Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मायबोलिकर उखाणे » Archive through May 11, 2008 « Previous Next »

Lajo
Friday, May 02, 2008 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री लाजो यांज कडून

सौभाग्यवतीने सांगीतले काम
ते माझी होईना छाती
या वयात कुठे जाउ
करायला 'म्हशींची' शिरगणती

हा हा हा चाफ्या...

हे श्री लजोंचे उत्तर...

खो खो हसलो
पाहून चाफ्याचा उखाणा
लाजो ला नका सांगू
नाहीतर करेल ठणाणा...


Chinya1985
Friday, May 02, 2008 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेहमान गाण्यात ओरडुन
ओरडुन लागला डोक खायला
अन दक्षिणा इमॅजिनेशनमध्ये
देतिय हृतिकला खाजा खायला!!!!


Chinya1985
Tuesday, May 06, 2008 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी असते गुडगर्ल
तर कोणी असते ड्रिमगर्ल
पण आजकाल मायबोलिवर
गाजतेय आयटीगर्ल!!!!!!


Dakshina
Wednesday, May 07, 2008 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजाली च्या बी. बी. वर "आयटी" शिकवते मालवणी
आणि गुरुदक्षिणा म्हणून मागते अंब्यांची गोणी....


Itgirl
Wednesday, May 07, 2008 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंब्याची गोणी नसते गं, पेटी असते

कशात काय न,फाटक्यात पाय
नसलेला ज्ञान पाजळूची
कशाक करतस गो दक्षिणा घाय??

खास तुझ्यासाठी मालवणी उखाणा गं



Jui_flower
Wednesday, May 07, 2008 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता माज़ा उखाना..... :D

२१ मण , २४ लाकड
माज़े राव सोडुन
ऐकणारि सारि माकड

Prachee
Thursday, May 08, 2008 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मी पण मी पण....
हं....

कोणाचा छंद, कोणाची हौस
माबोवर पडला उखाण्यांचा पाऊस...


Dakshina
Thursday, May 08, 2008 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असला तर असूं दे गो फ़ाटक्यात पाय...
गुरुचि विद्या गुरूला नाय फ़ळवली
तर 'दक्षिणा' नाव सांगणार नाय....




Itgirl
Thursday, May 08, 2008 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्तर द्यायच्या नादात की कुरघोडी करायच्या? स्वत:वरच उखाणा??? चांगल आहे गं, चालू देत!! :D

घे हो हलके हलके :P


Prachee
Friday, May 09, 2008 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, चांगली गुरु'दक्षिणा' आहे की...:-)

Chaffa
Friday, May 09, 2008 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'आय टी' आणि 'दक्षीणा'
नका लागु भांडायला
नाहीतर हा BB न्यावा लागेल
V&C वर मांडायला!


Itgirl
Friday, May 09, 2008 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक होती चिऊ अन
एक होता काऊ
चाफ्फा लग्गेच कारण शोधतो
म्हणे, v&c वर जाऊ

:-)


Chaffa
Sunday, May 11, 2008 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढस,काही म्हंटल तर,
आयटी सांगते चिउ काउची गोष्ट,
V&C वर कधी पाहीलेस का देवी?
मी टाकलेले पोष्ट?

कारण शोधण्यात पटाईत गं मी


Itgirl
Sunday, May 11, 2008 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी गं गेलो V&C वर
चाफ्फा भारी कळवळतो
तिथवर जायची गरज काय,
म्हणे, इथेच बसून कारण शोधतो!!



Chaffa
Sunday, May 11, 2008 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी गं गेलो V&C वर
चाफ्फा भारी कळवळतो
तिथवर जायची गरज काय,
म्हणे, इथेच बसून कारण शोधतो!!


क्या बात है आयटे!!!!!!!!!!!!!!!!!!

कारणे इथेच बसुन शोधण्या शिवाय
काय करेल हा बेटा, (म्हणजे मी)
आयटे तुझा संचार सर्वत्र
आणि आमचा आवाका पडतो थिटा!!!!!!!!!!!!!!!!!!


Itgirl
Sunday, May 11, 2008 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवाका पडे थिटा म्हणत
चाफ्फा करी काड्या
बसल्या जागी बडवतोय
चावीफळ्याच्या (key board) चाव्या

हलकेच घेणे हो, राग नसावा :-)


Chaffa
Sunday, May 11, 2008 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आय टे तुझा हजरजबाब पहाता
संशयाला मिळतो वाव
आयटी म्हणजे नक्की व्यक्तीच आहे ना?
नाहीतर असायचे एखाद्या संगणकाचे नाव?

इथे सगळे हलके हलकेच असते गं!


Itgirl
Sunday, May 11, 2008 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोकणचं पाणी आहे मी
संगणकही खाईल मात
चाफ्फ्या, तूही धरलस ना
पांढर निशाण हातात??

:-) :-)


Chaffa
Sunday, May 11, 2008 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पांढर निशाण आणि माझ्या हातात?
तु चुकिच मला जोखत आहे,
ज्या कोकणची तु आयटे
त्याच कोकणाच पाणी मी चाखत आहे!


Itgirl
Sunday, May 11, 2008 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाणी असणं, पाणी चाखणं
यात मोठाच आहे फरक
चाफ्फ्या, फुकाचा गैरसमज तुझा
आता तरी मला ओळख

:-)

जेवायला जातो म्हणून
गेला आहेस आता,
आल्यावर लिहिशील का उखाणे?
का हळूच काढता पाय घेशील
झोपेचे करुन बहाणे??




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators