Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 30, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through December 30, 2007 « Previous Next »

Chyayla
Wednesday, November 07, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमितच्या विनंतीला मान देउन.. माझे हॅलोवीनचे दोन प्रयोग देतोय एक जमला, तर दुसर्यात पुर्णपणे माझाच पोपट झाला आयला पब्लिक हुशार व्हाया लागली म्हणायची.

हॅलोवीनच्या दिवशी संध्याकाळी माझा रुमी घरी आला. किल्ली घालुन दरवाजा उघडला तर अंधार होता म्हणुन लाइट लावायला बटन दाबले तर हाताला काही तरी पांढरे चिपकले (ते टूथपेस्ट होते) मग जोडे ठेवायला बाजुचे दार उघडले तर अचानक अंगावर साप पडला की कसे दचकतो याचा अनुभव आला..

आतापर्यंत त्याला अंदाज येउन चुकला आज घरात काही तरी गडबड आहे तोच अचानक त्याच्या बेडरूममधला अलार्म वाजायला लागला सोबत कसलातरी फ़डफ़ड आवाज.. आता हे काय म्हणुन पहायला गेला तर पंखा लावुन एक भूत झोपले आहे (तो मी नव्हे बर का) थोडा वेळ तसाच शांत गेला म्हटल झाल सम्पले.. तर ५च मिनिटानी कानठळ्या बसावा असे गडगडाटी भूतबंगला म्युजिक सुरु झाले... ते मी लॅपटॉपमधे हॅलोवीनचे स्क्रिनसेवर सेट करुन ठेवले होते सोबत फ़ुल्ल व्हॉल्युम मधे स्पिकर लावुन ठेवले होते.. त्याने आपले काम चोख बजावले.

आता एक प्रयोग सफ़ल झाला म्हणुन मोठ्या उत्साहाने दुसरा प्रयोग करायला ऑफ़िस मधे गेलो.. रात्रपाळीत मी अजुन माझी एक ज्युनियर ऑफ़िसमधे आम्ही दोघेच. ती ६ वा. आलेली मी ७.३० ला गुपचुप दुरच्या क्युब मधे गेलो आणि काम सुरु केले, तिला सांगितले की मी आज घरुनच काम करतोय. तिच्या एक दोन तांत्रिक अडचणींचे समाधान केले आणि हळुच मागुन तिच्या क्युब मधे गेलो व भूताचा मूखवटा घालुन शुक शुक केले..

पण छे: कसच काय ती मागे न वळताच म्हणाली Sameer I know, you are there!!! झाला माझा पुर्ण पचका झाला.

याला कारण तिचा माझ्यावर असलेला पुर्ण विश्वास कारण ५च दिवस आधी तिला ईब्लिस पेज करुन सॉलिड पोपट बनवलेला होता. त्यामुळे ती यावेळेस पुर्ण सावध होती व तीला खात्री होतीच की मी असला ईब्लिसपणा करणार आहे.

तात्पर्य: एकाच व्यक्तिवर एकामागुन ताबडतोब दुसरा ईब्लिसपणाचा प्रयोग करु नये.


Zakasrao
Wednesday, November 07, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे हे
हालोविनला खोटे भुत दाखावायचे असते. बिचारा तुझा रुमी त्याला प्रत्यक्ष तुच दर्शन दिलेस.
तसाही तो घाबरत नसेल नाही. प्रत्यक्ष भुतासोबत राहतो म्हणल्यावर काय


Chaffa
Monday, December 03, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा किस्सा बराच जुना आहे पण काल रात्रीच्या पार्टीत तो पुन्हा एकदा रंगला होता.
त्या वेळी आमचा प्लांट पुर्णपणे चालु झालेला नव्हता. आजुबाजुला गवत, झाडी वाढलेली. मधेच प्लांटमधे मेंटेनन्स करायचा कंटाळा आला की थोडेसे प्रॉडक्शन काढलुआ जायचे त्या काळात रात्री प्रोजेक्टची टिम आराम करायची एखादा गरीब प्राणी मागे नाईट शीफ़्टला ठेउन,
तर त्याही रात्री असेच प्रोडक्शन चालु होते. रात्रिच्यावेळी आजुबाजुच्या झाडाझुडूपांची भिती बर्‍याच जणांना वाटायची. त्यातही एक असा भयंकर भित्रा इंजिनियर त्या रात्री साईटवर! ह्याच्या भित्रेपणाचा कळस म्हणजे हा दोन माणसे सोबत घेउन बसायचा एक नाही ( कारण बरोबर असलेला दुसरा माणुसच भुत असेल तर हे त्याचं लॉजिक )
मधेच काही प्रॉब्लेम आला म्हणुन त्याला प्लांटच्या मागच्या ओसाड भागात जायला लागले अर्थात सोबतीला एकजण होताच. दोघेही तिकडे जाउन जे काही जरुरी होते ते उपचार करुन प्रॉब्लेम सोडवुन परत निघाले आणि त्या साठी बाहेर पडले तर समोरच्या झाडीत खसफ़स! पहातात तर समोरच्या खुज्या झाडीत जे एकमेव ओकेबोके झाड ( आजुनही आहे ) होते त्या खाली एक पांढरी अकृती तरंगतेय ( उभि नव्हे ) दोघांची दाणा दाण त्यातुनही त्याच्या साथीदाराने जवळचा मोठासा दगड उचलुन त्या अकृतीवर भिरकावला आणि तो तिच्यातुन आरपार गेला असे तो कालही शपथेवर सांगत होता. घामाघुम होउन दोघे बाहेर पळाले आणि आख्ख्या कंपनित बोम्बाबोम्ब मग दुसर्‍या दिवशी तिथल्या लोकल माणसाचा सल्ला घेउन तिथल्या भुताला दर अमावास्येला नारळ द्यायची प्रथा चालु झाली आता ती प्रथा हळुहळू बंद झालिये म्हणा,
काल जेंव्हा हा विषय चालु होता तेंव्हा मी चुपचाप मॅंगोला संपवायचे काम करत होतो. दगड मारणारा तो डेअरींगबाज मला सांगत होता " साला ईतना बडा पथ्थर मारा तो वोभी सिधा उसके पार निकल गया फ़िरभी उसको कुछ हुवाच नही" "और तु बोलता है भुत होताही नही है"
मनात म्हणालो, आयला, आता तु मला सांग! तु लटपटत्या हाताने मारलेला दगड माझ्यापसुन चांगला पाच सहा फ़ुटावरुन गेलेला मी पाहिलाय.


Zakasrao
Monday, December 03, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, आता तु मला सांग! तु लटपटत्या हाताने मारलेला दगड माझ्यापसुन चांगला पाच सहा फ़ुटावरुन गेलेला मी पाहिलाय>>>>>>>>>>>>>>>>>..


बघ चाफ़्या म्हणुनच सम्या तुला भुत म्हणतो :-)

Gsumit
Tuesday, December 04, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे मस्तच किस्से...

च्यायला, असा पोपट माझापण झालाय... नविन सेल फ़ोन घेतल्यावर खुप मित्रांना इब्लिस sms पाठवुन त्रास दिला होता, नंबर अर्थात दिलेला नव्हताच... एकानी फोन करुन एकदम "मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला त्रास का देताय" अशी सुरुवात केली (पक्का सदाशिव पेठी पुणेकर होता...)
पण दुसर्‍या एका फ्रेंडनी "सुमित आता बास" म्हणुन sms पाठवला तेव्हा उडालोच... तिला कुठुनतरी आधीच कळाले होते हा माझा नंबर आहे म्हणुन, अन मी आपले इकडुन स्टाइलमधे मेसेज पाठवतोयेच...


Gsumit
Tuesday, December 04, 2007 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता अजुन एक किस्सा... हा मात्र मुद्दाम वगैरे नव्हता केला...
माझ्याकडं एक व्हिडीओ होता... त्यात एक मुलगी खाली मान घालुन अभ्यास करतानी गाणं गुणगुणतीये असं जवळ जवळ १ मिनिटभर दाखवतात... अन ती नंतर चेहरा वर करती तर एकदम डेंजर भुतासारखा चेहरा असतो तिचा... एकदम दचकतो पहाणारा...

तर तो मी माझ्या मित्रांना forward केला... एक ऑफिसमधलीच मैत्रिण तेव्हा हेडफोनवर गाणे ऐकत होती, तिनी तसाच तो मेल ओपन केला... भुत आल्यावर एकदम दचकुन आSSS करुन ओरडली... ते पण इतक्या जोरानी की आजुबाजुच्या पाच्-सहा cubicle मधली पोरं ताडकन उठली काय झालं म्हणुन...


Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हा इब्लिसपणा फ़ेब्रूवारीत केला होता, साधारणपणे १५ / १७ तारखेला, माझ्या मित्र-मैत्रिणिंना मेसेज केला की माझी एंगेजमेंट २९ फ़ेब. ला आहे, आणि ठाण्याचा एक पत्ता पण दिला होता. माझा ख़ोडकरपणा काही लोकांच्या लक्षात आला, तर त्यांनी मला, congratulations चे मेसेजेस केले, काही लोकांनी तर आनंदाने फोनच केले, आणि सगळे डिटेल्स विचारले, मी पण खूप गंडवलं सगळ्यांना, आणि मग फोन ठेवताना सांगितलं अहो फ़ेब्रूवारी २८ दिवसांचीच असते. (निदान हे वर्षं तरी लिप वर्ष नाही)

पण एका महाभागाने मात्रं मला मस्तच उत्तर दिलं होत, की I am sorry as I won't be able to attend your engagement ceremony, because I am out of country till 31st Feb. या माणसाला मात्रं मीच फोन केला होता...


Nkashi
Tuesday, December 04, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिथल्या भुताला दर अमावास्येला नारळ द्यायची प्रथा चालु झाली....

चाफ़्फ़ा, आतापर्यंत मिळालेल्या नारळांचे काय केलस?

Zakasrao
Tuesday, December 04, 2007 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमित दुसरा किस्सा मस्तच आहे मेलचा
दक्षिणा मस्तच :-)
एन काशी
बर्‍याच दिवसानी आलीस तु. :-)
BTW चाफ़्या तु खोबर्‍याच्या वड्या वै विकतो का रे पार्ट टाइम

दिवे घे रे


Dakshina
Tuesday, December 04, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, माझा रिप्लाय मिळाला ना तूला?

Chaffa
Tuesday, December 04, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा, आतापर्यंत मिळालेल्या नारळांचे काय केलस?

काही करायला लागले नाही मला! नारळ फ़ोडला की बाकि भुतं शिल्लक ठेवतिल तर ना
आणि झकास वड्या विकत नाही पण खायला जाम आवडतात.

आजुनही आमच्याकडे कुणालाच माहीत नाहीये तिथे नेमके कोणते भुत होते ते......


Shankasoor
Tuesday, December 04, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या company मध्ये एक नियम आहे, as a Security Policy, if you are going away from your desktop then you must lock it
एक दिवस माझा manager Coffee आणायला Canteen मध्ये गेला आणि नेमका desktop lock करायला विसरला. त्याच्या machine वर Outlook open होते.
मी त्याच्या mailbox मधुन एक party invitation ची mail लिहिली आणि अख्ख्या team ला पाठवून दिली. साळसूदपणे माझ्या desktop पाशी जाउन बसलो.
साहेब coffee घेउन परत आले. Manager ला त्या mail बद्दल काहीच खबर नव्हती.
Status Meeting च्या वेळेस जेव्हा आमच्या team मधल्या public नी Party का देतो आहेस म्हणून विचारले तेव्हा बिचरा एकदम भांबावून गेला.
जेव्हा त्यानी Sent Items बघितले तेव्हा बिचार्‍याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. शेवटी त्याला party द्यावी लगली होती, party च्या दिवशी मात्र मी त्याला माझा इब्लिसपणा सान्गितला होता


Chaffa
Tuesday, December 04, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंकासुर, लै भारी फ़ायदा करुन घेतलास. यालाच पार्टी उकळणे म्हणत

आणखी एक
हा बाकी लेटेस्ट किस्सा,
आमच्या वरच्या मजल्यावर जे कुटूंब रहातं त्यांची मुलगी आमच्या घरातलीच एक अशी वावरत असते. तिच्याशी थट्टा मस्करी हा नेहमीचा विषय आहे. तिच्याकडे एक कुत्रा आहे त्याचे नाव टॉमी (त्याचे खरे नाव मुद्दाम लिहित नाही कारण ते ईतके माणसाळलेय की चुकुन कुणाचा ID निघाला तर पंचाईत). रोज संध्याकाळी त्याला फ़िरायला घेउन जाते तेंव्हा तो नेहमी आमच्या दारात येउन थांबतोच, एखादे बिस्किट दिल्या खेरीज तो हलत नाही. आम्हालाही त्याची गंमत वाटते त्यामुळे त्याच्यासाठी घरात बिस्किटे ठेवलेली असतात. मघाशी मी इथे फ़ेरफ़टका मारत होतो तेंव्हा ति एकटीच (कुत्रा न आणता या अर्थी), आली आणि सवयीप्रमाणे किचनमधे घुसली, तिथे तिला बिस्किटे प्लेट मधे ठेवलेली दिसली ( दोनच होती म्हणा!) तिने ती उचलली आणि बाहेर येउन खाता खाता मला विचारते
" ही बिस्किटं चांगली आहेत ना? म्हणजे उष्टी वगैरे नाहीत ना?".
" नाही, मघाशी टॉमिला देत होतो पण त्याने नुसता वास घेउन तीथुन निघुन गेला त्याने उष्टी केली नाहीत" माझे तिच्याकडे न पहाता उत्तर.
अचानक बेसिन कडुन ऑऽऽऽऽक घुमला.
नंतर तिला स्पष्ट केले की "बबडे तु आज तुझ्या टॉमीला घेउन खाली गेलीच नव्हतीस तर मी त्याला बिस्किट कसा देणार?" तेंव्हा कुठे तिच्या पोटात शांतता पसरली


Naatyaa
Tuesday, December 04, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचे खरे नाव मुद्दाम लिहित नाही कारण ते ईतके माणसाळलेय की चुकुन कुणाचा ID निघाला तर पंचाईत >>> rofl!!!

Durandar
Thursday, December 06, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचानक बेसिन कडुन ऑऽऽऽऽक घुमला.
काय चाफ़्फ़्या प्रगतिपथावर दिसतोयस.
त्याचे खरे नाव मुद्दाम लिहित नाही कारण ते ईतके माणसाळलेय की चुकुन कुणाचा ID
वाट लागलि हसुन हसुन.


Nandini2911
Thursday, December 20, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल टाईम्स ऑफ़ इंडियाच्या ऑफ़िसमधे एकाला भेटायला गेले होते.
ट्याला रीसेप्शनवरून फोन लावला. तो भलत्याच कुणीतरी उचलला.
मी म्हणत होते can I speak to reporter called JOHN ABRAHAM…

बिचारा नुकतच दरवाजातून आत येत होता इतक्या जोरात कुणी हाक मारली म्हणून पाठी बघायला गेला आणि मस्त धडपडला. मग मी त्याला हात दाखवला.
“ How are you John? After such a long time” , असं म्हणून त्याची गळाभेट्” घेतली. “आजकल क्या कर रहे हो?” असं त्याने मला विचारलं… तो इथे कसा काय मी तिथे कशी काय वगैरे चौकशी झाली.. हल्ली कय चालू आहे गोल आपटल्याचं किते दु:ख झालं अशा गप्पा आम्ही सुमारे वीस मिनिटे मारल्या. मी जॉनची एखादी मैत्रीण असल्याचा साक्षात्कार रीसेप्शनिस्टल झाला आणि तिने मला काही घेणार का असं विचारलं. इत्यादी इत्यादी…

मी पहिल्यादा जॉनला काल भेटले हे सांगायला नकोच.. 


Nandini2911
Thursday, December 27, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रे काय ही दुरावस्था.. या बीबीची बघवत नाही...

आज दुपारी फ़ारेंडने लिहिलेले टर्निंग ब्रेन वाचले. तेव्हाच जाम हसू येत होतं. तितक्यात डोळ्याला हात लागला. आणि लेन्सला त्रास व्हायला लागला. म्हणून वॉशरूमधे गेले. डोल्याना पाणी लावण्यासाठी. माझ्या कलीग माझ्या पाठोपाठ आली..
"क्या हुआ?" आणी चेहर्‍यावर अमाप काळजी. तितक्यात अमोलचं कसलंतरी भयानक वाक्य आठ्वलं आणी मी परत हसले अर्थात चेहरा पुसत असताना. ती परत
"मुझे जीतुने भेजा है.. क्या हुआ बता." मी परत हसतेय. लेन्समुळे डोळा लाल झालेला. सतत पाणी येतय आणि मी "काही नाही" म्हणत हसतेय. ती अजून काळजीत. बाहेर येओन सरळ माझ्या बॉसकडे जीतुकडे.
"तुमने कुछ बोला उसको. रो रही है..."

नंतर लंचच्या वेळेला जीतु अगदी प्रेमाने मला "मी कधी रागवलं तर वाईट वाटून घेऊ नकोस. काही काम जमलं नाही की मला सांग. रडू वगैरे नको."

नंतर रिमीने परत एकदा विचारलं "क्यु रो रही थी" तेव्हा सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. मला कधीही रडू येत नाही पण लेन्सला धक्का लागला की डोळ्यात पाणी येतंच...
परत बॉस काहीतरी बडबडू देत.. जस्सीचे एपिसोड्स चालू करेन... :-) :-) :-)


Yogesh_damle
Friday, December 28, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हलकंसं विषयांतर- जीतु म्हणजे जितेश का गं? 'हल्ली तुझी नाटकं वाढत चाललीयेत!!' :-)

माॅड्स, नंदिनीचं वाचून झालं की हे उडवून टाका!


Chaffa
Saturday, December 29, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत बॉस काहीतरी बडबडू देत.. जस्सीचे एपिसोड्स चालू करेन...
नंदिनी 'जस्सी जैसी ( बोअर) कोई नही' माहीतेय ना

हा आणखी एक ताजा पण वापरुन वापरुन गुळगुळीत झालेल्या कल्पनेवर आधारलेला किस्सा.

आमच्याकडे नविनच जॉईन झालेल्या एका कलिगच्या मोबाईलवर गेले आठवडाभर एस एम एस येताहेत पहील्यांदा "तु छान दिसतोस मी तुला जाता येता पहात असते वगैरे वगैरे". मग 'आय लव्ह यु'( आणि हे सगळं हिंदीतुन) पहिले दोन दिवस बबड्याने फ़ारसे लक्ष दिले नाही पण नंतर हळुहळु अस्वस्थ व्हायला लागला. मग त्याने दुसर्‍या एका कलिगला सांगीतले हे एस एम एस प्रकरण तो पठ्ठ्या तयारीचा! त्याने दिला सल्ला तु फ़ोन लाव आणि विचार कोण आहे ती.
लावला की फ़ोन याने, पण पलिकडुन एखादा गोड आवाज यायच्या ऐवजी एक नाकातल्या नाकात बोलणार्‍या म्हातार्‍याचा आवाज. आता वांधे का? ह्याने विचारले तुमच्या फ़ोनवरुन मला एस एम एस येत आहेत म्हणुन. पण उत्तर आले " ये मेरा फ़ोन है, इसका नंबर किसने दिया तुमको?"
बाकी काही बोलायच्या आत फ़ोन कट.........
थोड्यावेळाने पुन्हा एस एम एस 'तुने फ़ोन किया वो मेरे बापुने उठाया था जब मै मिस कॉल करुंगी तभी फ़ोन करना'
दुसर्‍या दिवशी मिसकॉल आलाच पण दुर्दैवाने तो बॉसच्या समोर असतानाच. कसाबसा बाहेर आल्यावर त्याने फ़ोन केला तर या वेळी दुसराच आवाज म्हणे मेरे बापुका फ़ोन है उनको पुछो किसने एस एम एस किया, आता याने फ़ोन कट केला. थोड्यावेळाने पुन्हा एस एम एस 'फ़ोन मेरे भैय्या के पास था, इतनि देर क्युं लगा दी?".
आता हा गडी जाम गडबडला, याने सरळ त्याच नंबरवर एस एम एस केला " आपसे मिलना है कहाॅं मिलोगी?" बसला रिप्लायची वाट पहात. कसला रिप्लाय आणि कसले काय सरळ एक फ़ोन आला त्याच नाकात बोलणार्‍या म्हातार्‍याचा " ऐसे मेसेज दुबारा करोगे तो पुलिसमे कंप्लेन करुंगा"
आजुनही त्याला एस एम एस येतच आहेत आणि हा त्या तथाकथीत मुलीला शोधतोच आहे.

हे नाकातल्या नाकात बोलणे मला फ़ार आधीपासुन येते पण आजुन तरी जास्त कुणाला ते माहीत नाहीये. आणि यु.पी. च्या हिंदिचा हेल मी आधीच्या कंपनीत शिकलोय.
आता ३१ डिसेंबरच्या पार्टीत ह्या कला दाखवायचा विचार आहे. कारण हे एस.एम.एस. प्रकरण आता बर्‍यापैकी हॉट सब्जेक्ट आहे बरेच जणात.



Rutu_hirwaa
Sunday, December 30, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्फा
ग्रेट आहात हो ;)

अहो तुमचा हा किस्सा ऐकून मला 'भेजा फ़्राय' मध्ये तो रजत कपूर कसा असे बकरे पकडून आणत असतो आणि त्यांचे बिनधास्त मस्त पोपट करत असतो भर पार्टीमध्ये- त्या प्रसंगाची आठवण आली..

बाकी नंतर याच्या अंगलट येईल असा विनय पाठक त्याला भेटतो म्हणा.. असो :-)

तुमचा इब्लिसपणा बाकी चालूदेत बिनधोक..:-)

सांगा नंतर त्या कलीगला खरी गोम कळल्यानंतरची गंमत!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators