Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Paij...

Hitguj » My Experience » Paij... « Previous Next »

Zulelal
Wednesday, August 01, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शाळेत असतानाची गोष्ट. शाळा सुटल्याची घंटा वाजताच सर्वात आधी दप्तर उचलून वर्गाबाहेर पळत रस्त्याला लागण्यासाठी आमची अक्शरश: स्पर्धा व्हायची. अशाच एका दिवशी मी सुसात सुतून रस्त्यावर पोहोचलो, आणि आधी आल्याच्या समाधानात थोडा सुस्तावुन चालू लागलो. थोडासा पुढे गेलो, आणि अचानक मागुन पाठीवर थाप पडली. `बंड्या' मी मागे न बघताच ओळखलं, आणि बंड्या चकित झाला. `कसं ओळखलंस?' आश्चर्यानं त्यानं विचारलं.
`त्यात काय कठीण आहे? मी कुणालाही ओळ्खू शकतो...' मी जरा जोरातच फुशारकी मारली.
`ह्या.. शक्यच नाही' बन्ड्या अविश्वासानं म्हणाला.
`बघ बंड्या, तू पुन्हा मागं जा, आणि पाठीवर थाप मार. पुन्हा मी तुला ओळखून दाखवतो. पण जर तु हरलास, तर मात्र मला कुल्फी द्यावी लागेल' मी म्हणालो.
... आणि बंड्या विचारात पडला.
`नकोच बाबा, तू खरच ओळखलंस, तर फुकट मला कुल्फीचा भुर्दंड पडेल' बंड्या म्हणाला.
दोनतीन दिवसानी मात्र तो अचानक तयार झाला.
तेव्हाही, कुल्फी मलाच मिळाली होती.


Ladtushar
Monday, January 14, 2008 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही पैज आहे!
माझ्या मित्रानी एकदा अशीच एका मित्राची खेचण्या साठी एक मस्त पैज लावली होती. कोण एका पवभाजी बरोबर जास्तीत जास्त पाव खाऊ शकतो. अणि जो हरेल त्याने बिल दयाचे.
१२ वी च्या परिक्षे च्या वेळी अभ्यासिकेत पैज सुरु झाल्यावर मलाच पाव आणायला दोनदा तिनदा बेकरित धावावे लागले. बघता बघता त्या दोघानी चक्क ११० पाव संपवले होते अणि मग पोट धरून बसले होते. आम्हा सगाल्यांची तर ह सु ह सु पु वा झाली.....

Raviupadhye
Monday, January 14, 2008 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या वाशिम च्या शाळेची नववी ची वार्षिक परिक्षा. हाल तिकिट घेण्यास गेलो होतो.विदर्भात मार्च मध्ये ऊन खूप असल्याने परिक्षेच्या आधी पन्धरा दिवस सुटी असायची. ही १९६१ सालची गम्मत.परत येताना वाटेत एक पूल लागतो.या पुला खालून वर्षात आठ महिने पाणी असायचे आणि बरोबरचा माझा मित्र रमेश अत्यन्त पट्टीचा पोहोणारा.पण त्या उन्हाळ्याच्या दिवसात पुला खाली पाण्याचा खडखडाट होता. आम्ही सर्व मित्रानी रमेशला चिडवून उडी मारण्याची पैज घ्यायला लावली पैज आईस क्रीम सोड्याची होती.त्या पठ्ठ्या ने ही उडी मारताना पालथी मान्डून उडी मारली अन मग आम्हाला त्याला दोन्ही पाय मोडलेल्या अवस्थेत उचलून वर आणावे लागले,बिचार्याची परिक्षा गेली पण आम्ही मुलानी हेड मास्तरना प्रामाणिक पणे वस्तू स्थिती सान्गितल्या वर मात्र त्यानी जून मधे पुन्हा त्याल पेपर देण्याची परवानगी दिली.
त्याच्या घरी मात्र आम्ही रस्ता खड तड खड तड होता अशी पुडी सोडली अर्थात गौप्य स्फ़ोट व्हायाला कितीसा वेळ लागणार??


Vinaydesai
Monday, January 14, 2008 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा शाळेत पाणी पिण्याची पैज लागली. मधल्या सुट्टीत मी तिथल्या ग्लासाच्या मापाने 13 ग्लास पाणी प्यालो. मित्राने 12 ग्लास संपवले होते. मी जिंकलो..

पण पाणी नको एवढे प्याले की त्याला एकाप्रकारचा वास येऊ लगतो, निदान मला तरी तसेच वाटले.

नंतरचा तास संपल्यानंतर बाथरूम कडे मारावी लागली धाव अजून स्मरणात आहे...


Sunidhee
Monday, January 14, 2008 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या मामाचा चेष्टेखोरपणा... त्याची पोरं-बाळं चांगली मोठी असतानाचा..
मुंबईत तो विलेपार्ले ला पार्ले बिस्किट पाशी रहायचा. त्यामुळे घरात बिस्कीटाचा नेहमी घमघमाट पसरलेला असे.
एकदा एक गृहस्थ त्याच्याकडे आले होते. गप्पा मारताना ते एकदम म्हणाले, 'काय मस्त वास येतोय.. अगदी डोळे बंद केले तरी येतोय'. त्याना कळले नाही त्यांची गफलत, पण मामाला कळली. मामा पडला चावट, तो पटकन बोलला, 'हो ना, अहो, अगदी कान बंद केले तरी असाच मस्त वास येतो'. तेव्हा ते गृहस्थ लगेच 'हो, हो अगदी खरे आहे...' असे म्हणताम्हणताच त्याना चूक कळली आणि ते म्हणाले, ' काय हो पडळकर, चेष्टा करताय होय?'. सर्व हसून दमले. :-)


Simm
Tuesday, January 15, 2008 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sunidhi--yaat doley mitaichi paij mhanaaichi ki kaan mitaichi?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators