Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 20, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through June 20, 2007 « Previous Next »

Mbhure
Monday, June 18, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनी कमः ठीक आहे काही संवाद छान आहेत्; खास करुन तिरकस बोलणे. बर्‍याच चित्रपटानंतर अमिताभचे काम बरे वाटत्ले. तब्बू ठीक. लहान मुलगी जरा आगावू बोलते. तिचे नाव मला काही फर खटकले नाही कारण अमिताभने तिला ठेवलेले नाव असते आणि तोही कॅजुअली हाक मारतो.

भेजा फ्रायः मुंबईत चालला म्हणुन बघितला. खास काहीच वाटले नाही. सिनेमा सरकतच नाही.



Sas
Monday, June 18, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The Train मधे Miss India 2006 कोणती, इमरानचि बायको की ती दुसरी बाई???? :-)

Prajaktad
Monday, June 18, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक म्हातारे होतात तेव्हा त्यांना शेंडेफ़ळ लागते,>>>>????
jaadhavd तुम्हाला ' म्हातारचळ ' म्हणायचेय का??

Sashal
Monday, June 18, 2007 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Breach बघितला .. Not quite up to the mark! असं वाटलं .. पण तो Ryan Phillipe खुप आवडला .. त्याला बघून त्या 'अब तक छप्पन् मधल्या जतीन(?) (नाना पाटेकर चा subordinate ) ची सारखी आठवण होत होती ..

Disha013
Monday, June 18, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेट्रो बघितला. चांगला वाटला. अनुराग बासुचे movies तसे बोअर करत नाहीत. सगळी पात्र एकमेकात छान गुंफ़वलीत. त्या सलामेश्क़ सारखी खिचडी नाही केलेली. सगळ्यांची कामेही छान.
एक चालीस की लास्ट लोकल अगदीच डब्बा वाटला. एकतर त्यातली भाषा अगदी अंगावर येते. बिना शिवीचा एकही डायलॉग नाही.

यंदा कर्तव्य आहे बघितला. तशी त्याला स्टोरी काही नाही. काही घडतच नाही. पण 'आभास हा' गाणे मस्त आहे.
ब-याच दिवसांनी छान गाणे ऐकायला मिळाले.
एक मिन्लिश गाणे पण आहे. पण एकुन movie कंटाळवाना वाटला.


Manuswini
Monday, June 18, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The train:
तद्दन भिकार का टुकार(शब्दांची कमीच आहे इथे सांगायला) असा चित्रपट आहे.

त्यात चुंबनश्री इमरान हाश्मी असेल तर picture काय आहे हे ओळखायला त्रास नाही.
नको तेव्हढे चुंबन आणी नको तितका धसमुसळेपणा उत्तान कपडे घालेल्या नायिंकेबरोबर हेच आहे चित्रपटात.
सायली भगतला( Miss India 2006 ) आताच इतके देहदर्शन का दाखवावे लागले देवास ठावुक.

इमरान्ची बायको आई म्हणुन जराही शोभत नाही. parents meet ला तोकड्यात तोकडा skrt . diabetis आहे मुलीला म्हणुन जराही भाव दिसत नाहीत.

गोष्ट्: इम्रान हश्मी नी नविन नायिका ह्या couple ला मुलगी असते जीला jvenile diabetis असतो. उगाच ह्याचे कारण(?) कंटळलेला इमरान train मध्ये एका मुलीबरोबर फसतो, trap होतो वगैरे वगैरे. ती train मुलगी(सायली भगत) त्याला trap करते bla.. bla ..blaa .
काय नी काय....

शुभमंगल सावधान : चांगला आहे पण थोडीफार अतीशोयोक्ती आहेच.
उगाच मुलीचा बाप म्हणुन पड खाणारा बाप नी पड घेणारी मुलीचे दिवस गेले आता.....




Jadhavad
Tuesday, June 19, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर प्राजक्ता, अमिताभ ला म्हातारचाळेचे च डोहाळे लागलेत. निशब्द नंतरच्या एका interview मध्ये एका anchor ने त्याला गुगली टाकली होती, की, तुम्ही ह्या वयात खरच १७ वर्षाच्या मुली बरोबर हे असल कराल का? तर अमिताभ स्व:त म्हणतो, तुमच डोक फ़िरलय का? आता हा स्व्:त असली डोकेफ़िरु acting करतो आणि दुसर्‍याना म्हणतो तुमच डोक फ़िरलय क म्हणुन.

मनुस्विनी, तुमच बरोबर आहे.
द ट्रेन बद्दल म्हणाल तर, त्या फ़्रावशी मधे शिकलेल्या सायली भगत ला बघुन ती नाशिक ची आहे हे सांगायला लाज वाटते. अरे debut scene कसा असावा, बॉबी मधल्या डिंपल सारखा, गालाला पीठ लागले असतानाचा फ़्रेम. नाहीतर ह्यांचा debut scene. direct बाथरुम मध्ये हाफ़ न्युड सीन, बाथ घेतांना नाहीतर चुंबनश्री बरोबर त्यांच आवडत कार्य करताना. हे असले बाथ घेणार्‍या आणि किस देणार्‍या पाणी कम heroins ममता कुलकर्णी पासुन आल्या आणि राखी सावंत पर्यंत गेल्या, कुणाच्याच लक्षात राहील्या नाही. तशीच ही Miss INdia 2006 पण लक्षात राहणार नाही.


Rani_2007
Tuesday, June 19, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनीने सांगितलेल्या 'The Train' च्या story वरून आसे वाटले कि हा 'Derailed' (2005, Clive Owen, Jennifer Aniston) चा कॉपी असेल.

'Derailed' मध्येसुध्दा Clive Owen च्या मुलीला diabetis असतो. Jennifer Aniston त्याला ट्रेनमध्ये भेटते आणि तिच्या (व तिच्या boy friend च्या) जाळ्यात ओढते. त्यानंतर Clive त्याचा बदला कसा घेतो यात निम्मा वेळ घालावला आहे.


Deepanjali
Tuesday, June 19, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे debut scene कसा असावा, बॉबी मधल्या डिंपल सारखा,
<<<अता डिंपल सुंदर आहे अभिनय चांगला करते यात शंकाच नाही .. पण तो Debut scene असेलही so called innocent पण बाकी अख्खा बॉबी म्हणलात तर सायली भगत च्या एक पाउल पुढेच होती कि ती , ते पण almost 32 वर्षां पूर्वी !

Kedarjoshi
Tuesday, June 19, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यात चुंबनश्री इमरान हाश्मी असेल तर picture काय आहे हे ओळखायला त्रास नाही>>>>>

अग पण त्याचा पिक्चरला तु गेलीसच कशाला?
त्याचा पिक्चर मध्ये फक्त ' तेच ' असत, स्टोरी नसते.

फार दिवसांनतंर एक सुंदर चित्रपट पाहीला. चिल्ड्रेन ऑफ हेवन. ईराणी आहे. तो डब केला नाही पण त्याचे सबटायटल्स आहेत. तो बघीतल्यावरच कळेल की दिग्दर्शन, कथा वैगरे कशा असाव्यात. हा खरतर जुना चित्रपट पण गेल्या आठवड्यात मला बघायचे भाग्य लाभले.

Asami
Tuesday, June 19, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार Majid Majidi चे movies एकाहून एक सरस असतात. मिळतील तेव्हढे बघ.

Tukaram
Tuesday, June 19, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमसेक कसा आहे? good?

Manuswini
Tuesday, June 19, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,

मैत्रिणीच्या घरी गेल्यावर तीने लावला होता म्हणुन पाहीला जेम्तेम अर्ध्या तासात forward करुन.


Pancha
Tuesday, June 19, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमसेक मला चांगला वाटला. अमेरिकेतील देसी लाइफ़ चांगले दाखविले आहे. काही गोष्टी अवास्तव दाखविल्या आहेत.

संजय नार्वेकर चा चश्मे बहादुर बघितला, धमाल आहे, घरी बघायला हरकत नाही. मेक अप आणि कपड्यामधे घोळ केला आहे, तर्क न लावता टाइम पास म्हणुन एकदा बघायला हरकत नाही.


Kedarjoshi
Tuesday, June 19, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी हो रे मी सगळेच शोधनार आहे आता. पिक्चर बघीतल्यावर बराच बेळ मला सुचलच नाही काही. अनेकदा काही शॉटस रिवाईंड करुन बघीतले.
शिवाय कथा ही त्यांचींच आहे.


Pancha
Wednesday, June 20, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहिला. . सुंदर आहे जरुर बघा. यु ट्युब वर आहे, इथे बघा
चिल्ड्रेन ऑफ हेवन

Psg
Wednesday, June 20, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचा, या लिंकवर फ़क्त पहिलाच भाग अहे- पहिली ४२ मिनिटं. नंतरचा भाग मला सर्च करूनही सापडला नाही! कुठे असेल तर इथेच लिंक द्याल का प्लीज? दोन्ही मुलं फ़ारच गोड आहेत. पुढे काय होते याची उत्सुकता वाटत आहे.

Aditih
Wednesday, June 20, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच खुप छान वाट्तोय Children of Heaven पण मी सुध्दा पूनम सारखा पहिलाच भाग पाहु शकले. पुढचा भाग कधी बघतेय असं झालंय....

Pancha
Wednesday, June 20, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बघा दुसरा भाग
Children of Heaven - 2nd Part

Savyasachi
Thursday, June 21, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

children of heaven attach pahila. awesome movie.. thanks for the link guys..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators