Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 14, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through December 14, 2007 « Previous Next »

Farend
Thursday, December 13, 2007 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Denzel Washington चे मी बरेच पाहिले आहेत मागच्या काही वर्षांतील, Hurricane, Remember the titans, Training Day, Inside Man, The Siege वगैरे. तो काम चांगले करतो या शंकाच नाही पण मला हे बरेचसे रोल्स एकमेकांपेक्षा फार वेगळे वाटले नाहीत. त्यामुळे तो त्या एकाच प्रकारचे रोल्स चांगले करतो असे वाटले. कदाचित मी एकाच टाईप चे चित्रपट पाहिले असतील त्याचे. पण या २-३ पिक्चर्स मधे तरी हिंदी चित्रपटांसारखा दुसर्‍याची काहीच मदत न घेता सगळे स्वत: करणारा आणि सर्वज्ञानी हीरो चे रोल्स वाटले. फक्त (नक्की आठवत नाही) Inside Man मधे जरा हसताना वगैरे दाखवलाय तो. नाहीतर महा सिरीयस आणि नाना पाटेकर सारखे एकसुरी वाटतात ते.

मुकुंद My cousin Vinny माझाही favorite आहे. आणि मला 'कायद्याचं बोला' ही ती हीरॉइन सोडली तर आवडला. विशेषत: त्यातील म्हणींचा वापर..."इथे उंट बुडाले पाण्यामधी...", किंवा "घरचं झालं थोडं..." :-)


Deepant
Friday, December 14, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल पहिल्यान्दाच या बीबी वर आले. वाचायला मजा आली.

सकाळ मटा चा रिव्ह्यु वाचुन पिक्चर बघण्यापेक्शा मायबोलिकरान्चा रिव्ह्यु वाचुन पिक्चर बघावा असे वाटायला लागलेय.

नंदिता तु रिपोर्टर आहेस का? तुझ्याकडुन बरीच महिती कळली.


keep it up Nandita and ofcourse all Maaybolikar.

Slarti
Friday, December 14, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल, असामी, अनुमोदन. डेंझेलच्या भूमिका बर्‍यापैकी एकसुरी वाटतात..... तरी Philadelphia मधले त्याचे काम सही होते आणि Training Day मधली व्यक्तिरेखा मला वेगळी वाटली. त्याला जेव्हा Training Day साठी ऑस्कर - नामांकन होते तेव्हा ज्युलिया रॉबर्ट्स (आधीच्या वर्षी तिला Erin B. साठी ऑस्कर होते) म्हणाली होती, "He should be on his third Oscar by now, and that might not be enough. I cannot absorb living in a world where I have an Oscar for best actress and Denzel doesn't have one for best actor."

Slarti
Friday, December 14, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचे ऑस्कर स्विकृती भाषणसुद्धा छान होते. त्याच वर्षी Sydney Poitier ला (ऑस्कर विजेता पहिला आफ्रो-अमेरिकन) Lifetime Achievement मिळाले जे समारंभात आधीच दिले जाते. तेव्हा पुरस्कार स्विकारताना डेंझेल म्हणाला होता, "....Forty years I've been chasin' Sidney. They finally give it to me and what'd they do? They give it to him the same night. I'll always be chasing you, Sidney. I'll always be following in your footsteps. There's nothing I would rather do, sir. Nothing I would rather do....." सुंदर.

Farend
Friday, December 14, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फिलाडेल्फिया पाहायला पाहिजे मग. हे ऑस्कर वगैरे त्याच वर्षी का जेव्हा जणू काही ठरवून आफ्रिकन अमेरिकन्स ना बरीच पारितोषिके दिली होती? हॅली बेरी ला ही तेव्हाच दिले होते ना? आणि मायकेल मूर चे भाषण ही त्याच वेळचे बहुतेक. कदाचित माझ्या डोक्यात मिक्स झाले असेल पण लगान जेव्हा होता स्पर्धेत तेव्हा खूप लक्षपूर्वक बघितली होती, हे तेव्हाचेच असावे.

Slarti
Friday, December 14, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला Philadelphia ३ कारणांसाठी खास वाटतो : टॉम हँक्स, डेंझेल आणि स्प्रिंग्स्टीन. Streets of Philadelphia ऐकून Springsteen ऐकायला सुरुवात केली आणि ऐकतोच आहे . अजूनही Streets... ऐकताना काटा येतो.
खास बात म्हणजे यात हँक्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ऑस्कर मिळालं, लगेच पुढच्याच वर्षी Gump साठी मिळालं. सलग दोन वर्षी हा पुरस्कार मिळवणारे दोघेच आहेत आतापर्यंत... तो आणि Tracy .


Itgirl
Friday, December 14, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फिलाडेल्फिया अतिशय सुरेख सिनेमा आहे. मला खूपच आवडला होता. टॉम हॅंक्स आणि डॅंझेल, दोघांचीही कामे अतिशय सुरेख झाली आहेत. एकदा तरी पहावाच, असा सिनेमा आहे.

Rachana_barve
Friday, December 14, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा TV वर The Bourne Identity बघितला. मला खरच खूप आवडला. मी action movies ची fan नाही तरी पण आवडला. The Bourne Ultimatum चा ट्रेलर बघितला होता. बराच रक्तरंजीत वाटला होता चित्रपट त्यावरून. पण पहिला भाग बघितला असल्याने उत्सुकता वाटते आहे. कोणी बघितला आहे का?
om shanti om बघितला. मला तरी आवडला. खास करून काही bollywood चे जोक्स TP आहेत :-) मला तो awards चा सीन अतिशय आवड्ला :-O.. आजा नच ले पण बघितला. तो देखिल आवडला. MD छान दिसते.


Jhuluuk
Friday, December 14, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय रचना,
मी पाहिला आहे bourne ultimatum !
चांगला आहे.. पण त्या आधीचे २ पिक्चर्- bourne identity आणि bourne supremacy पाहिले असतिल तरच story कळेल असं मला सांगितला गेले होते..
त्यामुळे मी जरा background घेउन पाहिला आणि समजला! :D


Swati_rajesh
Friday, December 14, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The Bourne Ultimatum ha sundar aahe. Tyamadhil tunnel madhil scene tar phahanyajoga.

Asami
Friday, December 14, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल ,slarti मला Training Day हि सुरूवात वाटते तशा प्रकारच्या roles ची.


Lalu
Friday, December 14, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>Training Day हि सुरूवात वाटते तशा प्रकारच्या roles ची

हो. त्याआधी कुठलाच रोल तसा नव्हता. मी तर त्याचा पहिला सिनेमा 'मिसिसिपी मसाला' पाहिला होता. तेव्हापासून तशीच इमेज मनात होती ती 'ट्रेनिन्ग डे' नन्तर बदलली. बाकी दिग्दर्शकाना तो अशा प्रकारचे रोल करु शकतो याचा साक्षात्कार 'ट्रेनिन्ग डे' नंतरच झाला असावा. स्लार्ती, ते स्पीच आठवते :-). मॉर्गन फ्रीमनला पण बरीच वाट पहावी लागली ऑस्कर साठी. Shawshank च्या वेळी गॅरी सिनिस ने पळवले ( no complaints. ) शेवटी केलेल्या सगळ्या रोल्स पैकी तुलनेने कमी अशा रोलसाठी मिळून गेले.

बरं, या वर्षी मी गोल्डन ग्लोब, ऑस्कर वगैरे Angelina ला देऊन टाकले आहे आधीच!


Chinya1985
Friday, December 14, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेन्झेल वॉशिंग्टन भारीच आहे पण ट्रेनिंग डे काही एव्हढा आवडला नव्हता कारण बॉलिवूड मधे असे पिक्चर आले आहेत.

मुंबई साल्सा पाहिला. पिक्चर ठीक आहे. 'लाईफ़ इन मेट्रो' सारखाच आहे. ती मराठी 'गोलमाल' वाली भारी दिसत होती त्या चित्रपटात मात्र 'मुंबई साल्सा' मधे धुणी धुते.

पायरसीबद्दल म्हणायच तर ते चुकिच नक्की आहे पण परदेशातील रसिकांनी मराठी चित्रपट मग पाहुच नयेत का??बिल गेट्स भारतात आला होता तेंव्हा त्याला प्रश्न विचारला होता भारतातील पायरसीमुळे तुम्हाला खुप नुकसान होत असेल तर तुम्ही याबद्दल काय म्हणता??तो म्हणाला की पायरसीमुळे नुकसान होते पण पब्लिसिटी पण होते त्यामुळे ते मायक्रोसॉफ़्टच्या पथ्यावरच पडते.


Sashal
Friday, December 14, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Denzel Washington चा John Q पण छान आहे .. त्याचं त्यातलं character कदाचित तसंच stereo-typed (सगळं स्वतःच्या हातात घ्यायचं style ) असेल पण पिक्चर खूप छान आहे ..

Asami
Friday, December 14, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेन्झेल वॉशिंग्टन भारीच आहे पण ट्रेनिंग डे काही एव्हढा आवडला नव्हता कारण बॉलिवूड मधे असे पिक्चर आले आहेत. >> भारी आहेस तु :-)

piracy बद्दल असे आहे कि विकत घेउन पाहता येतात तेंव्हा


Karadkar
Friday, December 14, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Denzel Washington चे अतिशय आवडते सिनेमे म्हणजे Philadelphia, The Glory, Hurricane, Pelican Brief

सही कमे केली आहेत ह्यात त्याने. MississippI Masala मधे मस्त दिसला पण movie भंकस होता :-)


Admin
Saturday, December 15, 2007 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/46/103546.html?1142549984
तस्करीबद्दल असलेले सगळे संदेश इथे हलवले आहेत.

Slarti
Saturday, December 15, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> डेन्झेल वॉशिंग्टन भारीच आहे पण ट्रेनिंग डे काही एव्हढा आवडला नव्हता कारण बॉलिवूड मधे असे पिक्चर आले आहेत.

उदा. ??

Mukund
Saturday, December 15, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी,अमोल तुम्ही म्हणता ते खरे आहे.. त्याचे रोल काही प्रमाणात एकसारखे वाटतात.. पण तरीही ट्रेनींग डे मधे एका करप्ट नार्कॉटीक ऑफ़ीसरची वठवलेली भुमिका त्याने इतक्या सहजतेने व नैसर्गीकरित्या निभावली आहे की मी तरी खुप इंप्रेस झालो होतो मुव्ही बघीतल्यावर. अमोल आता तु तो हसणार्‍या भुमिका का करत नाही याबद्दल त्याला दोषी ठरवणार असशील तर तु मला सांग इंग्लिश मुव्हीज मधे असा कोणता अभिनेता आहे की जो हसत खेळत काम करतो?(कॉमेडी मुव्हीशिवाय?)डॅंझेलच काय पण शॉन कॉनरी,पीअर्स ब्रॉसनन, हॅरीसन फ़ोर्ड,मॅट डेमन,मेल गिब्सन,ब्रुस विलीस,ब्रॅड पीट किंवा टॉम क्रुझसुद्धा घे... ते कधीही नायिकेच्या मागे... तुझे देखा तो ये जाना सनम... किंवा मेरे सपनोकी रानी कब आयेगी तु..... वगैरे म्हणत नाचताना दिसणार नाहीत.. आणी ते तसे गात फिरतायत या विचारानेच हसु फुटते(तसे करण्याचे पॅटंट फक्त हिंदी मुव्हीजमधल्या अभिनेत्यांनी घेतले आहे..:-))

स्लार्टी.. हो मलाही आठवत आहे त्याचे ऑस्करचे स्पीच. आणी तुम्ही कोणी सिडनी पॉइटे चा टु सर विथ लव्ह हा मुव्ही पाहीला आहे का? त्या एकाच मुव्हीवरुन त्याच्या अभिनयाची ताकद तुम्हाला कळुन येईल.. जरुर बघा. तो जेव्हा हॉलीवुड मधे काम करत होता तो काळ अमेरिकन ब्लॅक लोकांसाठी चांगला नव्हता. बसमधे, ट्रेनमधे त्यांना बसच्या व ट्रेनच्या पाठी वेगळ्या जागा होत्या,त्यांची मुले वेगळ्या शाळेत जायची, त्यांना मतदानाचा हक्क नव्हता(तो १९६५ नंतर मिळाला) त्यामुळे त्या वेळेला तो इतका जबरदस्त अभिनेता असुनही त्याला एकदाच ऑस्कर मिळाले होते.(लिलीज ऑफ़ द फ़िल्ड मधल्या होमर स्मिथ च्या भुमिकेबद्दल..) त्यामुळे २००३ साली त्याला लाइफ़टाइम अचिव्हमेंटचे ऑस्कर मिळाले ते उचितच झाले.

चिन्मय... मला तुझ्या विविध विषयातल्या ज्ञानाविषयी आदर आहे... पण कम ऑन... हिंदीमधे ट्रेनींग डे सारखे हजार मुव्हीज असतील पण त्या डॅँ झेलच्या तोडीचा एकाने तरी अभिनय केला आहे का? आता संजय दत्त किंवा फ़र्दीन खान तसाच अभिनय करतात असे सुचवु नकोस..प्लिज!:-)


Slarti
Saturday, December 15, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

To sir... सुरेख आहे, शिवाय Guess, who's coming to dinner मधली त्याची आणि Tracy ची जुगलबंदी... व्वा !

>>> असा कोणता अभिनेता आहे की जो हसत खेळत काम करतो?
Jack Nicholson ला विसरलात !! One flew...., Terms of endearment, easy rider, A few good men ते The shining, batman, the departed ते as good as it gets, about schmidt ते पार mars attacks ! पर्यंत माणूस (पक्षी जॅक निकलसन) हसत खेळतच भिडतो...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators