|
गंगा यमुना पाणीच तेही जाळून पापे कुणास दाही खांद्यांवरती निघाली दींड घाटावरती अस्पृश्य पींड पारावरती वैद्य जातीचे शय्येवरती प्रेत सतीचे असे सदैव उघडे दार आल्या गेल्याशी सलगी फार
|
मयुर, रिकामेपण छान आहे!
|
Mankya
| |
| Friday, March 23, 2007 - 11:17 am: |
| 
|
मीनू .... वाचूनच सुन्न झालो ... खूप आवडली सुन्न ! जाणीवांची वेस .. मस्त वाटलं ! मयुरा .. रिकामेपण छानच रे ! देवा ... आरपार करून टाकलस अगदी ... वरवर शांतता आणि आत मात्र कमालीची धांदल, एक अव्यक्त पोकळी निर्माण केलीस ! अस्पृश्य पिंड .. खूप काहि सांगून गेलायेस ! माणिक !
|
वा देवा.. असे सदैव उघडे दार आल्या गेल्याशी सलगी फार जबरदस्त!! मीनू 'सुन्न' छान आहे. गणेश 'अनामिक' मस्त जमलीये.
|
Rujutak
| |
| Friday, March 23, 2007 - 2:08 pm: |
| 
|
कसा दूर झालास तु काय घडला गुन्हा पुसावं म्हटल तरी आठ्वण पुन्हा पुन्हा झाला हिशेबही जुना पुसल्या पाउलखुणा खेदही नाही ज्याचा असा राग बापुडवाणा! काय झाले तुला हे पण कसा निसटुन गेलास तु मला ना सापडलास कधी कुठे हरवुन आलास तु असा कसा परका तुही कसे काहीच आठवत नाही एकच फुल वेलीवरती तेही तुला विसरत नाही!!! ऋजुता
|
Mankya
| |
| Friday, March 23, 2007 - 2:12 pm: |
| 
|
एकच फुल वेलीवरती तेही तुला विसरत नाही!!! .. आवडलं ! माणिक !
|
Gargi
| |
| Saturday, March 24, 2007 - 9:59 am: |
| 
|
ऋजुता, मयुर, देव....कविता आवडल्या.. मीनू....'सुन्न' छान
|
Gargi
| |
| Saturday, March 24, 2007 - 10:11 am: |
| 
|
कुंपण हळुच हाक सागराची गाज वाटा पुन्हा करतायत् खुणा आकाशाचेही आज आवतन खास पण?...... अवेळी अंगण घालतय कुंपण
|
हल्ली... हल्ली... दु:खं सुद्धा हलकी... हलकी... वाटत आहेत... तुझं हसणं... पाहील्या पासून! हल्ली... राग सुद्धा वितळून जातोय दिवसेंदिवस.. तुझं रुसणं... हसल्या पासून! हल्ली... मनातली वादळं सुद्धा... गीतं गुणगुणत असतात... तुझं गाणं... अनुभवल्या पासून! हल्ली... स्वत्:लाही सावरतोय.. काट्यांतून,उन्हांतून... तुझं बहरणं... खुलल्या पासून! हल्ली... शब्दांवरही प्रित जडतेय... नक्षत्रांची सफर घडतेय.. तुझं ध्यान... लागल्या पासून! गणेश(समीप)
|
Jagu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 10:17 am: |
| 
|
जवळ माझ्या निजून पण तू मझ्या स्वप्नात आलास आणि मनातल्या इच्छा तू व्यक्त करुन गेलास म्हणालास आज आपल्यासाठी जगू जबाबदार्या झटकून टाकू त्यांनाच उराशी बाळगले आपले जीवन नाही जगले तुझ्या माझ्या भावनांची आज विचारपूस करु आजवर त्यांना दाबले होते आज त्यांना मोकळे करु आज एकमेकांसाठी भेटी देऊ आजवर बाजारहाट किराणा भरले मान पान सावरले आज आपल्यासाठी खर्चू आज आपण निसर्गात हिंडू डोंगर, नदी, समुद्र, तलाव पाहु आजच्या दिवस नको राणी तू हातावर चटके झेलू चल सखे आज आपण प्रेम काय असत ते पाहू आपल्याच विश्वात आज आपण हरवून जाऊ धुंद स्वप्नामध्ये रात्र लागली हळू हळू मावळू हे स्वप्न तुझ्या की माझ्या मनीचे हा विचार कसा आवरू? जगु!
|
वा गणेश! दिवसेंदिवस बहरत चाललायस मस्त!! साधं सोपं सरळ आवडलं. गार्गी कुंपण छान आहे.
|
Sumedhap
| |
| Thursday, March 29, 2007 - 8:55 am: |
| 
|
गणेश, खुप सुंदर आहे कविता....खरंच, किती छान भावना आहे.... जगु....तुमची कविताही सुरेख आहे...
|
Desh_ks
| |
| Thursday, March 29, 2007 - 9:20 am: |
| 
|
वळण हिशोब झाले सुखदु:खांचे आणि वाटले "कळले ना"! तरी वेगळ्या वळणावरती पाउल नकळत वळले ना? खुणावणार्या क्षितिजाआडुन निरोप आले गंधपिसे लगबग त्यांना भेटू जाता पुसून गेले जुने ठसे कालची फुले विखरुन पडली, नव्या वसंता कळले ना, पुन्हा वेगळ्या वळणावरती पाउल नकळत वळले ना? सागरतीरी मऊशार ओल्या शीतल रेतीवरती सहज पाउले टाकत फिरलो संध्याकाळी तसे किती खुणांसारखे आनंदी क्षण मग लाटांनी गिळले ना, तरी वेगळ्या वळणावरती पाउल नकळत वळले ना? मावळतीला सायंकाळी सुवर्णरंगी सडा पडे त्या रंगाची भूल पडेतो घन काळोखी रात्र चढे फिकट चांदणीसह एकाकी अबोल मन कळवळले ना? आणि वेगळ्या वळणावरती पाउल नकळत वळले ना? जे फुलले ते सुकून गेले, रोज पाहिले कितीकदा बहराच्या पाठीस लागुनी विनाश आहे उभा सदा तरी उद्याच्या आशेवरती मन वेडे हे खिळले ना? पुन्हा वेगळ्या वळणावरती पाउल नकळत वळले ना? -सतीश
|
Princess
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:25 am: |
| 
|
सतीश, अप्रतिम आहे... सगळे काही सुंदर... शब्द, भावना, मांडणी सगळेच आवडले.
|
Chinnu
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:53 pm: |
| 
|
गणेश छान! 'तुझं ध्यान' पेक्षा रुसणं, बहरणंशी जवळीक साधणारा एखादा शब्द योजुन पहा, म्हणजे लय बिघडणार नाही शेवटी. गार्गी कुंपण आवडली. सतीश, खुप दिवसांनी दीर्घ पण सुंदर कविता वाचली ती तुमची. कालचे फ़ुले विखरुन पडली, नव्या वसंता कळले ना! वाह, मस्त. खुणावणारे क्षितीज, सुवर्णरंगी सडा, काही काही कल्पना कहर आहेत. 'वळले ना' वाचतांना 'तुलाही कळतय, कळतय ना?' ची आठवण झाली.
|
Chinnu
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:57 pm: |
| 
|
देवा, उच्च अगदी. वैद्य जातीचे, तरी प्रेत सतीचे, आणि असे दैवाचे अन्यायकर्ते उघडे दार... अतिशय गहन अर्थ भरला आहे, इवलाल्या ओळींमध्ये! अशी गहन भावार्थाची कविता लिहिणे मलातरी जमणे अशक्य वाटते. keep it up!
|
सतीश, ' वळण' कविता आवडली.
|
Princess
| |
| Thursday, March 29, 2007 - 4:38 pm: |
| 
|
गणेश, तुमची कविता आवडल्याचे सांगायचे राहिले. "हल्ली" कविता खुप आवडली.
|
Mankya
| |
| Thursday, March 29, 2007 - 5:03 pm: |
| 
|
गणेश .. दोस्ता ' हल्ली ' खूपच छान लिहितोस ! ध्यान बाबत चिन्नूला अनुमोदन ! सतीश .. वळण आवडून गेलं रे ! गंधपिसे, नव्या वसंता, सुवर्णरंगी सडा, फिकट चांदनी, वेडे हे खिळले ... आहा ! माणिक !
|
Gobu
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:16 pm: |
| 
|
गणेश, फ़ारच सुन्दर कविता आहे आवडली मला
|
|
|