Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 17, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through July 17, 2007 « Previous Next »

Pancha
Sunday, July 15, 2007 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी नागेश कुन्नुर चा "डोर" पाहिला का? such a wonderful film ! a must watch

Deepanjali
Sunday, July 15, 2007 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी दोर नाही रे हिंदी मधे आहे ' डोर ' :-)

Ravisha
Sunday, July 15, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो,हो फारंच सुंदर "डोर"...श्रेयस तळपदे,आयेशा टाकिया आणि गुल पनाग सर्वांचा अप्रतिम अभिनय
very different storyline


Pancha
Sunday, July 15, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा तोच तो डोर राजस्थान आणी हिमाचल चे चित्रिकरण सुरेख केले आहे, a must watch for everyone, isn't it a wonderful movie? How far would you go to save the one you love?

इथे बघा डोर
Dor Movie

नागेश कुन्नुर चा तीन दिवारे पन छान होता

Dineshvs
Sunday, July 15, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल shootout at Lokhandawala पाहिला. आधी चर्चा झालीय. जबरदस्त रक्तपात बघवत असेल तर अवश्य बघावा.
पोलिसांपैकी संजय दत्त आणि अरबाझ खान ठिक, सुनील शेट्टी च्या बथ्थड चेहर्‍यावर काहिच भाव उमटत नाहीत. अमिताभ बच्चन फ़िका वाटला. पहिल्यांदा तो कोण आहे तेच कळत नाही.
भाईलोकांपैकी विवेक उत्तम. तुष्षार बरा.
राखी सावंत पाहुणी कलाकार आहे, पण आयटम मधे नाही. दिया मिर्झाला चांगले रोल्स मिळतच नाहीत आजकाल. अम्रिता सिंग मात्र सरप्राईज पॅकेज आहे. तिची बट खटकते. पण अभिनय उत्तम.
अभिषेकही पाहुणा कलाकार आहे. आणि चक्क मराठीत बोललाय.
कलाकारांची नावे मराठी असतील, तर हिंदी सिनेमावाल्यांची कल्पनाशक्ती तोकडी पडते. कविराज पाटिल, असे नाव असते ? आणि दया या नावाशी र्‍हाईम होत असले तरी, माया हे मुलाचे नाव असते ?
D म्हणुन जो माणुस उभा केलाय, तो बराच D सारखा दिसतो.
Based on true rumors अशी घोषणा आहे, पण योगायोगापासुन सुटका नाही. शेवटी लढत वन टु वन, अशीच आहे.
नेहा धुपीया पण, अंगभर कपड्यात आहे.
कथानकाशी मेळ खात नसली तरी मला यातली गाणी आणि नाच खुप आवडले.
ए गणपत तर खासच आहे.
तो काळही छान उभा केलाय. अगदी गाड्यांच्या रजिस्ट्रेशन नंबर्स कडेही लक्ष दिलेय. पण नंबरप्लेटवरचे लेटरिंग मात्र काळाशी सुसंगत नाही. लोकेशन्स पण चांगली निवडली आहेत, आणि त्यातुनही तो काळ उभा राहतो.


Dineshvs
Sunday, July 15, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताच ब्रुस विलीस चा Die Hard 4 बघुन आलो. पहिल्या भागानंतर बराच काळ गेलाय. त्यामुळे त्याला एक जोडीदार दिलाय. ब्रुस भाऊ, कॉम्पुटर सॅव्ही असु शकत नाहीत याचे भान ठेवलेय. त्या किड चे कामही उत्तम आहे.
यातली साहसदृष्ये जबरदस्त आहेत. प्रोमोज मधे दाखवतात तो प्रसंग फ़िका पडेल अशी साहसदृष्ये आहेत. ( ती कशी चित्रीत होतात, हे माहित असले तरी पडद्यावर बघायला छान वाटतात. )
काहि दृष्ये, उदा सगळे लाईट्स जातात आणि फक्त रस्त्यावरच्या गाड्यांचे हेडलाईट्स चालु असतात ते दृष्य. किंवा सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने होणारे अपघात, छानच टिपलेत.
( उगाच मनात विचार आला, किती म्हणुन संगणकाच्या आहारी गेलोत आपण. सिग्नल यंत्रणेजवळ कसे, मामा हवेतच. लायसन काडा, च्यापान्याचं बगा, उद्या सायबांकडुन लायसन घेऊन जा, अश्या डायलॉग्जशिवाय काय मजा राव. )
चक्क हिंदी सिनेमासारखे, मुलीच्या लग्नाची काळजी वैगरे प्रकार आहेत.



Vaatsaru
Sunday, July 15, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, एक 'माया डोळस' अस एका गुंडाच नाव पूर्वी वाचल्याच आठवतय :-)
Edit Post:
Google rocks: this is the link http://en.wikipedia.org/wiki/Maya_Dolas

Pancha
Sunday, July 15, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए गणपत तर खासच आहे.
हो, मला पण आवडले ते गाणे फ़क्त त्यामधिल "तेरे मा कि बहेन कि ......" and shake your axx" वाक्ये सोडुन

इथे ऐका
ए गणपत

दिनेश तुम्ही डोर पहा, तुम्हाला आवडेल, मी link दिली आहे वर

Farend
Monday, July 16, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sas तुम्ही वेबसाईट मागितली म्हणून आणि मला ही माझ्या मित्राची साईट प्रमोट करायची आहे म्हणून इतरांनाही.

www.seegest.com या साईट वर तुम्ही आपल्याला बघायच्या असलेल्या आणि बघितलेल्या चित्रपटांची लिस्ट बनवू शकता. आपले Yahoo चे लॉगिन वापरा. एकदा तुमचे मित्रमंडळी यावर एन्ट्रीज टाकू लागले की तुम्हाला बर्‍याच गोष्टी करता येतील. आपल्याला आवडलेल्या चित्रपटांबद्दल इतरांचे काय मत आहे वगैरे वाचता येते

गेल्या काही वर्षात मी बघितलेल्या चित्रपटांची लिस्ट मला वाटलेल्या रेटिंग प्रमाणे येथे आहे, अशी तुम्हीही बनवू शकता.

Dineshvs
Monday, July 16, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो माया डोळस, होता खरा एक नामचीन गुंड.

पंचा, डोर ची सीडीच विकत घेतलीय मी, इतका आवडला होता तो मला. त्याबद्दल लिहिलेही होते.
अजुन नकाब बद्दल कुणी लिहिले नाही ?
Die Hard 4 मधे ब्रुस भाऊला, एका नजुकश्या तरुणीकडुन बराच मार खावा लागला आहे.
याच सिनेमात, तो किड, गाडी चालवण्याची विनंति स्वंयचलित यंत्रणेला करतो, त्या प्रसंगातले संवाद आणि त्याचा अभिनय एकदम झक्क आहे.
यातच चालती गाडी हेलिकॉप्टरवर फ़ेकुन, ते पाडण्याच्या भन्नाट स्टन्ट आहे. एवढे होवुनही ना गाडीचा चालक मरत ना हेलिकॉप्टरचा पायलट. पण वर लिहिल्याप्रमाणे, सगळेच पटते.
हा सिनेमा मी आयनॉक्स मधे बघितला, तरीही मध्यंतरापुर्वीची प्रिंट इतकी बेकार होती की, जुन्या काळातला सिनेमा बघतोय कि काय असे वाटत होते. मागे अज्जुका कडे शंका व्यक्त केली होती मी.


Ksha
Monday, July 16, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल IMAX मध्ये Harry Potter and the Order of the Phoenix बघितला.

डोकं अजून ठणठणतंय :-(


Amruta
Monday, July 16, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का बर? चांगला नाहीये का?

Farend
Monday, July 16, 2007 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ta Ra Rum Pum नुकताच पाहिला. २-३ महिन्यांपूर्वी या बीबीवर त्याबद्दल वाचले होते. सैफ़ ने एकदम energetic रोल केला आहे आणि जावेद जाफ़्री सुद्धा नंतर मस्त. पण बाकी विशेष आवडले नाही.

या नावाचा आणि या पिक्चरचा संबंध काय आहे मलाही कळले नाही, असेल काहीतरी बादरायण संबंध.

मुळात कथा जरा अचाट प्रकारची आहे. एव्हढी रेस नेहमी जिंकणारा नायक ती नोकरी गेली तर एकदम कफल्लक होतो. त्याचे घर व सर्व वस्तू परत नेल्या जातात. का? तर क्रेडिट वर घेतल्या होत्या. मग त्यासाठी त्याला रेसेस जिंकायची काय गरज होती, क्रेडिट वर तर त्याला त्या कधीही मिळाल्या असत्या! आणि मुलांच्या शाळेसाठी पै न पै चा हिशेब चाललेला असतो, मात्र घराला रंग वगैरे आनंदाने दिला जातो (याच वीकेंडला मी catch and release सुद्धा पाहिला, त्यामुळे शॉट्स ची गल्लत होऊ शकते, पण बहुधा दोन्हीकडे जो तो रंगकाम करत सुटलेला पाहिल्याचे आठवते:-) )

मी इतके हॉलीवूड थ्रिलर्स पाहिले पण मला आठवत नाही कशातच वेगात जायचे असताना रस्त्याच्या (म्हणजे त्या पिवळ्या दुहेरी रेघेच्या) डाव्या बाजूने गाडी चालवलेली दाखवताना, मात्र हिन्दी चित्रपटातील हीरो नुसते टॅक्सीने लौकर पोहोचायचे असेल तर लगेच सर्व नियम धुडकावून चालवतो. तसेच या चित्रपटांत कोणीही कार मधे सीट बेल्ट लावत नाहीत, अगदी त्यांचे लग्न लावायला निघालेला अमेरिकन priest सुद्धा. आणि मुळात लग्न तसे अमेरिकन स्टाईल ने कसे लागते?

नन्दिनी तू मागे KKHH आणि त्यातील त्या लहान मुलीच्या बद्दल लिहिले होतेस, येथे तर त्याहून जास्त आहे.. म्हणजे मुलगी सुरुवातीला आपल्या आई वडलांचे कसे जमले ते सांगताना "आईच्या मैत्रिणी वाईन कमी प्यायला सांगितली होती, पण बरे झाले आईने ऐकले नाही ते" वगैरे बालसुलभ संवाद आहेत. एकूणच पुढच्याच नव्हे तर आधीच्या पिढीचे ही काही खरे नाही या चित्रपटात, कारण राणीचा बाप ही तिला आपण लग्ना आधी ३-४ अफेअर्स केली आणि तु ही खुशाल कर हे सांगतो.

आणि गरिबी आल्यावर जेवण वगैरे न घेऊन "मुझे भूक नही है" स्टाईल संवाद शक्यतो innocent दिसायचा प्रयत्न करणारी लहान मुले डेझी इरानी च्या ही आधी पासून दाखवून झालेली आहेत.

त्यापेक्षा जातिवंत मठ्ठ नायक दाखवलेला " Talladega Nights " बरा आहे, कहाणी साधारण अशीच. त्या Will Ferrell चा तो मित्र त्याच्या बायकोला पटवून त्याचेच घर हडप करून जेव्हा त्याला काहीतरी अडचण येते तेव्हा याला रात्री फोन करतो आणि हा ही त्याला मदत करायचा प्रयत्न करतो, मधेच सर्व आठवून शिव्या घालतो आणि पुन्हा विसरून मदत करायचे बोलतो, तो शॉट धमाल आहे.


Ksha
Monday, July 16, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

IMAX मध्ये बघायला गेलो ती चूक झाली खरंतर. २ तास डोकं वर करून इकडे तिकडे काय घडतंत हे बघायचं म्हणजे अति होत होतं!

बंदिनी बघितला काल. नूतनचे चित्रपट बघणे म्हणजे एक सुख असतं. काय अचाट अभिनेत्री होती ती! बंदिनीच्या एकेका फ्रेमवर तिचा ठसा उमटलांय!
ती जेव्हा अशोक कुमारच्या बायकोचा खून करते त्या आधीचा तिचा भावनावेग तर अशक्य दाखवलाय!

ta ra rum pum नाव ऐकूनच मला बघावासा वाटला नाही. आणि एकदा नाही म्हणजे नाहीच बघितला जात तो चित्रपट.


Pancha
Monday, July 16, 2007 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend, तु ta ra rum pum बद्दल एवढा विचार करु शकतोस? मानले तुला. purshit of happines मधल्या काही idea चोरल्या आहेत आणि खुप कारण नसतांना खेचला आहे. मुलांसाठी ठीक आहे.
गाणे मात्र श्रवणिय आहेत, esp the title song
हो अगर कोइ गम तो, बिल्कुल ना तुम घबराना
ता रा रा रा रम तारारामपम.......


Chyayla
Tuesday, July 17, 2007 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागेश कुकुन्नूरचा डोर पाहिला खरच साधा सरळ मस्त चित्रपट डोक्याला कोणताच ताप नाही. नागेशचा पहीला सिनेमा श्रेयस तळपदेलाच घेउन काढला होता "ईकबाल" तो पण पहायला मिळाल्यास जरुर पहा. तेंव्हापासुनच नागेश आणी श्रेयस माझे आवडते झालेत.

Deepanjali
Tuesday, July 17, 2007 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तारा रम पम बहुदा गाडीच्या हॉर्न चा आवाज असावा . :-)

Pancha
Tuesday, July 17, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tara rumpum are the noodles sold in nepal. tara rumpum slang developed when one drives a vehicle on winding roads for fun (like the noodles, also called chau chau)

Mandard
Tuesday, July 17, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, नागेशचा १ला सिनेमा Hydrabad Blues . त्याला बरीच वर्षे झाली. त्यानंतर Rockford, hydrabad blues2, bollywood calling, tin divare वगैरे नंतर इक्बाल, डोर आले.

Sayuri
Tuesday, July 17, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm hyderabad blues..mast cinema hota.
online kuthe available ahe ka?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators