Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 12, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » सौदागर » Archive through March 12, 2008 « Previous Next »

Sas
Thursday, March 06, 2008 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच लिहल आहे ह. ह. पु. वा. :-) पण................
सौदागर हा चित्रपट काही इतका अ. आ. नाही हो :-) फुग्यांच Logic (?) विसरला की काय???... दोन्ही गावात दोनच 'छकुले' विवेक आणी मनिषा जे फुगे फुगे खेळतात ते ही ३ च रंगाचे (कोणा तिसर्‍याने, विशेषता व्हिलनने हवेत फुगा सोडला तर ह्यांच Confusion नाही का होणार ??हि धस्ती आणी काळाजी मला चित्रपट संपे पर्यंत लागली होती) :-)

Gobu
Thursday, March 06, 2008 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ार एन्ड, सही! !! !!!

Prajaktad
Thursday, March 06, 2008 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वास्तविक तेव्हा दिलीपकुमार एवढा म्हातारा दिसतो की वधुपिता म्हंटला असेल "नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो". >>>
पण नेत्यांची दिलजमाई होऊन त्यांनी प्रीतीभोजन करावे आणि इकडे त्याचा पत्ताच नसल्याने कार्यकर्त्यांत मारामार् 0dया व्हाव्यात तसे यांचे लोक मारत आणि मरत राहतात>>>>


Kedarjoshi
Thursday, March 06, 2008 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लैच भारी रे भो.

Sashal
Thursday, March 06, 2008 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल लिहीलंय ..



Runi
Thursday, March 06, 2008 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच अतर्क्य आहेत या सगळ्या गोष्टी. मी पाहिला नाहिये हा सिनेमा आणि आता हे वाचुन वाटतय की कधी टीव्ही वर लागला तर टिंगल-टवाळी करत बघायला हरकत नाही.
खर तर असे अनेक सिनेमे त्या काळात (शाळा-कॉलेजात असतांना) अगदी आवडीने मैत्रीणींबरोबर जावुन कसे काय पाहीले सहन केले होते कोणास ठावुक. तेव्हा तेवढी अक्कल नव्हती म्हणुन असेल कदाचित किंवा सिनेमा बघायची कारणं वेगळी असायची उदा. हीरो खुप आवडणे, गाणी आवडणे, हिरॉइन चे ड्रेस किंवा इतर फॅशन्स आवडलेत म्हणुन सिनेमा बघणे असे बरेच काय काय.
त्या काळात या सगळ्या अश्या अतिमहत्वाच्या गोष्टी बघण्यातच सिनेमाचा सगळा वेळ जात असल्याने खरे कथानक काय आहे, कुठे काय चाललय याच्याशी काहीही देणं-घेणं नसायच.


Zakasrao
Friday, March 07, 2008 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


महान लिहिल आहेस.
हुंडा, poison लिहिलेल्या बाटलीतल विष, ILU चा अर्थ न कळणे जब्बरदस्त पंचेस आहेत. :-)

मला एक प्रश्न पडला आहे. ह्याच एकाहुन एक अचाट चित्रपट देणार्‍या सुभाष घई ला शोमॅन का म्हणायचे??


Sanghamitra
Saturday, March 08, 2008 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यापेक्षा मी हुंडा देतो...
परवान्याची मूळ प्रत..
साधारण पन्नाशीचे झाल्यावर..
अगदी अगदी. सॉल्लीड हसले. अशी (मनिषा करून दाखवते तर आपण का नाही? प्रत्येक शब्दाचे diagramatic representation. )
पण सुभाष घईचे लॉजिक बघ. ज्यांना हवाय त्यांनी अभिनेत्यांसाठी बघावा, काहींनी ष्टोरीसाठी बघावा आणि काहींनी इनोदी म्हणून बघितला तरी चालेल.
तो राजकुमार त्याच्या शायनिंग मारण्यामुळं कायम डोक्यात जातो. आणि चेहर्‍यावरची रेष हलेल तर शप्पत.
वय वाढल्यावर काही एक maturity यावी हे काय नाहीच.
हे लोक black n white मधे किती छान दिसतात. ते तेंव्हा तरूण होते हे तर आहेच पण दिग्दर्शन पण किती सौम्य असायचं तेंव्हा.
पण पिच्चर भारी होतं काय पन म्हना. काय ट्रॉली गारगार फिरवलिया. काय त्या हिरव्या वाद्या(वादियाला मराठी काय म्हणायचं. दर्‍याखोरी कसलं रुक्ष वाटतंय.), काय त्या नद्या, काय ते सैनिक, काय ती गाणी अन नाच आणि काय ती खानदानी दुश्मनी.
यासाठी बघतं पब्लिक! बस!


Vijaykulkarni
Sunday, March 09, 2008 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अतिशय सुन्दर परिक्शण
त्यातले इमली का बीडा हे गीत तर अचाट आहे. एका ओळीचा दुसर्‍या ओळीशी सम्बन्ध नाही.

त्या गाण्यावरून पु लन्चा उखाणा आठवतो

समोरच्या देव्हार्‍यात बसली हिन्दमाता.
XXX चे नाव घेते माझा नम्बर पहिला.


Farend
Monday, March 10, 2008 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो धन्यवाद आवडल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल

टोणगा, बरोबर, दिलीप कुमारचा रोल खूप चांगला आहे. दिग्दर्शकाने त्याचे एक दोन ठिकाणी हसे करून ठेवले आहे. तो लग्नाचा शॉट ते तरूण असताना का नाही दाखवला कोणास ठऊक?

अज्जुका, त्या तिघींचे जेवढे शॉट मी पाहिले त्यात काही सुचले नाही. कदाचित मी मधे १०-१५ मिनीटे डुलकी मारली तेव्हा काही येऊन गेले असावेत :-)

स्वाती, मृण्मयी, तुम्हाला (किंवा कोणालाच) पाहण्यापासून परावृत्त करण्यासाठी हे लिहिले नाही :-) उलट आता जरूर पाहा. आणि पाहताना या लेखाची आठवण झाली आणि पाहताना मी जेवढा हसलो तेवढे तुम्हालाही हसू आले तर तर मला आवडेल.

Sas ती फुग्याची भानगड मलाही नीट कळाली नाही.

झकास, आता जरी हे हास्यास्पद वाटले तरी त्या त्या वेळच्या आवडीप्रमाणे लोकप्रिय चित्रपट बनविण्याची हातोटी सुभाष घईकडे आत्ता आत्ता पर्यंत होती... क्रोधी, कर्ज, हीरो, कर्मा, राम लखन, सौदागर वगैरे पर्यंत. मग जरा ते जमले नाही त्याला. तरी परदेस, ताल वगैरे बरे होते. पण त्रिमुर्ती, यादे वगैरे खास नव्हते.

चिन्नू, ते कपाळाला कपाळ वगैरे मलाही हसू आले होते :-)

रश्मी, आधी म्हणे त्याला घरापासून लांब ठेवलेला असतो. पण घरी आलेला असताना त्याच्या आईने का लपून भेटायचे ते कळाले नाही. नंतर जरा ती चार्ज घेताना दाखवली आहे, पण एकूण 'वेळ मिळेल तसा' रोल दिसतोय :-)


Mrinmayee
Monday, March 10, 2008 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल, हे परिक्षण वाचण्यातच येव्हडी मजा आली, की आता आवर्जून बघण्यासारखं काही उरलं नाही सौदागरात असं वाटलं!
काल नवर्‍याला वाचून दाखवलं! येत्या वीक एंडला मित्रमंडळींसमोर जाहीर वाचन करणार आहे! खूप दिवसांनी इतकी पोट दुखे पर्यंत हसलो दोघेही!
एक विनंती, 'जींदा जला कर राख कर दुंगा, पाप को जला कर राख कर दुंगा आणि तत्सम सिनेमे' मायबोलीकरांसाठी बघ,परिक्षण लिही! पुण्य लागेल :-)!


Simm
Monday, March 10, 2008 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend--next project for you--"Tum Ho Naa"--cast Jackie Shroff--and two other women (hate to call them actresses)--don't know their names.

Ajjuka
Tuesday, March 11, 2008 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक next project ... मैने प्यार किया


Dakshina
Tuesday, March 11, 2008 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि "दूध का कर्ज"...?

Zakasrao
Tuesday, March 11, 2008 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि "दूध का कर्ज"...? >>>>
कुणाशी पुराणी दुश्मनी असेल तर दक्षिणाने उल्लेखलेला चित्रपट मराठीत डबिंग होउन आलाय तो दाखवावा. त्याचे नाव आहे कर्ज दुधाचे.


Ankyno1
Tuesday, March 11, 2008 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्ज नाही......

"उपकार दुधाचे"


Farend
Wednesday, March 12, 2008 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, काय प्रतिक्रिया मिळाल्या जरूर सांग वीकेंड च्या वाचनानंतर.

हे नवीन प्रोजेक्ट लक्षात ठेवतो :-) यातील कोणतेच अजून पाहिलेले नाहीत पण काही नावातच जोरदार दिसतात.


Ajjuka
Wednesday, March 12, 2008 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपकार दुधाचे/ दूध का कर्ज म्हणजे hollywood flick 'The Hand That Rocks the Cradle' ची अत्यंत डबडी नक्कल आहे.
'आचल के अंदर क्या है
तबाही तबाही!'
असलं एक भयावह गाणं आहे ज्यावर जितेंद्र (60 trying to be 35) आणि अनू अगरवाल नावाची एक कळकट तेलाची बाटली हे दोघे नाचत असतात. आणि वर्षा उसगावकर नावाची एक बाई जी जितेंद्रची बायको असते ती प्रोत्साहन देत असते.

फारेंडा तुला लिहायला एवढं आमिष पुरेसं आहे ना? :-)


Nandini2911
Wednesday, March 12, 2008 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ई ई ई ई
हा काय तो पिक्चर???
आता आठवला मला.... जया प्रदा आहे ना यात???
आणि अनु अगरवाल व्हिलन असते


Shraddhak
Wednesday, March 12, 2008 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो ' आंचल के अंदर ' गाणंवाला सावनकुमारचा ' खलनायिका ' . त्या अन्नु अगरवाल व्हिलनीण आहे हे बरोबर.

दूध का कर्ज म्हणजे जॅकी श्रॉफ़वाला.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators