Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 09, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » एक खरी व्यथा » Archive through April 09, 2008 « Previous Next »

Ggeetanjali
Friday, November 03, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks for ur advice. aani nakki tumha lokana jevayala bolavin h.
aani tila ekada alert hi karen.


Vikasshukla
Tuesday, November 07, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गीतान्जाली, आणखी काही वर्षानी या सर्व गोष्टीवर तू स्वत्:च हसशील. तेव्हा forgive and forget.

Ggeetanjali
Tuesday, November 07, 2006 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ho might be he possible asen. aani mi mhanunach vichar kelay ki kunala alert hi nahi karayach karan may b ti tyala sangen ... karan prem aandhal asat kunavar vishvas thevat nahi... aani te mazyasathi may be problamatic tharu shakat.
so really forgive & forget ... except sometimes some incident happen or he is in front of u. :-)

Zpratibha
Wednesday, November 08, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गितांजलि अगदि योग्य decision घेतलाय. That's the Spirit .

BEST OF LUCK . तुझ्या भावी आयुष्यासाठि मनापासुन शुभेच्छा.


Arc
Friday, January 25, 2008 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवनागरीमधे लिहीले तर उपकार होतील. तसेही शुद्ध मराठी नाहीच आहे.पण जरा वाचण्याइतपत तरी बर लिहा.

Zakki
Friday, January 25, 2008 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, देवनागरीत लिहून व्यथा कमी होते का? आमच्या संगणाकावर देवनागरी लिपीची सोय नाहीये, आम्हाला तेव्हढा वेळ नसतो, मुख्य म्हणजे तुम्ही कोण सांगणारे, इ. अनेक कारणे आहेत! माझ्या रंगीबेरंगीच्या पानावर जाऊन पहा.

Rajkumari
Wednesday, April 09, 2008 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे ragistration फ़ार पुर्वी केले होते, पण मधल्या काळात फ़क्त एक वाचक होते. खूप धास्ती वाटत होती, इथे लिहायची. पण धाडस करतेय.

Rajkumari
Wednesday, April 09, 2008 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा प्रॉब्लेम तसा फ़ार कॉमन आहे. माझा प्रेमविवाह होता, आणि आता (४ वर्षांपुर्वी)डिव्होर्से झाला आहे. येत्या मे मध्ये मला ३१ पूर्ण होतील. माझी नोकरी वगैरे चांगली आहे. (ही एक सुदैवाची बाब) त्याच्या बळावरच मी माझं आयुष्य जगतेय अस म्हटलं तरी चालेल. सेपरेशन, घटस्फोट या सर्व गोष्टींसाठी घरच्यांनी खूप मदत केली. खरंतर डिव्होर्से मिळाल्यावर जवळ जवळ दिड वर्षं मी दुसर्‍या लग्नचा विचार केला नव्हता, मूळात तसा विचार माझ्या डोक्यात कधी आलाच नाही. पण हळू हळू घरच्यांनी माझ्या अपरोक्ष प्रयत्न करायला घेतले. मी टाळाटाळ करायची पण नंतर मला समजून चूकलं की आता आपल्याला दुसरं लग्न करण्याशिवाय गत्यंतर नाही.
या ४ वर्षात मला खूप अनुभव आले, १/२ मुलं मला आवडली सुद्धा होती. पण त्यांना सांगायचे कधी धाडस झाले नाही. थोडक्यात, मन मारून जगले. काही वाईट अनुभव ही आले.
एकूणात, लग्नानंतरचे अनुभव, मग वेगळं होण्याचा त्रास, कोर्टाच्या फ़ेर्‍या, मग एकटेपणा यातून मनात एक कटू भावना निर्माण झाली आहे. मुलं तर अजुनही पाहते आहे, पण एकिकडे स्ट्रॉँगली वाटते की लग्नं नको. सुट्टीच्या दिवशी बाहेर फ़िरणारी जोडपी पाहीली की एकटेपणाची खूप जाणिव होते. अनुभवांमुळे खूप अक्कल आलेली असल्याने कोणत्याही गोष्टीचा अगदी किस पाडायची सवय झाली आहे. चुकून कधी एखादा मुलगा आवडला तर ते स्थळ वर्क आऊट होत नाही. माझ्या अपेक्षा पण खूप नाही आहेत. तरी हे का तडीस जात नाही काही कळत नाही. सर्वा ठिकाणी नाव घातले आहे,

Rajkumari
Wednesday, April 09, 2008 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरपूर पैसा ओतला आहे. तरिही माझ्या मनातले नैराश्य जात नाहीए. आणि दिवसेंदिवस ही भावना वाढतेच आहे. कधी काधी रात्र रात्र झोप लागत नाही. आपले कसे होईल? अशी एक धस्ती सतत मनात असतेच. सुटी तर नको वाटते, कोणतेही सण समारंभ मी साजरे करत नाही. कोणी बोलवले तर स्पष्ट नाही म्हणून सांगते. आई वडील बर्‍यापैकी वयस्कार आसल्याने त्याना काही सांगू शकत नाही. त्यामूळे य प्रश्नाशी एकटीच लढण्याचा प्रयत्न करतेय.

रोज ऑफ़िसला जाऊ नये असं वाटतं. झोपलं की उठू नये, कोणाशीही बोलू नये. चिडचिड, रडारड तर आजकाल रोजच होऊ लागली आहे. समुपदेशन हा एक आधारस्तंभ होता पण अलिकडे बर्‍याच दिवसात मी तो ही थांबवला आहे. नैराश्य काही जात नाही. मन स्थिर रहात नाही. प्रत्येक क्षणी काहीतरी वेगळंच करावंसं वाटतं.. पण मन कशातच रमत नाही.

Trish
Wednesday, April 09, 2008 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकुमारी, तुमच्या व्यथा समजू शकतो, मी ही या नैराश्यातुन गेलो आहे तरी तुम्ही खुप घाव सोसले असतील, मी एवढेच सांगू शकतो की तुम्ही नैराश्यातुन बाहेर पडून एक सुंदर आयुष्य जगायचा प्रयत्न करा, तुम्ही इथे लिहित आहत म्हणजेच तुम्ही चांगले सकरात्न्मक आयुष्य जगु इच्छित आहात. जर तुम्ही तुमचे मन इतर आवडीच्या छंदा मधे रमवले तर थोड़ा आधार मिळेल. काही चांगले सकरात्न्मक वाचन करा, वपुंचे प्रेममयी, किंवा पुलंचे दिलखुलास साहित्य वाचा. तुमचा जीवन कड़े बघण्याचा दृस्तिकोण बदलून पहा जीवन किती सुंदर आहे ते! प्रेतेक क्षण किती अनमोल आहे हे त्या क्षणा मधे जगुन पहा. दुखी भूतकाल आणि चिंतातुर भविष्य यांचा विचार सोडा, मजेत जगा !
तुमच्या सुखी आयुष्याला हार्दिक सुभेछा.

Rajkumari
Wednesday, April 09, 2008 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्रिश,
हे सांगणे खूप सोपे आहे, पण करणे खूप अवघड आहे, असे नाही वाटत का तुम्हाला..? गेली कित्येक वर्षं मी हे अनुभवती आहे, पण इथे आज लिहीलं. वाचन, संगित, ध्यान-धारणा, योगाभ्यास.... या सर्वं गोष्टी पण मी करून पाहील्यात हो.... पण त्याचा फ़ायदा हा तत्पुरता झाला, आता पाणी आगदी नाकाच्या वर जाऊ लागलेय.

Giriraj
Wednesday, April 09, 2008 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर येत रहा! लोकांशी गप्पा मारत रहा.. इतरही group activities मध्ये भाग घेत रहा... मग ते ट्रेकिंग असो किंवा असेच गप्पा मारणे,नाटक सिनेमे बघणे असो.!
अगदीई मायबोलीवरच्या शहरांच्या BB वर टवाळक्या केल्या तरी उत्तम! :-)तुम्ही भारताबाहेर आहात का?


Yashwant
Wednesday, April 09, 2008 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक चान्गली मैत्रीण किन्वा मित्र तुम्हाला मिळाला तर हळु हळु तुम्ही यातुन बाहेर येवु शकाल. तुम्हाला जो अनुभव आला त्यातल्या नकारात्मक भावनान्चा आधी निचरा केला पाहिजे. त्यासाठी एखादी चान्गली मैत्रिन, मित्र असेल तर उत्तम नाही तर या सगळ्या भावना एकदा कागदावर उतरवुन टाका. मुख्य म्हनजे तुमच्या त्रासाला जे लोक कारणीभुत झाले त्या सर्वाना आधी माफ़ करा. हे सगळे प्रश्न लगेच सुटतील असे नाही. थोडा वेळ लागेल. मायबोली वर इतकी चान्गली मानस आहेत त्यान्च्या सम्पर्कात रहा. इथे कोनताही प्रॉब्लेम सान्गितला तरी त्यासाठी खुप लोक चान्गले सल्ले देतात अगदी प्रमाणिकपने देतात. यातुन तुम्ही नक्कि बाहेर पडाल. ऑल दि बेस्ट.

Rajkumari
Wednesday, April 09, 2008 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज, दुर्दैवाने, मला ट्रेकिंग, सिनेमे किंवा ग्रुप activities मध्ये फ़र एकटे वाटते. आपल्याला कोणी सामील करून घेत नाही, किंवा हळू आवाजात आपल्याबद्दल चर्चा करत असतील असे वाटते. मी ट्रेकिंगला जाण्याचा एक दोनदा यत्न ही केला होता, जाऊनही आले होते, पण नंतर मी स्वतःला फ़ार analyse करत बसायला लागले. त्यमूळे कुठेही भाग घेणे टाळते. सिनेमा एखाद वेळी ठिक आहे, पण लग्न, सण समारंभात सुद्धा हे पाहून दुःख होते के आपल्या वाट्याला यातले जरा सुद्धा सुख नाही...
आपण कसल्याच सुखासाठी लायक नाही का?

मी भारतातच आहे, माझं मायबोलीचं प्रोफ़ाइल माझ्या मैत्रिणिने केलं आहे, तिने चुकून मझा लोकेशन USA असं लिहीलंय.

यशवंत - तुमचे ही आभार, खूप सकारात्मक दिशा दाखवलीत तुम्ही. पण त्याची अंमलबजावणी माझ्यासाठी कठिण झाली आहे. आलेले एकेक अनुभव आठवले, किंवा समोरच्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल काय भावना असेल असा साधा विचार जरी आला तरी उदास व्हायला होते.

Trish
Wednesday, April 09, 2008 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकुमारी, बरोबर खरच सांगणे नेहमी सोपे असते, माझ्या व्यथा दुखः हे सर्वस्वी माझे आहे ते तुम्हाला काय कळनार! बरोबर अगदी असेच वाटते आहे ना तुम्हाला आत्ता ??. मला ही असेच वाटले होते माझे दुखः कदाचित तुमच्या दुखः पेक्षा कदापि मोठे नसेल परंतु मला एक सांगा तुमचे दुखः मोठे का माझे मोठे हे कसे ठरवायचे? म्हणजे तुमच्या स्वप्नातील राक्षस मोठा की माझ्या हे जसे आपण ठरवू शकत नाही तसेच कुणाचे दुखः किती मोठे हे देखील ठरवू शकत नाही. कारण दुखः किती मोठे आहे हे नेहमी एखाद्या घटनेच्या किंवा अपेक्षेच्या अनपेक्षित घडण्या मुळे झालेल्या आघातावर अवलंबून असते, आता जर का हे दुखः जर आपण आपल्या जवळच घेवून बसु तर ते कधीच हलके होणार नाही कदाचित माझा तुम्हाला राग येइल की मी इतका कठोर का बोलतो आहे. पण मी देखील असे दुखः करण्यात खुप क्षण वाया घालवले आहेत.म्हणुन तुमची काळजी वाटते. कारण दुखः ही तुमच्या जवळ असलेली एक वजनदार ओझ्याने भरलेली पिशवी आहे ती तुम्ही जेवध्या जास्त काळ तुमच्या जवळ ठेवाल तेवढा काळ तुम्हाला त्याचे ओझे होईल तेव्हा लवकरच ती रिकामी करून हलके व्हा, अन या मायबोलित हसत खेळत मिसळुन जा.

मी मगाशी सांगितलेल्या प्रेममयी या वापुंच्या पुस्तकात त्यांनी खुप सुंदर सांगितले आहे की जीवन हे काय आहे आणि हा प्रवास तुम्ही किती विरक्त(unattached) राहून अर्थपूर्ण करता याला महत्त्व आहे हे पुस्तक वाचून बघा कदाचित तुम्हाला मदत मिळू शकेल अन नविन दिशा देखील.

"सुख कधी संपत नाहीत ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलाना टाकाण्याचे धेर्य फ़क्त आपल्या जवळ हंव. नव्या सुखाना जागा करून दिली की ती न बोलावता येतात." -वपु

माझी कथा वाचायाची असल्यास या लिंक वर पहा:
/hitguj/messages/644/135671.html?1197700784

Yashwant
Wednesday, April 09, 2008 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळु हळु बदल करायला सुरुवात करा. आपल्याला बदलायचे आहे हे आधी ऐक्सेप्ट करा. आम्ही फ़क्त लाम्बुन मार्गदर्शन करनार आहोत. ज्याने कोर्ट कचेर्‍या केल्यात त्याला तुमचे नैराश्य लगेच लक्शात येइल. पण, it is never too late बदल करायला सुरुवात करा. माझ्या आवडीच एक वाक्य इथे देतो बघ तुम्हाला त्याचा किती उपयोग होतो ते The world has not changed, but I have. And in changing, a whole new world is born.

Tonaga
Wednesday, April 09, 2008 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकुमारी, तुमची व्यथा मी समजू शकतो.खरे तर तुम्हाला companionship ची गरज आहे. मूल मोठे झाल्यानन्तर त्याला समवयस्कांचीच सोबत लागते अगदी प्रौढाना देखील. मानवी आयुष्यात भिन्नलिंगी समवयस्क सोबत आनन्द दायक आणि आवश्यक ही असते. त्याला ध्यान धारणा, वाचन, संगीत,ट्रेकिंग या गोष्टी पूरक आहेत पर्याय नाहीत. companionship निर्माण करा.ती कोनाचीही असू शकेल. एखादी मावसबहीण,वहिनी, कलीग इत्यादी. एकट्या राहू नका. त्याने प्रॉब्लेम वाढतील. झाल्या प्रकारात तुमची चूक नसावी त्यामुळे तुम्ही गिल्टी वाटण्याचे पहिले बन्द करा.एखाद्या मूर्खाच्या नशिबात तुमच्यासारखे रत्न नसेल तर त्याला तुमचा काय दोष?
माझ्या एका नात्यातल्या मुलीस घटस्फोट घ्यावा लागला.ती लेक्चरर होती. हे लोकाना माहीत नसते. ती नवर्‍याबरोबर दिसत नसे मग तिला गॅदरिंग मध्ये फिश्पॉन्ड येऊ लागले..
अशी तिने ५-६ वर्षे काढली. अगदी आत्महत्येच्या टोकाला पोचली होती. सुदैवाने तिच्या पेक्शा थोड्या जास्त वयाचा अत्यन्त रसिक मुलगा वेडपट तत्वाकरता लग्न राहीलेला मिळाला. अगदी सोने झाले तिचे. त्यानेही तिचा कुठलाही पूर्वेतिहास विचारात न घेता एक अक्षराने त्याचा पुन्हा कधी उल्लेख केला नाही. त्यामुळे जगात चांगली मानसे आहेत. तुम्ही सूज्ञ वयाच्या आहात त्यामुळे कोण तुमच्याभोवती कशासाठी रुंजी घालतोय हे कळण्यासारख्या आहात...
माणूसकीवर विश्वास ठेवा. तुम्ही कोणाला तरी नक्कीच हव्या आहात हे कधीच विसरू नका....

तडजोडी तर यशस्वी कुटुम्बातही असतात.
निदा फाजलीने म्हटलेय ना...
यहाँ कभी किसीको मुकम्मल जहाँ नही मिलता..
किसिको जमीन नही मिलती, किसीको आसमाँ नही मिलता..

मुकम्मल्= सम्पूर्ण

२)दुआ करो कि यह पौधा हराही लगे...
उदासियोंमेभी चेहरा खिला ही लगे...

नही है मेरे मुकद्दरमे उजाले ना सही,
ये खिडकियां तो खोलो,सुबहकी हवाही लगे...

बशीर बद्र.


Shraddhak
Wednesday, April 09, 2008 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकुमारी,

दुःखं आणि कठीण प्रसंग कुणाच्या वाट्याला येत नाहीत? घटस्फोटासारख्या क्लेशदायक प्रकारातूनही कित्येक जणांना जावं लागतं.
तुमच्याकडे कितीतरी plus points आहेत. घरचे पाठीशी आहेत, चांगली नोकरी आहे. वय तसं फारसं नाही, कोर्ट केस संपली आहे. मग कशाला जिवाला त्रास करून घ्यायचा. त्रास होतो, तसा तो झाला, आता मिटवून टाका की मनातून ती आठवण. तुम्ही म्हणाल, सोपं नाही. सोपं तसं काहीच नसतं. आपल्या मनाला शेवटी आपणच समजवावं लागतं. समुपदेशक एका मर्यादेपलिकडे काही करू शकत नाहीत.
स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःकडे लक्ष द्यायला शिका. दुसरा चांगला जोडीदार हवा असेल तर योग्य प्रयत्नांनी आणि योग्य वेळी नक्की मिळेल. त्यावरून का जीव कष्टवायचा. घरात आईवडील आहेत, त्यांच्यासोबत आनंदात वेळ घालवा.
सॉफ्टवेअर मध्ये आहात का? असाल तर ऑनसाईट मागून घ्या. परक्या देशात इतर नवीन गोष्टी अनुभवताना कटू गोष्टी विसरणं जरा सोपं जातं.

आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट:
असल्या अति वैयक्तिक गोष्टी शक्यतो ऑनलाईन फ़ोरम्सवर मांडू नका. अशा फ़ोरम्सना भेट देणारे सर्वच लोक सारख्याच चांगल्या मनोवृत्तीचे नसतात.


Rajkumari
Wednesday, April 09, 2008 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्रिश,
तुमचे बोलणे अजिबात कठोर नाही वाटले. तुमची कथा पण वाचली, मनाला चटका लावून गेली. तुम्ही म्हणता तसं कुणाचं दुःख मोठं आणि कुणाचं छोटं हे बिलकूल ठरवता येत नाही. पण मानसिक आरोग्य बिघडलं की सर्वं काही बिघडतं असं माझी एक मैत्रिण कायम म्हणते. आणि मला ते मनोमन पटते.
एकिकडे आपल्याला काही तरी हवे आहे, आणि त्याच बाबतीत आपण दुसरीकडे इतके साशंक आहोत, ह्या दोलायमानात जगणं खूप अवघड आहे.
तुम्ही सांगा विसरायचं तर कसं विसरायचं ते.
माझ्या सेपरेशन च्या दरम्यान माझ्या आयुष्यात एक मुलगा आला होता, तो अनमॅरीड होता. त्याची अट, माझ्या (त्याच्या) घरी माझा घटस्फोट झालाय हे सांगायचं नाही, मला ते मान्य नव्हतं. नंतर नंतर त्याने लग्नाबद्दल बोलणं ही टळायला सुरूवात केली. मग त्याने घरच्यांनी सांगितले तिकडे लग्न केले. लग्नं ठरेपर्यंत तो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होता. तो परदेशात होता, आणि मी त्याला शेवटी जेव्हा त्याबद्दल विचारणा केली तेव्हा त्याने माझे शिक्षण, जात पात काढले, आणि माझ्याशी लग्न करू शकत नसल्याचे सांगितले, मी उध्वस्त झाले. आपला कुणितरी निव्वळ उपयोग करून घेतला असे झाले. त्यातूनही मी बरेच काही शिकले.

Rajkumari
Wednesday, April 09, 2008 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यशवंत म्हटले त्याप्रमाणे मी त्यतूनही निट बाहेर आले, आणि ज्याच्यामुळे मला त्रास झाला होता त्यालाही माफ़ करून टाकले. आत्ताच श्रद्धा आणि तोनगा यांच्या पोस्ट्स पण वाचल्या...

खरंतर घटस्फ़ोटाचा क्लेश मी विसरूनही गेलेय. त्याबद्दल मला काही वाटत नाही. त्यानंतरची माझी मानसिकताच मला जास्त त्रास देतेय. अनुभवांती जास्ती शहाणपण आल्यामुळे असेल ते कदाचित. मुलगा असते तर एकटंच राहीले असते. मग असुरक्षिततेची कोणती भावनाच नसती.

मी फ़ार भावूक आहे, हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सुदैवाने मला चांगली माणसं जास्त भेटली. आणि ज्यांना वाईट म्हणावं अशी सुद्धा काही वाईट नव्हती, परिस्थिती मुळे तशी वागली असं धरून चालूया. बहूतेक माझ्या मनात बर्‍याच गोष्टी आहेत. आणि त्यांची सांगड मला घालता येत नाहीए.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators