Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 27, 2008

Hitguj » My Experience » PMP Course | Ak Anubhav » Archive through May 27, 2008 « Previous Next »

Zakkas
Saturday, May 17, 2008 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता प्रोजेक्ट मनेजमेंट्मध्ये बरीच वर्षे झाली आणी आमच्या टी. टी. ग्रुपच्या सगळ्यांनी PMP केलं म्हणून करू करू असं बरीच वर्षे म्हणत होतो.
गेल्या महीन्यात मुहूर्त लागला आणी PMP ग्रुपच्याच वेब साईटवर जॉर्ज मेसन युनी.मध्ये प्रेप क्लासमधे रजीस्टर केल. (किंमत ६५०$ नगद)

(माझा एक मित्र भारतात जाऊन सर्टीफाय होऊन आला. त्याला बहुतेक ह्या PMP.org क्लासची माहीती नसावी.)

चार शनीवार ८.३० ते ४:०० ९ सेशन्स आहेत.

आज पहिला दिवस.

पहीलया सेशनमध्ये इंटीग्रेटेड मनेजमेंट वर दोन तास झाले. एक साठीचा गोरा शिकवायला होता. त्याने सुरवातीलाच दोन गोष्टी सांगीतल्या
अ. प्रोजेक्ट मनेजमेंट चा प्रत्यक्ष अनुभव आणी ही परीक्षा ह्यात खूप तफावत आहे. त्याच्या भाषेत परीक्षेची तयारी करताना 'सस्पेंड द रिआलीटी'

ब. ही परीक्षा तयार करणारे, पुस्तक लिहीणारे सगळे अकडमीक आहेत. त्यामुळे बराचसा भाग म्हणजे मूर्खपणा आहे.

म्हणजे ओपनिंगलाच PMP चा अधिकृत प्रतीनिधी सांगतो की ह्याचा प्रत्यक्षात काही फारसा फायदा नाही?
[सुरू....]


Zakkas
Sunday, May 18, 2008 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहीले दोन तास भयंकर बोअर गेले. कशाचा कशाला पत्ता नाही. पळून जावंस वाटल. तो मास्तर म्हणायचा 'आय नो धिस डझ नॉट मेक सेन्स बट मेमोराइझ'. मला दहावीच्या भूगोलाची आठवण झाली. 'रत्नागिरी जील्ह्यात जांभा दगड मिळतो. 'रत्नागिरी जील्ह्यात जांभा दगड मिळतो.. दहा वेळा..' आता तो जांभा दगड काळा का गोरा हे माहीती नाही पण रट्टा मारा. बोर्डात यायचयना! हे पी. एम. पी. तसलच बहुधा.

पण तो तास संपला अन पुढचा तास सुरू झाला.

हा मास्तर पण साठीचाच.

ह्यात जरा जीव थार्‍यावर आला. प्लनींग आणी कॉस्टींगची दोन मॉड्यूल्स होती.

क्रिटीकल पाथ अनलिसीस विसरलो होतो. (का पूर्वी कधी निट कळलच नव्हत?) मास्टरनी ते छानच सांगीतल.

कॉस्टिंगमध्ये डिसकाऊंटेड कश फ़्लो, अर्न व्हॅल्यू क्रेडीट झाले. चांगलं वाटल. रट्टाबाजी आहेच पण अर्थपूर्ण.

मास्टर मात्र धावत सुटला होता. त्याला प्रश्ण विचारलेले आवडत नव्हते. कारण मटेरियल खूप कव्हर करायच होत. त्याला ४५ वर्षाचा अनुभव होता. त्याने ऑइल रिफ़ायनरया, आय. टी. चे मोठे मोठे प्रोजेक्ट हाताळले होते अन त्याच्याकडे प्रोजेक्ट मनेजमेंट्च्या खूप स्टोर्‍या होत्या. पण वेळेअभावी 'हा हा हंत हंत नलिनी..'

चाराला क्लास सुटला.

रात्री बेन्द्रांकडे भेट टू गेदर. तेंव्हा मीत्र म्हणाले की हा पी. एम.पी प्रकार अगदीच भंपक नाहीये. थोडासाच भंपक आहे. जरा बर वाट्ल ते ऐकून.

आता पुढल्या शनीवारी पाहूयात काय काय होतय ते.

[क्रमश:]


Farend
Sunday, May 18, 2008 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, इंटरेस्टिंग आहे. अजून लिही, वाचायला आवडेल. एका ठिकाणी वाचले होते की 'होंडा' ने अमेरिकेत साउथ मधे (केंटकी किंवा तेथे कोठेतरी) प्लांट चालू करायची तरीख २ वर्षे आधी जाहीर केली आणि बरोबर त्या तारखेला तेथे उत्पादन चालू झाले. त्या प्रोजेक्ट वर कोणी काही लिहीले असेल तर मजा येईल वाचायला.

Shonoo
Sunday, May 18, 2008 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बरोबर शिकणार्‍या गोर्‍यांनी क्रिटीकल पाथ अनॅलिसिस चा इतका धसका घेतला होता. ठरवलेल्या वेळापेक्षा दुप्पटवेळ त्या एका विषयावर घालवला होता आमच्या इन.स्ट्र्क्टर ने.
मी त्या परिक्षेचे education hours Penn Stage Great Valley मधे केले होते. अन अभ्यास स्वत:च घरी केला होता. एक दोन याहू ग्रूप्स ची चिकार मदत झाली होती परिक्षेची तयारी करताना. शोधून मग इथे टाकेन. पण Do as I say, not as I Do हे ब्रीदवाक्य असू द्यावं मनात :-)


Dineshvs
Monday, May 19, 2008 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे प्रकार अजून शिकवतात का रे ? आम्हाला होते ना क्रिटकल पाथ मेथड आणि त्या बरोबर, प्रोग्रॅम एव्हॅल्युएहन रुव्ह्यू टेक्निक, म्हणजे PERT पण होते. पण आमच्या ग्रेट शिक्षकांमूळे, त्यावेळी ते छान समजले होते.

Zakkas
Monday, May 19, 2008 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पर्ट संपल अस मास्तर म्हणाले.

'क्रिटिकल पाथ' चा वापर अजूनही ऑइल रिफ़ायनर्‍या, केमिकल प्लांट बनवणारे करतात असं मास्तर म्हणाले.

मला तरी सॉफ़्टवेअर प्रोजेक्टमध्ये 'क्रिटीकल पाथ' वापरायची वेळ येइल असे वाटत नाही. (चू. भू. द्या. घ्या.) :-)

- झ.


Yog
Tuesday, May 20, 2008 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakkas,
critical path is a concept and is still used by lot of industries. I am working as program manager for $1B airport expansion program and kid you not critical path is at core of everything...
PERT died, to some extent thats true..
complex and big scale s/w development project madhehi critical path vaaparataa yeto..one has to simply use it in the "context".
ani jo kon mahaabhaag PMP laa bhampak mhaNat asel tyaanche maajhyA vatIne paay dharaa..tyaacnhyA dnyAnAchA aamhaa paamarAnAhI upayog hoIl.. PMBOK cha gelyA varshIcha version lihiNArA maajhaach ithalaa ek coullege aahe who has 15+ years of practical knowledge in addition to academic degrees and certifications... so pustak lihINAre sagaLe academic aahet he mhaNaNAre are "ill informed" evhadech mi mhanen...
baakI tumhI PMP karaa vaa nakaa karu, doesn't matter. end of the day, tumhI kaay shikalaat tyaachaa vaapar kasaa karataa yaavar sarva avalambun aahe ase malaa vaaTate. aso.
tumachaa ekandarIt PMp chaa anubhav avashya lihaa..tyaatUn aamahaalaahI kaahI shikaayalaa miLel. paN tyaavarUn PMP baddal ekandarIt connclusions kaaDhaNArI vidhaane karaNe titakese paTat naahI..

Rajya
Tuesday, May 20, 2008 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढच्या आठवड्यात मी जातोय या कोर्सला. जाऊन आलो की सांगतो कसे आहे ते :-) ३५ तासाचा कोर्स आहे सध्यातरी :-)

Zakkas
Tuesday, May 20, 2008 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


राज्या,

जरा डिटेल्स देऊ शकशील का तुझ्या कोर्सचे?

कुठे? कोण कंडक्ट करतयं?

-झ्क्कास


Rajya
Wednesday, May 21, 2008 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कास, हा कोर्स PMSOFT Consultancy pvt. ltd. ने आयोजित केला आहे.

www.pmi.org
www.pmsoftglobal.com
या संकेतस्थळाला भेट दे :-)

Mansmi18
Thursday, May 22, 2008 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PMP ला बसण्यासाठी Project Manager, or Project Lead or Team Lead असणे आवश्यक आहे का? फ़क्त team members देउ शकत नाहीत का?

जाणकार कृपया सांगा..


Madhura_d
Thursday, May 22, 2008 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

either real world experience as manager/lead or formal training lagta.
formal training = recognized classroom training and earned credit hours.
So if you are just team member, take online/onsite courses and earn those formal training credits first and then you can appear for exam.


Mansmi18
Thursday, May 22, 2008 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Madhura,

Thanks. I know about the 35 hrs contact hours/training through PMP recognized REPs.
(I think that is the formal training you are talking about?)

I am asking if you should be a project manager/team lead/group lead in the work
experience to be eligible for taking the exam.(In addiition to 35 hrs formal training condition)

Thanks in advance for everyone's help.


Madhura_d
Thursday, May 22, 2008 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

as far as I know donhi lagta. ( sorry for my confusing either-or post above).
It needs both PM education ( 35 hours) and PM experience ( 3 yrs of PM exp )


Yog
Thursday, May 22, 2008 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

check out: PMI.ORG
tyaat PMP chI pre-requisites apllication aahe..that describes in detailed.

Shonoo
Friday, May 23, 2008 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रॉजेक्टच्या वेगवेगळ्या फेजेस मधे काम करण्याचा अनुभव लागतो. प्रत्यक्ष प्रॉजेक्ट मॅनेजमेंटचाच अनुभव लागतो असं नाही. समजा एखादा स्टोर मधे कॅशियर असेल तर तो रोज तेच तेच काम करणार तर तो अनुभव ग्राह्य धरत नाहीत. पण स्टोर मधले पॉइंट ऑफ़ सेल सिस्टीम बदलत असतील अन त्यावर जर त्याने काम केलं असेल तर ते ग्राह्य धरतील. PMI ची जी प्रॉजेक्टची व्याख्या आहे Temporary endeaviur with a defined goal अशा स्वरूपाची त्यात आपला अनुभव बसला पाहिजे. जर सॉफ़्ट्वेअर सपोर्ट मधे काम असेल तर नुसतं maintenance असं न लिहिता version upgrade किंवा specific functionality upgrade असं लिहावं लागेल.

PMI चा अर्ज भरताना काही मदत हवी असल्यास मी करु शकते.


Zakkas
Sunday, May 25, 2008 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आज पी. ऐम. आय. च्या वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प तीन वक्त्यांनी गुंफले.

पहिले वक्ते होते जक फरेरो. आतापर्यंतच्या मास्तरांपैकी बेष्ट मास्तर. [१२ ला अग्रवाल क्लासला परेरा नामे नामी मास्तर होते. त्यांची आठवण झाली.] त्यांनी 'स्कोप' वर आख्यान लावले. इनपुट, आऊटपुट आणी टूल्स चे जे असंख्य प्रकार आहेत ते जनरली कसे लक्षात ठेवायचे हे त्यांनी छानच सांगीतले. वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर, रोलींग वेव्ह प्लनींग चांगले समजले.

शेवटी म्हणाले "माझी प्रेप वेब साईट आहे. दोनशे डॉ. ला ९० दिवस २००० प्रश्नांना अक्सेस मिळेल." [गरज आहे? शोनू?]

पुढचा तास क्वालीटी वर. मास्तर बरा होता. पण अचानक बरीच लोके रीयल लाइफ प्रोजेक्टचा संदर्भ देऊन प्रश्न विचारायला लागली. [क्लासमध्ये बरीच फेडरल गोव्ह. कॉन्ट्रॅक्टींग करणारी लोके आहेत.] मग एक बाई भडकली. म्हणाली मी इथे काही क्यू. ऐ. शीकायला आलेली नाही. मला परीक्षा द्यायची आहे. ऊगाच रीयल लाइफ़ प्रश्न विचारू नका.
मास्तरांनी घड्याळ्यात पाहील. त्यांना कळल की वेळेचा लोचा झाला आहे. मग त्यांनी गाडी भरधाव सोडली. मी मनात म्हटल की बरय मॉड्यूल प्रोजेक्ट स्क्येड्यूल वर नाहीये ते. नाहीतर नाव सोनूबाई आणी हाती कथलाचा वाळा.
क्वालीटीचा भाग पुन्हा वाचायला लागणार!

शेवटच्या विदुषी होत्या प्रोक्युरमेंट एक्स्पर्ट. काय मजा आली नाही. थोडी सटर फटर ज्ञान शिते टाकली आमच्या झोळीत मेक बाय डिसीजन, प्रोक्युरमेंट प्लनींग वगैरे.
फीक्स कॉस्ट आणी कॉस्ट प्लस च्या आकडेमोडीच्या वर्क शिटवर पण ताईंचा पाय घसरला. काहीतरी थातूर मातूर सांगून वेळ निभाऊन नेली.
पाच सहा स्लाइड राहील्याच.

ह्या आठ्वड्यात जरा ऊजळणी करणे आणी थोडा थोडा फॉर्म भरणे आहे.

मदत लागल्यास सांगतोच.

-झकास.



Shraddhak
Monday, May 26, 2008 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोके????????????      

Itsme
Tuesday, May 27, 2008 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसंत व्याख्यानमाला :-)

झकास, शेवटच्या पुष्पा पर्यंत लीही .. its informative


Zakkas
Tuesday, May 27, 2008 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, लोके म्हणजे लोकं,

विषयांतर म्हणजे टीम मधल्या लोकांना मनेजमेंटच्या भाषेत रिसोर्सेस म्हणतात. मला हा शब्द कधीच आवडला नाही. पार्टनर शब्द बरा वाटतो. म्हणजे कसं ह्या प्रोजेक्टसाठी अजून दोन सिनीयर जावा पार्टनर्सची गरज आहे.

इटस्मी (भाषांतर 'अहं ब्रम्होस्मी' असं होइल?) - प्रयत्न करतो. :-)

-झक्कास


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators