Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वारियाने कुंतल हाले ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » ललित » वारियाने कुंतल हाले « Previous Next »

Supermom
Thursday, April 05, 2007 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा काही खरेदीसाठी दुकानात गेले होते. नेहेमीप्रमाणे प्रचंड घाईतच होते. खरेदी आटोपून जायला वळणार, तोच एका मुलीने लक्ष वेधून घेतले. होती भारतीयच. अगदी चारचौघांसारख्या दिसणार्‍या त्या मुलीची पाठ वळली, अन तोंडातून आपसूकच 'अहा' निघालं.

कंबरेच्याही खाली रुळणारा तिचा विपुल केशसंभार बघितला, अन मन अनेक आठवणींच्या समुद्रात जणू हेलकावे घेऊ लागलं. लांबसडक केसांचं हे ऐश्वर्य आता फ़ारसं दृष्टीसही पडत नाही हे खरं, पण जेव्हा पडतं, तेव्हा पार वेडावून टाकतं.

अन फ़क्त लांब केसच सुरेख दिसतात असं मुळीच नाही बरं का. कुरळे, सरळ, दाट, पातळ, काळेभोर, पिंगट... किती म्हणून तर्‍हा या केसांच्या. लहानपणी दर रविवारी आई किंवा आजी न्हायला घालीत असे.तेव्हा तो वातावरणात दरवळणारा शिकेकाई अन कपूरकाचरीचा वास अगदी धुंद करून सोडीत असे. अन थंडीचे दिवस असले की धुपाच्या शेगडीवर केस उदवूनही देण्यात येत. किती सुरेख, मंद वास यायचा तेव्हा केसांना. नंतर दोन वेण्या घट्ट वळून दिल्या जात. ते मात्र मुळीच आवडत नसे.
आई अन आजीच्या हातात जोवर केस असतात, तोवर कसे दृष्ट लागण्यासारखे राहतात. त्यांची निगाही छान ठेवली जाते. मग एकदा का स्वतः च्या हातात आले, की शांपूच्या मार्‍यात त्या सार्‍या केशसंभाराला ओहोटी लागते.

केस लहान असो की मोठे, प्रत्येकाचं एक निराळंच सौंदर्य असतं. गाडीवरून सुसाट जाणार्‍या युवतीच्या बॉबकटचा फ़ुललेला पिसारा, देवळात जायला निघालेल्या काकूंचा भरदार अंबाडा अन मोगर्‍याच्या गजर्‍याने खुलणारा एखाद्या नववधूचा शेपटा. केसांची सारीच रूपं कशी सुखावून टाकणारी.


अपूर्ण


Savyasachi
Friday, April 06, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, मस्त लिहील आहेस.

Pendhya
Saturday, April 07, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, केश संवर्धन! एक छान निरिक्षण.

मी एका मित्राच्या घरी गेलो असतांना, त्याच्या घरा शेजारी एक तरुण तेलगु जोडपं त्यावेळी शिफ़्ट होत होतं. त्या तरुणाची बायको, हातात " वीणा " , हे वाद्य, घेऊन ऊभी होती. मी तिला विचारल्यावर ती म्हणाली की ती, वीणा वाजवते.तिचे केस पण असेच लांबलचक होते, तिच्या कंबरेच्याही खाली.

आजकालच्या जगात, बायकांनी लहान केस ठेवणं, आपण समजू शकतो; त्याला कारणं बरीच असतात. आणी ती योग्य ही आहेत. असो! मुद्दा तो नाही.

मला नेहमी वाटतं की मुलींनी / बायकांनी लांबलचक केस ठेवावे. अगदी कंबरे पर्यंत. त्यांना छान दिसतात. म्हणून मी त्या माणसाला म्हणालो की, " You must consider yourself, very lucky. " तो माझ्या या अनपेक्षित comment मुळे जरा दचकुनच म्हणाला, " Why? " . मी म्हंटलं, " Well! you have a wife, who has long, beautiful hair and who also plays a very traditional instrument. Both of them, a rarity in today's world. What else do you need? " .

ह्यावर, ते जोडपं खळखळून हसलं.



Jayavi
Saturday, April 07, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेंढ्या....... कोणी नजरेत भरलीये का रे... :-)
सुमॉ.... अगदी खरंय तुझं. माझ्या आईची वाक्यच लिहिलीस तू. माझे सुद्धा केस जोपर्यंत आईच्या ताब्यात होते.....तोपर्यंत असेच छान....आणि कमरेपर्यंत होते. माझ्या ताब्यात मी २-३ वर्ष कसेबसे सांभाळले आणि टाकले छाटून. आई इतकी चिडली होती ना....म्हणाली," मी वाढवलेले केस तुला कापायचा काहीच अधिकार नव्हता." दर रविवारी शिकेकाई उकळून आईच केस धुवून द्यायची. अगदी लग्न होईस्तोवर आईच्या हातानेच वेणी घालून घ्यायचे मी. सुमॉ ...... आईची खूप आठवण आली गं....!!

Abhiyadav
Monday, April 09, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी कधी चिमणीचे कोटे(घरटे) असल्यासारखे बॉबकट असतात

Disha013
Monday, April 09, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ,समस्त स्रीवर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय!
आई,आज्जीच्या हाती केस कसे छान निरोगी असतात.भरपुर compliments मिळायचे केसांसाठी. गेले ते दिवस.

:-(
माझी एक नॉन मराठी मैत्रीण होती. छोटे केस असले की स्मार्ट दिसतं आणि वयही कमी वाटते म्हणुन कमरे एवढे केस छाटलेले तिने पार्लर मधे माझ्यासमोर तिच्यापेक्षा मलाच वाईट वाटले होते,ते बघुन.

अभियादव,असे केस वा-याने कसे उडणार?:-)


Sunidhee
Monday, April 09, 2007 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा.. हो ग.. बायकांच्या जिव्हाळ्याचाच विषय मांडलाय सूपरमॉम नी... माझ्या पण चांगल्या केसांच नामोनिशाण नाही राहिले आता.. आणि ही सुरुवात तेव्हा झाली जेव्हा बारावीत असताना पहिल्यान्दा मैत्रिणीबरोबर पार्लर मधे केस कापयला गेले होते.. त्या केस कापणार्‍या बाइंनी मला चक्क १५ मिनिटे दिली होती पुन्हा विचार करायला कि केस कापु कि नको म्हणुन.. मी १५ मिनिटे बसुन विचार करुन सांगितले 'कापा' आणि र्‍हासाला सुरुवात झाली.. :-(
बघ सुपरमॉम तु अजुन पुर्ण पण केले नाहियेस आणि आम्हाला राहवलेच नाही.


Chinnu
Tuesday, April 10, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, मलापण लांब केस आवडतात. आजीचे शेवटपर्यंत काळेशार होते केस. अंबाडा खुप मोठ्ठा पडायचा तिचा. केसांची गोष्ट येताच तिची आधी आठवण येते.

Supermom
Tuesday, April 10, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेत असताना एकदा मोठ्या बहिणीने मला एक छान केशरचना करून पाठवले होते. केस दुमडून बांधले होते त्यात. आपल्याच थाटात, मी होमवर्कची वही द्यायला इंग्लिशच्या बाईंच्या खोलीत शिरले. दोन मिनिटे त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिले,रोखून पाहिले. मी अस्वस्थ. कारण त्या फ़ार कडक होत्या...

'मूर्ख कुठली....'
एकदम त्या कडाडल्याच.
मी चकितच झाले. होमवर्क तर अजून बघितलेच नव्हते त्यांनी. मग माझ्या अकलेवर आधीच का शिक्कामोर्तब झाले हे मला कळेचना.

'इतके सुरेख केस कापतात का कधी?'

'कापले नाहीत. दुमडलेत म्हणून छोटे वाटताहेत...' मी चाचरतच उत्तर दिले.
'हं, मग ठीक आहे.'

सुटकेचा निश्वास सोडून मी कशीबशी बाहेर पडले.

अर्थातच हे सुरेख केस आता बाळंतपणानंतर भूतकाळच झालाय. पण केसांचा लांबसडक पिसारा सुटसुटीत बॉबकटमधे बदलला असला, तरी आवड मात्र तशीच आहे.

अन हा फ़क्त बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे असे नव्हे. लग्नाच्या वेळीही कित्येक जाहिरातींमधे 'मुलीचे केस लांब असावेत' अशी अट दिसतेच की. अगदी अजूनही.



Arch
Tuesday, April 10, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांनाही आवडतात की लांब केस. हल्ली तर कित्येकदा पाठीमागून मुलगा की मुलगी ओळखताच येत नाही. का उलट व्हायला लागल आहे मुली केस कापतात आणि मुलं वाढवतात. ह्यालाच केसाचा balance राखला म्हणायच का?

पाठिवर कंबरेपर्यंत केस मोकळ्या सोडलेल्या बायका माझ्या स्वयंपाक घरात शिरलेल्या मला अजिबात आवडत नाही.

Office मध्ये contractor south indian मुली तेल लावलेल्या गच्च वेण्या घालून jeans घालून येतात तेपण मजेशीर वाटत. जसे केस तसा वेष हवा का?

असो SM केसावरून बर्‍याच गोष्टी आठवल्या. हव तर उडवून टाकायला सांग


Rachana_barve
Tuesday, April 10, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो माझ्या कलीगचे केस अगदी खांद्याखाली रुळतात. आणि त्याचे स्वत : च्या केसांवर इतके प्रेम आहे की मुली पण इतकी काळजी घेत नसतील. दर शुक्रवारी तो केस धुवून येतो आणि मग मोकळे सोडून ऑफ़ीसमध्ये येतो. एका हाताने सतत जुल्फ़ सावरण चालू असत त्याच. बरेचदा मागून एखादी मुलगीच वाटतो. पण आता सवय झाली आहे. पण त्याचे केस खरच सुरेख, काळेभोर घनदाट आहेत :-O

Disha013
Tuesday, April 10, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय म्हणा,लांब केस आता काही फ़क्त स्रियांचीच मक्तेदारी राहिली नाहीये.त्यामुळे सुमॉ, मुलांना मुलींचे लांब केस आवडतात की त्यांचे स्वत्:चे याबाबतीत माझे confusion व्हायला लागलेय...

तुझा लेख छान आहे.लिही पट्पट. मधेच घुसखोरीबद्दल सोरी.


हेहेहे रचना,
मग बाकीचे चार दिवस तो तेल लावुन घट्ट वेणी घालतो का गं?


Chinnu
Tuesday, April 10, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) आर्च, मलाही माझ्या किचन मध्ये पाठीवरचे रुळणारे, आणि eventually गळून पडाणारे केस आवडत नाहीत. केस मोकळे सोडून मीही किचन मध्ये जात नाही. केस तसा वेष हवा हेही बरोबर. इकडे आपले सलवार सुट आणि साडी formal मध्ये यायला हवे!

Sanghamitra
Wednesday, April 11, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ सही लिहीलेय.
काही गोष्टी अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या असतात.
कुठल्याही बाईच्या केसांचे कौतुक करा की लग्गेच
"अहो तरी माझे गेले." हे येणारच.
इति पुलं





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators