Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2007

Hitguj » My Experience » ऑर्कुट किंवा इतर चॅट वर अनोळखी लोक असे approach होतात... » Archive through December 11, 2007 « Previous Next »

Ajjuka
Tuesday, December 04, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, मनुला अनुभव आला आणि तिने त्या गोष्टीशी कसे डिल केले हे महत्वाचे आहे की त्या व्यक्तीचे नाव?
एका व्यक्तीला वाईट अनुभव देणारी व्यक्ती दुसर्‍यांशी अतिशय चांगलीही असू शकते मग काय तुम्ही त्यावरून मनूशी वाद घालणार की तिचा अनुभव challenge करणार?
इथे वरतीच आपल्याला मायबोलीवरच्या 'चोराच्या उलट्या बोंबा' पद्धतीची झलक मिळालीये ना?

नावाच्या आग्रहापेक्षा Be aware हे महत्वाचे नाही का?

दिव्या, मैत्री असते अस्तित्वात. अगदीच असते पण आपण चांगल्या मैत्रीचे आडाखे काय ठरवतो आणि दुसरा काय ठरवतो यात खतका उडाला तर घोळ होतो.

मला मायबोलीवरच्या कुणाचाही असा अनुभव आला नाही सुदैवाने गेल्या ८ वर्षांमधे. आणि समजा आला तरी मायबोलीला नावं ठेवणं योग्य नाही. कारण वाईट अनुभवांच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगले अनुभव आहेत. आपलं तर लग्न ठरलंय (हे लग्नाच्या आधी..) किंवा झालंय मग अनोळखी लोकांशी कशाला बोला असल्या मूर्ख विचारांपायी मी जर इथे संवाद साधत नसते तर असे अनेक जिवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळाले नसते. हे सगळेच कधीना कधीतरी अनोळखी होते आणि यांच्याशी पहिला संवाद झाला असेल तो चाचपडतच.

थोडक्यात... काय Be Aware , तांदळात एखादा खडाही असू शकतो.


Limbutimbu
Tuesday, December 04, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगो मनु, यस्जीरोडवर तर माझ्याबरोबर समदेजण "अनुल्लेखाचा" भुरटा खेळ खेळत अस्तात! गेली दोन वर्षे मी एकतर स्वगते लिहिली किन्वा किस्नाला पेशल नमस्ते ठोकत राहीलो सॅल्युटसारखा! एनिवे..... मी तिथल्या कुणा "सरदार दरकदारान्ना" फारसा ओळखतही नाही, त्यामुळे माझ्या काहीच लक्षात येत नाहीये!

माझ्यापुरत म्हणायच झाल तर याहू किन्वा ऑर्कुटसारख्या ठीकाणी समोरच्या आयडी मागील चेहरा "तो", "ती" की "ते" आहे याचा विचारच करत नाही. मला आपल माझ्या आवडीच्या विषयात बोलणार भेटल की झाल, त्यापेक्षा वेगळा विषय निघाला तर कलटी मारायला सान्गायच!
कोण "अरे" म्हणल तर सरळ "कारे"नेच उत्तर द्यावे
अन दरवेळेस उत्तर द्यावेच असेही नाही, इग्नोर करावे
याहूवरचे येडे तर मधेच मेसेज टाकुन asl? असे विचारतात, मी वैतागलो तर सरळ "८०,म्हसोबा,मसणात" अस काहीही ठोकुन द्यायचो!
mostly मेल हिअर अस लिहिल की या आगन्तुक पीडा पळुन जायच्या! :-)

अज्जुका, तुझ्या पोस्टशी ऍग्री! (नन्तर वाचली)


Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटच्य ४ पोस्ट्स अतिशय छान आहेत. आपण खरंच खूप सावधगिरी बाळगली पाहीजे. मनूला हैराण करून ती व्यक्ती कोण आहे, हे माहीती करून जरी घेतलं तरीही ती व्यक्ती ते सगळे 'स्टंटस' परत इकडे करेलंच कशावरून? आणि दुसरं कोणी याच गोष्टीचा फ़ायदा करून घेऊन एखाद्याबद्दलची वैरभावना भागवून घेणार नाही कशावरून? त्यामूळे दिव्या, मनू आणि अज्जुका सांगतेय ते अगदी मनोमन पटलं.

Aashu29
Tuesday, December 04, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

८०,म्हसोबा,मसणात" अस काहीही ठोकुन द्यायचो!

hhpv, limbu!

Divya
Tuesday, December 04, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, completely agree with you . मैत्रीत सुद्धा सुंदर रंग असतात. पण ज्यांना फ़क्त black and white च दिसत ते आयुष्यातील खुप सुंदर गोष्टींना मुकलेत अस वाटत.

Manuswini
Tuesday, December 04, 2007 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

All above posts are really matured and up to the point. kudos to them.
I am writing here again to say that past 2 days were very bad for me, I got so many emails and questioned me if that is the person or not.

I am really sick, people look at this as tamasha and keep asking me names, oh manu tell me na, you can trust me etc.what you are going to do with names?? think about it. anyways, thats fine now.
Let me tell you all here one really last declaration on this subject,

"I have not personally declared anybodys name to anybody. people did write me emails, or tried knowing by giving hints.

I have only said "yes" to people who had enough guess about it. that also after many requests from them. and "these" people I "really" count them as good close maayboli friend from maayboli. so now it is "their responsibility" to how to use that info and not to cause any mental trouble for me specially or misuse or anyone here".



Chaffa
Wednesday, December 05, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे पहील्यांदा तोंड उघडतोय ( लिहीतोय ) अजुक्का तुला अनुमोदन
लिंब्या तुलाही अनुमोदन, असे अनुभव मलाही आलेयत त्यातला एक तर महा भयानक पध्दतीने मायबोलीवरच आला. V&C ची ति रात्र जर आठवु शकणारे कुणी असतील तर त्यांना माझ्या मनस्तापाचा अंदाज येईल. ईथल्याच एका ID ने एका रात्रीत मला मजबुत छळले. सरळ मायबोली सोडावी असेच वाटायला लागले होते, पण काही जुने जाणते ID मदतीला धावले.
आणि गंमत म्हणजे माझ्या IT च्या अफ़ाट ज्ञानामुळे मी त्याच व्यक्तीला ऑर्कुटवर जमा करुन टाकले.
पण एक मात्र मान्य करावेच लागेल तिथे मला त्रास दिला नाही.
एकदा चुकुन चॅटरुम मधे गेलो ते ही मराठी कम्युनिटीवर ईथे माझा ID आडवा आला धडाधड खिडक्या उघडल्या गेल्या आणि asl pls चा भडीमार! पटकन बाहेर पडलो पण दुसर्‍या दिवशी पुन्हा लॉग ईन केल्यावर मोजुन आकरा ऑफ़लाईन मेसेज डिलिटलेत.


Meenu
Thursday, December 06, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं एकंदरीत हा सगळा वाद संपला आहे खरं तर. तरीही काही गोष्टी लिहाव्याशा वाटत आहेत. मनुच्या पोस्टच्या संदर्भात. (मनु hope u will take it in right spirit! )

तू तुझ्याबाबतीत जे घडलं ते इथे सांगितलस आणि इतरांना त्याचा उपयोग होईल यात काही शंका नाहीये. फक्त मला वाटतं

१. की ती गोष्ट खरच खूप जुनी आहे.
२. असं शब्दशः chat copy paste नसतं केलस तरीही तुला सांगता आलं असतं काय घडलं ते.
३. त्या व्यक्तीसंदर्भात जे काही clue तु दिलेस मला वाटतं तसे द्यायला नको होते.

specifically ती व्यक्ती गडावर असते हे म्हणलं नसतंस तरी चाललं असतं. होतं काय की, गडावर आम्ही अनेक जण येत जात असतो. एकंदरीत एकमेकांशी निखळ गप्पा मैत्री या हेतुने. तू केला आहेस तशा प्रकारच्या उल्लेखाने उगीचच लोकांना गडावर येणार्‍या प्रत्येकच व्यक्तीच्या बाबत शंका घ्यायला जागा तयार होते. ते मला तितकं योग्य वाटलं नाही.


Sandu
Thursday, December 06, 2007 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरिल Meenu ची पोस्ट अगदी मनोमन पटते मि हे लिहिणारच होतो.


Maanus
Sunday, December 09, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gr8 news for orkut fans. Like facebook, now you can also hide your scraps from non-friends.

1. click on settings at left bottom
2. click on privacy.
3. select friends from everywhere.
4. click save




Panna
Monday, December 10, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! चांगली सोय केलीये ऑर्कूटने! :-)
धन्यवाद माणसा!!
:-)

Psg
Monday, December 10, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स माणसा हे कळवल्याबद्दल :-)

Swa_26
Monday, December 10, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. माणुस, खरंच खुप छान माहिती दिलीत!!

Manuswini
Monday, December 10, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, मी ही पोस्ट बघितलि नाही, I was travelling ,
आता काय लिहायचे ह्यावर(हे मीनुच्या पोस्टला उद्देशून आहे).
एकुणच इथे माझा chat वरील लिहिण्याचा अनुभव 'मझ्हा बोचरा अनुभव' मध्ये जायला हवा आता. एक अनुभव काय शेयर केला नी लोकांची intepretation बघून थकले.

प्रत्येकाची 'चुक' किंवा 'बरोबरची' परिमाणे वेगळी असतात मग मी सुद्धा खालील त्रासाने त्यावेळेला एक योग्य वाटलेला निर्णय घेतला नी तेव्हढे स्वात्रंत्य नक्कीच असावे कोणाला. तु असे का केले, तसे का केले फक्त when you are in his shoes मध्ये असाल तरच कळेल.

खरे तर अतीशय कंटाळा आलाय पण काही प्रश्ण मलाही पडलेत होते / आहेत म्हणून हा खचीतच शेवटचा खटाटोप. आता इथे आणखी कोणाचे फालतु युक्तीवाद नकोत मला. कोणाला नाहीतर आणखी उगाच गोंधळ / युक्तीवाद घालायचा असेल तर ती व्याक्ती मोकळी आहे.

मीनु, माझी सुद्धा पोस्ट तु " किंचीत " माझ्या बाजूने समजून घेशील ह्या हेतुने लिहितेय, hoping that intepretation would be in right sense...

खालील लिखाण हे सर्वांना उद्देशून आहे ज्यांनी नकळत मला भंडावून सोडले,
१) माझी कोणत्याही बीबीशी वैर नाही, ह्या बीबी वर अनुभव लिहिल्यावर सहजीकच कोणीही कुतुहलाने विचारणारच ना कुठले संकेत्स्थळ मग ते, कोण वगैरे वगैरे मग admin ने हा बीबी काढयलाच नकोच होता.
२)सर्वात आधीच्या पोस्टमध्ये मी काही स्थळाचा, व्याक्तीचा उल्लेख केलाच न्हवता पण लोकानी इतके भंडावून सोडले, कुठले स्थळ, कोणता बीबी, कोण ते तरी सांग कधी private email लिहून तर कधी chat वर पकडून. I mean ओळखीच्या मायबोलीवरील लोकानी अगदी सांग सांग करत, मग ही का ती का कुठे असते कुठल्या बीबी वर, मला तरी सांग.
स्वतच्या बद्दल खात्री देत, अग मी कोणाला सांगणार नाही मला नाव सांग. अशी विचारणा एक नाही,दोन नाही तर बर्‍याच जणानी केली. अनोळखी मायबोलीकर होतेच पण ओळखीचे पण. मी तर काळा का गोरा, बाई का बाप्या माहीत नसताना मला विचारत होता की 'मायबोलीवर्; का? हे नी ते सारखे वरील प्रश्ण. मग त्यांनाच का सांगावे? तर आम्ही सावध होवु असे लिहिण्यार्‍याचे,विचारण्यार्‍याचे उत्तर.
नावे काय करायचे तर मला उपयोगी ठरेल. एक होत्या का दोन वगैरे अगदी कंटाळून सोडले. मग ह्यांच्यावर विश्वास ठेवून मी जर नावे सांगीतली तर मग माझेच नाव वापरून उलटेच काही केले तर ह्या लोकांनी?

ह्यांना फक्त स्वतची चिंता पडलेली मग बाकिच्यांनी काय घोडे मारलेय की त्यांना कळु नये?

३) cut n paste नी वर्णन करून सांगीतले तरी काय फरक प्रश्णे तर तशीच पडणार ना?
४) आणि अनुभव 'जुना' असेल तर लिहु नये असे आहे का? आधीच लिहिले ना की इतके दिवस गप्प बसले कारण हे मध्यम न्हवते. मग हा बीबी काढलाच का? अनुभव हा जुना असो नवीन असो. मग त्यात सुद्धा असे का mention केले तसे का?

बहुधा काहींना एक दोन hints दिल्याने तसाच अनुभव आल्याने कळले असेल तरी प्रत्येकाने स्वतची नजर ठेवण्यास(कोण कसे ते) काय बंदी आहे का?

५) lastly why should one suspect on everybody on sinhgad BB? just because that person is from sinhgad then why would you suspect everybody coming there? I believe in this theory, one should have his/her own judgement. Others experiences do help but there is something also called 'own experiences' that are far different. Like I said in earlier post,every person is smart and adult enough, he can not ask people around and say oh, i am so innocent;please tell me how is the person on so n so BB.

whenever somebody tries for new thing(let be maayboli,orkut,yahoo chat medium), you do have "benefits of doubt" right? and thats how you start. you do make decision based on your own judgement, not always on someones input.
असे का नाही consider करत हे तर जंगल आहे इथे गाय वाघ,लांडगे असणारच. मग जंगलातील एक भाग अतीशय चांगला म्हणजे 'मायबोलि' आहे पण समजा तिथे इतके दिवस गायीच्या रुपात एक लांडगा होता म्हणून सगळ्या गायीवर आता संशाय येणार का? i think its foolish.

rest all is people's choices.. but somebody writes here then it is his msitake. this is what it appears here.

कृपया कोणाला दुखवायचा माझा हेतु न्हवता. I am not good in expressing well in marathi so my language might sound arrogant but thats not the case. thats it.


Dakshina
Monday, December 10, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यामते तरी, इथल्या अनोळखी - ओळखीच्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांकडे जास्ती लक्षं देऊ नये हेच खरं. असं किती दिवस लोकांना explaination देत फ़िरणार, नाही का? अनुभव जुना असो वा नवा, आपल्याला वाटलं शेअर करावा, माध्यम मिळालं, शेअर केला.... बास प्रश्नं मिटला.

Manuswini, : I think, since you have written about your experience, you must have thought about it twice/thrice before writing. You might be even expecting such questions from other Maaybolikars. which are most obivious. and it even looks like you have taken the entire responsibility of your writing. which is worth appriciating. you are the only one who has shown the daring to disclose it.

पण खूप लोकांना बहूतेक तो माणूस कोण हेच जाणून घेण्याची जास्त इच्छा होती / आहे. त्यामागे 'आम्ही तरी सावध राहू' हा माझ्यामते फ़क्त एक फ़ंडा होता. उत्सूकता ही त्यापेक्षा कितीतरी आधिक होती.


Savyasachi
Tuesday, December 11, 2007 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आता इथे आणखी कोणाचे फालतु युक्तीवाद नकोत मला

manu, there are always 2 types of people who talk from your side and who talk opposite. I guess there can be very few topics in the world with only one opinion.
what you think is faltu, may be great, correct for many others.
you decided to share and u did it. thats it. you are not required (not liable) to give justifications/clarifications etc. there was no need to give explanation that you had given above. esp. if it is affecting you.

तू व्याक्ती अस खूप ठिकाणी लिहील आहेस. व्यक्ती अस बरोबर आहे. (अस मला वाटत :-) )

Ajjuka
Tuesday, December 11, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी सुरू करताना इथे V&C घडवण्याचा उद्देश नव्हता. अनेकांना अनेक मूर्ख लोक भेटतात ते किस्से इथे शेअर करणे, त्यावर थोडी गंमत एवढेच अपेक्षित होते पण काही लोकांनी यातला खेळकर भाग घालवून लिहिणार्‍या माणसाचीच निंदानालस्ती करायला सुरूवात केली. सगळं वातावरणच बिघडून गेलं.
मला एक कळत नाही की इथे एक किस्सा टाकला गेला तर किस्सा टाकणार्‍या माणसाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून जाब विचारायचा अधिकार यांना कोणी दिला?
सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणार हे कबूल आहे पण तरीही या इथल्या किश्श्यांवरून एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याची चिरफाड करायचा संबंध काय?
हे आधी झालं यापुढे होऊ नये ही विनंती. सगळ्यांनाच भारी भारी नमुने भेटत असतात आणि त्याबद्दल सांगायला इथे कोणाला असं दडपण येणं योग्य नाही की आता लोक मला काय म्हणतील!


Lopamudraa
Tuesday, December 11, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, मला अजुन अस कुणिच नमुना भेटले नाहिये अगदी orkut वर सुध्दा नाही. :-)

Deepanjali
Tuesday, December 11, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे का नाही consider करत हे तर जंगल आहे इथे गाय वाघ,लांडगे असणारच. मग जंगलातील एक भाग अतीशय चांगला म्हणजे 'मायबोलि' आहे पण समजा तिथे इतके दिवस गायीच्या रुपात एक लांडगा होता म्हणून सगळ्या गायीवर आता संशाय येणार का?

<<<<<<<नाव जाणून घ्यायची खरच इतक्या लोकांना उत्सुकता का वाटते ?
आणि समजा खरच जरी एखाद्याने नाव जाहिर केलं तरी काय फ़रक पडणारे ? :-)
एखाद्या X व्यक्तीने 'Y' व्यक्तीचा वाईट अनुभव आला म्हणून इथे नाव जाहिर उल्लेख केला आणि suppose जर तो Y माझ्याशी वागताना सभ्यच असेल तर मला तरी काही फ़रक पडणार नाही .
मग 3 rd person च्या दृष्टीनी तो विचित्र असला म्हणून माझ्या दृष्टीने तो काही लगेच व्हिलन नाही झाला .
माझ्याशी सभ्य असणार्‍या एखाद्या मित्राचा तिसर्‍याच एखाद्य मुलीला दुर्दैवाने जरी online, orkut वर असा विचित्र अनुभव अलाच तरीही मला तरी काही फ़रक पडणार नाही , माझ्या दृष्टिने तो चांगला मित्र च राहिल , त्या दोघां मधे काय problems असतील ते ते दोघेच जाणे , जो पर्यंत ती व्यक्ती माझ्याशी सभ्य आहे तोवर who cares!
:-)

Lalu
Tuesday, December 11, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>माझ्याशी सभ्य असणार्‍या एखाद्या मित्राचा तिसर्‍याच एखाद्य मुलीला >>दुर्दैवाने जरी online, orkut वर असा विचित्र अनुभव अलाच >>तरीही मला तरी काही फ़रक पडणार नाही , माझ्या दृष्टिने तो चांगला >>मित्र च राहिल , त्या दोघां मधे काय problems असतील ते ते >>दोघेच जाणे , जो पर्यंत ती व्यक्ती माझ्याशी सभ्य आहे तोवर who cares!

असं कसं? तुम्ही चांगले फ़्रेन्ड्स असाल तर असा दृष्टिकोन कसा चालेल? तुम्ही केअर नाही केली तर मग कोण करणार? तुमची कोणी जवळची व्यक्ती असं वागते आणि तुम्हाला काहीच फरक पडत नाही? इथे कान पकडून जाब विचारता आला पाहिजे. "दुर्दैवाने विचित्र अनुभव आला", "दोघांमध्ये काय प्रॉब्लेम असतील ते" असं म्हणणं म्हणजे denial मध्ये गेल्यासारखं आहे. "फ्रेन्ड्सना खुलाश्याची गरज नसते" वगैरे तत्वज्ञान न पटण्यासारखे आहे. त्यांच्याशीच तर बोलायची गरज असते, बाकीचं जग जाऊदे खड्ड्यात. शेवटी फ्रेन्ड्स म्हणजे माणसंच असतात, त्यांच्याही मनात शंका येऊ शकतात. जगात कोणीच कोणाला पूर्ण ओळखत नाही. त्यामुळं खुलासा विचारायला आणि तो द्यायला खर्‍या मित्रांनी कधी मागपुढं पाहू नये. खरोखरच चांगली मैत्री असेल तर ती तुटायची भीती कशाला?
जे लिहिले आहे ते DJ च्या ३ वाक्यांशीच संबंधित आहे. सॉरी, विषयांतर झाले :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators