Bsk
| |
| Monday, April 30, 2007 - 10:56 am: |
| 
|
कर्वे रोडला सारस्वत आणि युनायटेड वेस्टर्न बॅंका अगदी पाठोपाठच्याअ बोळात आहेत! मी, एकदा United western चा फॉर्म घेऊन सारस्वत च्या माणसासमोर उभी राहीले होते.. त्याला काही कळतच नव्हतं! आणि मी मनातल्या मनात त्याना हसत होते, काय हे किती बावळटासर्खे वागतायत.. :| शेवटी त्यानी विचारले, तुम्हाला नक्की काय करायचे आहे? ही सारस्वत बॅंक आहे, हा फॉर्म युनायटेड चा दिसतोय! आले बाहेर..जीभ चावत!
|
हा घ्या माझा ताजा ताजा किस्सा. आम्हि moving करत आहोत. त्यासाठि कहि movers सन्गितले होते काल. त्यानी फोन करुन १५ मिनटात येतो पैसे आणि सामान तयार ठेवा सांगितल. नवरा म्हणाला मि एथे थांबतो तु atm मधुन पैसे काढुन ये. आणि मझ्या account मधुन काढ. आमची स्वारी घाइ घाइत पतिराजांच atm card घेउन निघालि. drive in atm मधे गेले card टाकल amount type केलि पण कहिच transaction होइना. बर मागे लोक वाट बघत होती. मग बाहेर येवुन पतिरजांना फोन केला अरे कहितरि गडबड आहे. परत एकदा प्रयत्न करते. मग परत २ वेळा try केल्यावर वरचा message वाचायची बुद्धि सुचली. तिथे "this type of transaction can not be done with this card" असा msg होता. मग card निट पहिल्यवर लक्षात आल कि ते debit card nasun credit card होत......
|
झाली आणि समोर पोलिस............तेवढ्यात मागुन बाबा............काय झाले असेल माझे...............>>>>> वर्हाडी भाषेत याला एक म्हण आहे.. 'जथी गेले लपाले, तथी बसले कापाले.. अर्थ स्वयंस्पष्ट आहे
|
Music
| |
| Tuesday, May 01, 2007 - 8:43 pm: |
| 
|
च्यायला ह. ह. पु. वा. :-))
|
मला टाईप करताना कधी कधी शब्द पुटपुटत टाईप करायची सवय आहे. एकदा माझ्या पासवर्ड चं स्पेलिंग असं मोठमोठ्याने बोलत टाईप करत गेलो होतो! [ ] मला कळेना माझ्या आजूबाजूला इतका शुकशुकाट का झाला अचानक्- ते!!
|
Ultima
| |
| Wednesday, May 02, 2007 - 11:40 am: |
| 
|
(ए. भा. प्र. )पण आजुबाजूच्यांना कस समजल की तु जे काही पुटपुटत होतास तो पासवर्ड आहे??
|
साहजिक आहे, आधी मोठ्ठ्याने 'वाय्-ओ-जी-ई-एस्-एच अंडरस्कोर डी-ए-एम्-एल्-ई' असं जगजाहीर किंचाळल्यावर लोकांचं कुतुहल जागतंच! आणि त्यानंतर 'एन्-ए-एन्-ए-सी-एच्-आय टी-ए-एन्-जी' ऐकलं तर मग विचारूच नका! आता 'नानाची टांग' करु नका, नाहीतर माझ्यापेक्षा श्रेष्ठ वेंधळे ठराल! माझा नवा पासवर्ड आहे.... श्श्श्श!!
|
नेहमिच रेल्वे स्टेशनला रिक्शा ने जातो . काल खुप घाई झालि म्हनुण बाईक कढलि आनि स्टेशन ला पे /पार्क मध्ये लावलि. आणि ट्रेन नि नेहमि प्रमाणे ओफ़िसला गेलो. आणि नेहमिच्या सवयि प्रमाणे रेल्वे स्टेशन वरुन रिक्शा पकडुन घरि गेलो. घारि फ़्रेश होउन जरा फ़िरुन येउ म्हणुन बाईक चि चावि घेऊन खालि आलो पन बाईक जागेवर नवति .लगेच भावाला कोल केला पण त्याने पन बाईक न्हेलि नहि आस सांगित्ल. मलातर घामच फ़ुट्ला वट्ल बाईक गेलि चोरिला. २-३ मिनट काहि सुचच नहि . अग्दि बाईक घेतल्याचा पहिला दिवस पण आठवुन झाला. छाति चे ठोके वाढले होते.वट्ल ६५००० ला बांबु . आणि आता पप्पांना सांगु म्हनुन परत वर चाल्लो होतो.तेवढ्यात शेजार च्या मित्राने विचारल दादा सकाळि बईक घेऊन कुठे गेला होता तेव्हा लक्श्यात आल. लख कन ट्युब पेट्लि आज मि बाईक वर स्टेशला गेलो होतो.खुप घाई झालि म्हनुण बाईक कढलि आनि स्टेशन ला पे /पार्क मध्ये लावलि होति. आणि तिथेच विसरलो. आणि........................
|
Music
| |
| Thursday, May 03, 2007 - 4:15 pm: |
| 
|
पोळ्या करायची तशी आता मला सवय झालीये.. परवा सहजच वाटलं की आई कशी पोळी भाजून झाली की gas वर टाकते, टम्म फुगायला तसं करावं पण लक्षातच आलं नाही की इकडे hot plates आहेत फुगरी पोळी सोडाच सगळा धूर झाला ... :-((
|
Runi
| |
| Thursday, May 03, 2007 - 9:27 pm: |
| 
|
म्युझिक, खि खि खि चला म्हणजे मी एकटीच नाहीये असा वेंधळेपणा करणारी, तु पण आलीस तर माझ्या जोडीला.
|
Ajjuka
| |
| Friday, May 04, 2007 - 5:29 am: |
| 
|
काल रात्रीचा ताजा वेंधळेपणा... ललितच्या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सगळी धामधूम आटपून घरी पोचायला दीड वाजला. उद्या केस धुवायचेत म्हणजे झोपायच्या आधी डोक्याला तेल लावायला हवे म्हणून औषधी तेलाची बाटली कप्पा उघडून हातात घेतली. बाटली उघडली, तेल हातावर घेतले आणि मी विचारात पडले... तेलाचा रंग लालसर कसा झाला आणि इतके पातळ कसे काय तेल? मग बाटलीकडे पाह्यलं.. अंबर ( Fossils madhalaa Amber colour ) रंगांचीच बाटली होती पण त्यावर लेबल होतं 'अडुळसा'.
|
कोणी लेन्सेस लावुन specs लावलाय का कधी??? रविवारी बाहेर जायच होत, fridge वर specs ठेवला होता.लेन्सेस लावल्या आणि घाईतच specs पन लावला. निट दिसत का नाही धुरकट दिसतय म्हणुन specs काढला आणि डोळे उघडले..... कोणी सांगेल का smiley कश्या टाकायच्या ते????
|
योगिता,, मी हा उपद्व्यप नवीन चष्मा आणल्यावर केला होता. "मेल्याने नंबरची वाट लावली" असे कौतकोद्गार देखील काढले. पाच मिनिटानी लक्षात आले. डोळ्यात लेन्स आहेत. म्हणून..
|
चला म्हणजे असे उपद्व्याप करणार आणखीही आहे तर कोणी... एकदा तर लेन्स काढताना बोटालाच राहीली आणि कधी नव्हे तो हात चांगले साबण लावुन धुतले. लेन्स लावायला lense case बघितली तर सापडेना. basin मध्ये पण बघितल. बाबांकडे हट्ट करुन घेतल्या होत्या लेन्स. शेवटी सापडली एकदाची. लावली लगेच आणि थोड्या वेळाने डोळा चांगला चुरचुरु लागला. म्हटल काहितरी गेल असेल म्हणुन चोळला. तरीही तोच प्रकार.घरी गेल्यावर पाणी यायला लागल. तरी लक्षात येइना. Docctor कडे जाउन check केल तेव्हा कळल लेन्सला infection झाल होत म्हणुन..घरी येउन आई आणि बाबा दोघांच्या तोंडाचे पट्टे सुटले होते.. ३ महिने लेन्सेस लावायची हिम्मत होत नव्हती.. आता लावते पण जपुनच...
|
Zakasrao
| |
| Friday, May 04, 2007 - 11:37 am: |
| 
|
बाळ नितीन आता थोड शुद्ध लिहि. हे अस वाचायला त्रास होतो शिवाय ह्यातुन खुप वेगळे अर्थ निघतात. तुच वाचुन बघ परत एकदा कस वाटतय.
|
योगीता... वरती वाच, माझ्या लेन्सचे भरपूर किस्से आहेत. जेव्हा लेन्स घेतली तेव्हा आई म्हणाली "तेन दिवसही नीट सांभाळणार नाहीस" पण तरी वर्षभर सांभाळल्या. आणि मागच्या शनिवारी एक हरवली. आता नवीन आणून डोळ्यात स्थानापन्न केल्या आहेत.
|
Zakki
| |
| Friday, May 04, 2007 - 1:54 pm: |
| 
|
'अडुळसा?!' म्हणजे काय? किंवा कोण? हे असले लेबल पाहून मला तरी काऽही बोध होत नाही! कदाचित् तेलाचा ब्रॅंड अडुळसा असेल असे समजून मी ते माझ्या डोक्यावर जे काय चार दोन केस शिल्लक आहेत त्यांना लावले असते! नाहीतरी तेलाचा नि माझा संबंध कधी येतो?
|
Disha013
| |
| Friday, May 04, 2007 - 3:37 pm: |
| 
|
हा मी काल केलेला वेंधळेपणा.मी रोज मझ्या मुलाला शाळेतुन आणायला जाते. जाता जाता घरातील कचरा पण फ़ेकुन देते.कालही कचरा घेवुन निघाले आणि कचर्याची बॅग फ़ेकायचे विसरुन गेले!! अर्धे अंतर गेल्यावर लक्षात आले.मग काय,फ़िरले परत!
|
Chyayla
| |
| Friday, May 04, 2007 - 10:55 pm: |
| 
|
फुगरी पोळी सोडाच सगळा धूर झाला ... :-(( म्युजिक म्हणजे लग्नाची तयारी जोरात सुरु आहे, हो स्वयम्पाक नको का यायला... सासरी जाताना माहेरचा Fire Extinguisher नक्की घेउन जा ह... मी रोज मझ्या मुलाला शाळेतुन आणायला जाते. जाता जाता घरातील कचरा पण फ़ेकुन देते बापरे दीशा मी तर काही भलताच विचार करायला लागलो होतो , मग पुढची पोस्ट वाचली आणी सुटकेचा निश्वास सोडला...
|
Ajjuka
| |
| Saturday, May 05, 2007 - 6:47 am: |
| 
|
अडुळसा माहित नाही? अहो ते एक खोकल्यावर उपयोगी पडणरी आयुर्वेदीक रसायन आहे. जे आमच्या भारतात बरेच प्रसिद्ध आहे...
|