|
Zakasrao
| |
| Friday, April 13, 2007 - 4:49 am: |
| 
|
शिवणक्षेत्रात तेवढी प्रगती नाही.. (दोर्यात सुई ओवता येत नाही.. )  डीजे मंगल कार्यालय>>>> रुणी तेवढ्यातल्या तेवढयात खेचुन घेतलस ना.
|
अगदी बरोबर.. सुयोग म्हणजे मंगल कार्यालयच डोळ्यासमोर येतं...
|
Chyayla
| |
| Friday, April 13, 2007 - 6:31 am: |
| 
|
तो रात्री भुतासारखा काम करतो आणि दिवसा झोपतो. झक्की... एकदम बरोबर मी आजकाल खरेच रात्री काम करतोय त्यामुळे देशी म्हणतो तसे डे-ड्रीमीन्ग पण आलच ना... अरे मित्रान्नो स्वप्ने बघत जा स्वप्ने खरी होतात... जा झोपा. भुतासारखा... म्हणजे भुते पण भयन्कर्-ईब्लिस असतात वाटत. च्या, धन्यवाद! माझ्या बद्दलचा तुमचा अंदाज ९९% बरोबर अहे म्हणजे तुम्ही खरर्ररच शिवरायान्सोबत गड्-बीड जिन्कण्यात व्यस्त होत्या? एक गड आम्हाला पण द्या ना. दीपाली The Paali अरे बापरे या मायबोलीवर अजुन किती पाली आहेत कुणास ठाउक.
|
च्यायला.. पालीचा विषय नको काढूस.. म्हणजे मला भिती नाही वाटत पण मुली उगाचच ई.... करून किंचाळतात. मला पाल पकडता येते आणि एकदा अशीच रूममेटच्या बेडवर पकडून टाकली होती.. (तांडव नृत्याचे काही प्रकार तिने दाखवलेले अजून स्मरणात आहेत... )
|
Suvikask
| |
| Friday, April 13, 2007 - 7:28 am: |
| 
|
bsk हे " dsk" toyota सारखं वाटतं गोबु - "कोबु" सारखा वाटतो चाफा - "चापा रे" अस सांगणारा कुणीतरी डोळ्यासमोर येतो झकासराव - "भकास" पणे फिरत आहे असे वाटते. झक्की यांचे काहीच "नक्की" नसते. बी कुठेतरी वा-यावर उड्णारी बी (पांढरी म्हातारी) आठवते. नंदीनी बंदीनी असल्यासारखी वाटते. निकाशी सतत आकाशी बघत असल्यामुळे निकामी झाली आहे असे वाटते रुनी जुनी झाल्यासारखी वाटते इंद्रधनुष्य धनुर्वाताचा रुग्ण भ्रमर विहार, फुलपाखरु निरुद्देश भटकणारे चला सगळ्यांनी कृपया दिवे घ्या...
|
नंदीनी बंदीनी असल्यासारखी वाटते>>>>>>>>>>>>> हे आता पर्यंतचे सर्वात विनोदी वाक्य.. मला स्वप्नातही कुणी बंदिनी करायचे धाडस करणार नाही.. आणि केलेच तर मग त्याची..... वाट...
|
Nkashi
| |
| Friday, April 13, 2007 - 9:43 am: |
| 
|
परकर्-पोलक्यातली, मोठे मोठे डोळे करुन बघणारी, सतत घरभर लुडबुड करणारी मुलगी डोळ्यासमोर येते. ही ही ही माझे घरभर लुड्बुड करण्याचे दिवस निघुन गेले आहेत... आता काही महिन्यानी / वर्षाने माझ बाळ लुड्बुड करायला लागेल...
|
मायबोलीवरील समस्त महिला वर्गाची माफ़ी मागुन... आरती, भक्ती, पुजा... देव्हार्यातील समई समान... पुर्ण भक्तीभावात लीन, अध्यात्माची आवड असणार्या... काही अपवाद वगळता ऋजुता, श्रुती... दादाकडून नेहमी हक्काने हट्ट पुरवून घेणारी छोटी लाडकी बहीण अपुर्वा... अखंड बडबड करणारी, मुलांचे खेळ खेळणारी, प्रत्येक गोष्टीत हिरहिरीने भाग घेणारी, चपळ, चंचल... नंदिनी... चमचा लिंबू स्पर्धे ऐवजी चुकून सुई दोरा स्पर्धेत नाव घोषीत झाल्यावर "मी नाय खेळणार जा" या अविर्भावात रुसुन बसलेली ऐश्वर्या राय... (ऍश बेबी हम दे चुके सनम मधली नंदिनी) Neelu_N ... सुरवातीला आणि अजुनही शेवटच्या N मुळे हा ID मला मुलाचा वाटतो. एक लाडावलेली नीलू चटकन डोळ्यासमोर उभी रहाते... सगळ्यांची मनधरणी करणारी... चॉकलेट खाणारी व कव्चीत प्रसंगी देणारी... रुपाली, अंजली, दिपाली, श्यामली... या पाली जमातीलत्या सगळ्या मुली कुठेतरी डोंबिवली, कांदिवली, बोरिवली, आंबिवली, दोलवली अश्या किचकट ठिकाणी रहात असणार असा माझा ठाम विश्वास आहे... पाली जश्या भक्षाच्या शोधात असतात तश्या या मुली नेहमी डबा दबा धरुन बसलेल्या असतात अशी माझी पक्की धारणा आहे... गौरी म्हंटलं की गौरी गणपती आठवतात... ही मुलगी दिसायला, वागणूकीला फ़ार सोज्वळ असणार... हीचा होणारा किंवा असलेला गणपती हा लंबोदरच असणार... गौरी हे आवडत्या नावापैकी एक संघमित्रा... दुरचित्रवाणी वर सातच्या बातम्या देणारी महीला... गोलमटोल चेहर्याची, चमिष्ट सन्मी TIL गं स्मीता... चेहर्यावर सदा समधानी भाव आणि मंद हास्य विलसत असलेली. भावना, संगीता, हेमा, लता... सुरेल, सुमधुर असणारच... वाद्यवृद मधे गाणार्या गाईका वाटतात... दक्षा... भावनाने एका GTG वृतांतात दक्षाचे वर्णन करताना म्हटले होते... "खळखळणारा झरा" त्यावर किरूची शंका "तुला झरा म्हणायचं की धबधबा" दक्षा म्हणजे जागृत, स्वाभिमानी, कर्तबगार व्यक्तीमत्व... कोणाचीही विकेट काढण्यात सराईत असलेल्या वकीलीणबाई... मृणमई, मंजिरी... अहाहा... कानाला गुदगुल्या झाल्या.... तालबद्ध नाव... सुगम संगीताच्या कार्यक्रमाला बसल्याचे भाव चेहर्यावर साठवलेली... मनी संगीत प्रेमी तर आहेच गळ्यातही गोडवा आहे. अमी... कमी तिथे अमी... खी खी खी... भोळी भाबडी, निरागस... परिक्षेला जाणारी मुलगी, शिरावर पृथ्वीचा पुस्तकांचा भार सांभाळणारी... मनिषा लिमये... शाळेतली मुख्याध्यापिका असव्यात असे काहीसे वाटले होते... हीला प्रश्ण का पडतात हाच एक मोठा प्रश्ण आहे... मायबोलीवर प्रश्णमंजुषा नावाने प्रसिद्ध सखी... फ़क्त वपुंचीच... हुषार, हजरजबाबी, खेळकर, मनमिळावु, एकटी, रसिकमय. पुनम, सुमन, कुसुम... बागेतून फ़ेरफ़टका मारून आल्याचा भास होतो... या मुली त्यांच्या समंजसपणामुळे संसारात उत्तम प्रगती करत असणार... सरीता, नम्रता... जन गन मन मधील नद्यांची नावे... विषय एक बोलणे भलतेच.... एकंदर वायफ़ळ चर्चा करण्यात दिवस घालवणार्या बायका... पार्वती, लक्ष्मी, तुलसी... सांगायला हवे का... केकता कपुरची मालिका... सुविकस्क... बाईमाणूस... I mean बाई की माणूस? की धनुर्वाताच्या रुग्णाची सुशृषा करणारी नरस बाई... रुनी... मागच्या जन्माचे कसले तरी ऋण फ़ेडण्यासाठी किवा आयुष्यभर कोणाचे तरी ऋणी राहण्यासाठी जन्माला आलेली असावि... स्वभावाने नम्र, शांत, स्वतःचे दुःख लवपुन सगळ्यांना हसवाणारी... कशी... नऊवारीतील काशीबाई, कपाळावार कुंकवाचा चंद्र मिरवणारी, करारी मुद्रा धारण केलेली खेडवळ स्त्रीची प्रतीमा डोळ्यासमोर उभी रहाते. सावनी, पावनी... ब्युटी पार्लरचा बोर्ड किंवा व्यवसाय असावा... गुज्जू किंवा सिंध्याची गोलमटोल बायडी प्रिया, प्रिती, सोनल, सोनाली... या नावाच्या फ़टाकड्या फ़क्त Call Centre किंवा Spam Mail शिवाय प्रत्यक्षात कुठेच अस्तित्वात नसाव्यात... फ़ुलपाखरू... छान ID दिसते... तुषार जोशीची कविता आठवली सुवर्णाच्या कांतीला चंदनाचा गंध मिनाक्षी नेत्र लांब पापण्यात बंद... तुझ्या कमानदार भुवयांच्या शरसंधनाने सांग या फ़ाटलेल्या कलिजाला शिवु कशाने... तुझा अटकर बांधा करतो फ़ारच वांदा जुळेल का ग सखे प्रतीचा सांदा... BSK ... कॅन्सर पडीत रुग्णांसाठी झटणारी संस्था किंवा DSK विश्व घरला घरघरपण देणारी माणसं... TIL गं Supermom ... स्वतःच्या मुलांना धाकात ठेवणारी आणि दुसर्यांच्या कारट्यांचा उद्धार करणारी... जगाची काळजी करणारी... TIL गं अज्जुका, अनुजा, निरजा... या नावाने कादंबरी छापली तर नक्कीच प्रसिद्धी मिळेल... कलात्मकता ही नावात आहेच... creative mind असणार. प्रिन्सेस... घोडा राजकुमार सगळेच एकामागोमाग धुरळा उडवुन गेले... पण का कोण जाणे मला आठवते ती प्रभू रामचंद्रांना पाहुन लाजलेली आणी नजर खाली घालुन त्यांना वरणारी सीता... हिंदुहृदय सम्राट, लाडु सम्राट, चिवडा सम्राट असेच काहिसे भडक तडक व्यक्तीमत्व... जयमहाराष्ट्र!!!
|
इन्द्रा... हसून हसून वाट लागली. समस्त मायबोली महिलाचा उद्धार केलायस.. भेटच तू मला आता बघते तुला..
|
Pendhya
| |
| Friday, April 13, 2007 - 12:52 pm: |
| 
|
मायबोलीवरील समस्त महिला वर्गाची माफ़ी मागुन... >>>>>>>>> हे बरय! सौ चुहे खाके, बिल्ली हज को चली. ************ **** त्या ईंद्राला, " बिल्ला हज को चला " असं म्हणून सतावू नका रे.
|
Bsk
| |
| Friday, April 13, 2007 - 12:59 pm: |
| 
|
बापरे!! अशक्क्य विनोदी लिहीलयस इन्द्रा..  कॅन्सर पडीत रुग्णांसाठी झटणारी संस्था किंवा DSK विश्व घरला घरघरपण देणारी माणसं>>>   कॅन्सरपीडीत साठी संस्था!! lol...
|
इंद्रा, तु भेटच जिटीजीला... तुझ्य तंगड्या, हात, डोके सगळच मोडते की नाही ते बघ आत्ता....
|
Ultima
| |
| Friday, April 13, 2007 - 2:29 pm: |
| 
|
इन्द्रा... खरच रे हसुन हसुन    अशक्य आहेस तु!!!....... आता लवकरच तुमच्या गिरणगावत महिला मोर्च्या येणार बहुतेक......
|
Chyayla
| |
| Friday, April 13, 2007 - 3:56 pm: |
| 
|
झकासराव - "भकास" पणे फिरत आहे असे वाटते. झक्की यांचे काहीच "नक्की" नसते. बी कुठेतरी वा-यावर उड्णारी बी (पांढरी म्हातारी) आठवते. इंद्रधनुष्य धनुर्वाताचा रुग्ण सुविकास्क... एकदम मस्त, जबरदस्त.... माहोल.. खास करुन इन्द्रधनुश्य धनुर्वाताचा रुग्ण...    इंध. ना.. तु आगीत इन्धन घालुन गेलास.. आता भरले म्हणायचे तुझे दीवस, महिलान्चा मोर्चा येणार हे नक्की... रेडियोवर फ़ोटोसकट तुझी बातमी येणार की गिरणगावात महिला मान्-अवमान प्रकरणी इन्द्रधनुश्याला महिलान्नी बदडले... माझी पुर्ण सहानुभुती आहे हो
|
Runi
| |
| Friday, April 13, 2007 - 4:27 pm: |
| 
|
लाडु सम्राट, चिवडा सम्राट असेच काहिसे . जयमहाराष्ट्र!!! संघमित्रा... दुरचित्रवाणी वर सातच्या बातम्या देणारी महीला.>>> सुविकासके आणि इंद्रा अशक्य आहात तुम्ही. तुमच्या सगळ्यांची कल्पनाशक्ती ईतक्या वेगवेगळ्या आणि भन्नाट प्रकारे चाललेली बघुन खुपच मजा येतेय वाचायला. आणि मी तसे बसल्या बसल्या visualise करतेय आणि एकटीच हसतेय
|
Princess
| |
| Saturday, April 14, 2007 - 4:00 am: |
| 
|
आपल्याला नाही बा असे वाटत की इंद्राने चुकीचे लिहिलेय... साक्षात सीतेची उपमा मिळालीये. इंद्रा, मी नाही रे येणार त्या मोर्च्यात माझे खरे नाव आणि मायबोलीवरचा id दोन्हीबद्दल लिहिलेले आवडले. खरय की नाही ते सांगेन नंतर
|
Sakhi_d
| |
| Saturday, April 14, 2007 - 4:19 am: |
| 
|
इन्द्रा मस्तच लिहिले आहे.... ह. ह. पु. वा. मी पण नाही येणार मोर्चात.... कारण तु बरोबर लिहिले आहेस. तुम्ही सगळे अशक्य आहात... एक मात्र नक्कि नंदिनीला बंदिनी नाही कोणी करु शकत...
|
Zakasrao
| |
| Saturday, April 14, 2007 - 4:39 am: |
| 
|
इन्द्रा      आता मात्र तु खरोखर धनुर्वाताचा रुग्ण होशील. मोर्चात सापडालास की. ह्यावर उपाय एकच कोणा धनु राशीवाल्याला जेवु घाल. बोल कधी येवु खायला? रुप्स अस म्हणु नये. त्या नन्दिनीने अस म्हणल आणि...... पेन्ध्या बिल्ला... च्यायला त्या सुविकासक ने तुझ्याविषयी काही लिहिल नाही म्हणून काय...... बरं सुविकासक बरे लिहिता तुम्ही. त्यातील इन्द्र आणि bsk यांची प्रतिमा पटली बाकीचे नाही.
|
ईंद्रा, जुई या ID बद्दल आपला काय अभिप्राय? अरे अरे हेल्मेट आणायला का पळतो आहेस असा?
|
>>>ईंद्रा, जुई या ID बद्दल आपला काय अभिप्राय? भ्रमा... माझी कल्पनाशक्ती अचानक खुंटु लागली आहे रे... डोळ्यासमोर तारे चमकू लागेले रे... दोन पायाच्या मारकुट्या म्हशी हातात लाटणी, वरवंटा, पाटा (पाटा cancel नाही झेपायचा) घेऊन माझ्या दिशेने आगेकुच करत आहेत... झकासच्या फ़टफ़टिवरील हेल्मेट डोक्यात घालण्याच्या प्रयत्नात झकासचा एक कलिंगड वाया गेलायं
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|