Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through February 28, 2008 « Previous Next »

Itgirl
Monday, February 25, 2008 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका,
.. .. .. ..


Ankyno1
Monday, February 25, 2008 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोधा अकबर...

थिएटर मधील पब्लिक च्या काही सीन वरती काॅमेंट्स.....

१. ऐश्वर्या हृतिकला जेवण पेश करते....
"पुण्यात मेस काढ!"
"माला भूक....!"

२. हृतिक सूफी गाण्यात नाचतो...
"कोई मिल गया...!"

३. ईला अरूण ची एंट्री....
"च्यायला... तेंव्हापसून दिल्लीत घागरे घुमवतीये...!"

४. एकांत....
"ए.... फमिलीवाले पण आलेत..!"

५. हृतिक ऐश्वर्या ला दरबारात जवळ बोलावतो....
"एकांत...!"


Ajjuka
Monday, February 25, 2008 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मनू
जर तेव्हा सेफ्टीपिना होत्या तर आरसे आणि मेणबत्त्यांचं काय घेऊन बसलीस. :-)

आणि तेव्हा लो वेस्टची पण पद्धत होती (अकबराचा अंगरखा), होजियरी किंवा जर्सी नीटेड fabric अस्तित्वात होते (अकबराच्या व सेनेतल्या मेन लोकांच्या चिलखताखालचा अंगरखा) आणि तेव्हा शांपू होता (सगळ्यांची उडती झुल्फे!) आणि तेव्हा सिंथेटिक जॉर्जेट्/ शिफॉन होतं, आणि तेव्हा प्लॅस्टिकची जर होती. आणि शहेनशाहची सख्खी बहिण तेव्हा १५० रूपयेवाल्या सिंथेटिक चकचकीत साडीतून कापलेली कम्प्लिट भांडीवाली छाप ओढणी वापरायची, सर्व मुसलमान बायकांच्यात समोरचे केस मागे नेऊन back combing करून फुगवायची पद्धत होती, आणि त्यावेळी राजा सोडून कुणालाही मापाचे, खांदे न उतरणारे, ओंगळ ढगळ न दिसणारे असे कपडे घालायची परवानगी नव्हती अगदी राजाच्या सासर्‍याला सुद्धा.

पिरिअड फिल्म करताना २ मेन लोकांना बरे कपडे (केवळ workmanship wise ) दिले आणि बाकिच्यांना ड्रेसवाल्यांकडचा कॉलेजच्या गॅदरींगसाठी असलेल्या स्टॉकमधून कपडे वापरले की चालते असं नाही. इथे मग भानू अथैय्या वेगळ्या दिसतात ना. मॉब असला तरी त्यातला कोणीही वेगळ्या ग्रहावरचं, वेगळ्या काळातलं दिसत नाही. प्रेक्षकाला तपशील माहित नसले तरी हे बरोबर नाहीये हे कुणीही सांगू शकतो. प्रेक्षकांना इतकं गाढव समजता की काय तुम्ही?

स्वाती,
खरबंदा म्हणजे कधी ऍसिडिटी कधी 'आती नही!' अशी अभिनयातली व्हरायटी. श्या तुम्हाला एवढी subtle काही कळायची पात्रताच नाही... ही ही ही.. (दिवे घे गं!)


Swa_26
Monday, February 25, 2008 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही..... अज्जुका!!
अगं त्या जोधा अकबराच्या लग्नाआधी जोधा अटी सांगते त्या सीननंतर तर तो खरबंदा असा काही पोटावर हात फिरवतो, कि जसा काही आताच जेवणावळ झोडुन आलाय, ४ घास जास्त खाल्लेत नि आता हवाबाण हरडे घ्यावे लागेल!!


Zakki
Monday, February 25, 2008 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार लोकहो.

अखेर 'तो' चित्रपट पाहिला. वामकुक्षीचे खोबरे करून गेलो होतो. खुर्चीत बसून जरा निद्रादेवीची आराधना करावी म्हंटले तर चित्रपट सुरु झाला नि कुणी बेहेरा खान मोठ्ठे डोळे करून रागारागाने काहीतरी उर्दूत ओरडत होता. बाबारे, तू बहिरा आहेस, पण आम्हाला नीट ऐकू येते. नि एव्हढे रागावून मोठे डोळे करून काय बघतोस?

मग मात्र त्या अखंड लढाईच्या आवाजाची सवय झाली. मोठ्या पडद्यावर पॅनोरॅमिक सीन बघायला फार बरे वाटत होते.

जरा वेळाने डोळे उघडले तर एक उंचापुरा गोरा, घर् ०दया डोळ्याचा माणूस अगम्य भाषेत काहीतरी बडबडत होता नि ते ऐकून पडद्यावरच्या लोकांना फार आनंद झालेला दिसला. मी विचारले तो काय म्हणाला, सौ. ने सांगितले की जोधाच्या मागण्या त्याने कबूल केल्या. मी विचारले तुला ही अगम्य भाषा कशी समजली? ती म्हणाली, पडद्यामागे जोधाने हेच हिंदीत सांगितले होते, ते तो आता त्याच्या लोकांना भाषांतर करून सांगतो आहे.

मग लग्नाचा सीन आला. बहुधा मी सगळा चित्रपट संपेपर्यंत झोपलो होतो की काय? कारण लग्न लागले की चित्रपट संपला असे असते. म्हणून म्हंटले, चला वेळेवर संपला. मागून अहो बसा, असे आवाज आले. मग कळले की संपला नाहीये. मग वाटले त्या नवरदेवाच्या लांब मुंडाळ्यांमागे कदाचित् नायका ऐवजी खलनायकच असेल. त्याने नायकाला कपटाने फसवून कुठेतरी लपवून ठेवले असेल. तिथून तो नायक, पंधरा इंची दगडी भिंत नुसत्या हाताने फोडून पन्नास मीटर लांब उडी मारून एकदम ये शादी नही हो सकती असे ओरडत लग्नाच्या ठिकाणी येईल. पण तसे काही झाले नाही.

मग जरा डोळा लागला, डोळे उघडून बघतो तर डोक्यावर फुल लावायच्या कुंड्या उलट्या ठेवून काही लोक आकाशाकडे बघत काहीतरी म्हणत होते. मग तो नायक पण त्यांच्यात सामील होऊन आकाशाकडे पाहू लागला. पण आकाशात काय होते ते दाखवलेच नाही.

नंतर जरा वेळाने परत पाहिले तर एका प्रचंड मोठ्या भांड्याजवळ नायिका उभी होती. नि एक पांढरे कपडे नेसलेली बाई काहीतरी रागारागाने बोलत होती. मला वाटले आता बहुतेक या नायिकेला त्या भांड्यात उकळत्या पाण्यात टाकणार, नि तेव्हढ्यात नायक येऊन सर्व लोकांशी फायटिंग करून नायिकेला सोडवेल, नि सोडवता सोडवता, टायटॅनिक सारखा नायक मरेल, नि चित्रपट संपेल. पण तेव्हढे कुठले माझे भाग्य!

मग सगळे जण जेवायला बसतात. एव्हढे मोठे ताट नि एव्हढे सगळे पदार्थ पाहून म्हंटले की काय राक्षस आहेत की काय हे लोक? एव्हढे जेवण एक दोन महिने सहज पुरेल आम्हाला. त्यावेळि नायिका एकदम सांगते की भाजीत मीठ कमी झाले आहे. काहीतरी नाट्यमय प्रसंग होता असे वाटते. (ते काय हे नंतर गाडीतून घरी येताना इतरांनी सांगितले)

नंतर मग जावई सासरी येतो. त्याच्यासमोर तोंडावरून पदर घेतलेल्या अनेक बायका उभ्या असतात, त्यातून तो नायिकेला बरोब्बर शोधून काढतो!

मग नायक नायिका तरवारीचे युद्ध करतात. लई जोरात. मग जरा वेळाने ती नायिका, शेकडो लोक भांगडा करत असता, तिथेच दरबारात हत्तीवर बसून येते, नि नाच संपतो. मग नायक नायिका एक प्रेम गीत म्हणतात, नि पलांगावर झोपतात. म्हंटले आता तरी पुरे करा चित्रपट. का आणखी त्यांच्या मुलांची कहाणी सांगणार?

मग मात्र मी प्रयत्न करून डोळे मिटले. जरा वेळाने डोळे उघडून बघतो, तर नायक नि एक दुसरा जण एकमेकांशी फ़्री स्टाईल कुस्ती करत असतात, नि नायिका बघत असते. कधी हा तर कधी तो जिंकताना दिसत होता. त्यातला नायक नक्की कुठला हे समजायला कठिण होते, पण शेवटी नायकच जिंकणार हे माहित होते नि आतातरी चित्रपट संपेल या आशेने मी चित्रपट नीट बघू लागलो.

पण तेव्हढ्यातच तो संपला. वाटेत ओक ट्री रोडवर जाऊन भेळ, कचोरी खाऊन घरी यायला रात्रीचे दहा वाजले.

मग कसला सकाळी लवकर उठतोय्!



जर तेव्हा सेफ्टीपिना होत्या तर आरसे आणि मेणबत्त्यांचं काय घेऊन बसलीस

त्यापेक्षा चष्मा, किंवा सेफ्टी गॉगल्स असायला पाहिजे होते, म्हणजे मग त्या हेमूचा डोळा फुटला नसता, नि अकबर हरला असता. मग अकबरा ऐवजी त्याने प्रजेची लुटालूट केली असती.

खरे तर त्या काळी मोबिल फोन पण होते. ते मात्र खरे आहे. बरेच उत्खनन करून तांब्याच्या तारेचा एक पण तुकडा सापडला नाही. त्या अर्थी लोक लॅंड लाईन ऐवजी मोबिलच वापरत होते हे सिद्ध होते. (अकबरानेच हे चालू केले की काय? केव्हढा थोर हा राजा!!


Chinya1985
Monday, February 25, 2008 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक सिनेमा-हीरो आणि हिरॉइनच लग्न ठरत. हीरॉइनच दुसर्‍यावरच प्रेम असत. तिच्या मनाविरुध्द तिचे आईवडिल तिच लग्न लावतात. नेहमीप्रमाणे सुहागरातला ती हिरोला सांगते माझ तुझ्यावर प्रेम नाही. मग हीरो म्हणतो मी तुझ्यावर बळजबरी करणार नाही. मग हळुहळु दोघांच एकमेकांबद्दल मत चांगल होउ लागत तेव्हढ्यात त्यांच्यावर जळणार्‍या व्यक्तिद्वारे दोघात गैरसमज घडवुन आणला जातो. मग हीरॉइनला तिच्या घरी परत पाठवण्यात येते. मग गैरसमज दुर होतो. हिरो हीरॉईनला घ्यायला माहेरी जातो,ती नकार देते. मग हीरो समाजकार्यात पुढे येतो,त्यामुळे हीरॉइन इम्प्रेस होउन परत येते आणि मग प्रेमात पडतात. मग क्लायमॅक्सला हीरोवर जीवन मरणाचा प्रश्न येतो आणि हीरो जिंकतो आणि गोड अंत होतो.
या कथेचे अनेक सिनेमे येउन गेलेले आहेत. त्यात अजुन एक म्हणजे जोधा अकबर. जोधा अकबर काही लोकांना आवडला याचेच आश्चर्य वाटते. मी तर पायरेटेड डिव्हीडी वर पाहिला. आजकाल quality काय सुधारलिय पायरेटेडची!!!लैच भारी. ओरिजिनलच वाटते. अतिशय टुकार आणि बोअरींग सिनेमा आहे. जुन्या काळात स्त्रीयांना इतके अधिकार कुठे होते??इथे मात्र ऐश्वर्याच्या मनाविरुध्द काहिच होत नाही. मी हे करणार अन ते करणार आणि बादशहा पण हो कर ग बाई शेवटी तु स्वतंत्र आहेस. बाकी या चित्रपटावरुन उद्या सेक्युलॅरिस्ट असेही म्हणतील की लोकशाही आणि स्त्रीमुक्ती चळवळ अकबराने भारतात आणली. त्या हत्तीच्या सीनमधे अस फ़ारस भारी काहीच वाटल नाही. शिवाय अकबराचे चालणे कसे ऐटीत असायला हवे. इथे हृतिक अगदीच साधा चालतो. मुळात बादशहा म्हणुन तो शोभतच नाही. मंगल पांडे साठी आमीर आणि विरासत साठी अनिल कपुरनी वजन वाढवुन स्वतला स्थुल बनवले होते. त्याचप्रमाणे हृतिकनी केले असते तर जरा भारदस्त दिसला असता. तो तलवारबाजीचा सीन तर फ़ारच मजेशीर आहे. ऐश्वर्यात इतकी ताकद आहे का की ती हृतिकचा वार झेलु शकते??एकच जमेची बाजु म्हणजे भव्यता आणि सौंदर्य. पण नुसत्या भव्यतेनी काय होत??पण सडकछाप लोकांना भव्यता दाखवली की चित्रपट आवडतो. मग लगेच 'कसल आहे ते!!!अरे तो बादशहा आहे रे' वगैरे किंवा 'जेवणात किती पदार्थ आहेत बघ' पासुन 'चांदीच ताट दिसतय' पर्यंत. या सडकछाप लोकांना डॉक्युमेंटरी दाखवली असती ना हृतिक आणि ऐश्वर्या घेउन तरी 'सुपरहीट आहे' वगैरे म्हटले असते. वर आपण मतप्रदर्शन केल तर म्हणतात 'तुम्ही ग्रॅंडिऑसिटी का नाही बघत' वगैरे. बाकी आशुतोशनी भव्यता आणि सौंदर्या ऐवजी इतर गोष्टींवरही भर दिला असता तर बरे झाले असते.

बाकी इतिहासाशी केलेला खेळ अजिबात पटला नाही. पण नुसता चित्रपट म्हणुन पाहिला तरी पकावु आहे.


Zakki
Monday, February 25, 2008 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महत्वाची सूचना, Disclaimer :
वर माणूस याने जे लिहीले आहे ते मी न्यू जर्सीच्या बतमी फलकावर लिहीले होते. तिथे नेहेमी येणारे लोक मला चांगले ओळखतात. (पूर्णपणे ओळखून आहेत) त्यांना कळते मी का असे लिहीले आहे.

पण इथे येणारे लोक मात्र अत्यंत अभ्यासू व गंभीर प्रकृतीचे आहेत. त्यातले काही मला वाटते चित्रपट व्यवसायात या ना त्या रूपाने पोटापाण्यासाठी कामे करतात. त्यांना हे लिखाण नक्कीच आवडणार नाही, व सहजिकच राग येईल. म्हणून मी इथे ते लिहीलेच नव्हते. त्यामुळे आता पुन: तीव्र शब्दात निषेध, माझ्या अकलेची जाहीर चौकशी असल्या गोष्टी करू नका. काही (गावच्या) लोकांना सवयच असते की प्रत्येक गोष्ट स्वत:वर ओढवून घ्यायची नि अकांड तांडव करायचे! तसे लोक इथे येतात. म्हणून हा खुलासा.

क्षमस्व. धन्यवाद.


Yog
Monday, February 25, 2008 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की बुवा..
तुमचा व इतरान्चा (मोठा) review वाचताना माझाही डोळा लागला.. जाग आली तेव्हा अगदीच बोर आहे या वाक्यान्नी review सम्पला. आता ज्याचा review इतका बोअर तो चित्रपट ( $10 देवून) व चार तास फ़ुकट घालवून का बघायचा..?
पेक्षा घरी आणून fwd करून पहावा म्हणतो. तरी एकन्दरीत "ऐतीहासीक विनोदी" चित्रपट काढला आहे असे वाचून वाटते.
ता.क.: भारतात 40% लोक दारिद्ररेषेखाली असताना अशा करोडो रुपयान्चा चित्रपट बनवणे हा एक चन्गळवाद आहे असे इथल्या जाणकारान्ना ( Bee, Arch ) वाटत नाही काय...?
आशुतोष ला "आई"ने हेच शिकवले का..?
:-)

Zakki
Tuesday, February 26, 2008 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग,
कारण बायको.

शिवाय मोठ्ठ्या पडद्यावर दृष्ये फार छान दिसतात. माणसांची नाही, निसर्गाची. कदाचित् प्रत्यक्षात देखील एव्हढा मोठा भूभाग एका वेळी दिसणार नाही तो चित्रपटात दाखवला आहे.


Pha
Tuesday, February 26, 2008 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'वळू' पाहिला. झकास वाटला! आधी गावकर्‍यांनी मोकाट सोडलेल्या, पण नंतर गावात - मळ्यांत घुसून नासधूस करू लागलेल्या ( ' डुरक्या ' नामक) वळूला फॉरेस्ट ऑफिसर आणि गावकर्‍यांनी पकडण्याइतपत साध्या कथेवर हा चित्रपट बेतलाय. कथेचा ढोबळ आराखडा इतका सरळसोट असताना चित्रपट चांगला किंवा वाईट वाटणं हे बहुतांशी कथा फुलवण्याच्या यशापयशावरच अवलंबून असतं. माझ्या मते दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि पटकथालेखक गिरीश कुलकर्णी हे कुलकर्णीद्वय त्यात चांगलेच यशस्वी ठरलेत. आपल्याकडचे यशस्वी चित्रपट ढोबळमानाने तीन पठड्यांत मोडतात - मूलभूत मानवी प्रवृत्ती, नीतिमूल्ये अशा भक्कम पायावर उभारलेले आशयप्रधान चित्रपट; टायमिंग, द्वयर्थ, घोळात घोळ, गिमिक्स अशा मालमसाल्यावर बनवलेले 'इनोदी' चित्रपट किंवा पदरा / रुमालांच्या नशीबातले दुष्काळ संपवणारे भावनाप्रधान चित्रपट. अशा पार्श्वभूमीवर हा चित्रपट मिरासदारांच्या कथेसारखा खुसखुशीत, कधीही पाहाण्याजोगा (डीव्हीडी अजून आली नाहीये :-O ) वाटतो. वळू पकडायला आलेल्या फॉरेस्ट ऑफिसराचं गावात आल्याआल्या सरपंचांच्या घरी शासकीय इतमामानं (आणि भारतीय परंपरेनुसार) - म्हणजे सुवासिनींकडून ओवाळून स्वागत होणं, फारिष्टाबरोबर आलेला दुसरा पाहुणा डॉक्युमेंटरी चितारणार असल्याचं कळताच गावकर्‍यांचं अपापल्या परीनं कॅमेर्‍यासमोर भापायला धडपडणं, वळूबद्दल फारिष्टाला माहिती देताना गावकीतली / घरगुती / वैयक्तिक पातळ्यांवरची आपापली गार्‍हाणी गाऊन दाखवणं हे सारे छोटे छोटे गमतीशीर प्रसंग पाहताना आपल्याच गुणदोषांचं दर्शन होतं. गावातल्या दोघा पुढार्‍यांचे तोरा सांभाळण्याचे प्रयत्न, दोघांच्याही अनुयायी मंडळींचा बिलंदर खुषमस्करीपणा, भटजीबुवांचं फारिष्टाच्या गळ्यात शंकराला अभिषेक मारणं, बॉलिवूडपटांमुळे खेड्यापाड्यांतल्या तरूणाईपर्यंत झिरपलेली स्वप्नसृष्टी, त्यांची ' हिंदकळलेली ' बॉलिवूड धर्तीची इष्कबाजीची ष्टाइल या गोष्टी हसवता हसवता विचारांचे किडेही सोडून जातात.

चित्रपटांत अधूनमधून पेरलेल्या या खसखशीत ' डुरक्या ' च्या चाहुलीसरशी उत्कंठा वाढवायचं काम मंगेश धाकड्यांच्या पार्श्वसंगीतानं छानच केलंय (मला त्यांचं संगीत खरोखर इतकं आवडलंय की
वळूच्या ब्लॉगावरून मी त्याचे रिंगटोन डाउनलोड केलेत! :-) ). चित्रपटाचं शीर्षकगीतदेखील त्यांच्या संगीतानं आणि आर.के. लक्षमणस्टाइल हास्यचित्रांमुळे ताजं - टवटवीत, देखणं वाटतं.

बाकी, भटजीबुवांच्या ' सवयी ' बद्दल वाजवीपेक्षा एखाद - दोनदा गिमिकल उल्लेख करणं वगैरे किरकोळ त्रुटी आहेत. पण एकंदरीत चित्रपट धमाल आहे. माझं गुणांकन : चुकवू नका! परदेशस्थांनी डीव्हीडी येण्याची वाट पाहा. :-)

' वळू ' चित्रपटाच्या संकेतस्थळावर काही ट्रेलरदेखील आहेत. त्याचा दुवा असा :
http://valuthefilm.com


Tanyabedekar
Tuesday, February 26, 2008 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, तुम्ही भावे हायस्कूल वाले दिसताय... वळुचा डायरेक्टर पण भावेचाच आहे...

Mbhure
Tuesday, February 26, 2008 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो. अ. मधील वरील चुका तर बघताना जाणवतात. बायकाना पडदा वगैरे नाहीच. ऐश्वर्याचे लो - कट....

ते २६ जानेवारीचे गाणे म्हणजे विनोद आहे. त्यातच ती जोधा येते काय.....

ईला अरुणची एंट्री म्हणजे टिपीकल क सिरीयल सारखी घेतली आहे. तसेच ते जोधावर संशय घेणे.

अचाट आणि... : हिंदी चित्रपटात राण्या लो - कट, Slit gown, बिनबाह्याचे कपडे घालून का दाखवतात?


Vinaydesai
Tuesday, February 26, 2008 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचाट आणि... : हिंदी चित्रपटात राण्या लो - कट, Slit gown, बिनबाह्याचे कपडे घालून का दाखवतात?

तुम्हाला दिसाव्यात, आवडाव्यात आणि लक्षात रहाव्यात म्हणून....
~D

Kedarjoshi
Tuesday, February 26, 2008 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पडला प्रकाश पडला. संतु ने जोधा अकबर ला A हे एवढेच नाव का लिहीले त्याचा प्रकाश पडला.
अचाट आणि अतर्क्य. (व अतर्क) त्याचा शॉट नुसताच A .

आणि आशुतोश ने JA का नाव दिले त्याचाही प्रकाश पडला. कारण नुसतीच प्रेम कथा राहीली असती तर तो तिकीट बारी वर आणखी आदळला असता त्या पेक्षा सवंग प्रसिध्दी बरी निदान त्यामुळे तरी ते भंगार चांदीच्या भावात विकले जाईल.

ईतिहास सोडुन नुसत्या कथीत प्रेमा साठी पाहावा म्हणलं. प्रेमाच्या नावाखाली लोक काय वाट्टेल ते सहन करतात. तेवढे अत्याचार मी नाही सहन करु शकलो. OSO पेक्षा किती तरी बोअर आहे हा चित्रपट. संपतच नाही.

सेटस चांगले होते पण त्या चांगल्या सेट्सला बिचार्या आशुतोशने न्याय दिला नाही.


फ ती रिंग टोन मस्त आहे.


Sanghamitra
Wednesday, February 27, 2008 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय धमाल लिहीलेय या बीबीवर.
>> आणि शहेनशाहची सख्खी बहिण तेव्हा १५० रूपयेवाल्या सिंथेटिक चकचकीत साडीतून कापलेली कम्प्लिट भांडीवाली छाप ओढणी वापरायची,

अज्जुका जाम हसलेय तुझं हे पोष्ट वाचून. पूर्ण रिव्ह्यू लिही ना वेळ झाला की.

Meghdhara
Wednesday, February 27, 2008 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय.. बिनबाही (आणि काय काय) शिवाय त्या कोणाला दिसत, आवडत..लक्षात रहात नाहीत का? :-)

भांडीवाली छाप ओढणी.. हा विनोद होता?.. :-(

जोधा अकबर बर्‍याच जणांना आवडला नाही. मलाही जाम कळलं नाही कशासाठी होता एवढा खर्च, खटाटोप..? 'निव्वळ मनोरंजन करणे हा उद्देश नाही' अस सांगून कोणी गंडलं किवा कोणी धंदा करू पाहिला तरी त्याची टीका कताना काही संकेत पाळायचे नसतात का? मी एक अगदीच (अति)सामान्या प्रेक्षक म्हणून विचारलं..

पण आता कुणी चित्रपटाचा बोल्ड ऍनालिसिस.. रुड सत्य याचा रिव्यू लिहिला ना तर त्याचे नाव
AJ च्या चिंधड्या असा लिहा. मग भांडीवाली छाप ओढणीचे आणि तत्सम विनोद रिस्पेकटिव स्पिरिट मधे पोचतील..


मेघा


Sanghamitra
Thursday, February 28, 2008 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणगा,
ते वाक्य वाचून माझ्या डोळ्यासमोर त्या टिपिकल चकचकीत खोट्या जरीच्या साड्या किंवा ओढण्या आल्या. आणि पिरिअड फिल्म मधे इतक्या पुरातन काळातल्या राजकन्येच्या अंगावर ते दाखवल्यामुळं त्यातला विरोधाभास अगदी जाणवला. म्हणून दाद दिली मी.
त्यात कुणालाही कमी लेखलंय हे माझ्या लक्षातही आलं नाही खरंतर अजूनही आलं नाहीये कारण अस्थानी चुकीची गोष्ट दिसल्यावर त्यातून विनोद निर्माण होतोच. बर्‍याच हिंदी मूव्हीजमधे अगदी झोपडपट्टीतल्या हिरॉइन्स पण ब्रॅंडेड चप्पल्स आणि डिझायनर ड्रेसेस घालून दाखवल्यात(उदा. शहंशाह मधली मिनाक्षी आणि एकूणच या विषयावर इथे बरीच उदाहरणं दिली जातात की पैसे नाहीत पण भारी ड्रेसेस, गाड्या किंवा एवढा श्रीमंत तरी रिक्षातून जातो वगैरे.) ते पाहूनही हसू येतंच ना. आता या उदाहरणातही तसं क्रौर्य वगैरे शोधणार्‍यांना सापडेलच पण जे वास्तववादी नाही ते विनोदाला पात्र होते इतकी साधी गोष्ट आहे ती.
तरीही भावना दुखावल्याबद्दल क्षमस्व.
इथं आता दिवे आणि CBDG शिवाय मोकळेपणानं काही लिहायची सोयच राहीली नाहीये.
(आणि मी अजून तो मूव्ही बघितलाच नाहीये ते वेगळंच.)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators