Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 30, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through October 30, 2007 « Previous Next »

Badamraja
Friday, October 26, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड एकदा बघायला काही हरकत नाही(पण सस्पेंन्स ओपन होण्याच्या आधी) :-)

Meenu
Friday, October 26, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भूलभूलैय्या चा विषय चाललेला दिसतोय म्हणून लिहीते. हा सिनेमा तसेच हेराफेरीसुद्धा हे चित्रपट प्रियदर्शनने मूळ मल्याळी सिनेमावरुन घेतले आहेत. भूलभूलैय्या च्या मूळ मल्याळी सिनेमामध्ली काही दृश्य यु ट्युब वर नक्की पहा. Manichitrathazhu हे मल्याळी सिनेमाचे नाव आहे.
http://www.youtube.com/watch?v=I64acIebgc8 या सिनेमासाठी या (मल्याळी)अभिनेत्रिला national award मिळाले आहे. आणि हो dance पण सुंदर आहेत.

दोन्ही मल्याळी originals हिंदी रीमेकपेक्षा जास्त चांगले आहेत.

Badamraja
Friday, October 26, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु पण त्या सिनेमा मधे विद्दा बालन आणि अक्षय कुमार दोघही नसतील.
आणि हो विद्दा बालन चा अभीनय चांगला झाला आहे.
भुत मधील उर्मीला च्या जवळ जान्याचा विद्दाचा प्रयत्न बर्‍यापैकी सफ़ल झाला आहे.


Dineshvs
Friday, October 26, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, आभार मला तसे वाटतच होते. म्हणजे रुपांतर करताना गडबड झालीय वाटतं. अक्षयच्या जागी मोहनलाल आहे ना ? पण तरिही भुलभुलैया तली नर्तकी छान आहे हो.

नंदिनी, कथ्थक नाजुक प्रकार नसतो. शेवटी चक्कर घेताना, हाताच्या हालचाली तलवारबाजी केल्यासारख्याच होतात.
खरे तर हिंदि सिनेमात अस्सल भरतनाट्यम फारच कमी दिसले. मला फक्त जुनीच गाणी आठवताहेत. कदाचित तुम्हा लोकाना हि माहित नसतील
परदेसी नावाच्या सिनेमात पद्मिनी ( कोल्हापुरे नव्हे ) ने लताच्या गौड सारंगमधल्या तिल्लानावर भरतनाट्यम केलेय. तिनेच मेरा नाम जोकर मधे, काटे ना कटे रैना, या आशाच्या गाण्यावर भरतनाट्यम केलेय. हे गाणेही गौड सारंग मधेच आहे. पण पुढे ते गाणे सिनेमातुन वगळण्यात आले.
वहिदा रेहमानने गाईडमधे, मोसे छल किये जाय आणि एक फ़ूल चार काँटे मधे, मतवाली नार ठुमक ठुमक चली जाय, वर भरतनाट्यम केलेय. वैजयंतीमालाने, प्रिन्स सिनेमात, मुकाबला हमसे ना करो, मधे भरतनाट्यम केलेय. ( तिने याच गाण्यात मोहिनीअट्टमचा पण नमुना पेश केलाय ) मीनाकुमारीच्या चित्रलेखा मधे, कलावति रागातल्या, काहे तरसाये गाण्यावर भरतनाट्यम आहे, पण तो नाच मुखवटा घालुन, कुण्या दुसर्‍याच अभिनेत्रीने केलाय. अपलम चपलम, वरती पण भरतनाट्यम आहे, ते मद्रास सिस्टर्स असे नाव घेणार्‍या दोन नर्तिकानी केलय. ( वर उल्लेख केलेली पद्मिनी आणि तिच्या बहिणी रागिणी व ललिता, या पण भरतनाट्यम कलाकार होत्या. ) जयाप्रदाने, सूरसंगम मधे, आयो प्रभात, सुर का है सोपान सूरीला आणि आये सूर के पंछी आये वर भरतनाट्यम केलेय. आये सुरे के मधे तिने कथ्थक आणि ओडीसीची पण झलक दाखवलीय. हेलने ने गुमनाम मधे, रफ़ीच्या एका गाण्यात भरतनाट्यम केलेय. कमल हसन आणि प्रभुदेवाने पण भरतनाट्यम केल्याचे आठवतेय, पण त्यावेळी गाणी नव्हती.

त्या मानाने कथ्थक हिन्दी सिनेमात भरपुर आलेय. मोहे पनघटपे आणि प्यार किया तो डरना क्या, या मोगले आज़म मधल्या दोन्ही गाण्यावर मधुबालाने कथ्थक केलेय. झनक झनक पायल बाजे मधल्या, रागमालेत, शीर्षक गीतावर आणि घनश्याम नही तूम काले हो, वर संध्याने गोपीकृष्णबरोबर जोमदार कथ्थक पेश केलेय. वैजयंतीमालाने संघर्ष मधे, तस्वीरे मुहोब्बत थी जिसमे गाण्यावर, कुमकुमने बसंत बहार मधल्या, कर गया रे मुझपे जादु आणि जा जा रे जा वर कथ्थक केलेय, तिनेच कोहिनूर मधल्या, मधुबनमे राधिका नाचे वर कथ्थक केलेय. हेमामालिनीने किनारामधलया, मीठे बोल बोले, वर कथ्थक केलेय. मिनु मुमताजने जहांआरा मधल्या, तुम और याद आये तसेच साहब बिबी और गुलाम मधल्या, साकिया गाण्यात कथ्थक केलेय.
पाकिजा मधे टायटल्स च्या आलापात, युही कोई मिल गया था, थाडे रहियो, ईन्ही लोगोने आणि आज हम अपनी दुआओंका असर वर उत्तम कथ्थक आहे, पण त्यापैकी कठिण भाग, बहुतेक सितारा देवी आणि पद्मा खन्नाने निभावलाय.
शिकारी सिनेमात, तूमको पिया दिल दिया, या गाण्यावर रागिणी आणि हेलनने उत्तम कथ्थक केलेय. अर्थात हे सगळे अगदी शास्त्रीय नाच नव्हते. अगदी शास्त्रीय असे कथ्थक, शतरंजके खिलाडी मधे आहे, पण त्यावेळी गाणे नाही.
अगदी अलिकडे ऐश्वर्याच्या उमराव जान मधे सुंदर कथ्थक दिसले होते. वीर रसासाठी अर्थातच कुठलेही नृत्य आदर्श आहे म्हणा.
बीभत्स रस तसा सगळ्याच नृत्यात असतो, पण शशि कपुरच्या कलयुग मधे, कथकलीचा बीभत्स रसासाठी छान उपयोग केलाय. तो प्रकार बघुन अनंत नाग आणि सुप्रिया पाठक उठुन जातात, असा प्रसंग आहे.

पुर्वी टिव्हीवर शास्त्रीय नृत्याचे उत्तम कार्यक्रम सादर होत असत. मराठी नर्तिका सुचेता भिडे, डॉ कनक रेळे, झेलम वर्दे, या नर्तिकांचे कार्यक्रम मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. आपली मराठमोळी लावणी पण बहुतांशी कथ्थकवरच आधारित असते, आणि लिला गांधि, जयश्री गडकर सारख्या अभिनेत्रीनी कथ्थकचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले होते. माया जाधवपण यात पारंगत आहे.

या निमित्ताने या सगळ्या गाण्यांची आठवण झाली.



Asmaani
Friday, October 26, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भूल भुलैय्या पाहिला. छानच आहे. मुख्य म्हणजे सभ्य आहे. कदाचित हिंदी चित्रपटात खूप वर्षांनी शास्त्रीय संगितावर आधारीत गाणे आणि नृत्य बघायला मिळाले.
मला वाटते की ह्या फ़िल्म चा उद्देश " भूत वगैरे गोष्टी मनाचा खेळ असतात" असे दाखवण्याचा होता. पण शेवटी भुताच्या अस्तित्त्वाची शंका पूर्णपणे दूर नाही होत.


Slarti
Friday, October 26, 2007 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बदाम, रहस्य सांगायचे असेल तर कृपया spoiler warning असे लिहाल का ? एवढीच कळकळीची विनंती... त्यायोगे तुम्हाला चर्चाही करता येईल व लोकांना अनपेक्षितपणे नको ती माहिती मिळणार नाही. हे कसे, कुठे करतात हे जाणून घेण्यासाठी IMDb ला अवश्य भेट द्या.
धन्यवाद.


Farend
Friday, October 26, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावरून एक विनोद आठवला. एक माणूस एक रहस्यपट बघायला जातो. फुल्ल असल्याने एका ब्लॅक वाल्याकडून तिकीट घेऊ पाहातो. पण पाच का पचास वगैरे करत शेवटी अगदी थोड्या जास्त किमतीत सुद्धा तो तिकीट घ्यायला तयार होत नाही. मग नाईलाजाने तो ब्लॅक वाला त्याला मूळ किमतीत तिकीट देतो, पण पैसे आल्यावर सांगतो "ड्रायव्हर ने खून केला" :-)

Badamraja
Saturday, October 27, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी तुमची सुचना वजा विनंती नक्कीच पाळली जाईल.

Nandini2911
Saturday, October 27, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा. कथ्थक काय कुठलाच नृत्यप्रकार नाजुक नसतो. (मी स्वत्: वयाच्या पाचव्या वर्षी घुंगरू बांधले आहेत. :-)) माझी आत्या भरतनाट्यमाम्धे विशारद होती.
मात्र कथ्थक का नृत्यप्राकार इथे असायल हवा होता हे जे तुम्ही म्हणत होता त्यावरून मी सांगितलं की तो इथे चालला नसता. मुळात कथ्थक मधे thighs and calf movements खूप लिमिटेड आहेत.

मी शास्त्रीय नृत्य करणं सोडुन बरेच दिवस झाले. मधे एका मेडिकक प्रॉब्लेम मुळे मला नाच हा प्रकार पूर्ण सोडावा लागला होता. पण हौस नावाची अजीब गोष्ट आहे. त्यामुळे सध्या jazz आणी सालसा शिकतेय. पण शास्त्रीय नृत्य परत शिकायचा विचार आहेच. :-)

आणी दिनेशदा एवढ्या मोठ्या यादीत तुम्ही माधुरीला विसरलात??? देवदासमधे पंडित बिरजू महाराजानी बसवलेलं काहे छेड छेड मोहे वर माधुरी काय अप्रतिम नाचते!! (तिने त्यातले कवित्त पण स्वत्: म्हटलय)
आणि संगीत मधेपण तिने जबरदस्त नृत्य केले होते. माधुरी ग्रेट डान्सर आहे हे जर कुठे दिसत असेल तर चोली ज्के पिछे गाण्यात. अत्यंत अश्लील शब्द असताना देखील तिने सरोज खानने ज्या मर्यादा सांभाळल्या आहेत त्याला तोड नाही.

उमराव जान मधे ऍशपेक्षा वैभवीचीच मेहनत जास्त आहे. :-) ऍशनए जीन्समधल्या एका गाण्यात जबरदस्त भरतनाट्यम केले होते. पण वयानुसार तिचा स्टॅमिना कमी झाला आहे. Miss India स्पर्धेत तिने सुंदर भरतनाट्यम केले होते.
आणि हेमामालिनीने अभिनेत्री मधे शास्त्रीय नृत्य केले होते. एशा देओल स्टेजवर प्रतिम नाचते. पिक्चरमधे मात्र तिचा फ़ारसा प्रभाव दिसत नाही. अहाना पण सुंदर नाचते.

मात्र सध्या नृत्याचा अजीब ट्रेंड चालू असल्यामुळे कुणीही उठतो आणि नाचतो. बिपाशाने एका सोहळ्यात जादु है नशा है वरती डान्स केला होता. :-)


Maanus
Sunday, October 28, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करिना आणि शाहीद चा break-up कधी झाला?

http://esakal.com/esakal/10282007/Nava_Chitrapat99170CDDCE.htm


Dineshvs
Sunday, October 28, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा नंदिनी, हि पण हुनर आहे का अंगात ? चला या निमित्ताने आम्हाला कळलं तरी. ग्रेट.

मला माधुरीचा देवदास मधला नाच तितकासा नव्हता आवडला. त्यात तिने स्वतः काहि ओळी गायल्यात पण तिचा ड्रेस फारच बोजड होता. आणि मार डाला तर तद्दन फ़िल्मी होता. तिला असे फ़िली नाच करायला लावुन, तिच्या टॅलेंटचा अपमानच झालाय नेहमी.
तिने १०० डेज नावाच्या एका सिनेमात, झासा देरे ना झासा, अश्या गाण्यावर छान नाच केला होता.


Prajaktad
Sunday, October 28, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करिना आणि शाहीद चा break-up कधी झाला? >>>>

http://www.indiaglitz.com/channels/hindi/article/34157.html

खर खोट ते दोघच(तिघ) जाणे..

Savyasachi
Monday, October 29, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे करिना शाहीद सोड, करिना आणि सैफ आता एकत्र आहेत. प्राजक्ताने लिंक दिली आहेच

Maitreyee
Monday, October 29, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भूलभुलैया पाहिला. शेवट इथल्या काही लोकांच्या सौजन्याने(?!) आधी समजला होताच. काही TP सीन्स आहेत पूर्वार्धात. पण एकूण मला ना धड कॉमेडी ना धड हॉरर असे रसायन वाटले. अक्षय ला वाया घालवलेय. * spoiler warning * अन त्या विद्या बालन चे का इतके कौतुक होत आहे ते कळले नाही.त्या रोल मधे कुणीही असते तरी मेकप अन वातवरण निर्मिती च्या साह्याने तितके बरे काम केलेच असते. अधून मधून एक ती वेडसर नजर सोडली तर बाकी काही भाव वगैरे दाखवायला चन्सच नव्हता. ***
प्रियदर्शन ने as usual पात्रांची गर्दी करून कुणालाच वाव दिला नाहिये.
btw गावाच्या आतले काही शॉट्स अन बहुतेक लोकांचे कपडे, फ़ेटे पाहून दिनेश नी लिहिलेले पटले! ते गाव बाहेरून काशी अन अन्तर्भागात जेसलमेर असावे असे वाटते :-)


Farend
Monday, October 29, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाहेरून काशी अन अन्तर्भागात जेसलमेर LOL
म्हणजे बंटी और बबली आणि पहेली चे स्क्रॅप वापरून सेट्स बनवले असावेत :-) मला पोस्टर मधील विद्या बालन रानी सारखीच वाटली.

'जब we met ' कोणी पाहिला का? दोन्ही कपूर बद्दल अजून डेअरिंग होत नाही.


Savyasachi
Monday, October 29, 2007 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी आवडला भुभू :-)
परेश रावल नेहमीच सही काम करतो. आणि अमिषा नेहमीप्रमाणे सही दिसते. अजून काय पाहीजे :-)
तस विद्याबाचे काम उत्तम आहे. विक्रम फार हास्यास्पद वाटतो. आधी मारे गाजावाजा केला आहे थोर मांत्रीक वगैरे आणि शेवटी फक्त अक्षयच्या शिष्याची लायकी करून टाकली आहे. आणि तेही गणपतीस्तोत्र म्हणत. टू मच.


Tanyabedekar
Tuesday, October 30, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नो स्मोकींग पाहिला का कुणी?? एकदा पाहायला हरकत नाही. पहिल्या बघण्यात काही म्हणजे कहीही कळत नाही. but its a bold attempt..

Manuswini
Tuesday, October 30, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भूलभूलैया पाहीला इतके इथले वाचून. छ्या! काहीऽऽऽ खास वाटला नाही.
भीती निर्माण करायचा प्रयत्न फसलेला वाटला मला तरी.
दुसरे म्हणजे एवढे नावाजलेले डॉकटर असून disturbed identity disorders मांत्रीक Style ने खरेच cure करतात???????//
त्यात ते शायनी ला कापणे काय? आभास निर्माण करणे, गुलाल फेकणे, मंत्र जाप वगैरे कायच्या कै!... तीनेच मागून येवून कपाट ढकलणे नी कोणाला तिच्या बाजूला येण्या जाण्याचा आवाज न होणे काहीही.........

मग अक्षय दोन मिनीटेच फक्त एखाद्या लालु डॉकटसारखे अब तुम आंखे धीरे धीरे खोलो हास्यास्पद.

कोणी इथे Psychiatrist इथे असेल वा ज्ञान असेल त्यात तर त्यांनी हे सांगा मला की अशी treatment देतात काय DID मध्ये?जंतर, मंतर, गुलाल मग गोधंळ घालून, नाटके रचून DID patient बरा होतो?
}

Itgirl
Tuesday, October 30, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, तुला अजून बरेचसे हिंदी सिनेमा मेंदू बंद करून बघायचे असतात हे कोणी सांगितले नाहीय्ये का? आता लक्षात ठेव हो :-)सव्यसाची, अमिषा सही दिसते?? कायच्या कायच!! कचकड्याची बाहुली आहे नुसती...

Manuswini
Tuesday, October 30, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग पण इथे सगळे एवढे तारीफ़ करतात आहेत त्यांनी मेंदू बाजूला काढला न्हवता काय हा प्रश्ण मला पडला य
लोक हो गमतीने घ्या हो


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators