Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 16, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through November 16, 2007 « Previous Next »

Maitreyee
Wednesday, November 14, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, अग जाऊ दे की, त्या रनबीर साठी एवढी का अपसेट होतेयस तू :-) हे म्हणजे आपण म्याच हरली की फ़िक्सिन्ग मुळे हरली असे म्हनण्यासारखं झालं :-)
कोणी किती PR केले तरी लोकाना (म्हणजे मुलींना ) जर तो आवडलाच नाही तर त्याला कोण काय करणार. तिथे टॉवेल पाडला काय किंवा बार मधे दूध प्याले काय काही उपयोग नाही :-O



Asami
Wednesday, November 14, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते हीरोईन ला तरी का टॉवेल मध्ये? >> अग movie मधले सगळे towel मधे दाखवले तर costume designer च्या पोटापाण्याचे काय

Chinya1985
Wednesday, November 14, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनि,राज कपुरचा फ़ॅन नाही कारण अजुन त्याचा एकही पिक्चर पाहिलेला नाही. पण आता तुम्ही इतक त्याच नाव सारख सारख रोशन करताय तर बघायला हवा. हीरॉईन टॉवेलमधे चालते कारण ती टॉवेलमधे आल्याचा कुठल्याही पुरुषाला त्रास होत नाही मुलाला तर नाहिच नाही. पण हिरो जर टॉवेलमधे आला तर काही मुलींनाही आवडत नाही,आणि मुलांच्या तर डोक्यात जातो.

नन्दिनि हे तु त्या भन्साळ्याला सांगायला हव. पण मिडीयावाले शाहरुख,यश चोप्रा,करण जोहर वगैरे यांना फ़ारच डोक्यावर घेतात. शुक्रवारी तरण आदर्शनी लिहिलय की शाहरुखच्या सर्वात चांगल्या चित्रपटांपैकी एक आहे OSO . पैसा वाटला असेल सगळ्यांना. खालिद मोहोम्मदच तर बोलायलाच नको. बाकी शाहरुखचा पिक्चर फ़्लॉप व्हावा अस मनोमन वाटत असत.

दोन प्रश्न्-दिपिका पदुकोण रनबिर कपुरची गर्ल्फ़्रेंड होती??मी तर वाचल की सोनम कपुरशी अफ़ेयर आहे त्याच.
सोनम कपुरने कुठल्या चित्रपटाला बिकिनि शॉट्स दिलेत? अनिल कपुरचे यावर काय म्हणने आहे??


Lopamudraa
Wednesday, November 14, 2007 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ओम शांती ओम" च्या ऐवजी वेळ असेल तर "जब वी मेट" दुसर्यंदा बघावा...!!! डोर तीसर्यांदा बघावा..!!!

Tanyabedekar
Wednesday, November 14, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारत आणि अमेरिकेमधील अणु-करारापेक्षाही जास्त उत्सुकता अनिल कपूरचे सोनम कपूरच्या बिकिनी शॉट्सबद्दल काय मत आहे ह्याबद्दल भारतातील आम जनतेला आहे.

Deepanjali
Thursday, November 15, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lol.. अनिल कपूर च्या reaction चं काय एवढं ? :-)
सोनम कपुर चं profession आहेच glamerous, अनिल कपुर किंवा इतरांना काय वाटणार त्याचं !


Nandini2911
Thursday, November 15, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनि हे तु त्या भन्साळ्याला सांगायला हव. '
>>>>
चिन्या, नवीन जॉब तेच तर आहे. पहिला क्लायंट रणबीर कपूर आहे. १९ पासून तिथे जॉईन होतेय.
दिपिका पदुकोण रनबिर कपुरची गर्ल्फ़्रेंड होती
>>>
अरे, जबरदस्त गाजलेलें आहे. सोनम रणबीरचं "काहीही" नाही. दिपिकाचा live in relationship वाला निहार पंड्या आणि रणबीरचे एका क्लबमधे मारामारी पण झाली होती. रणबीरची आधीची गर्लफ़्रेंड (शाळेपासूनची) त्याला सोडून गेली. ती परत यायची त्याला अजून आशा आहे. :-)

आयला मायबोलीकराना सर्व गॉसिप आधीच कळत जाईल..




Giriraj
Thursday, November 15, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणतेही अफ़ेअर नसलेली एखादी चानपैकी हिरोईन सांग पाहू नंदिनी! :-)

Itgirl
Thursday, November 15, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..कोणतेही अफ़ेअर नसलेली एखादी ..

गिरिराज, विचार काय??


Nandini2911
Thursday, November 15, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहे ना.. मल्लिका शेरावत.. (पण ती घटस्फ़ोटित आहे.)


Dineshvs
Thursday, November 15, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता नंदिनी एवढा काहि माझा अभ्यास नाही पण गिर्‍या एका ऐवजी दोन नट्या आठवल्या बघ.

हेमामालिनीचा सीता और गीता पाहिलाच असशील ( नाही रे हेमाबद्दल नाही काही म्हणत मी ) तर त्या सिनेमात अगदी पहिल्याच सीनमधे ना नुकत्याच जन्मलेल्या जुळ्या मुली दाखवल्यात, त्यांचे तेव्हा तरी नक्कीच काहि अफ़ेअर नव्हते रे.
आणि बाय द वे, तुझी अत्यंत आवडती ईशा देओल पण अजून एकाकीच आहे रे. ( सॉरी रे तुझे गुपित मी उघड केले, पण काय आहे ना, जे काही आहे ते फक्त तुझ्यातर्फ़े म्हणजे एकतर्फ़ीच रे, तिचा काय दोष त्यात ? )


Maanus
Thursday, November 15, 2007 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलम? .. .. ..

मै से मी से ना मीना से, दिल बेहलता है.


Sashal
Thursday, November 15, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

* Spoiler warning त्या ओम् शांती ओम् चं नाव खरंतर ओम् शांती ओम् शांती हवं ना? बिचार्‍या त्या शांती च्या look alike ला किंवा तिच्या भूताला काहीच footage नाही ..

पुरुष प्रधान संस्कृती चा निषेध!


Chinya1985
Thursday, November 15, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला चांगल आहे नन्दिनि. आम्हाला आता रणबिरच्या न्युज देत रहा. बर अजुन एक प्रश्न. भन्साळीनी शाहरुख विरुध्द काहितरी विधान केल आहे अस वाचण्यात आल.ते काय आहे कशाबद्दल आहे??

Farend
Thursday, November 15, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुष प्रधान संस्कृती .... हो किंवा 'ओम शांती शांती' सुद्धा चालले असते. पण मग स्त्रीप्रधान झाले असते. पण कल्पना करा, या हिशेबाने संजीव कुमार च्या नया दिन नयी रात चे नाव काय झाले असते :-)

Farend
Friday, November 16, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणतेही अफ़ेअर नसलेली एखादी ...

गिरीराज निरूपा रॉय, जोहरा सहगल, रोहिणी हट्टंगडी तसेच शबाना आज़मी यांचे कोठे अफेअर चालू असल्याचे ऐकिवात नाही


Amruta
Friday, November 16, 2007 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा कठीण आहेस रे. अरे गाण तरी निट म्हण. हसायला आल तु लिहिलेल वाचुन.:-)

Psg
Friday, November 16, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए आशा पारेखचेही ती अगदी टॉपची हीरॉईन होती तेव्हाही अफेअर नव्हते म्हणे कोणाशी..

btw आज बातमी आहे की मनोजकुमार शाहरूखवर अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे.. 'ओम' मधे त्याचं portrayal विनोदी केलं म्हणून.. डीटेल बातमी नंतर सांगते, नाहीतर नन्दू सांगेलच :-)


Zakasrao
Friday, November 16, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए आशा पारेखचेही ती अगदी टॉपची हीरॉईन होती तेव्हाही अफेअर नव्हते म्हणे कोणाशी.. >>>>..
हम्म.
पण तिच वय झालय ना आता हो ना रे गिरि
जोक्स अपार्ट तीने लग्न केलच नाही अस ऐकल मी. प्रत्यक्ष तिनेच एकदा बुगी वुगी मध्ये सांगितल होत.
अमोल
पुनम डिटेल्स दे लवकरच
गॉसिपिंगचा वेगळाच BB हवा ना. :-)



Manjud
Friday, November 16, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, .. ..

तुम्ही हे असं पण लिहू शकता, आवडलं बॉ आपल्याल....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators