Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through May 22, 2007 « Previous Next »

Monakshi
Thursday, May 17, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तू हिंदी पिक्चर बघताना एवढा विचार करतेस म्हणजे ख़रंच कठिण आहे.

अगं, कुठचाही हिंदी पिक्चर हा डोकं बाजूला ठेवूनच बघायचा असतो. फार कमी पिक्चर असे असतात की जे बघितल्याने पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळते. मी तर थिएटर मध्ये जाऊन बघतंच नाही. हो, उगाच पैसे फुकट गेल्याचे दु:ख़ नको.

तुम्ही कोणी risk बघितला आहे का? रणदीप हुडा म्हणून एक नवीन हिरो आहे. छान आहे पिक्चर. मुंबईच्या underworld आणि police encounter वर based आहे तो. अर्थात जर का भरपूर हाणामारी आणि रक्तपात सहन करु शकत असाल तरच बघण्यात अर्थ आहे.


Sanghamitra
Thursday, May 17, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि अद्नान 'क' नंतर ब्रेक किंवा उचकी लागल्यासारखे सलामे इश्क इश्क इश्क म्हणतो. क च्या पुढे एखादा श्वास किंवा अकार घेतला तर कॅलरीज खर्च (आणि कष्ट) होतील म्हणून असावे.

Nandini2911
Thursday, May 17, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा... मला असे टुकार पिक्चर बघायला जाम आवडते. हे लोकं इतके कोट्यवधी रुपये खर्च करून चित्रपट बनवतात. जरा लॉजिक वापरले तर काय बिघडेल??
आणि मी हा पिक्चर थेटरात पाहिला नाही. घरी व्हीसीडी भाड्याने आणून पाहिला. त्यामुळे एकाच दिवसात तीनदा पाहिलाय. काय ही सहनशक्ती)
एक धमाल आठवण पिक्चर आठवत नाही. टीव्हीवर पाहिला होता. गोविन्दा आणि ममता कुलकर्णी. :-) कॉलेजचा बोर्ड सीटी कॉलेज ऑफ़ आर्ट्स. ममताच्या हातात एक छोटीशी वही. आणि गोविंदा तिला विचारतो "मुझे तुम्हारे इंजिनीअरिंग के नोट्स चाहिये."


Nkashi
Thursday, May 17, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्य हो नंदिनी !!!!

Dineshvs
Thursday, May 17, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाक्शी, मी बघितलाय रिस्क. विनोद खन्ना बर्‍याच दिवसानी दिसला. त्यातला पहिला भाग बराचसा वास्तव आहे, पण शेवट मात्र वास्तवात कधीच होणार नाही असा.

मी परदेशात असताना, व्रत घेतल्यासारखे दर वीकेंडला थिएटरमधे जाऊन सिनेमे बघत असे. त्या दिवसात जो असेल तो सिनेमा बघावा लागत असे.
मिथुन आणि अश्विनी भावेचा, चित्ता वैगरे नावाचे सिनेमे बघितले आहेत मी.
आता ते व्रत सुटले म्हणायचे.


Chinya1985
Thursday, May 17, 2007 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे फ़ारेंड मी वाचली तुझी पोस्ट.भारी लिहिल आहे तू.मला तो क्लॉझ वाला मुलगापण आवडला(जो फ़िज़िकल कॉम्पटिबिलिटी बद्दल बोलतो)शिवाय गाणी पण आवडली.जाहिराती वगैरे ठिक आहे यार.ताल सारखी मुर्ख जाहिरात तर नाही ना दाखवली मग चालतय.

बी तू तर कुठले कुठले आर्ट फ़िल्म्स पाहत आहेस. चांगल आहे.

नन्दीनीची तर कमालच आहे.


Farend
Friday, May 18, 2007 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, या बीबीच्या लेव्हलला आजच एक "चित्रपट्: अचाट आणि अतर्क्य" असा नवीन बीबी उघडला आहे, म्हणजे लोक जसे त्या classic चित्रपटांच्या बीबीवर प्रत्येक तशा चित्रपटांसाठी एक thread चालू करतात तसे अशा अचाट चित्रपटांबद्दल ही आपल्याला करता येईल आणि त्यावरची परीक्षणे वाहून जाणार नाहीत.

माझे एक पोस्ट ("जननी") तिकडे आहे, shraddhak आणि nandini2911 तुम्ही तुमची नगिना आणि KKHH बद्दलची ही तिकडे टाकाल का? आणि आणखी अशा चित्रपटांबद्दल जर रिव्ह्यू असतील तर तिकडेच लिहूयात.


Farend
Friday, May 18, 2007 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A night at the museum एकदा बघण्यासारखा आहे. ज्यांना Jumanji आवडला असेल त्यांना हा ही आवडेल. बेन स्टिलर त्या संग्रहालयात रात्रीच्या वॉचमन ची नोकरी स्वीकारतो आणि रात्री तेथील सगळे जिवंत होऊन जी धमाल करतात त्यावर आहे. रॉबिन विल्यम्न्स आणि ओवेन विल्सन यांनी ही छोट्या रोल मधे छान कामे केली आहेत.

मी मागच्या वर्षी पुण्यात याची हिंदीकरण केलेली जाहिरात "फस गया सिकंदर म्युजियम के अंदर" अशी वाचली होती :-)


Tanyabedekar
Friday, May 18, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी तो ममता कुलकर्णी आणि गोविंदाचा पिक्चर बहुतेक किस्मत आहे. नक्की आठवत नाही पण मोस्टली किस्मतच. ईंजिनीअरींगला असताना कॉलेजच्या मागे एक व्हिडिओ थिएटर होते. तिथे असले प्रचंड सिनेमे बघितले आहेत कारण दुपारच्या शोचे तिकिट फक्त ५ रु. असायचे आणि आम्ही रेग्युलर कस्टंबर (कस्टमर म्हणणे त्या थिएटरवाल्याचा अपमान होइल) म्हणुन आम्हाला तिकिट फक्त ३ रु.

Nandini2911
Friday, May 18, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण तुमच्याच केटेगरीतली. अकरावापासून सिनमा बघायचं जे वेड लागलय ते अजून उतरलं नाही.
बाय द वे, स्पायडर मॅन भोजपुरीत येतोय.
त्याची "हम हैं पीटर पार्कर" आणि एम जे की जान खतरवा मे है. वगैरे संवादाची झलक ऐकली. मुंबईत कुठे लागलाय? व्हीसीडीची चौकशी करतच आहे मी. मिलाली की सांगेन्च. आणि पाहिल्यावर लिहीनच.


Yogita_dear
Friday, May 18, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येतोय काय नंदिनी??आलाच.. रविकिशनचा आवाज आहे..त्यातला एक dialogue वाचला त्या दिवशी.. हम है makkadman ..उधर आइब और तोहार टेटवा दबाई देब....कसा आहे????

Disha013
Friday, May 18, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याची "हम हैं पीटर पार्कर" आणि एम जे की जान खतरवा मे है.



Supermom
Friday, May 18, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हम है makkadman ......'

आई ग, ह. ह. पु. वा.


Tanyabedekar
Saturday, May 19, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि घ्या माकडमॅनची लिंक
http://www.makkadman.com/

Rajya
Saturday, May 19, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंतनु,
मस्तच आहे मक्क्कड्मॅन
ह. ह. पु. वा.


Nandini2911
Saturday, May 19, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आहे मक्कडमॅन. स्पेशली ते k3g चं गाणं मस्त वापरलय,

Swapnil_khole
Monday, May 21, 2007 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला परवा कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी आमिरचा मंगल पांडे पाहिला.
आमिरचे कित्येक चित्रपट गंडलेले आहेत. मन, बाजी. आणि अगदी कळस म्हणजे मंगल पांडे. मंगल पांडे आमिरने केला तरी कसा हेच मला कळत नाही. दिग्दर्शकाने इतिहास तर स्वतःला पाहिजे तसा वाकवला होताच, तेवढे स्वातंत्र्य मान्य जरी केले तरी बाकी चित्रपटात काहीही खुर्चीला खिळुन ठेवण्यासारखे नव्हते. ना दिग्दर्शन, आमिर वगळता कोणाचाही चांगल अभिनय नाही, स्क्रिनप्लेची बोंब, सुमार दर्जाचे एडिटींग. आमिरने त्या चित्रपटावर ४ वर्षे मेहनत घेतली होती म्हणे.


Farend
Monday, May 21, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंग्रजीतून डायरेक्ट भोजपुरी? आजकाल हिंदी पेक्षा तेच जास्त चालतात वाटतं. मागच्या वर्षी पुण्यातही एक 'बम्बई की लैला छपरा के छैला' अशा काहीतरी नावाचा चित्रपट लागला होता. बघायला हवा होता म्हणजे येथे लिहिता आले असते :-)

Tanyabedekar
Monday, May 21, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल २ सिनेमे बॅक टू बॅक पाहिले. हायद्राबाद एव्हडे गरम होते कि दुपारी सिनेमा हॉल मध्ये बसण्यावाचुन पर्याय नव्हता. त्यात शनिवार आक्खी रात्र कोएट्झीचे स्लो मॅन हे पुस्तक वाचुन काढलेले. (ज्यानी कुणी कोएट्झी चे Disgrace, life and times of michael k वगैरे वाचली आहेत त्यांना अंदाजा येइल कि अशी जबरी pessimistic पुस्तके वाचली की काय होते)

तर सिनेमा क्र. १:
एक चालीस की आखरी लोकल.. पल्प फिक्शन, रिझर्वॉयर डॉग्ज हे टोरंटिनोच्या २ जबरी सिनेमे.. विशेषत: पल्प फिक्शन.. ह्या दोन पिक्चरमधील काही शॉट्स जसेच्या तसे कॉपी करुन एक सुमार पिक्चर बनवला आहे. संवाद अतिशय सुमार. बाकी कथाच एव्हडी लूज आहे की कुणाचा अभिनय वगैरे लक्षातच येत नाही. नेहा धुपिया ही वेश्येच्या रोल साठी बहुतेक बॉलीवूड मध्ये नं. १ झाली आहे.
मुळात ह्या सिनेमाला अतिशय उग्र, शिवराळ संवाद आणि टोकाचे हिंसक सादरीकरण आवश्यक होते. ते सगळे अत्यंत माइल्ड करुन सिनेमाचा पार चोथा केला आहे.
टीप्: पल्प फिक्शन वरुन काही भाग चोरल्यामुळे माझ्या तलपायाची आग मस्तकात गेली आहे आणि त्यामुळे वरील रिव्ह्यू हा बायस्ड असु शकतो याची वाचकांनी नोंद घ्यावी.

सिनेमा क्र. २:

Last king of scotland

too good a movie.. a must watch.. especially if you have read about africa, uganda and the era of Idi Ameen.. Forest Whitaker has given a tremendous performance.. hats off to him.. he plays Amin to the near perfection.. the film is more of a documentary.. fiction is pretty well mixed with facts.. but all in all I would say this is a must watch for acting and performance..
tip: In Dark Star Safari, Theroux narrates an incidence with Nadine Gordimer.. she told Theroux that she remembers a shy fellow student from her class.. very studious and hardly mixing with other students.. but for sure not a psycho or violent.. that student was Idi Amin..

Mbhure
Tuesday, May 22, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या आठवड्यात कुठचेही सिनेमा देसीकडुन आणलेले नसल्याने, TV लागले चित्रपट X+1 वेला बघितले. तरीही छान वाटले.

१. COntact: फ़ॉस्टरबाईंचा हा चित्रपट मला खुप आवडतो. नुसतेच Sci-Fi सिनेमा मला फार आवडत नाहित आणि Matrix सारखे कळतही नाहित. पण Contact हा ह्यापेक्षा खुप वेगळा आहे. ज्युडी फॉस्टर ही एक जिद्दी आणि धेय्यवादी संशोधक असते. अवकाशात दुसर्‍या ग्रहमालेत " जीवन " शोधन्यात तिला यश मिळते. पण (देश कुठचाही असो) राजकारणी, इश्वरवादी आणि इतर तिच्या मुळ हेतुच्या कश्या चिंधड्या उडवतात ह्याचे छान चित्रण आहे. Carl Segan च्या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे. एकदा जरुर बघावा.

२. Private Parts: हा वरील चित्रपटाच्या exactly विरुद्ध पठडीचा चित्रपट आहे. ज्यांना हॉवर्ड स्टर्न, New Yokr's Highest Rated DJ , माहित असेल(किंवा नसेल तरीही) त्यांनी हा चित्रपट जरुर बघावा. एक वेगळ्याच स्टाईलचा हा चित्रपट आहे. फक्त एक सुचनाः जर आजच्या हिंदी सिनेमात असणार्‍या राखी सावंतसारख्या बाया बघणे तुम्हाला " शांतम् पापम् " वाटत असेल तर ह्या चित्रपटाच्या अजिबात वाटेला जाऊ नका.

३. सारांशः हा खरा कौटुम्बिक चित्रपट. कधीही पाहिला तरी, माहेरच्या साडीपेक्षा दस पट रडवतो. असे सिमेना पाहिल्यावर, हल्ली जे काही सिनेमा महेश भट काढतो त्याबद्दल त्याचा राग येतो. अर्थ, जमन, सारंश, नाम.... काय पोटॅन्शियल आहे ह्या माणसाकडे. फुकट गेल्यासाचे वाईट वाटते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators