Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 26, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through October 26, 2007 « Previous Next »

Asami
Thursday, October 25, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साथिया मस्ती कंपनी डरना मन है. युवा ओंकारा काल शूट आऊट ) हे सर्व तुफ़ान हिट नसले तरी पैसा वसूल नक्केच आहेत. > विवेकच्या जीवावर ? एक company म्हणालीस तर ठीक पण हे मला तर तुझा विवेक वर पण crush आहेकि काय अशि शंका येतेय आता :-)

Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>सब्बीर भाटीया सारखी माणसं सोडून कुठे गेली ही

सबीर भाटिया चांगला त्यांच्यापेक्षा?
मग मी म्हणतो, एक पैसा सोडल्यास माझ्यात आणि त्याच्यात काही फरक नाही :-)


Slarti
Thursday, October 25, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मग मी म्हणतो, एक पैसा सोडल्यास माझ्यात आणि त्याच्यात काही फरक नाही

हो, पण तो एक फरक बहुधा बराच मोठा असावा...

Itgirl
Thursday, October 25, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी, हेच मी लिहिणार होते :-) नुसताच मोठा फ़रक नाही, कदाचित निर्णायक पण :-)

Gsumit
Thursday, October 25, 2007 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग मी म्हणतो, एक पैसा सोडल्यास माझ्यात आणि त्याच्यात काही फरक नाही >>>

don't worry सव्यसाची, पैसे का क्या है, आज है, तो कल नही, लेकिन परसो है ना...

Deepanjali
Thursday, October 25, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या
कसा होणार तू भाटीया ??
अजुन पैसा पैसा च करतोयेस , सब्बीर सारखे लोक्स डॉलर मधे खेळतात !
btw,
विवेक ओबेरॉय माझा fav नाही पण त्याच्या मधे जबरदस्तं potential नक्कीच आहे असं मला वाटतं . :-)
कंपनी , दम , साथीया , शूट आउट , युवा मधे acting खूपच चांगलं केलय त्यानी .




Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेहे...
डीजे, अग मी पण $ मधे खेळून पाहीले ग. पण सॉलीड तोटा झाला :-(
आयटे, म्हणजे मुली पहिला पैसा बघतात तर :-)
सुमीत, अरे मला कळलय ते कधीच, ते तिला कळायला पाहीजे ना :-)
बाकी मला भाटिया होण्यात काही रस नाही. कोब्रा आहे ते उत्तम आहे :-)


Pranju
Friday, October 26, 2007 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी तुझा पहिला crush , तोच माझा पण ....सलमान खान.
मैने प्यार किया आला तेव्हा अक्कल नव्हती... मात्र सलमान आवडुन गेला.... मनापासुन . दहावीत असतान्ना हम आपके realease झाला आणी परिक्शा असुनही त्या वर्शी १०+ वेळा पाहिला.

दहावी च्या सुट्टीत मावशीकडे hydrabad ला ८ दिवस गेलो असतान्नाच माझा birthday होता. कुठल्यातरी पार्क मधे आम्ही मी , दादा , ताई असे ५-६ पोर सकाली पिकनिक ला गेलो. नाव आता आठवत नाहि पन national park होते. पार्क मधे काहिच गर्दी नव्हती... अगदी ३-४ ग्रुप दिसले फ़क्त.
जवळच शूटिन्ग चालु होते.... गुलटी लोकान्चा काहितरी बावळट्पणा चालू असेल म्हणून आम्ही बघायला गेलो नाही. थोड्या वेळाने दादाला मी ओढतच शूटिन्ग बघायला घेवुन गेले. बघते तर हिन्दि पिक्चर ... आणि चक्क सोहेल खान दिसला.... मी खुश. मी त्याच्याशी बोलनार तेव्हाच मला सलमान दिसला. मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. निळी जीन्स आणि पांढरा बनिअन... too much.



Pranju
Friday, October 26, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"औजार " चे शूटिन्ग होते ते..... फ़क्त सलमान चे शॉटस होते. पिक्चर चे unit सोडुन आणि आम्ही ७-८ लोक होतो.
सलमान बरोबर भरपूर गप्पा मारल्या. ... मराठी मधून . माझा birthday आहे हे दादा ने सांगितल्यावर त्याने केक मागवला. सगळ्या unit समोर सलमान स्वत: happy birthday to u.... गात असतान्ना मी केक कापला.

आमच्याकडे कॅमेरा नव्हता म्हनुन मी नाराज होते... तरी तिथल्या कॅमेरामॅन ला घराचा पत्ता देउन आम्ही निघालो. .घरी फ़ोटो येतील अशी अपेक्शा पन नव्हती.

जवळजवळ महिन्याने घरी मोठे पार्सल आले...सल्लु बरोबर काढलेले ४ फ़ोटो, त्याने स्वत: sigh केलेले मोठे greeting card आणि खुप सारे chocolates.




Itgirl
Friday, October 26, 2007 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...आयटे, म्हणजे मुली पहिला पैसा बघतात तर....
मी ते sarcastically लिहिले होते कोब्रा असून पण एवढे कळू नये म्हणजे कम्मालच झाली!!
साजूक तुपातले :-)



Nandini2911
Friday, October 26, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघा,,, सलमान किती चांगला आहे.
माझा विवेकवर क्रश वगैरे नाही पण सध्या सहानुभुती मात्र आहे. कधी काळी त्याच्यावर तुफ़ान लेखणी चालवली आहे ते जाऊ द्या.
पण त्याच्यात पोटेन्शिअल मात्र आहे.


Deepanjali
Friday, October 26, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रांजु ,
Wow सही ssssss च !!


Savyasachi
Friday, October 26, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे, घेतले ग. साजूक तुपातले बरेच पदार्थही आवडतात मला. (असच एक माहिती म्हणून :-) )

Savyasachi
Friday, October 26, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा प्रांजू, 'ऐश'च झाली कि म्हणजे तुझी :-)

माझा पण सलमान त्याच्या त्या एका हाताने पुशप्स मारण्यामूळे (एमपिके) एकदम आवडता आणि आयडॉल होता, आहे.
२००५ ला ऍमस्टरडॅम वर त्याला आणि कटरिनाला जवळपास तासभर बघत होतो ५ फूटांवरून. अर्थात कॅट कडे जास्त झाल:-)
हाय हेलो पण झाल. बरोबर काही माकडे पण होती. अतूल अग्निहोत्री आणि कोण कोण.


Manuswini
Friday, October 26, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, तु कोब्रा आहेस ते इथे सांगण्याचा पॉंईट नाही कळला बघ? :-). म्हणजे गपचुप कोणाला माहीती मायबोलि through द्यायची होती तर ठीक आहे :-)

तुला साजूक तुपातले पदार्थ आवडतात ना मग दोन(दिवे) घे माझ्याकडून. :-)


Savyasachi
Friday, October 26, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग गूपचूप कसल. प्रोफाईल मधे होमपेज मधे जगजाहीर आहे बघ :-)
हां आता कोणाला भिडे आडनावावरून देखील कळत नसेल तर गोष्ट वेगळी.
आता दोन देतेच आहेस तर अस बघ, दिवाळी तोंडावर आली आहे, खरच पार्सल कर बघू. नाहितरी मी हे चांगले करते ते चांगले करते अस जिकडे तिकडे लिहीले आहेस :-)


Maanus
Friday, October 26, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचा
http://ap.google.com/article/ALeqM5iFkg05PN361reUpYAF9hGHIWeiXw :-) पैसा असुन काही उपयोग नाही

Savyasachi
Friday, October 26, 2007 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, कुठून कुठून शोधतोस रे असल्या बातम्या :-)

Chinya1985
Friday, October 26, 2007 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साथिया मस्ती कंपनी डरना मन है. युवा ओंकारा काल शूट आऊट

साथिया माझ्यामाहितिप्रमाणे फ़ार हीट नव्हता,मस्ति हीट झाला तो कॉमेडीमुळे डरनात पण त्याची भुमिका १०मिनिटाची होती,युवा माझ्यामते फ़्लॉप होता आणि त्यात त्याची भुमिका तर अगदि उगाचच टाकलेली होती,ओंकारात तर त्याचा रोल बघितल्यावरच कळते की या बाबाला आता चांगले पिक्चर मिळत नाहित,शुटाउट मधे भुमिका ठिक होती पण त्याच्याऐवजी एखादा तगडा अभिनेता घेतला असता तर बर वाटल असत कारण पोलिस सांडच्या सांड आणि व्हिलन सगळे छोटु. त्या व्हिलनमधे फ़क्त एक दारुडा दाढीवाला ठिकठाक गुंड वाटत होता.

प्रांजु, सहिच

नन्दिनि, तु अजुन हृतिकबद्दल आणि रिअल लाइफ़ हिरोबद्दल लिहिणार होतिस ना??लवकर लिहि


Pranju
Friday, October 26, 2007 - 10:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलमान चे gift मी अजुन जपुन ठेवले आहे.... सगळ्या chocolates चे wrappers सुद्धा.
( नवरा दरवर्शी माझा birthday विसरतो , जेव्हा नुसता boyfriend होता तेव्हापासुन....thats why this gift is very special )

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators