हणायचे आहे ते नीट येत नव्हतं. एक दोन वाक्यं त्याने डीलीट केली. तरीपण ठीक वाटत नव्हतं.

"वीर... वीर.." आई दुसरं कोण?

त्याने डोळे घट्ट मिटले. त्याला काय म्हणायचं आहे त्याची परत एक उजळणी केली. तरीही डोक्यातला गोंधळ काही दूर होईना.

शेवेटी त्याने नाद सोडून दिला. आणि send वर क्लिक केलं. आता ती जाणे आणि रेहान जाणे.

आता कुणाशीच त्याचा काही संबंध उरला नव्हता. परत एकदा आईने आवाज दिला.

डोळ्यात आलेला एकच आसू त्याने पुसला. आणि तो रूमच्या बाहेर आला. तेच सवयीचे खोटं हसू ओठावर घेऊन. त्याला खरं हसताना अजून कुणी पाहिलंच नव्हतं. तिच्याशिवाय. आज वीरने तिला पण सोडलं. रेहानमुळे.

रेहान, त्याच्या आयुष्यावर आलेलं ग्रहण. वीरने जिन्यातून खाली येताना तो विचारपण काढून टाकला. निश्चय तर झालाच होता. आता विचार करण्यात काय अर्थ होता?


Sakhi_d
Wednesday, May 30, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी सुरवात तर चांगली झाली आहे.

तुच आधी सांगितल्याप्रमाने तु तुकड्यानमधेच लिहिणार आहेस पण जरा मोठे भाग येवुदेत म्हणजे वाचताना लय लागेय... अर्थात हे मझे मत, आवडले नसल्यास सोडुन देणे... :-)


Nandini2911
Wednesday, May 30, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काय हे? किती चुका? त्या पण एकाच कॉपीमधे. I cant edit it जा परत लिही." सुधीर देशमुख खेकसत होते. सारा मात्र मान खाली घालून शांत उभी होती.
"सॉरी" ती म्हणाली.
सुधीरचा राग जरा शांत झाला. त्यानी परत एकदा साराकडे पाहिलं. अवघी तेवीस वर्षाची. नाजुक बांध्याची. टीपिकल कोकणस्थाचा रंग. काळे डोळे. त्यात घातलेलं काजळ. पिंगट लांब केसाचा सैलसर बंधलेला अंबाडा. आणि तरी चेहयावर आलेल्या बटा. तो रंगीबेरंगी पायघोळ स्कर्ट आणि टॉप. डोळ्याखाली कित्येक जागलेल्या रात्रीची उठलेली वर्तुळं.
"अगं काय झालय? तू सुट्टी का घेत नाहीस?"
तिने नकारार्थी मान हलवली.
"पंधरा दिवसापूर्वी घेतली होती. आता वीदाऊट पे घ्यावी लागेल..."
"ठीक आहे. ही स्टोरी परत लिही. अजून काही आहे तुझ्याकडे?"
तिने परत मान हलवली. आणि ती केबिनच्या बाहेर आली. दैनिक सत्यशक्तीचे ऑफ़िस अजून शांत होतं. दुपारचा एक पण वाजला नव्हता. ती परत तिच्या डेस्कवर आली.

नवीन मेल आलं होतं. वीर कपूरचं. तिने मेल न बघताच डीलीट केलं. वीर त्याच शहरात होता. तिच्यापासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर होता. तरी त्याने तिला मेल पाठवलं होतं.. नाती इतकी बदलतात?

साराने मोबाईलवर वीरचा नंबर फ़िरवला. त्याने फोन उचलला नाही. अर्थात हे अपेक्षितच होतं.. वीर गेले महिनाभर तिला भेटत नव्हता. आणि गेले महिनाभर रेहान मृत्यूशी झुंजत होता. "देवा, लवकर यातनामधून सोडव त्याला." तिने मनातल्या मनात प्रार्थना केली.

समोरची स्टोरी तिने परत वाचली. तिच्या चुका तिच्याच लक्षात आल्यावर मनाशीच एकटी हसली. भराभर तिने एडिटींग केलं. "आता सुधीर सर मला ओरडणार नाहीत." ती स्वत्:शीच बोलली. तिने फ़ाईल स्पेल चेक करून सुधीर सराना पाठवून दिली.

तेवढ्यात तिचा इंटरकॉम वाजला. धवन सर. मॅनेजिंग एडीटर.

"गूड आफ़्टरनून सर"
" come into my cabin "
साराने फोन ठेवला.
"ओह नो.."
ती धवनच्या केबिनमधे गेली. जवळ जवळ दीडशेकिलोचा तो थुलथुलीत देह खुर्चीवर बसला होता.
"येस सर"
"सारा.. आपका ध्यान कहा है?"
सकाळपासून ती तिसर्‍यादा हेच वाक्य ऐकत होती.
"एक बजके गया... और तुम अभी यही पेहो? प्रेस कॉन्फ़रन्स खतम भी हो गयी होगी"
साराने सकाळपासूनचे सगळे अपॉइंटमेंट्स आठवले. दुपारी कुठलीच प्रेस कॉन्फ़रन्स नव्हती.
"सर, किसकी थी प्रेस कॉन्फ़रन्स?" फोन करून प्रेस रीलीज आणि फोटो मागवता येतील. हाय काय नी नाय काय..

"सारा, ये तुम पूछ रही हो. ideally ये तुम्हारा स्कूप होना चाहिये था. वीर कपूर शादी कर रहा है. और तुम्हे कुछ भी नही पता." त्याने टेबलावर हात आपटला.

साराच्या डोळ्यासमोर अंधार पसरला.
"सारा.. सारा."
"येस सर."
" I want an exclusive report. Veer is not an ordinary film star. His fiancee is some south Indian babe. We will publish everything about their romance. तुम्हारा कॉलम सिर्फ़ वीर के बारे मे लिखेगा."
"येस सर" तिचं तोंड सुकलं होतं.
"जितना इन्फ़र्मेशन मिलता है उतना लेलो. तुम्हारे वीरके साथ अच्छे contacts है. युज देम ऑल. और वैसे भी गॉसिप स्टोरीज तुमसे अच्छा कौन लिखेगा. "
"ओके सर. बाय"

ती केबिनच्या बाहेर आली. डेस्कवर आल्यावर मात्र तिने अश्रूना वाट मोकळी करून दिली. देशमुखानी केबिनमधून तिच्याकडे पाहिलं.

त्याच्य समोर नुकत्याच cancel झालेल्या प्रेस कॉन्फ़रन्सचा मेल होता. वीरने आयत्या वेळी स्वत्:च्या लग्नाची announcement रद्द केली होती.


Dhoomshaan
Wednesday, May 30, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, शब्दांची गरज नाही, छान लिहते आहेस!

Meenu
Wednesday, May 30, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त नंदिनी .. किती सहज लिहीते आहेस तु ..

Nandini2911
Wednesday, May 30, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रसिकाला घरी यायला जवळ जवळ दुपारचे दोन वाजले. काल रात्री चालू झालेलं शूटिंग आता संपलं होतं. रात्रभरच्या जागरणाने पार थकून गेली होती. कित्येकदा वाटायचं नको ही दररोजची परवड. वर्षातून एखादं नाटक करावं आणि शांत रहावं. पण मग पैसा... त्याचं काय?

रसिका छोट्या पडद्यावर चांगलीच स्थिरावली होती. पंचवीस वर्षापूर्वी हिंदी चित्रपटात नशीब आजमावायला ती आली होती. पण नशीबाने सगळी दानं तिच्यासाठी उलटी फ़ेकली होती. नव्हे.. फ़ेकत होतं.

तिने फ़्लॅतचा दरवाजा उघडला. घर शांत होतं. म्हणजे वीर घरात नव्हता. आज वीरच्या लग्नाची announcement होती. पण कालच रात्री त्याने ती cancel केली होती. आता कुठे गेला असेल तो?

रसिका तिच्या रूममधे गेली. शॉवर घेऊन झोप एवढाच तिचा कार्‍यक्रम होता. तेवढ्यात वीरचा मोबाईल वाजला. त्याची कर्कश रिंगटोन अख्ख्या घरात ऐकू यायला लागली. म्हणजे वीर घरात होता.

रसिकाने वीरच्या रूमचा दरवाजा हलकेच उघाडला. वीर खिडकीजवळ खुर्ची टाकून बसला होता. शून्यात नजर लावुन. जवळच बेडवर त्याचा मोबाईल वाजत होता. पण त्याचं लक्ष नव्हतं.

रसिका हळूच आत आली. मोबाईल किंचाळायचा शांत झाला. अख्ख्या घरभर एक जीवघेणी शांतता पसरून राहिली.

रसिकाने वीरच्या केसातून हलकेच हात फ़िरवला. त्याने मागे वळून पाहिलं..
"आई, तू केव्हा आली?" त्याचा आवाज खुप दमल्यासारखा वाटत होता.

"कुठे तंद्रीत हरवला आहेस? मोबाईलवर वीसपेक्षा जास्त मिस कॉल आहेत. मला मीडीयाने हैराण केलं.. की announcement का रद्द झाली.. वीर काय चालवलं आहे तू? ती सेजल वेड्यासारखी वाट बघतेय तुझी.."
"आई, प्लीज. मला तो विषय नको आता. खुप विचार करओय मी. आता नाही झेपत हे सगळं. मला थोडा वेळ एकटं राहू दे."

"साराला फोन केला होतास?"
रसिकाने त्याला विचारलं.
"नाही. तिचा रेहान आजारी आहे. ती त्याच्या सेवेमधे गुंतली आहे. माझ्याशी बोलायला वेळ नाही तिला. महिना झाला.. " तो अगदी शांतपणे म्हणाला.
"वीर..." रसिका चमकली.
"आई.. प्लीज.. तू जा. मला जेवायला बोलावु नको. मी मघाशी जेवलो,"

रसिकाचा नाईलाज झाला. तिने रूमचा दरवाजा ओढून घेतला. सहज हॉलमधे ठेवेलेल्या वीरच्या आणि साराच्या फोटोकडे तिचं लक्ष गेलं. बरोबर तीन वर्षापूर्वी.. आजच्याच या तारखेला काढलेला फोटो होता.

वीर आणि साराच्या साखरपुड्याचा.


Gobu
Wednesday, May 30, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,
छान लिहीलेस
ही ३ पात्रे एकमेकात कशी गुन्फ़तेस ते महत्वाच!


Kmayuresh2002
Thursday, May 31, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,गुड स्टार्ट.. चालु देत..

Mankya
Thursday, May 31, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी .. सहजता सहज साध्य झालीये तूला ! Great going !

माणिक !


Nandini2911
Thursday, May 31, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दोघीजणी नुकतंच लेक्चर संपवून घरी निघाल्या होत्या. त्यातल्या एकीला काय आठवलं कुणास ठाऊक.. तिने दुपारचा पेपर विकत घेतला. मोठ्या उत्सुल्कतेनी ती चाळायला लागली.

"काय बघतेस?" दुसरीने विचारलं.
"अगं, आज वीर कपूर लग्न करणार होता. त्याची बातमी आहे का बघतेय."
"ए चल, आज लग्नाची announcement होती. कुणाबरोअर करणार गं तो लग्न?"

पहिलीने खांदे उडवले.
"काय माहीत? एवढ्या ढीगभर मुलीबरोबर फ़िरतो. पण मला वाटतं ती जाडी साऊथची हीरॉईन आहे ना तिच्याबरोबर."
"ई... काय घाण आहे ती, त्यापेक्षा ती मॉडेल छान आहे."

"ए हे वाच.. वीरने लग्नाची announcement रद्द केली.."
"म्हणजे तो लग्न नाही करणार.."
"ए असं नको ना म्हणू, तो करेल गं लग्न.. चांगला आहे तो. माझा फ़ेवरेट हीरो आहे. देवा. त्याला चांगली मुलगी मिळूदे."
"अगं... पण असं अचानक का cancel केलं. या लोकांचं ना काही कळतच नाही."
"पण वीर तसा नाहीये गं. त्याच्या नवीन पिक्चरचा प्रोमो पाहिलास. काय दिसतो त्या रेड शर्टमधे."

"ए नाही हा.. मला तो इतका नाही आवडत. पण तो नाचतो मात्र जबरदस्त.."

त्या दोघी घरी जाईपर्यन्त हाच विषय बोलत होत्या.

किंबहुना अख्ख्या मुंबईचा आवडता विषय सध्या वीर कपूरचं लग्न हाच होता.

प्रत्येक मीडियावाला याच स्कूपच्या मागे होता. कोण होती वीरेची गर्लफ़्रंड आणि का लग्न रद्द झालं. उत्तरं कुणालाच मिळत नव्हती.

दुपारी साडेचारला ऑफ़िस गजबज्याला लागलं. सारा मात्र डेस्कवर डोकं ठेवून बसली होती. प्रियाने तिला आल्या आल्या हाक मारली.
"सारु, चल चहा घेऊ या.."

साराचे डोळे रडून रडून सुजले होते.
"काय झालं? रेहान बरा आहे ना?" प्रियाने विचारलं.
"नाही. तो अजूनही सीरीयस आहे गं. मला ना काय करायचं तेच सुचत नाही आहे."

"वीर काय म्हणतोय?"

ती खुर्चीत बसत म्हणाली.
"प्रिया, तुला माहित आहे ना मी त्याच्याशी बोलत नाही ते. तोही माझा फोन उचलत नाही."

प्रियाने तिचा पीसी चालू केला.
"काय स्टोरी आहे तुझ्याकडे आज?"
"काही नाही. एकच छोटीशी प्रेस रीलीज होती. तेवढीच, तुझ्याकडे?"

"काही खास नाही. ब्लास्ट केस चालू आहे तितकंच."

प्रियाने धडाधड टाईप करायला सुरुवात केली.

सारा मात्र विमनस्कपणे बसून राहिली.
"सारा, रेहान कुठल्या हॉस्पिटलमधे आहे गं?"

"अं.. रेहान.. तो जुहूला आहे." सारा सवकाश म्हणाली.
"सारा, मला एकदा भेटायचय तुझ्या रेहानला. खूप ऐकलय त्याच्याबद्दल. केव्हा भेटवशील?"

साराच्या चेहर्‍यावर एक फ़िकट स्मित आलं.

"प्रिया, रेहान बरा होऊन घरी येऊ दे. त्याला ऑफ़िसमधेच घेऊन येईन. पण तो बर होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना कर.
"प्रियाने साराकडे हसून पाहिलं.
"माझा देवावर विश्वास नाही. पण dont worry रेहान लवकर बरा होईल. इतकं करतेस तू त्याच्यासाठी.. नक्की घरी येईल तो." प्रिया तिच्या नेहमीच्या आतविश्वासाने म्हणाली.


Rayhaan
Thursday, May 31, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

What??? पहलेही पोस्ट मे वाट लगाई है. एक बार पढ के देखले. Stupid.

Runi
Friday, June 01, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, पुढचा भाग कधी? वाट बघतेय मी केव्हाची.

Sneha21
Friday, June 01, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, पुढचा भाग कधी? वाट बघतेय मी.............too

Sati
Friday, June 01, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी छान कथा आहे. प्रिया, रेहान तुझी आवडीची पात्रे दिसतात.
तुझ्या गोष्टी नेहमीच वेगळ्या विषयांवरच्या असतात म्हणून आवडतात.
साती


Nandini2911
Monday, June 04, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया पटापट टाईप करत होती. रोजच्या बातम्यामधे तिला इंटरेस्ट जास्त नव्हता. एखादा जबरदस्त स्कूप तिला हवा होता. आणि तो स्कूप तिच्या बाजुला बसला होता.

सारा ऑफ़िसमधे सगळ्याची लाडकी होती. तिचा लाघवी स्वभाव, मिळून मिसळून वागणं यामुळे प्रियाच्या बातमीवर कुणीही विश्वास ठेवला नसता. त्यातच साराचं रेहान प्रकरण सर्वाना ठाऊक होतं. सारा आणि रेहान लहानपणचे मित्र होते. एकाच शाळेत शिकलेले. लवकरच ते लग्न पण करणार होते. पण तेवढ्यात रेहान आजारी पडला. सारा त्याच्यासाठी अक्षरश्: जीव टाकत होती. कित्येक ठिकाणी नवस बोलली होती. पण परिणाम शून्य.

प्रिया जेव्हा तीन महिन्यापूर्वी जॉइन झाली तेव्हा हीच सगळी माहिती तिला समजली होती. पण कुठेतरी काहीतरी गडबड असल्याचं प्रियाच्या चलाख मनाला केव्हाच समजलं होतं. सारा व्ही. के. ही मुलगी वाटते तितकी सरळ नाही हे लक्षात आल्याबरोबर तिने हळू हळू तिच्याबद्दलची सगळी माहिती गोळा करायला सुरुवात केली. सहजच. कधी तरी गरज पडली तर म्हणून.


कुठल्यातरी लहान गावामधे शिकलेली सारा कोकणस्थ होती. वयाच्या एकविसाव्या वर्षी मुंबईत आली. तिचा पहिला आणि सगळ्यात मोठा स्कूप होता. वीर कपूरची मुलाखत. प्रसिद्धीपेक्षा चार हात लांब असणार्‍या रसिकाचा हा मुलगा. चॉकलेट हीरो म्हणून अजूनही झाडाच्या भोवती धावणार्‍या रोहित कपूरचा मुलगा. रोहित आणि रसिकाचं प्रकरण पंचवीस वर्षापूर्वी गाजलं होतं. रोहित लग्न झालेला होता तरीही रसिकाबरोबर त्याचं "लफ़डं" होतं. त्यातच झालेला वीर.


सारा आणि वीर दोघंही खूप चांगले मित्र असल्याचं सर्वानाच ठाउक होतं. कित्येकदा वीरच्या नवीन प्रकरणांची चर्चा साराच्या गॉसिप कॉलममधून व्हायची.

पण "दाल मे कुछ काला" जरूर होतं. साराच्या बिल्डिंगच्या जवळच प्रियाचं घर होतं. साराच्या फ़्लॅटवर प्रियाने कित्येकदा वीरला रात्री अपरात्री येताना पाहिलं होतं. इतक्या पॉश बिल्डिंगमधे घर घेणं कसं शक्य झालं होतं. ह प्रियाला पडलेला प्रश्न तेव्हा सूटला होता. तरीही नविन प्रश्न पैदा झालेच होते. वीरच्या लग्नाची announcement आणि साराचं रेहानप्रकरण... कुठेतरी गडबड होत होती.

असंच एके दिवशी विचार करता करता प्रियाच्या मनानं उडी मारली.
"वीर आणि रेहान" दोघंही एकच असतील तर...

वीरला स्वत्:चं करीअर मार्गी लागेपर्यन्त दोघंही खोटं बोलत असतील तर...

वीर आणि सारा लग्न करणार असतील तर..

प्रियाला माहित होतं की हा खूपच wild guess आहे पण तरीही जर हे खरं असेल तर..

त्या दिवसापासून प्रियाने सारावर नीट लक्ष ठेवायला सुरुवात केली. तिच्या assignments , येण्याजाण्याच्या वेळा आणि तिच्याशी बोलताना प्रिया बारीक नजर ठेवून असायची. साराला कल्पना पण नव्हती की प्रिया तिचं प्रत्येक वाक्य लक्षात ठेवतेय आणि घरी गेल्यावर डायरीत लिहितेय.

एकदा असंच साराचं लक्ष नसताना प्रियाने तिचा मोबाईल चेक केला होता. लिस्टमधे कुठेही रेहानचं नाव नव्हतं.



Mankya
Monday, June 04, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी .. जबरदस्त वळण दिलेस कथेला !

माणिक !


Rajya
Monday, June 04, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा नंदिनी,
हम तो फिदा हो गये!!


Nandini2911
Monday, June 04, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस संपला. आजचा दिवस कसा बसा ओढुन नेला. हा विचार करतच सारा घरी आली. फ़्लॅटची चावी उघडून आत आली. वन बी एचकेचा हा छोटासा फ़्लॅट, तिने आणि वीरने सजवला होता. पण बहुतेक लवकरच हा फ़्लेट पण तिला सोडावा लागला असता. रेहानमुळे दुर्दैवाचे चालू झालेले फेरे कुठे संपले असते कुणास ठाऊक. साराला भूक तशीही विशेष नव्हतीच. एक ग्लास भरून फ़्रीजमधून ऑरेंज ज्युस काढला आणि टीव्हीसमोर बसली. रोजच्या त्याच बातम्या ऐकून ती वैतागली होती. कुठलाही चांगला पिक्चर चालू नव्हता. म्युझिक चेनल्सवर वीरच्या नवीन पिक्चरचे प्रोमो चालू होते. ते बघणं तिच्या अगदी जीवावर आलं.. कुठलंसं धार्मिक चेनल लावून ती बघत बसली. काहीतरी भजन वगैरे सुरू होतं, तेवढीच मनाला शांती.

तिथेच सोफ़्यावर बसल्या बसल्या तिचा केव्हा डोळा लागला तिला समजलं सुद्धा नाही. रात्री केव्हातरी दरवाजा उघडला. आणि वीर आत आला.

सारा शांतपणे झोपली होती. वीरचा सगळा राग अचानक गायब झाला. हलक्या हाताने त्याने तिला उचलून बेडरूमधे नेलं... बेडवर ठेवलं. आणि तो तिथेच बसून राहिला.

खरं तर त्याला आज साराबरोबर भांडायचं होतं. खूप प्रश्न विचारायचे होते. पण ती समोर आल्यावर तो हे सगळं विसरला होता.

तो आईला सारखं विचारायचा.. एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नाही हे माहित असूनही आपण कसं त्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतो? सध्या तो त्याच स्थितीत होता. अख्ख्या आयुष्याचं त्रांगडं होऊन बसलं होतं.

वीर उठून साराच्या डेस्कजवळ गेला. तिची डायरी अजून तिथेच पडली होती. आजच्या दिवसात काहीही लिहीलेलं नव्हतं. फ़क्त "रेहानला लवकर बरं कर.." एवढंच प्रत्येक पानावर.. पानभरून.

वीरला साराची "खरी डायरी" आठवली. कपाटात ठेवलेली. ती डायरी वाचूनच तो साराच्या प्रेमात पडला होता. त्याने कपाटातून ती जुनी पुराणी डायरी काढली.

रात्रभर तो वाचत बसला होता. शब्द न शब्द त्याला पाठ होता.. तरीही तो वाचत बसला होता.

सारा त्या डायरीत कुठेही नव्हती. होती ती सरस्वती.. आठ दहा वर्षाची... कोकणातल्या कुठल्यातरी एका खेड्यात.. उन्हातून अनवाणी धावत आणि ठेचकाळत.


Nandini2911
Tuesday, June 05, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"सरस्वती.. सरस्वती.." जयाकाकूचा आवाज अर्ध्या गावाला ऐकू गेला असेल. पण सरस्वती मात्र एकमेकाच्या पाठून धावणार्‍या कोंबड्या बघण्यात दंग होती.
"कार्टे, अर्ध्या तासापूर्वी तुला गोडेतेल आणायला पाठवलं. तरी तू अजून इथेच.. आता तुला आणि तुझ्या बापाला काय घालू गिळायला." जयाकाकूने सरस्वतीच्या पाठीत दोन धपाटे घातले. आधी तिला रडून यायचं पण आता सवय झाली होती.
"जा घरात बैस. मीच जाऊन येते दुकानात. नाहीतर तू परत कुठेतरी उंडगत बसायचीस," सरस्वती निमूटपणे पडवीत जाउन बसली आणि बालभारतीचे पुस्तक घेऊन वाचत बसली.

नुकतीच सहामाहीची परीक्षा संपली होती. सगळ्याना दिवाळीचे वेध लागले होते. पण सरस्वतीला शाळा केव्हा सुरू होतेय असं झालं होतं. घरी तिला खूप कंटाळा यायचा. काकू सारखी बडबडत बसायची. त्यातच बाबा कुठेतरी पडायचे. सरस्वतीला आशचर्य वाटायचं की ते सारखे कसे काय पडतात. पण एके दिवशी तिच्या वर्गातल्या एका मुलीने सांगितलं की तिचे बाबा "हातभटी" पितात म्हणुन असे पडतात.

बाबाना त्या अवस्थेत चालता यायचं नाही. ते काय बोलायचे कुणाला कळायचं नाही. कित्येकदा रस्त्याच्या कडेने उन्हात पडलेले तिने पाहिले होते. तरी बाबा हे हातभटी का पितात ते तिला अजून समजलं नव्हतं.. आणि तिने बाबाना कधी विचारलं नाही.

तिच्या घरात एक नियम होता. तिचे बाबा तिच्याशी कधीच बोलायचे नाहीत. किंबहुना ती समोर आलेली पण तिला आवडायचं नाही. असंच एकदा ती बाबाना काहीतरी विचारायला गेली.. लहान होती. पाच सहा वर्षाची. बाबानी तिला चप्पल घेऊन मारलं होतं. त्या दिवसापासून ती बाबाच्या जवळ सुद्धा उभी रहायची नाही.

ती, तिचे बाबा आणि विश्वनाथकाका एकत्र रहायचे. जयाकाकूला दोन मुलगे होते. सागर आणि समीर. तिच्यापेक्षा पाचेक वर्षानी लहान. सरस्वतीची काका मात्र तिचे फ़ार लाड करायचे. कायम तिच्यासाठी खेळणी नाहीतर फ़्रॉक आणायचे. काकानी तिच्यासाठी काही आणलं की काकूचा संताप अनावर व्हायचा.

हातात पुस्तक घेऊन ती नुसती बसली होती. सगळे धडे तिला तोंडपाठ होते. इतकंच काय पण शाळेच्या वाचनालयातील सगळी पुस्तकं तिने वाचून काढली होती. दहा एक मिनिटानी काकू परत आली आणि परत तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. काकूच्या बोलण्याकडे पूर्णपणॅ दुर्लक्ष करण्याचं तंत्र तिने व्यवस्थित आत्मसात केलं होतं. त्यामुळे सरस्वतीने आपला मोर्चा परत अंगणातल्या कोंबड्याकडे वळवला.

कोंबडेची पिल्लं आईबरोबर खेळत होती. सरस्वतीला हे बघताना खूप माजा यायची. हलकंच केव्हातरी आठवायचं. खाडीपलीकडल्या मुसलमान मोहल्ल्यातली ती बाई. तिला आणि तिच्या बाबाला सोडून दुसरं लग्न केलेली. तिची आई.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators