|
Psg
| |
| Tuesday, March 18, 2008 - 6:21 am: |
| 
|
मला इथला स्टॉक मार्केट गुरू केदारजोशी म्हणजे चष्मा, दाढीमिशीवाला, आडव्या अंगाचा आणि सतत विचार करणारा गंभीर असा वाटतो चाफ़ा (चाफ़्फ़ा नाही) उंच, गोरा, बारिक आणि सरळ नाकाचा आणि नेहेमी हसणारा असा वाटतो सशलशी माझी फ़ारशी ओळख नाही, पण सशल मला बुटकी, खूप गोरी, जाड, चष्मा/ लेन्सेस असलेली, खूप छोटे केस असलेली आणि बडबडी, शीघ्रकोपी वाटते ऑलिंपिक चॅंपियन मुकुन्द सतत टीव्हीसमोर किंवा लॅपटॉपसमोर बसून काहीतरी वाचत असेल आणि वाचता वाचताच कीबोर्ड चालवत असेल असे वाटते आत्तापर्यंतचा एकूण अनुभव पहाता, हे सगळे नक्कीच असे नसतील, अगदी विरुद्ध असतील माझ्या मनातल्या प्रतिमेपेक्षा ही खात्री आहे
|
Bee
| |
| Tuesday, March 18, 2008 - 8:07 am: |
| 
|
मला पूनम (ताई), सुश्मिता आणि ऐश्वर्या राई हून कैक पटीने सुंदर असणारी स्त्री वाटते
|
>>>>>> कुणी ऍडमीन आणि नेमस्तकाना पाहिले आहे का?>> हो हो मी पाहिलय..... अस मी म्हणू शकत नाही! :P पण ते कसे दिसत असतील याची कल्पना करू शकतो त्यान्च्या येथिल अनुभवान्वरुन! ऍडमिन तसे सरळ हिशेबी सुस्वभावी विचारान्चे म्हणजेच एकतर चौकोनी किन्वा गोलटक चेहर्याचे असणार! गोलटक चेहरा म्हणजे गोबरे गाल! उभण्ट्या चेहर्याला, गालफडे वर आलेल्याला इथे स्थान नाही! भिवया जाड असणार, मिशा ठेवलेल्या असतीलच असे नाही, कानाच्या पाळीवर मात्र केस असू शकतात! डोक्यावर मात्र भरपुर केस असतील, केसाची एखादी चुकार बट पान्ढरी देखिल झालेली असेल! चेहर्यावर मिश्कील हसू असेल! चश्मा???? अं? अं? अं? असेल असेल! असावाच! त्याशिवाय ऍडमिनला शोभा नाही! व्यक्ती बुटकी असेल! बहुतेक सर्व थोर थोर व्यक्ती प्रत्यक्षात उन्चिने बुटक्याच असतात! माणसाच्या उन्चिचा कर्तुत्वाशी सम्बन्ध नसतो! व्यक्ती सावळी असेल! भितीदायक वाटाव अस ऍडमिन मधे काहीही नसेल! उलट आपुलकि जिव्हाळा वाटेल असेच आपले ऍडमिन असतील असे वाटते! आता बघु मॉडरेटरबाबत! मॉडरेटर म्हणल की मला शाळेतल्या कोणत्याही इयत्तेतला बळीचा बकरा म्हणून उभा केलेला वर्गाचा मॉनीटर आठवतो! पिढ्यान पिढ्या बदलल्या! गावे बदलली, पण मॉनिटरच्या कथा अन व्यथा त्याच त्या राहिल्या! (मॉनिटरच्या कथा अन व्यथा या नावाचा बीबी आत्ता पर्यन्त का बरे सुरू झाला नाही??????) तर असो! मॉड म्हणजे डोळ्यावर जाडभिन्गाचा नाकावर उतरलेला चष्मा हवाच हवा! रन्ग गोरा! डोळे असल्यास घारे, किमान भुरे, नसल्यास वटारलेले तरी हवेतच! कपाळाला कायम आठ्या! पुरुष असेल तर आडव्या, स्त्री असेल तर उभ्या! नजर तीक्ष्ण शोधक सावध! मोजकेच जेवढ्यास तेवढे बोलणे! स्वतःहून विषय काढणे नाही! यान्ना कधी कुणी खळखळून हसताना बघणार नाही! हसले तरी ओठान्ची दाताभोवतीची मिठी काही सुटणार नाही! मूळात हसणार नाहीत, हसले तरी आभार उपकार केल्यागत! चिडले तर मात्र यान्चा अवतार बघण्यासारखा होतो! खाद्यावरच्या पिशवीशी चाळा करीत, जणुकाही पिशवीतून लॅपटॉप काढून समोरच्यास तत्काळ तडीपारीची शिक्षा फर्माविण्यास बोटे चाळवावित तसे यान्चे हात रागाने वळवळत असतात! ओठान्ची थरथर होत अस्ते, पण सर्व शब्द कॉम्प्युटर मार्फत लिहायची सवय लागल्याने तोन्डातून एक अक्षर बाहेर फुटत नस्ते.....! डोळे सन्तापाने नुस्ते आग ओकीत असतात! शहाण्याने अशावेळेस त्यान्च्या समोरून नजरेआड व्हावे हे उत्तम! कुणी मला सान्गेल का हो असेच अस्तात का हो ऍडमिन अन मॉड???????
|
नंदिनी मला 'हम दिल दे (के) चुके' सनम मधल्या ऐश्वर्यासारखी वाटते (नावात बरंच काही असतं!) >>>> तुझ्या स्पोर्ट्सवाल्या मित्राना विचार ना... ते मला डॉन म्हणतात म्हणे.. गिरी, पोरटी काय रे?? इतकी पण लहान वाटत नाही मी. बाकी ऍडमिन मला जसे वाटले होते तसेच निघाले. चेहर्यावरून प्रचंड शांत वाटतात. पूनम, तुझी बरोबरी सुश आणि ऍशबरोबर... अयाई गं.. मास्तुरेनी ऐकले तर
|
Kandapohe
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:18 pm: |
| 
|
ईकडे अधुन मधुन चक्कर मारलीच पाहीजे. धमाल आहे. 
|
Chyayla
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:42 pm: |
| 
|
मला इथला स्टॉक मार्केट गुरू केदारजोशी म्हणजे चष्मा, दाढीमिशीवाला, आडव्या अंगाचा आणि सतत विचार करणारा गंभीर असा वाटतो पूनम, हो अगदी अगदी माझ्याही डोक्यात हीच प्रतिमा होती याउप्पर मला केदार खुप वयस्कर असेल असे वाटत होते. पण छे... एक दिवस केदारचा फ़ोन आला आणी मी त्यांच्या हॉटेलवर भेटायला गेलो गाडी पार्क करुन विचार केला समोर जो कोणी देशी असेल तेच केदार जोशी. तेवढ्यात केदारच माझाकडे च्यायला अस माझ्या आयडीचा उद्धार करुन आलेत. केदारला चष्मा नाही, दाढी नाही पण मिशी मात्र आहे. अंगान आडवे आहेच व एके काळी बरीच दाणगाई केलेली दिसतेच तसे तेही कबुल करतात. बोलणे व्यवस्थित व हळुवार. बर्याच आयड्यांची चर्चाही झाली. आणी हो तोंडात तसच "च्यायला" हा शब्द बसलेला. मी एकदा विचारलेही की माझा आयडी ईतका आवडला की काय? खुप जणान्ना नाही आवडत.. तर तो शब्द कधिचाच तोंडात बसलेला असल्याचे सांगितले. पण हो हा माणुस एकदम दिलचस्प आहे यात वाद नाही. केदारजोशी तुमची काही गुपित उघड केलीत गरज पडल्यास "गिरीराज बादल्या" घ्या नाही तर "झकास बंब सेवा" आहेच
|
केदार नावाची मुलं मला पांढरी फ़टक , चपचपीत तेल लावलेली बाळू टाईप ची असतील असच वाटतं . पूनम मला एकदम टिपिकल वेणी घालणारी , घारी गोरी , कायम सलवार कमीझ मधेच वावरणारी साधी मुलगी वाटायची पण प्रत्यक्षात वेगळी खूप वेगळी आहे . 
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:08 pm: |
| 
|
साधी मुलगी वाटायची पण प्रत्यक्षात वेगळी खूप वेगळी आहे>>>>> अच्छा म्हणजे साधी नाही आहे...
|
Bee
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:48 pm: |
| 
|
गिरिराज मला सणकी नाना पाटेकर सारखा वाटतो :-)
|
अच्छा म्हणजे साधी नाही आहे... <<<अरे म्हणजे या गडकर्यांनी तिला ' वहिनी ' कॅटेगरी मधे बसवलय तशी टिपिकल वेणी - गोरी - घारी - सलवार कमीझ या टिपिकल स . पे . personality मधली नाहीये पूनम ! :० गडकर्यांच्या नामाकरणामुळे अशा अनेक विचित्र images तयार होतात . ' मीनु ' ही ' आज्जी ' म्हणून famous आहे म्हणून मला एक लठ्ठ , आंबाडा वाली , जाड भिंगाचा चश्मा वाली लोकांना तत्त्वद्यान सांगणारी बाई डोळ्या समोर यायची पण बिचारी मीनु किती साधी आणि मॉड आज्जी आहे राहुल फाटक ला योण्णा म्हणतात , या नावा मुळे तर फ़क्त म्हातारा रजनीकान्त च डोळ्या समोर येतो ! ~D~D
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:01 pm: |
| 
|
स . पे . personality >>>>> म्हणजे काय?
|
Tonaga
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:03 pm: |
| 
|
गिरिराज मला सणकी नाना पाटेकर सारखा वाटतो :-) >>>>मला तर तो अमजदखान सारखा वाटतो....
|
Amruta
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:04 pm: |
| 
|
म्हणजे सदाशिव पेठी हो
|
Arch
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:05 pm: |
| 
|
मनु ... छोटीशी, नाजुकशी. पण सदा वादविवादाला तयार असलेली.
|
Amruta
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:06 pm: |
| 
|
टोणगा म्हणजे शाळेत शेवटच्या बेंच वर बसुन उनाडक्या करणारा पोरगा वाटतो. 
|
च्यायला माझी गुपीत उघडी करतोस काय? पुनम अंगाने आडवा नाही तर वेल बिल्ट म्हण बाई (थोड क्रेडीट द्या की राव. एकेकाळी रोज मेहनत करुन कमावलेले शरीर आहे ते. ( तुझ्यावर cnbc च्या ऐनेलिस्टच्या प्रभाव पडला वाटत तेथील लोक जाड, चश्मेवाले वैगरे असतात.) चश्मा आहे रे च्यायला पण दिवसा गॉगल होत असल्यामुले तुला लक्षात नाही आला. डिजे मी पांढरा नाही आणि चपचपीत तेल ही लावत नाही.
|
टोणगा म्हणजे शाळेत शेवटच्या बेंच वर बसुन उनाडक्या करणारा पोरगा वाटतो. <<<<मला उलट टोणगा म्हणवून घ्यायची सूप्त इच्छा असलेला पण प्रत्यक्षात टोणगागिरी करायची हिंमत नसलेला अतिशय shy मुलगा डोळ्या समोर येतो ! :0 डिजे मी पांढरा नाही आणि चपचपीत तेल ही लावत नाही. <<<<केदार , अहो तसे मी imagine केलेलं वर्णन कुठल्याच personalities ना match होत नाही ! 
|
Arch
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:14 pm: |
| 
|
Deeps , सध्या मुक्काम पोस्ट कुठे?
|
आर्च : अजुन एक week इस्तंबूल ला आहे ' आर्च ' म्हंटल्यावर मला अर्चाना जोगळेकर किंवा अश्विनी भावे डोळ्या समोर येते . 
|
आर्च ' म्हंटल्यावर मला अर्चाना जोगळेकर समोर येते >> अनुमोदन. मलाही बरेचदा तसे वाटते पण मग आर्च सिस्टीम्स मध्ये आहे त्यामुळे एकाचवेळेसे ती कॉम्प वर काही तरी खडबड करुन एकादा सर्वर डाउन करताना लगेच तिच्याकडे आलेल्या मुलींना हा पाय असा नाही ठेवायचा ती बघ कशी चांगली नाचतीय असे सांगनारी आर्च डोळ्यासमोर येते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|