Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 25, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through May 25, 2007 « Previous Next »

Deepanjali
Tuesday, May 22, 2007 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारांशः हा खरा कौटुम्बिक चित्रपट. कधीही पाहिला तरी, माहेरच्या साडीपेक्षा दस पट रडवतो.
<<<म्हणजे मूळात माहेरची साडी पण रडवतो कि काय ?? :-)

Farend
Tuesday, May 22, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Blood Diamond चांगला आहे. आफ्रिकेत हिरे, तेथील सरकारे व बंडखोर गॅंग्स यातील मारामार्‍या यामुळे तेथील tribal जमातीतील लोकांचे कसे शोषण होते याबद्दल. पण त्यातीलच एकाचा मुलगा एक टोळी अतिरेकी बनवायला घेऊन जाते आणि त्यानेच एक आधी सापडलेला हिरा तेथे जंगलात लपवलेला असतो. हे दोन्ही शोधायला Leonardo DiCaprio त्याच्याबरोबर जातो वगैरे वगैरे. यातील संवादांत अफ्रिकेतील लोकांच्या हालावर चांगल्या कॉमेंट्स आहेत. आणि असे सामजिक प्रश्न दाखवणार्‍या इतर चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा आहे.

Saco
Wednesday, May 23, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल In Pursuit of Happiness (2005) बघितला. अतिशय सुंदर चित्रपट आहे.

Bee
Wednesday, May 23, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुरे, जमन??? मी कधीच कसे ऐकले नाही ह्या चित्रपटाबद्दल. काय कथा आहे? पात्र कोणकोण आहेत?

Nandini2911
Wednesday, May 23, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, जनमे रे.. टायपो झालाय समजून घे.

Mbhure
Wednesday, May 23, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ Good Point. उगीच परत वाद नको.... जाऊ दे.

आभार नंदिनी.

१९७१ः अज्जुकाचे पटले. हुश्श, मनोज वाजपेयी न आवडारे आहेत तर येथे. तो अंडरप्लेची "Overacting" फार करतो. त्या गोटुने आणि मलिकने छन काम केले आहे. चित्रपटानंतर Making of बघितले. त्यात एका निर्माता सागरने सांगितले की सुरुवातीला दिग्दर्शक सागरशी थोडे मतभेद झाले वगैरे. मला वाटत ते मतभेद बजेटबद्दल असावेत. स्वस्तातले नट घेतले तर बाकी गोष्टीवर पैसे खर्च करायला हवे होते. तो कॅम्प एव्हढ तकलादू वाटतो. दारु गाळण्याची आयडिया ग्रेट एस्केपमधुन घेतली आहे. चित्रपट जरा तरी वास्तवातला दाखवला असता तरी बघयाला मजा आली असती.पाच कैद्यांना शोधायला पाकिस्तानची अख्खी फौज पाठवली आहे. आणि अज्जुका म्हणते तसे, तो मकिल सोडुन, सर्व बुद्धू!

नमस्ते लंडनः ठीक आहे. कॅटरीनाने तिच्या नॅचरल उच्चारात काम केले असल्याने ते बरे वाटते. तिच्या आईचे काम केलेल्या अभिनेत्रीने चांगले काम केले आहे. उपेन पटेलही बरे काम करतो. एकदा बघायला ओ.के.


Disha013
Wednesday, May 23, 2007 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते लंडन मधे उपेन पटेल आहे? मला कसा दिसला नाही?की मी पिक्चर विसरलेय?

Farend
Wednesday, May 23, 2007 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा तो नाही का मुस्लिम फ़ॅमिलीतला? अक्षय त्याला एक जबरी उपदेश डोस देतो मशिदीत आणि मग तो धर्मांतर करायचे नाकारतो?

Deepanjali
Wednesday, May 23, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या , चक्क उपेन पटेल नाही लक्षात राहिला !
तोच पाकिस्तानी family मधला मित्र दाखवलाय कत्रिनाचा तो .


Disha013
Wednesday, May 23, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो! एवढं महत्त्वाचं चरित्र कसं विसरले मी!तोच तर कळ लावतो.
BTW ,तिच्या आईचे काम केलेली ती अभिनेत्री कुठल्याशा serial मधे यायची असं अन्धुक अंधुक आठवतयं.


Sashal
Thursday, May 24, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कट्रिना छानच दिसते त्या नमस्ते लंडन मध्ये .. मला तर वाटायला लागल, की हल्ली ऍश सुध्दा तेव्हढी fresh दिसत नाहि .. वय झालं बहुतेक तीचं आता ..

The Freedom Writers: खुप छान आहे, Hillary Swank ने खुप चांगलं काम केलं आहे ..


Maitreyee
Thursday, May 24, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गं सशल, फ़ार छन दिसते ती, कॉंप्लेक्षन आणि गोरा रंग अगदी खास आहे तिचा. माझा नवरा तर अगदी हरखून च गेला होता

Robeenhood
Thursday, May 24, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गं सशल, फ़ार छन दिसते ती, कॉंप्लेक्षन आणि गोरा रंग अगदी खास आहे तिचा.>>>>>अरेरे, किती आदिम दृष्टीकोन चित्रपटाकडे पाहण्याचा! हे यांचे चित्रपटाचे रसग्रहण.! एकदा प्रसिद्ध चित्रकाराचे प्रदर्शन भरले होते त्यात दोन स्त्रिया एक चित्र पहात उभ्या असतात तो चित्रकार त्यांच्या मागे उभा राहून फीडब्याक घेत असतो. त्या चित्रात भाज्यांची काही चित्रे असतात ते पाहून एक बाई अभावितपणे उद्गारते' बरं झालं बाई, जाताना मंडईतून जाताना भाजी घ्यायची आठवण झाली.!! याला म्हणतात कोणाला कशाचं अन बोडकीला केसाचं!! तसंच हे. अरे त्याची कथा काय, दिग्दर्शन कसे, क्यामेर्‍याचे ऍन्गल्स, संगीत, नेपथ्य, काश्च्युम डिझाईनिन्ग यावर रसग्रहण करा.. म्हणे कॉम्प्लेक्शन! छ्या छ्या. अगदी च गावंढळ या बाया बुवा!!
मायबोलीवरील रसग्रहणाच्या स्वयंघोषित विदुषीनी वाचले तर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल की राहील? आँ?

(बाय द वे ही ऍश कोन? )


Robeenhood
Thursday, May 24, 2007 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॅटरीनाने तिच्या नॅचरल उच्चारात काम केले असल्याने ते बरे वाटते. तिच्या आईचे काम केलेल्या अभिनेत्रीने चांगले काम केले आहे.>>>कत्रिना ची आई आहे नीना वाडिया!.. .. ..

Sashal
Thursday, May 24, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला ऍश कोण ते माहित नाही? कमाल करता! Beauty या context मध्ये ऍश नाव येऊन सुध्दा, ती ऍश कोण हे न कळणारा बाळबोध भारतीय प्राणी आजच बघीतला ..


Slarti
Friday, May 25, 2007 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हूड, तुम्ही एकाच वेळी तीन जणींशी पंगा घेत आहात हे पाहून तुमच्या हिंमतीला दाद द्यावीशी वाटते.

Kedarjoshi
Friday, May 25, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pirates of the Caribbean: At World's End
आत्ताच बघुन आलो. अमिताभ चे पिक्चर पहील्या दिवशी पाहान्यात जी मजा होती तीच हा पिक्चर पाहताना अनुभवली. मी ही या चित्रपटाच्या प्रदर्शानाची वाट बघत होतो.

पहील्या दोन्ही पेक्षा जास्त मसाला व धमाल या चित्रपटात आहे. जॉनी डेप चे विनोद, ऑरलन्डो चा निडरपणा व कायरा चा मस्त अभिनय व अदा, जबरस्त visual effects , रोमहर्षक फायटिंग्स नी भरपुर असा हा मस्ट सी पिक्चर.

मी स्टोरी लिहीत बसत नाही कारण मग त्यातली मजा जाईल.

पण एक गोष्ट खटकली. जेव्हा पायरेटस च्या ९ मुख्य सरदारांची बैठक बोलावीली जाते त्यात एक भारतीय दाखवला आहे व त्याचे नाव संभुजी दाखविले. त्याचे नाव हा फक्त एक योगायोग नाही कारण ते सर्व east India company चे जहाज बुडवायला निघालेले असतात. छत्रपती संभाजी यांना जर चुकुन समुद्री चाचे असे दर दाखविले नाही ना? कारण योगयोगाने पण नाव कसे जुळेल?


Tanyabedekar
Friday, May 25, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनने झक्कींशी पंगा घेवुन घेवुन स्वत:ला तयार केले आहे. आता ते तीन काय कितीही जणींशी पंगा घेतील.

Giriraj
Friday, May 25, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक भा प्र. कतरिना कैफ़ ही महम्मद कैफ़ ची बहीण आहे का?

दुसरा भा प्र. सलमान आणि कतरिना यांचे लग्न झालेय की व्हायचे आहे? सलमानच्या घरी ती एक लहान मूल कडेवर घेऊन दाखवली होती त्याच्या परिवारासह!


Ajjuka
Friday, May 25, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेट्रो पाह्यला.. जे काय भयानक सिनेमे येतायत सध्या त्यांच्याशी तुलना करता बराच बरा म्हणायला हरकत नाही.
नावावरूनच मुंबईसारख्या शहरातल्या आयुष्याबद्दल असणार हे उघड आहे. सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट जी आहे झालेली ती म्हणजे अश्या शहरातल्या fragmented आयुष्याचा अनुभव किंवा fragmented असण्याचा अनुभव मिळतो. तो अनुभव इतका खरा आणि strong आहे की अनेक flaws असले तरी चिडचिड होत नाही.
अनेक कथानके एकत्र गुंफत चित्रपट पुढे सरकतो. पण त्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध खूप सहज आहे. याला अपवाद केके मेनन चे त्याच्या बायकोच्या बहिणीच्या रूममेटशीच असलेले अफेअर.
केके हा चांगला अभिनेता आहे हे नव्याने सांगायची गरज नाही पण त्याच्या भूमिकेत त्याच्यातल्या अभिनेत्याला आव्हान मिळेल असे काही नाही. पण corporate मधे जसं त्याचं ठार माकड केलं होतं तसं इथे नाही आणि ते श्रेय दिग्दर्शकाला.
शिल्पा शेट्टी चक्क बरा अभिनय करू शकते. केके बरोबरचे २ आणि त्या चमकील्या बरोबरचा १ हे सीन्स मस्त केलेत तिने. अर्थात कोंकणा सेन शर्मा सारखी सहजता नाही पण तरी..
कोंकणा सेन्-शर्मा आणि इरफान खान दोघेही फारच मस्त आणि सहज. इरफान खान विशेषतः. naturalistic acting चा वस्तुपाठ आहे त्याचा performance म्हणजे. शेवटी लग्नाच्या वरातीतून 'घोडे घोडे चल चल!' म्हणत पळ काढणं मस्तच.
शर्मन जोशी हे बाळ पण बरं काम करू शकतं की. opportunist आणि आपल्या स्वप्नासाठी काहीही करायची तयारी असलेला तरूण त्याने मस्त उभा केलाय. त्याचे आधीचे 'महान विनोदी' चित्रपट पाह्यले (मी पाह्यलेत volvo ची कृपा.. दुसरं काय..) तर इथे त्याचा अभिनय हा एक सुखद धक्का आहे. पण त्याचा track मधे मात्र काही shot to shot गोष्टी एका हॉलिवूड चित्रपटातून उचलल्या आहेत. मोकळ्या जागेतील पडके हॉटेल, ते बांधायचे त्याचे स्वप्न, त्याचे painter's elevation जे काचेवर केलेले आहे आणि ति काच दोन खांबावर व्यवस्थित बसवून तिथे तुम्हाला exact कल्पना येऊ शकते की हा परीसर कसा दिसेल याची. हे सगळं त्याने आपल्या dream girl ला दाखवणं आणि तीचे त्याच्या बॉसबरोबरच लफडं असणं... etc.. आठवतोय का कुणाला तो चित्रपट? मी बहुतेक HBO किंवा star movies वर पाह्यला होता.
कंगना राणावत चा performance म्हणजे दिग्दर्शकाने आपले कसब कितीही पणाला लावले तरी मी माती खाणारच या सदरातला होता. आणि तो चमकीला अहुजा तर हे राम... तो तिच्यापेक्षाही वाईट.
नफिसा अलीच काम पण चांगलंय. पण तिची गोष्टच एका पॉएंट नंतर गरजेची नव्हती. असं वाटतं. आणि धर्मेंद्र बद्दल न बोललेलंच बरं. पापाजी नही सुधरेंगे कभी इतकंच. माझी मात्र तो बोलू लागला ह ह पु वा होत होती.
आणि ते प्रत्येक गाण्यात दिसणारे संगीतकार कम गायक.. सगळ्यांना काळे कपडे घालून भैसटल्यासारखं झुलत रहायची सवय होती.. (गेल्या जन्मी हत्ती असावेत). त्यातला एक तर मोहन जोशींना सुट्टा देऊन उभं केलंय असा दिसत होता. ते फारच विनोदी होतं. त्यामुळे गाणी लक्षात रहात नाहीत.
असो पण एवढ्या सगळ्या नंतरही चित्रपट मनात रेंगाळतो...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators