Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 30, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Malaa vinodi vaTlele » Archive through March 30, 2008 « Previous Next »

Raviupadhye
Saturday, March 29, 2008 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालील काही प्रकार आपल्याला विचित्र वाटत असतील पण खूप प्रचलित आहेत.

-गरम गुलाब जामुन व व्हेनिल्ला आईस क्रीम्- यू पी व पन्जाब
-पुरण पोळी व आमरस्- उत्तर कर्नाटक्-विशेषत्: लिंगायत
-तुपात बुडवून भजी- कर्नाटक
-ज्यूस व हॉट कॉफ़ी एकत्र ऑर्डेर व पीणे सकाळच्या नाष्त्यात्- अमेरिकेत(निदान मी असताना तरी १९९७ मध्ये डेट्रॉईट मध्ये सकाळी बरेच वेळा पाहिले आहे-खरे खोटे-हल्ली- उसगांवकर व झक्कीजी जाणो)
-दहिभातात साखर्-बंगाली-विशेषत्: उन्हाळ्यात
-रबडी व जिलबी- यू पी व बिहार,एम.पी
बाकी मित्र जे अनेक ठिकाणी फिरलेत ते add करतीलच


Ajjuka
Sunday, March 30, 2008 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यातलं
ज्यूस आणि कॉफी हे माहिती असलं तरी कधी न जमलेलं आहे.

पण तुम्ही हे कॉम्बो चाखलंय का?
आमटीभात आणि वर आमरस.
मला कल्पनेनंही ढवळतं. माझा नवरा मिटक्या मरत खातो.


Tonaga
Sunday, March 30, 2008 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवनवीन कॉम्बो करून पहायला काय हरकत आहे? हल्लीची रूढ कॉम्बिनेशने अशाच प्रयोगातून जन्माला आली असतील. पूर्वी इथे माझे आवडते पदार्थ मला असे खायला आवडतात असा काहीतरी बी बी इथे होता त्यातही बरीच धमाल कॉम्बिनेशन्स होती.
अवांतर्- मासे आणि दही हा विरुद्ध आहार आहे ना?>>>>>
ही कल्पना आयुर्वेदात आहे. दोन्हीतले प्रोटीन्स काही शरीरात मिसमॅच झाले की त्याची reaction त्या त्या शरीरात येते. त्याला allergy असेही म्हणतात. पण हे पुन्हा व्यक्तीसापेक्षच. थम्ब रुल नाही. काही बंगाल्याना त्याचा निश्चित त्रास होत असणार.

Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक
गुलाब जामुन आणि आंबट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट दही- ओरिस्सा


Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा सौम्य प्रकार म्हणजे
शिरा व लिंबाचे लोणचे
चहा पोळी वा पुरी चहा-बुडवून


Ajjuka
Sunday, March 30, 2008 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>शिरा व लिंबाचे लोणचे
चहा पोळी वा पुरी चहा-बुडवून <<
हे दोन्ही बेफाम मस्त लागतात.
लिंबाच्या किंवा आंब्याच्या लोणच्याशिवाय शिर्‍याची मजाच नाही.
आणि संध्याकाळच्या खाण्यात काही केलेलं नसेल तर चहा पोळी किंवा कुठलीही पुरी चहात बुडवून मस्त वाटते. विशेषतः ती पुरी तिखटामीठाची असेल तर अजूनच. अर्थात भोपळ्याची गोड पुरी पण चहात बुडवून मस्त लागते.
बिस्किटं नाही बुडवत आपण चहात तसंच.


Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका- क्या बात है!!! मी हे माझे अत्यन्त प्रिय प्रकार घाबरत घाबरतच लिहिले आपल्या या आवडी same to same आहेत म्हणायच्या.
हल्ली मात्र मायबोली वर सगळच घाबरत लिहावं लागतं कोण मागून वार करेल सांगता येत नाही :-)


Tonaga
Sunday, March 30, 2008 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपाध्येबुवा अहो चहा पोळी विशेशत्: ती जेवढी शिळी असेल तेवढी उत्तम,हा स्वर्ग आहे स्वर्ग... ज्याने चहा पोळी खाल्ली नाही तो महाराष्ट्रीयनच काय पण माणूसदेखील नाही असे माझे (अतिरेकी)मत्त हाये.

शिरा आणि लोणचे? बघायला पाहिजे...

पन दिनेश साहेबांना आवडेल का हे सारे? खाण्याच्या बाबतीत त्यांचे मत इथे अंतिम मानले जाते म्हणून विचारलं... :-)

बरं, बाय द वे चहा आधी की पोळी? :-)


Tonaga
Sunday, March 30, 2008 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंबट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट दही आणि आंबट दही यांच्या चवीत काय फरक असतो?


ए. भा. प्र.


Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो अगदी गोड आणि कडक चहा वाफाळणारा त्यात बुडवा पोळी किंवा तिखटामिठाची पुरी मग काय राजा-स्वर्गच
दुसरा प्रकार चकली बुडवून किंवा तिखटामिठाचे शन्करपाळे-त्याच्या फाडलेल्या प्वाटात चहा चमच्याने ओतून :-)


Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंSSSSSSSSSSSSSSSSSSSSSबट्ट म्हणजे मेन्दूला जावून भिडणारा आम्बट पणा

Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी चर्बट पणा करू का?
चहा घ्या त्यात शेव टाका जरा जाडसर्-अन प्या-:-)


Karadkar
Sunday, March 30, 2008 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोणी आणि चकली
दही चकली
दही जिलेबी

आमरस आणि पु. पो. खाणे जमत नसेल तर तुम्ही लिंगायत नाही असे सरळ म्हणतात.


Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपमा आणि तूप ऐकले आहे का? भाताच्या मूदीवर ओततात तसे

Ajjuka
Sunday, March 30, 2008 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>उपमा आणि तूप ऐकले आहे का? भाताच्या मूदीवर ओततात तसे<<

ऐकलं नाहीये पण ते उत्तमच लागणार. तूप आहे ते वाइट कशाला लागेल!

Tonaga
Sunday, March 30, 2008 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चहा घ्या त्यात शेव टाका जरा जाडसर्-अन प्या>>>>
ये बात कुछ हजम नही हुई :-)

Tonaga
Sunday, March 30, 2008 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिटक्या मरत >>>>
??.. ??..?..???

Tonaga
Sunday, March 30, 2008 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंSSSSSSSSSSSSSSSSSSSSSबट्ट म्हणजे मेन्दूला जावून भिडणारा आम्बट पणा

>>>>आँ? आंबट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट दही खाल्ल्यावर पोटात न जाता मेन्दूकडे जाते?

ऐ. ते. न.


Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारू पोटात जाते पण चढते मेन्दूत्-:-) कसेंSSSSSS तस्सेSSSSSSS

Jo_s
Sunday, March 30, 2008 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरण पोळी, आमरस बरा लागतो एकदा खाल्लाय, पण ती पुरण पोळी पुण्यातल्या सारखी नसते.

शिरा आणि लोणचे? बघायला पाहिजे... चांगले लागते

इडली चहा ट्राय करा...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators