Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 29, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through February 29, 2008 « Previous Next »

Bee
Thursday, February 28, 2008 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'क' सीरीयल म्हणजे नक्की काय म्हणायचे भुरे तुम्हाला?

फ, असे वाटते तू जणू पुणे विद्यापिठात मराठी विषयात Ph D करतो आहे :-)


Bee
Thursday, February 28, 2008 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, तू झक्कींचे पोष्ट हल्ली वाचत नाहीस का? ज्या शब्दांना मराठी शब्द आहेत त्यांना तू मिंग्लिश मधे लिहितेस :-)

Ajjuka
Thursday, February 28, 2008 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकुरबाबा आता तुझं काही खरं नाही रे.

Bee
Thursday, February 28, 2008 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुझ्या शब्दांची धार ही तलवारीच्या धारेपेक्षा काही कमी नाही. हव तर तू हे १००० खिशांची full-pant घालणार्‍याला विचारून घे :-))

Ajjuka
Thursday, February 28, 2008 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही त्यात बोलू नये बी.

Ankyno1
Thursday, February 28, 2008 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,

चलता है....

माझी मानसिक तयारी आहे....


Nandini2911
Thursday, February 28, 2008 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल जंपर पाहिला. फ़िल्म छोटी आहे. साधारण दीड तास इतकीच. पण कल्पनेची आयडीया भन्नाट आहे. लोकेशनचा बेस्ट वापर. :-) पण बाकी सर्व एकदम फ़ालतू.. मजा नही आया

Tiu
Thursday, February 28, 2008 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The moderators (sometimes) give me a very bad feeling of biased behaviour!

मघाशी इथे असलेलं टोणगा ह्याचं पोस्ट ज्यांनी वाचलं असेल त्यांना मी काय म्हणतोय ते कळेल. टोणगाचं पोस्ट मला जितकं खटकलं तितकंच अज्जुकाचं पोस्ट आणि टोणग्याच्या पोस्टला तिने दिलेलं उत्तरही खटकलं. एक सर्वसामान्य वाचकाचं हे मत आहे. मॉडरेटर म्हणुन तुम्हाला दोघांच्या पोस्टमधे काय फरक दिसला की एकाचं पोस्ट उडवलं आणि त्याच विषयाशी संबंधीत दुसर्या व्यक्तीचे तितकेच उपहासात्मक पोस्ट्स अजुनही इथेच ठेवले?

होतं काय की सगळे जण सिद्धहस्त लेखक नसतात. एखाद्याला असलं उपहासात्मक लेखन करुन आपला कार्यभाग साधणं (म्हणजे ज्याला उद्देशुन लिहिलंय त्याला उचकवणं) जमतं. मग तो समोरचा माणुस भावनेच्या भरात काहितरी अद्वातद्वा लिहुन उत्तर देतो...
दोन्ही प्रकार तितकेच वाईट! पण शेवटी एकच व्यक्ती वाईट ठरते.


Ajjuka
Friday, February 29, 2008 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चोराच्या उलट्या बोंबा चा प्रत्यय आला.

जे म्हणायचेही नव्हते ते म्हणलेच आहे असे ठरवून, लादून वाट्टेल ते बोलतो अगदी दुसर्‍याचा जन्म कुठे झाला त्यावरून, तो बिचारा झाला का आता? वा वा! सर्वसामान्य वाचक माय फूट... डुप्लिकेट आयडीज असले की असं बरं असतं.

डोळ्यांच्या खाचा झाल्या का? माझंही पोस्ट उडवलंय इथलं ते दिसलं नाही वाटतं.


Meghdhara
Friday, February 29, 2008 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिउ आणि सगळेच

अज्जुकाला उचकवण्यासाठी मी नक्कीच लिहिलं नव्हतं. तेवढी माझी ऐपत नाही.
पण मुळ उद्देशच कुठेच आणि कुणाला पोचला नसेल तर तो उद्देश मी माझ्याकडेच ठेवलेला बरा.

जे काही वाचलं भाषा जरा जास्तच हेटाळणीची वाटली ते व्यक्त केलं.

हं. एक चूक नक्की झाली.
हा काय विनोद होता? .. पुढचा सर्कॅसम मनातल्या मनात ठेवायला हवा होता. त्याबद्दल नक्कीच क्षमस्व.

बाकी वाटलं होतं 'तुम्हाला कुणाचण काही नाही पटलं की तुम्ही बोलता तसेच तुमच्याबद्दल काहीतरी न आवडलेले तुमच्याबद्दल बोलु शकतात' हे व्यक्तीस्वातंत्र्य मी नक्कीच घेतले.

सन्मित्रा इथे काही लिहायचीच सोय नाही.. म्हणायचं काहीच कारण नाही. फक्त मलाच कदाचीत त्यातली गम्मत पटली नाही. आणि हे तेवढं महत्वाचं नाहिये.

अज्जुक्का तु आधी तुझ्या लिखाणामुळे आणि नंतर श्वास थ्रू एक लक्षात राहिलेली व्यक्ती.तुझ्या पोस्टमधे टीकेपेक्षा हेटाळणी जास्त वाटली (माझी चूक)आणि एका (मायबोलीमुळे) ओळखीच्या सिनेमावाल्याकडुअन आपल्याच क्षेत्रातल्या माणसाच्या कामाबद्दल राखून बोलण्याची अपेक्षा केल्याने मी (सिनेमाशी बघणं सोडुन काही संबंध नसताना) उगाच संतापले. जशी काय सगळ्या जगाची चांगुलपणाची धुरा माझ्या डोक्यावर आहे. असो. माणूस हळूहळू सुधारतो. मीही सुधारेन.

मॉडरेटर, दोन्ही जवाबदार व्यक्तींच्या विनंतीवरुन तुम्ही त्यांचे पोस्ट उडवले हे ग्रुहीत धरुन तुमच्यावर विश्वास व्यक्त करते.

मेघा







Ajjuka
Friday, February 29, 2008 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>'तुम्हाला कुणाचण काही नाही पटलं की तुम्ही बोलता तसेच तुमच्याबद्दल काहीतरी न आवडलेले तुमच्याबद्दल बोलु शकतात'<<
म्हणजे परत तोच मुद्दा झाला. हेटाळणीचा सूर त्या चित्रपटाविषयी होता कुठल्याही कष्टकरी वर्गाविषयी नाही हेच तुम्हाला समजून घ्यायचं नाहीये.




Ankyno1
Friday, February 29, 2008 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी मला एल सांगू शकेल का.....

या फिल्मी काँट्रोव्हर्सीज कायम फालतू विषयावरूनच का चालू होतात?

उदा.
'आजा नच ले' मधल्या एका गाण्यातल्या काही शब्दांवरून लोकंनी गदारोळ केला...
आता ते शब्द कोणाचाही काहीही अपमान करण्याच्या हेतूनी लिहिले गेले नव्हते... एक उदाहरण देणे एवढाच त्याचा उद्देश होता...
पण काही लोकांना उगाचच असं वाटलं की त्या शब्दांमधून त्यांचा अपमान होतोय.... आणि त्यांनी लगेच हिंसक मार्गाचा अवलंब केला....

सेन्साॅर बोर्डानेही गाण्यातले त्या शब्दांवर कात्री चालवली आणि एकाप्रकारे लेखकाच्या प्रतिभेला फटकारलं....
हे म्हणजे सायमंड्स च्या तक्रारीवर हरभजन वर बंदी आणण्यासारखंच आहे.....

कलियुगाचे परिणाम.... दुसरं काय....

असो...
नवनवे सिनेमे येतायत....
नवनवीन काँट्रोव्हर्सीज साठी तयार रहा....

कारण...
समाजात एक गट असा आहे ज्याला सतत कसला ना कसला त्रास होत असतो... आणि ही चिड चिड व्यक्त करायला तो कारण शोधत असतो.... आणि त्याला कुठलेही फालतू कारण चालतं...
ही विरोधक मनोवृत्ति लवकरात लवकर नष्ट व्हावी ही इछा....


Aaftaab
Friday, February 29, 2008 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच झूमवर Mr and Mrs Iyer पाहिला..
अप्रतिम! ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी जरूर पहावा..


Ajjuka
Friday, February 29, 2008 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पब्लिसिटी स्टंट हेच उत्तर जास्त योग्य वाटते नाही का अंकुर?

Tiu
Friday, February 29, 2008 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्याला असलं उपहासात्मक लेखन करुन आपला कार्यभाग साधणं (म्हणजे ज्याला उद्देशुन लिहिलंय त्याला उचकवणं) जमतं.

सर्वसामान्य वाचक माय फूट... डुप्लिकेट आयडीज असले की असं बरं असतं.

अज्जुका, Thanks for proving my point!

मेघधारा...ते पोस्ट तुम्हाला उद्देशुन नव्हतं. गैरसमज नसावा!

अवांतर: डुप्लिकेट आयडीचा उल्लेख करण्याचं प्रयोजन समजलं नाही. विनाकारण हवेत तीर मारू नये. चुक झाली तर खुल्या मनाने कबुल करावी! असं केल्यानी आपल्याला कमीपणा येत नाही...


Ankyno1
Friday, February 29, 2008 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,

पब्लिसिटी स्टंट मधे कोणी स्वत चं अथवा स्वतच्या कलाकृतीचं नुकसान करून घेत नाही....

बरेचदा पब्लिसिटी साठीच काँट्रोव्हर्सीज केल्या जातात....
पण मी दिलेलं उदाहरण नीट वाच....

तिथे काही लोकांची उगाचच विरोध करण्याची प्रवृत्तीच दिसते....


Ajjuka
Friday, February 29, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकुर,
दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत.

टिउ,
जर मी कुणाला कमी लेखलेलंच नाही तर तुम्ही मी ते तसं केलंच आहे आणि त्या चुकीची मी माफी मागावी असं का सारखं सारखं सांगताय. असल्या वागण्याने डुप्लिकेट आयडीची शंका येणं हे अजिबात चुकीचं नाही आणि तुम्ही जर माझ्यावर नाही त्या गोष्टी तुमचं व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून थोपणार असाल तर तेच व्यक्तिस्वातंत्र्य मलाही का नको?


Ajanukarna
Friday, February 29, 2008 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून थोपणार असाल?


थोपणार हा काय प्रकार आहे? हिंदीच्या प्रभावामुळे चुकीच्या अर्थाने शब्द वापरू नयेत. मराठी थोपणे आणि हिंदी थोपणे यांचे अर्थ पूर्णपणे वेगळे आहेत.

मोल्सवर्थ मध्ये थोपणे चा मराठी अर्थ बघा.


http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87&display=simple&table=molesworth

अज्जुका यांनी इथे लादणार हा शब्द वापरणे अधिक योग्य होते.

हिंदाळलेल्या मराठीत सरकार चे 'शासन' झाले. आधी लोकांची व्यक्तीमत्त्वे संपन्न असत. आता कुठलाही गल्लीबोळातल्या गटाराकाठचा कार्यक्रम 'संपन्न' व्हायला लागला त्यातलाच हा प्रकार आहे.


Deepanjali
Friday, February 29, 2008 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ankyno1,
तुम्ही लाल रंग का वापरता लिहिताना , उगीच भांडताय असं वाटत . :-)


Zakki
Friday, February 29, 2008 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे काय विषय चालला आहे हो? कुणा दोघांचे पटत नसेल तर खाजगी पत्रे लिहीता येतात. इथे सर्वांनाच त्या व्यक्ति नीट माहित नसतात, तर त्यांचे काय लिहीले आहे, त्याचा संबंध विषयाशी काय, हे कळत नाही.

उगीच आपले, आपल्या लिखाणाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करायचा. आता सगळे जण एकाच जगात रहात असताना, तुमच्या अस्तित्वाचाच काही लोकांना त्रास होतो! पण म्हणून काय उगीच भांडणे जाहीरपणे करायची का? म्हणजे इतके दिवस असेच झाले, नि त्यात मीहि भाग घेतला होता. गंमत म्हणून, पण आग विझायच्या ऐवजी वाढतच गेली!!

तर आता पुरे करा. सांगूनहि जर कुणि आपलेच बरोबर आहे असा आग्रह धरून बसेल तर राहू द्यावे. आपापल्या वर्तणुकीचे परिणाम भोगतील ते! आपण कोण ठरवणार त्यांचे चुकले का बरोबर?




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators