Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 29, 2007

Hitguj » My Experience » नवीन वर्षी केलेले संकल्प ! (पूर्ण किंवा अपूर्ण) » Archive through December 29, 2007 « Previous Next »

Sonu_aboli
Saturday, December 30, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन वर्षाची जशी चाहुल लागते तशी अनेक गोष्टींसोबतच चर्चा चालू होते ती नववर्षाच्या संकल्पाची.
आता १ जानेवारीपसून मी नियमीत(?) व्यायाम करणार, फ़िरायला जाणार,
स्मोकिंग सोडणार,भांडणे नाही करणार वगैरे वगैरे....
आजवर किती जणांनी असे संकल्प पूर्ण केले आहेत?काय गमती झाल्या तसे करण्यात? किती दिवस टिकल्या त्या प्रतिज्ञा? कळू द्या सर्वांना!



Sonchafa
Sunday, December 31, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ार पूर्वी शाळेत विचारायच्या बाई नवीन वर्षात काय करणार म्हणून.. त्या काळात केले होते काही संकल्प इतर मित्र-मैत्रिणी करता म्हणून पण ते फ़ार काळ टिकले नसावेत.. फ़ारसे लक्षात नाही आता.. पण त्यानंतर एकदा विचार केला की कोणतीही आवश्यक ती गोष्ट करायला नवीन वर्षच कशाला हवे? तेव्हा ह्यापुढे संकल्प करायचा नाही.' आणि गंमत म्हणजे हा संकल्प मात्र आजवर टिकून आहे. :-)

Dakshina
Wednesday, January 10, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीतरी हा B.B. पुढे चालवायचा संकल्प करा...

Saavat
Wednesday, January 10, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"दक्षिणाने हा B.B. पुढे चालवावा!" चला केला संकल्प!

Disha013
Wednesday, January 10, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळीकडे डु. आयडी. घेवु न मा. बो. करांना छळायचा संकल्प केला दिस्तोय कुनीतरी!



Lalu
Wednesday, January 10, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनचाफा :-)
खरं आहे, पूर्वी केलेत असे आता आठवत नाहीत पण दरवर्षी केले जातातच. एकदाच करायच्या गोष्टी असल्या तर त्या झाल्या की नाही हे वर्षाच्या अखेरीला पडताळून बघायला सोपे, म्हणजे अमुक पुस्तकं मिळवून वाचायची आहेत, काही लिहायचे आहे, एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची आहे इ.
- आरोग्य चांगले ठेवणे, नियमित व्यायाम करणे हा एक नेहमीचा संकल्प. या वर्षीही आहे. :-) * बिपाशाचा आदर्श ठेवलाय या वर्षी, हे नवीन
- 'मायबोलीकरांना भेटणे' असाही एक आहे, म्हणजे आधी भेटलेल्यांना पुन्हा आणि न भेटलेल्यांना पहिल्यांदा. चला, कोण कोण येतंय?


Asami
Wednesday, January 10, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

* बिपाशाचा आदर्श ठेवलाय या वर्षी, हे नवीन

>> आयला धूम III ???

Marhatmoli
Wednesday, January 10, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalu ,

मी आहे भेटायला तयार! बोल कधि भेटतेस?


Lalu
Wednesday, January 10, 2007 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू Dhoom III काढणार आहेस या वर्षी?!!
मराठमोळी, कधीही. :-)


Deepanjali
Thursday, January 11, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

*बिपाशाचा आदर्श ठेवलाय या वर्षी, हे नवीन*
<<<<मग नवर्‍यानी कोणाचा आदर्श ठेवलाय , जॉन चा का ?


Zakki
Thursday, January 11, 2007 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो दीपांजली, तो नवर्‍यांचाच संकल्प असावा, असे मला वाटले होते. बिपाशा म्हणजे तुर्कस्थानच्या केमाल पाशाच्या वंशातला कुणि थोर पुरुष असावा. म्हणून त्याचा आदर्श. असे आपले, मला वाटले. पण बायको 'ह्या:, असले काही नाही' म्हणाली.

मागे असेच मिशा पटेलचा सिनेमा बघताना मला वाटत होते की कुणि जबरदस्त मिशा असणारा माणूस दिसेल. झक्क हाणामारीचा सिनेमा असेल. पण बराच वेळ झाल्यावर तसे कुणि दिसले नाही, तेंव्हा मी बायकोस विचारले. तिने सांगीतले की मिशा म्हणजे मुलगी. धन्य रे हटकेश्वरा! तेंव्हा चू. भू. द्या. घ्या.

या वर्षी अश्या सगळ्या लोकांची माहिती मिळवायची असा संकल्प करतो आहे! (म्हणजे माझे चार चौघात हसू होऊ नये, म्हणून बायकोने मला हा संकल्प करायला सांगीतले आहे, हे सूज्ञांच्या लक्षात आले असेलच.)धन्यवाद.


Manishalimaye
Thursday, January 11, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्कि कसलं धडाधड एडिट करता हो तुम्ही! क्षणापुर्वी वाचलेले बदललेत

Lopamudraa
Thursday, January 11, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षणापुर्वी वाचलेले बदललेत>>>. मनिषा अस क्षणा क्षणा ला माय्बोलिवर येउ नाये मग....
मी तर मायबोलिवर मागच्यावर्षिपेक्षा कमी वेळ घालवायचा आपले आणि आपल्यामुळे (इतरांचे भडकणारे डोके शांत ठेवायचे) असा संकल्प केला आहे...


Robeenhood
Thursday, January 11, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

`लोपे हा असला फालतू टाइमपास करण्यापेक्षा तुझी ती विषामृत कथा पूर्ण का करीत नाहीस?

Lopamudraa
Thursday, January 11, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोब्बिन्हूड तुम्हीच का नाही पुर्ण करत ती कथा(हा फ़ालतु पणा करण्यापेक्षा)?
आधी जे लिहिलय ते तर वाचा.. ..


Robeenhood
Thursday, January 11, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं, ती लिहिलेली कथा वाचली म्हणून तर एवढी उत्सुकता वाटतेय पुढे वाचायची... मध्ये तू म्हणत होतीस वेळ नाही... मग ह्या कुचाळक्या करायला वेळ आहे वाटतं तुला? अन कथा पूर्ण करायला नाही वाटतं? पण छे, भाव खायची नाही तरी खानदेशी लोकाना सवयच असते...

Robeenhood
Thursday, January 11, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो, ,ह्या बी बी च्या अनुषंगाने ह्या वर्षी ती कथा पूर्ण करायचा संकल्प कर म्हणजे झाले....

Sonu_aboli
Thursday, January 18, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरच रंगलय की चर्चासत्र.शेवटी निकाल काय तर, एखादा संकल्प करनेका संकल्प करावा

Nilima_v
Friday, December 28, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन वर्षाचे निष्चय २००८.
आपण बर्याच गोष्टी ठरवितो सर्व काही करतोच असे नाही, पण पुन्हा काही गोष्टी नक्कि ठरवितो. त्याबद्दल्च्या गप्पा.
माझे काही निष्चय.
१ कुटुंबासाठी अधिक वेळ काढणे.
२ वाढ्त्या वय प्रमाणे आहार बदलणे.
३ हरित सवयी लावून "जागतिक ऊष्मा" कमी करायसाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे.

Hkumar
Saturday, December 29, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विषयावर रत्नाकर मतकरींचा एक लेख आहे. त्यात एक संकल्प असा होता
नव्या वर्षापासून राजकारणावर अजिबात चर्चा करणार नाही ( कारण अशा चर्चांचा शेवट ' आहे हे असेच चालायचे' या वाक्याने होत असतो ).


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators